Skip to main content

लोकसभा निवडणूक निकाल २०१९

वामन देशमुख यांनी या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो! यावर्षीची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खूपच चुरशीची झाली आहे आणि आज या निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे. वेगवेगळ्या संस्थांनी एग्झिट पोलच्या माध्यमातून आपापले अंदाज वर्तवले आहेत. ते कितपत खरे ठरतात याची उत्सुकता आहे. संदर्भासाठी ते अंदाज इथे देत आहे. Poll_of_Polls https://images.indianexpress.com/2019/05/national.jpg सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि हळूहळू चित्र स्पष्ट होत जाईल. या निकालासंबंधीची चर्चा, अपडेट्स, बातम्या यांसाठी हा धागा सुरु करत आहे.
उगा काहितरीच

निकाला कोणत्या साइटवर व्यवस्थित पहायला मिळेल ? गूगल च्या होमपेजवर (election live update) असं टाकल्यावर जे दिसतंय त्यात सगळे पक्ष आहेत , मोबाईल वरून पहायला थोडं अवघड आहे. त्यापेक्षा NDA , UPA ,Other असं पाहिजे सरळसरळ.
23/05/2019 - 08:08 Permalink
वामन देशमुख

In reply to by प्रसाद_१९८२

बरोबर आहे, निवडणूक आयोगाच्या साइटवर अधिकृत माहिती मिळेलच, तिथे घोषित निकाल दिसतील पण कदाचित निकालपूर्व कल दिसणार नाहीत. https://results.eci.gov.in
23/05/2019 - 08:42 Permalink
वामन देशमुख

In reply to by वामन देशमुख

क्षमा करा, निवडणूक आयोगाच्या या साइटवर निकालांचा कलदेखील उपलब्ध आहे. https://results.eci.gov.in/pc/en/partywise/index.htm
23/05/2019 - 10:10 Permalink
वामन देशमुख

BTW, लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांवर निवडणूक होत आहे. तामिळनाडूतल्या वेल्लोर या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात रोख रक्कम सापडल्यामुळे एप्रिल महिन्यातच तेथील निवडणूक रद्द करण्यात आली होती.
23/05/2019 - 09:18 Permalink
वामन देशमुख

BTW, लोकसभा निवडणूकांसोबतच आंध्रप्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणूकादेखील होत आहेत. तेथील स्थिती याप्रमाणे - आंध्रप्रदेश - १०१/१७५ (सत्ताधारी) तेलुगु देशम - १२ वाइएसाआर काँग्रेस - ८८ इतर - १ ओडिशा ४३/१४६ - (सत्ताधारी) बिजद - ३० भाजप - १० अरुणाचल प्रदेश ११/६० - (सत्ताधारी) भाजप - ९ इतर - २ सिक्कीम ६/३२ - (सत्ताधारी) सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट - २ सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा - ४
23/05/2019 - 10:27 Permalink
वामन देशमुख

महाराष्ट्रातील हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील काँग्रेसच्या सुभाष वानखेडेपेक्षा आघाडीवर आहेत. शिवसेना सोडल्यापासून सुभाष वानखेडे यांचं नशीब काही ठीक दिसत नाही. २०१४ साली भाजपात असताना ते कॉंग्रेसकडून हरले आणि आता काँग्रेस मध्ये राहून बहुदा शिवसेनेकडून हरतील.
23/05/2019 - 10:36 Permalink
वामन देशमुख

In reply to by विजुभाऊ

बारामतीत सुप्रिया सुळे यांची २५ हजाराहून अधिक मतांची आघाडी मावळात शिवसेनेचे यांची 80000 मतांची आघाडी साताऱ्यात उदयनराजे भोसले ८००० आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे रामसिंग कोल्हे हे १३००० ने आघाडीवर. तथापि, यात मला व्यक्तिशः धक्कादायक काही दिसत नाहीय, काही चुकतंय का?
23/05/2019 - 10:54 Permalink
वामन देशमुख

