Skip to main content

कलेवराचा उत्सव?

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 06/10/2015 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ता मधे प्रकाशित झालेल्या 'कलेवराचा उत्सव' या लेखाच्या लेखकास हे पत्र. यातील मजकूर कुणा एका व्यक्तीस उद्देशून नसून तो केवळ एक विचार समजावा. नमस्कार, लोकसत्ता चा मी एक नियमित वाचक असून त्यात प्रकाशित झालेला आपला 'कलेवराचा उत्सव' हा लेख वाचला. (http://www.loksatta.com/vishesh-news/rajiv-khandekar-article-1147141/) त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून हा ई-संदेश. आपली कळकळ या लेखातून वाचकांपर्यंत नक्कीच पोचली. आपल्या अनेक मतांशी मी सहमत आहे. तरीही त्याहून अधिक मतांशी मी सहमत नाही. सर्वप्रथम, मी एक संगीतप्रेमी आहे. शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य संगीतापर्यंत सगळे संगीतप्रकार मी ऐकतो, त्यांचा आनंद घेतो. जितकी रशीद खान ची भैरवी काळजात भिड्ते तितकंच एनिग्मा चं 'सॅडनेस' वेडं करतं. आपण आपल्या लेखात संगीत कळण्याचा उल्लेख केलात, त्याबद्दल इतकंच म्हणतो की संगीत कळण्यापेक्षा ते मनाला भावणं अधिक आनंददायी असतं. आपण पायथागोरस, प्लेटो या शास्तज्ञांबद्दल जे म्हणालात त्याबद्दल फारसं ज्ञान नाही, पण ते वाचून संगीताचं गणित, की गणिताचं संगीत हा प्रश्न मात्र खुणावून गेला. त्रासच म्हणायचा तर तो लोकसंख्या, भ्रष्टाचार, प्रदूषण, राजकारण अशा गोष्टींचा जास्त होतो पण मुद्दा ढोल ताशांचा आवाज इथवर असेल तर ही गोष्ट मान्य आहे की त्यांचा आवाज अतिउच्च असल्याने त्याचा त्रास नक्कीच होऊ शकतो, होतो. विशेषतः रुग्णालयं, किंवा लहान मुलं, आपण म्हणालात त्याप्रमाणे पाळीव व इतर सगळेच प्राणी, यांना अतिउच्च आवाजाचा त्रास होऊ शकतो. त्याबद्दल काही म्हणणं नाही, ते खरं आहे. पण म्हणून 'ते संगीत नाही' असं म्हणणं ही अतिशय टोकाची भूमिका आहे. शिवाय त्यात सहभागी होणा-या मुली, त्यांचे पेहराव, त्यांचे मोकळे सोडलेले केस, किंवा बेभान होऊन त्यांचं ढोल वाजवणं, याची तुलना 'डोरा' च्या उपभोगोत्सुकतेशी करणं, हे कोत्या मनाचं लक्षण आहे. एकीकडे इझरा पौंडच्या मते ‘जे संगीत नृत्यापासून दूर जाते ते संगीत नष्ट होण्याकडे वाटचाल करते' असं आपण नमूद करता, आणि ढोल ताशांच्या तालावर मुली थिरकल्या तर त्यांचं थिरकणं आपल्याला उन्मादस्वरूप वाटतं. याचा कृपया विचार करावा. 'बधिरता ही नाचणाऱ्या व वाजवणाऱ्या व्यक्तीची अवस्था नसून आवश्यकता असते', असं आपण म्हणालात. मग भजनात तल्लीन होणारा, शास्त्रीय संगीत ऐकताना डोळे मिटून डोलणारा ही मंडळीही बधीरच म्हणायला हवीत, नाही का? जसं संगीत, तशी त्याची अनुभूती असते. आणि संगीत जरी वैश्विक असलं तरी संगीताची अनुभूती ही पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष बाब आहे असं माझं मत आहे. संगीत ऐकण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कुणी ते कळतं म्हणून ऐकतो, कुणी आवडतं म्हणून ऐकतो, कुणासाठी ते ताण-तणावावरचं औषध असतं तर कुणासाठी ते गोष्टी, माणसं आठवण्याचं किंवा विसरण्याचं माध्यम असतं. संगीतातली फलश्रुती