Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वामन देशमुख on गुरुवार, 05/23/2019 - 06:09
नमस्कार मिपाकरहो! यावर्षीची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खूपच चुरशीची झाली आहे आणि आज या निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे. वेगवेगळ्या संस्थांनी एग्झिट पोलच्या माध्यमातून आपापले अंदाज वर्तवले आहेत. ते कितपत खरे ठरतात याची उत्सुकता आहे. संदर्भासाठी ते अंदाज इथे देत आहे. Poll_of_Polls https://images.indianexpress.com/2019/05/national.jpg सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि हळूहळू चित्र स्पष्ट होत जाईल. या निकालासंबंधीची चर्चा, अपडेट्स, बातम्या यांसाठी हा धागा सुरु करत आहे.
  • Log in or register to post comments
  • 26514 views

प्रतिक्रिया

Submitted by NiluMP on गुरुवार, 05/23/2019 - 23:23

Permalink

एकच पक्ष सर्व जागा जिकल्या तर

एकच पक्ष सर्व जागा जिकल्या तर काय होते/होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by सोन्या बागलाणकर on Fri, 05/24/2019 - 04:03

Permalink

सु श्री मायावती ताईनी evm

सु श्री मायावती ताईनी evm रडगाणं आळवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या दाव्याप्रमाणे मुद्दाम evm काही ठिकाणी छेडछाड न करता ठेवण्यात आली ज्यामुळे असे वाटावे कि evm मध्ये घोटाळा नाहीये. *टाळ्या*
  • Log in or register to post comments

Submitted by सोन्या बागलाणकर on Fri, 05/24/2019 - 04:04

Permalink

काँग्रेसचा १७ राज्यांमध्ये

काँग्रेसचा १७ राज्यांमध्ये धुव्वा! आता तरी काँग्रेस नेत्यांना अक्कल येईल हि अपेक्षा करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 05/24/2019 - 04:55

Permalink

कॉन्ग्रेसला लोकांनी का डावलले

कॉन्ग्रेसला लोकांनी का डावलले - तुमचे मत धागा निघावा.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Fri, 05/24/2019 - 06:06

In reply to कॉन्ग्रेसला लोकांनी का डावलले by कंजूस

Permalink

त्यापेक्षा मोदींच्या विजयाची

त्यापेक्षा मोदींच्या विजयाची मीमांसा करणारा धागा निघावा. ते जास्त आवश्यक आहे, त्यातून शिकण्यासारखे देखील बरेच असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Fri, 05/24/2019 - 09:23

In reply to त्यापेक्षा मोदींच्या विजयाची by आनन्दा

Permalink

मग आपणच काढा की धागा

मग आपणच काढा की धागा
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Fri, 05/24/2019 - 20:35

In reply to मग आपणच काढा की धागा by रणजित चितळे

Permalink

सध्या वेळ नाही, हंगाम चालू

सध्या वेळ नाही, हंगाम चालू आहे.. मग लिहायचा विचार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 05/24/2019 - 09:47

Permalink

वंचित बहुजन आघाडी

एम आय एम नावाचा मुसलीमांचा पक्ष व दलितामधील एक गट प्रकाश आंबेडकर गट यांना १२ जागा हव्या होत्या त्या बदल्यात ते आपल्या पूर्ण पाठिंबा आघाडीला देणार होते. आघाडीने त्यांना धुडकावून लावल्यावर त्यांनी विधान सभेची पूर्व तयारी म्हणून सर्व ४८ जागा लढवल्या . पैकी ३० ठिकाणी त्यांना काहीही महत्व नाही असेच दिसत आहे. ९ ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केल्याने निकालात फरक आलेला आहे. ७ ठिकाणी ते तिसर्या नंबरला देखील नव्हते. १२ जागी दलित व मुसलमान मिळून ५५ टक्के मतदार आहेत असा आंबेडकर यांचा दावा होता . त्यामुळे तेथे आम्हाला महत्व आहे असे त्यांचे म्हणणे . अर्थात ते निवडून न आल्याने उघड आहे ममुसलीम व दलित मते आघाड़ीला पडली. प्रकाश आंबेडकरांनी अकोल्याची जागा मुसलीम माणसाला आघाडीसाठी सोडली असती व त्या बदल्यात शिंदेंचा सोलापुरातील पत्ता काटून ती जागा स्वतः: साठी मिळविली असती आता एका जागेचा जरी समझोता केला असता तर या दोन्ही जागा भाजपा ला मिळाल्या नसत्या . पण.......
  • Log in or register to post comments

Submitted by mrcoolguynice on Fri, 05/24/2019 - 11:33

In reply to वंचित बहुजन आघाडी by चौकटराजा

Permalink

माझ्या वैयक्तिक मते...

माझ्या वैयक्तिक मते... अंबेडकराना (राज ठाकरे यांचा प्रमाणे) लोकसभा ही प्रीलीम परिक्षे सारखी द्यायची होती. त्या दोघाँची नज़र येनरया बोर्डाच्या ( विधानसभे) कड़े आहेत. आता ज़ेव्हा हाँ लोकसभेचा धुरला ख़ाली बसेल, आणि यूनिट बाय युनिट , मत डिस्ट्रीब्यूशब समजेल, तेव्हा ते व हे आपपले पत्ते खोलतिल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com