महाराष्ट्रात २०१४ साली काँग्रेसची लाज राखणारे दोन लोकसभा मतदारसंघ म्हणजे नांदेड आणि हिंगोली. यापैकी हिंगोलीत शिवसेना आणि नांदेडात भाजप थोडीशी आघाडीवर अशी सद्यस्थिती आहे. नांदेडात अशोक चव्हाणांना भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे टफ फाईट देत आहेत.
23/05/2019 - 10:41 Permalink
वामन देशमुख

सध्यातरी तीन आकडी संख्या गाठणारा एकमेव पक्ष भाजप आहे. दोन आकडी संख्या गाठणारे पक्ष - शिवसेना, काँग्रेस, बसपा, बिजू जनता दल, जदयु, तृणमूल काँग्रेस, डीएमके, आणि वाइएसआर काँग्रेस पक्ष.
23/05/2019 - 11:05 Permalink
चौकटराजा

योगेंद्र यादव याचे भविषय - मोदी लाट असेल प्रकाश आंबेडकर यांची भीती - काँग्रेस दुभंगेल .. ( गांधी घराण्याची हाकालपट्टी होईल ?)
23/05/2019 - 12:02 Permalink
गड्डा झब्बू

महाराष्ट्र कॉंग्रेसमुक्त होण्याच्या मार्गावर. भाजप २४ शिवसेना १९ कॉंग्रेस ० राष्ट्रवादी ४ इतर १ चित्र आशादायक आहे.
23/05/2019 - 12:15 Permalink
गड्डा झब्बू

In reply to by प्रसाद_१९८२

भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी ४८ हजार मतांनी आघाडीवर
23/05/2019 - 13:27 Permalink

जबरी, अर्बन नक्षलवादी व कथित हिंदू दहशतवाद निर्मात्याला सोलापूरकारांनी घरचा रस्ता दाखवला हे एक बरे झाले.
23/05/2019 - 13:48 Permalink
महासंग्राम

In reply to by यशोधरा

पुन्हा सुरु झालीये मोजणी. गिबा ९५,००० मतांनी आघाडीवर आहेत सध्या मावळात श्रीरंग बारणे विजयी, पवार घराण्यात पार्थ पवारांच्या रूपाने पहिला पराभव
23/05/2019 - 14:37 Permalink
mrcoolguynice

भारतात मोदी सलग दुसऱ्यांदा जिंकल्याप्रमाणे , तिकडे डॉनल्ड ट्रम्प देखील दुसरी टर्म जिंकू शकतात, असे भाकीत करायला हरकत नाही.
23/05/2019 - 14:23 Permalink
मी चिमुर कर

महाराष्ट्रात बवंआ ने कांग्रेस ची मते मिळवून निकालात फरक पाडला मतांची बेरीज करतांना कांग्रेस ने ही मत मोजलीच नाहीत अन्यथा महाराष्ट्रात थोडा निकाल वेगळा असता
23/05/2019 - 14:44 Permalink
सोन्या बागलाणकर

तथाकथिक मराठी लोकांच्या कैवाऱ्यांचा "लाव रे तो विडिओ" काही कामास आला नाही. आता त्यांना स्वतःच ते विडिओ बघून टाइमपास करायची वेळ आली.
23/05/2019 - 15:11 Permalink
गड्डा झब्बू

तमाम फुरोगामी आणि सिक्युलर लोकांनी ज्याला पाडण्यासाठी आकाशपाताळ एक केले त्याला जनतेने भक्कम पाठबळ देऊन पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून दिले. श्री नरेंद्र मोदींना पंतप्रधानकीच्या दुसऱ्या टर्मसाठी भरघोस शुभेच्छा!!! हर हर मोदी! घर घर मोदी!!
23/05/2019 - 17:05 Permalink
ट्रम्प