प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते आणि म्हणूनच संगीताचे प्रकारही वेगवेगळे असतात. तेंव्हा अमूक एक वाईट आणि अमूक एक चांगलं असं त्याचं सरसकटीकरण होऊ शकत नाही. मात्र एक सामायिक गोष्ट ही की संगीताचा प्रकार कुठलाही असला तरी संगीतात प्रत्येक जण स्वतःला शोधत असतो. उन्मादाबद्दल म्हणाल तर मान्य आहे की पब संस्कृती, अंधा-या जागेत कानठळ्या बसवणा-या आवाजात नाचणं, पुढे त्या पब संस्कृतीतून दिसणारा तथाकथित उच्चभ्रू समाजाचा ओंगळवाणा चेहरा हा उन्माद आहे. किंबहुना उन्मादाची व्याख्या खूप व्यापक आहे. केलेले नियम न जुमानणं, जिथे तिथे पैशाच्या जोरावर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणं, लग्नसमारंभ, उत्सव अशा प्रसंगी पैशाची बेछूट उधळण, त्याचं प्रदर्शन करणं, समोरच्याला कमी लेखणं, केवळ परवडतंय म्हणून गोष्टींची नासाडी, उधळपट्टी करणं, समाजभावना न जपणं, आपलं तेच खरं करणं, दुस-याला कमी लेखणं, असहिष्णु वर्तन करणं, ही सगळी उन्मादाचीच उदाहरणं आहेत. आणि हा बळावत चाललेला उन्माद ढोलपथकांच्या आवाजापेक्षाही जास्त घातक आहे. सरतेशेवटी, पुन्हा संगीत, बधिरता, अवस्था, आणि डोरा कडे येतो. संगीत, मग ते कुठलंही असो, ऐकताना तुम्ही ट्रान्स मधे जाणं, तल्लीन होणं, किंवा आपल्या भाषेत बधीर होणं, हे ते संगीत तुमच्यापर्यंत पोचल्याचं लक्षण आहे, असं मी मानतो. एखादं गाणं ऐकता ऐकता अचानक अंगावर सर्रकन काटा येतो, तेंव्हा काय होतं हे सांगता येणार नाही. मी स्वतः एका ढोलपथकाचा सदस्य आहे, आणि त्या तालाची, नादाची, संगीताची मजा ही केवळ शब्दातीत आहे हे आग्रहाने सांगेन. ती आपण स्वतः त्याचा भाग होऊन अनुभवल्याशिवाय कळण्यातली नाही. संगीत ही नशा आहे, नक्कीच आहे. त्यामुळे नशेत जसा माणूस झिंगणं ही तात्पुरती अवस्था असते तसाच संगीतात माणूस गुंगणं ही सुद्धा तात्पुरती अवस्था असते. आणि ती स्वाभाविक आहे. कुणाला कुमारजींच्या भामत भैरव रचनेतील ‘ढोल आ बजा ले रे’ ऐकून ती अवस्था मिळत असेल, तर कुणाला स्वतः ढोल वाजवून. प्रत्येकाचं माध्यम वेगळं, पण परिणाम एकच. पण केवळ एखादं संगीत आपल्या लेखी श्रवणीय नाही म्हणून त्याच्याशी संबंधित लोकांबाबत ‘स्वत:ला नसलेल्या लिंगाची इच्छापूर्ती करणारे' असं विचित्र विधान करणं, हे योग्य नाही. आपल्याला आवाजाबद्दल असलेल्या आक्षेपाशी सहमत असलो तरीही एकंदरित आपली मतं पूर्वग्रहदूषित, आणि टोकाची वाटली. विशेषकरून आपण ढोलपथकात असणा-या फक्त मुलींचा वारंवार उल्लेख केलात, तो संकुचित वाटला. आजच्या काळात मुली या मुलांपेक्षा कुठेही मागे नाहीत, ढोलपथकात मुलींपेक्षा दुप्पट संख्येने मुलं असतात, मग आपला आक्षेप प्रत्येकावर समान असायला हवा होता. असो. वर म्हटल्याप्रमाणे निष्प्राण, उन्मादक समाज बघायचा असेल तर तो ढोल पथकांमधे नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूला आहे. त्याविषयी सकारात्मक समाजकार्य होणं गरजेचं आहे, अर्थात तो मुद्दा वेगळा आहे. पण ज्या संगीतात कलेवरातही प्राण ओतण्याची ताकद आहे, त्या संगीतात रमणा-यांचा उत्सव 'कलेवरांचा उत्सव' कसा असू शकतो? यावर आपण जरूर चिंतन करा अशी मी आपल्याला विनंती करतो. ब्लॉग दुवा हा

वाचने 54501
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

In reply to by मोदक

अशानी तर मग कुणीच कुठेच बोलायची सोय रहाय्ची नाही मिपावर.. आपली मतं दुसर्‍याला पटवायची नसतील तर काय करायचं काय नक्की इथे?!!!! ;)

In reply to by पिलीयन रायडर

आपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांनाआपापल्या अकलेचे ढोल वाजवूदेत म्हटलं लोकांना
मस्त. आवडले. हा प्रतिसाद लेखात अ‍ॅडवायचा होता राव. तेवढेच कमी प्रदूषण अकलेंच्या ढोलांचे पण. ;)

In reply to by पिलीयन रायडर

आपली मतं दुसर्‍याला पटवायची नसतील तर काय करायचं काय नक्की इथे?!!!! ;) तुमचा काय अनुभव आहे? ;)

In reply to by पिलीयन रायडर

मले काय ठावे बाबा.. तुझ्या खरडवहीत एकदा एक निरागस जीव ज्ञानकण शिंपडून गेला.. होता ते वाच! ;) ऑन अ सिरीयस नोट, १) "तुम्ही समस्त ढोल वाजवणार्‍यांची बाजू घेवून का प्रतिवाद करत आहात?" २) "तुमचे पथक नियम पाळणारे आहे असे तुम्ही म्हणता आहात.. ठीक आहे. तुम्ही बरोबर आहात तर जगाची काळजी सोडा" २.१) पब्लीक दोन्हीकडून (फक्त) बोलणारच आहे मग कशाला काळजी करा - हे ही एक! हे माझे मुद्दे आहेत. इतकेच. बाकी काही नाही.

In reply to by पिलीयन रायडर

आपली मतं दुसर्‍याला पटवायची नसतील तर काय करायचं काय नक्की इथे?!!!! ;)
अन्हिते मझ्यशि भन्द्न कर्न्र कं? =))

In reply to by मोदक

माझा एक जेन्युईन प्रश्न; सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्ट सर केल्याचा, सोन्याबापूंनी बुलेट चालवल्याचा, सुचेता कडेठाणकर यांनी गोबीचे वाळवंट चालत पार केले त्याचा लोकाना काही त्रास झाला का?
...तुम्हाला ढोल वाजवायला आवडते.. ते तुमचे पॅशन आहे....
...तुमची आवड सांभाळणे ही तुमची गरज आहे....
बरोबर आहे. पण मुद्दा हा आहे की हे लोकाना त्रास देउन का करता?
व्यायाम, संगीत, गाड्या अशा विषयांवर लेख लिहा.
याला अनुमोदन! या सगळ्या बाजू असलेला माणूस आपल्या ढोल वाजवण्यामुळे ईतराना त्रास होतो त्याबद्दल बेफिकीर कसा काय याच आश्चर्य वाटतं !

In reply to by भाकरी

काय करूया म्ह्णता मग? नियम न पाळणारे लोक्स अस्तित्वात आहे म्हणून नियम पाळणार्‍यांच्याही हक्कांवर गदा आणायची का? तुम्हाला त्रास होतो आहे तर एक वकील पकडा, ढोल-ताशे, डीजे वगैरे अनावश्यक आहे हे तुम्हाला पटले आहेच, ते फक्त कोर्टाला पटवून द्या*. बंदी आणा. त्रास संपेल. हे करणे शक्य नसेल तर जगातल्या तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या अनेक गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे हे मान्य करा - त्रासाची तीव्रता कमी होईल. (*यासाठी गाईडलाईन म्हणून "कोर्टाने रात्री लाऊडस्पीकरला बंदी केली आहे" या केसचा अभ्यास करू शकता.)