1 ) राज ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश !!!!! मनसे सारखीच केली काँग्रेस व राष्ट्रवादी ची अवस्था !!!! 2 ) नागरिक शास्त्रात हे शिकलो होतो की सगळे खासदार मिळून पंतप्रधान बनवतात. पण 2019 मध्ये एका पंतप्रधानाने सगळे खासदार बनवलेत. 3 )रुझानों के अनुसार इस समय राहुल गांधी सबसे आगे चल रहे हैं... और कांग्रेसी लठ लेकर उसके पीछे !!!!!
23/05/2019 - 19:33 Permalink
भीमराव

तुला नाही मला नाही, घाल MIM ला. खैरे ठासुन आले असते, पण हिंदू मत जाती मधे अडकलं आणि जे झालं ते असं झालं.
23/05/2019 - 20:51 Permalink
माईसाहेब कुरसूंदीकर

ते माजी संपादक व खासदार कुमार केतकरही आज दिसत नाहीत चानेल्सवर . कदाचित त्याना उद्या "व्यापक कटा'चा वास येईल. असो. निखिल वागळे, मोदी परत निवडून आल्याने 'मला एक वेगळीच अनामिक भिती वाटू लागली आहे" असे मुलाखतीत म्हणाले.
23/05/2019 - 22:05 Permalink
सोन्या बागलाणकर

सु श्री मायावती ताईनी evm रडगाणं आळवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या दाव्याप्रमाणे मुद्दाम evm काही ठिकाणी छेडछाड न करता ठेवण्यात आली ज्यामुळे असे वाटावे कि evm मध्ये घोटाळा नाहीये. *टाळ्या*
24/05/2019 - 04:03 Permalink

त्यापेक्षा मोदींच्या विजयाची मीमांसा करणारा धागा निघावा. ते जास्त आवश्यक आहे, त्यातून शिकण्यासारखे देखील बरेच असेल.
24/05/2019 - 06:06 Permalink
चौकटराजा

एम आय एम नावाचा मुसलीमांचा पक्ष व दलितामधील एक गट प्रकाश आंबेडकर गट यांना १२ जागा हव्या होत्या त्या बदल्यात ते आपल्या पूर्ण पाठिंबा आघाडीला देणार होते. आघाडीने त्यांना धुडकावून लावल्यावर त्यांनी विधान सभेची पूर्व तयारी म्हणून सर्व ४८ जागा लढवल्या . पैकी ३० ठिकाणी त्यांना काहीही महत्व नाही असेच दिसत आहे. ९ ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केल्याने निकालात फरक आलेला आहे. ७ ठिकाणी ते तिसर्या नंबरला देखील नव्हते. १२ जागी दलित व मुसलमान मिळून ५५ टक्के मतदार आहेत असा आंबेडकर यांचा दावा होता . त्यामुळे तेथे आम्हाला महत्व आहे असे त्यांचे म्हणणे . अर्थात ते निवडून न आल्याने उघड आहे ममुसलीम व दलित मते आघाड़ीला पडली. प्रकाश आंबेडकरांनी अकोल्याची जागा मुसलीम माणसाला आघाडीसाठी सोडली असती व त्या बदल्यात शिंदेंचा सोलापुरातील पत्ता काटून ती जागा स्वतः: साठी मिळविली असती आता एका जागेचा जरी समझोता केला असता तर या दोन्ही जागा भाजपा ला मिळाल्या नसत्या . पण.......
24/05/2019 - 09:47 Permalink
mrcoolguynice

In reply to by चौकटराजा

माझ्या वैयक्तिक मते... अंबेडकराना (राज ठाकरे यांचा प्रमाणे) लोकसभा ही प्रीलीम परिक्षे सारखी द्यायची होती. त्या दोघाँची नज़र येनरया बोर्डाच्या ( विधानसभे) कड़े आहेत. आता ज़ेव्हा हाँ लोकसभेचा धुरला ख़ाली बसेल, आणि यूनिट बाय युनिट , मत डिस्ट्रीब्यूशब समजेल, तेव्हा ते व हे आपपले पत्ते खोलतिल.
24/05/2019 - 11:33 Permalink