In reply to by मोदक

हॉस्पिटलच्या बाहेर ढोल वाजवायचं थांबलं की 'नियम पाळला' असं म्हणायचंय का तुम्हाला? हॉस्पिटलच्या कक्षेबाहेरच्या लोकाना ढोल वाजवण्याचा त्रास होतो तो नियमात बसतो असं वाटतं का तुम्हाला? "ढोल-ताशे, डीजे वगैरे अनावश्यक आहे" नाही तर "ढोल-ताशे, डीजे वगैरेमुळे बाकिच्याना होणारा त्रास अनावश्यक आहे" हे तुमच्या लक्षातच आलेलं दिसत नाहि.
हे करणे शक्य नसेल तर जगातल्या तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या अनेक गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे हे मान्य करा - त्रासाची तीव्रता कमी होईल.
खरंच? त्या लेखात 'कलेवर' शब्द वापरलाय तो अगदी बरोबर वापरलाय - लोकांच्या मनाची कलेवरंच झाल्येत. ढोल-ताशांच्या आवाजावरनंच नाही तर बाकी बर्‍याच ठीकाणी तुझा उपाय अंमलात आणता येईल नाही का? म्हणजे बघ, रस्त्यांवरचे खड्डे, गलिच्छ राजकारण, मोबाईल फोन कंपन्यांकडून मिळणारी भिकार ग्राहकसेवा, वगैरे वगैरे अनेक गोष्टिनी होणार्‍या त्रासाची तीव्रता कमी करायचा सोपा उपाय - आपल्या नियंत्रणाबाहेर आहे हे मान्य करायचं. वा रे मिपाकर!!

In reply to by भाकरी

'नियम पाळणारे' ?? हॉस्पिटलच्या बाहेर ढोल वाजवायचं थांबलं की 'नियम पाळला' असं म्हणायचंय का तुम्हाला? हॉस्पिटलच्या कक्षेबाहेरच्या लोकाना ढोल वाजवण्याचा त्रास होतो तो नियमात बसतो असं वाटतं का तुम्हाला? "ढोल-ताशे, डीजे वगैरे अनावश्यक आहे" नाही तर "ढोल-ताशे, डीजे वगैरेमुळे बाकिच्याना होणारा त्रास अनावश्यक आहे" हे तुमच्या लक्षातच आलेलं दिसत नाहि. तुमच्या प्रत्येक वाक्याची चिरफाड करणारा प्रतिसाद देण्यापेक्षा एक साधा प्रश्न विचारतो. नीट विचार करून उत्तर द्या. तुम्हाला प्रॅक्टीकल सोल्यूशन हवे आहे की नुसते "माझे कोणीतरी ऐकत आहे" याचे समाधान? खरंच? त्या लेखात 'कलेवर' शब्द वापरलाय तो अगदी बरोबर वापरलाय - लोकांच्या मनाची कलेवरंच झाल्येत. ढोल-ताशांच्या आवाजावरनंच नाही तर बाकी बर्‍याच ठीकाणी तुझा उपाय अंमलात आणता येईल नाही का? म्हणजे बघ, रस्त्यांवरचे खड्डे, गलिच्छ राजकारण, मोबाईल फोन कंपन्यांकडून मिळणारी भिकार ग्राहकसेवा, वगैरे वगैरे अनेक गोष्टिनी होणार्‍या त्रासाची तीव्रता कमी करायचा सोपा उपाय - आपल्या नियंत्रणाबाहेर आहे हे मान्य करायचं. वा रे मिपाकर!! मी पुन्हा एकदा सांगतो आहे. अन्याय सहन करू नका. राजकारण वगळता वरच्या प्रत्येक गोष्टीसाठी; (ज्या गोष्टी स्मार्ट क्रायटेरीयामध्ये बसतात) उत्तरे मिळवणे तुमचा हक्क आहे आणि त्यासाठी जास्ती त्रास घ्यावा लागत नाही. तुम्हाला जेन्यूईनली उत्तरे हवी असतील तर माझाच एक धागा आहे.. त्यावर लिहा. मिपाकर नक्की मदत करतील. (बाकी वैयक्तीक भागाकडे आत्ता दुर्लक्ष केले आहे. पुढच्या वेळी तुम्हाला याच टोन मध्ये उत्तर मिळाले तर चालेल असे गृहीत धरत आहे.)

In reply to by मोदक

सोल्यूशन हवंय. प्रॅक्टिकल सोल्यूशन = हा त्रास सहन करा कींवा त्या दिवसात पुण्यात राहू नका कींवा घर घेताना हमरस्त्यावचं घेउ नका अशा प्रकारचं असेल तर ते आत्ताही आहेच की. बँकेचं उदाहरण ईथे कसं लागू आहे कळलं नाही. एका स्पेसिफिक प्रकारचं ट्रान्झॅक्शन बँक मॅनेजर करत नव्हता कींवा पैसाने लिहिलंय तसा काही प्रकार असला तर नीट करत नव्हता. त्याच्यात आणि सार्वजनिक ठीकाणी असह्य आवाज करण्यात काय साम्य आहे नाही कळलं मला. तुम्ही "मिपाकर नक्की मदत करतील." म्हणताय. तसं वाटलं म्हणूनच वेल्लाभटशी बोलत होतो ईथे. पण त्याने तर असा आपल्या वाजवण्याचा त्रास झाला तरी वाजवत राहिन असं स्पष्ट सांगितलंय. मी वैयक्तिक लिहिलं नाहिये आणि माझ्यामते टोनपण व्यवस्थित आहे. पण हा सापेक्ष असू शकतो. तुम्हाला बोचला असला तर क्षमस्व. देव करो नी तुमच्या आई-वडीलाना, कींवा कोणालाही खरंतर, असा त्रास भोगायला लागूंदे नको. पण तसं झालं असतं तर तुम्हाला माझा मुद्दा कळला असता. अगतिकपणे असा त्रास सहन करण्यापलिकडे काहिच करू शकत नाही हेच थोडक्यात परत एकदा अधोरेखित होणार या सगळ्या चर्चेतून.

In reply to by मोदक

तापत्या उन्हातून माणूस आल्यावर हाश्श् हुश्श् करत घाम पुसतो तेव्हा त्या हाश्शहुश्श् नं उन्हाची झळ कमी नाही होत. आपलं मानसिक समाधान होतं असं एक लेखक म्हणून गेलेत. भाकरीताई तुमचा मुद्दा मोदक ला समजला आहे असं मला वाटतंय.

In reply to by मोदक

चित्रं काढणे हे माझं पॅशन आहे त्यामुळे उद्या रात्री जाऊन समोरच्यांच्या घरावर मस्तपैकी चित्रं काढून येतो. यात तर आवाजाचाही त्रास नाही आणि उलट त्यांच्या घराची शोभा मी वाढवणार आहे! मला वाटतं चालून जावं नै? (हौशी चित्रकार)रंगा

In reply to by चतुरंग

कायदेशीर मुद्दा आहे रंगा काका... ढोल वाजवणारी मंडळी कुणाच्या खाजगी मालमत्तेवर अतिक्रमण करून ढोल वाजवत नाहीत. तुम्ही रस्त्यावर / फुटपाथवर चित्र काढले तर कोणाला हरकत असणार आहे?

In reply to by मोदक

खाजगी मालमत्ता एकवेळ परवड्ली इथे थेट शारीरीक त्रास आहे आणि तोही एकाच वेळी अनेक व्यक्तींना आणि कित्येकदा कायमचे त्रास्/आजार जडवणारा. व्यक्तिस्वातंत्र्य कुठे संपतं आणि सामाजिक भान कुठे सुरु होतं यातली ही धूसर सीमारेषा आहे. संवेदनशील मनाला यातली सामाजिक जाणीव अस्वस्थ करुन सोडते त्यावेळी आपल्या आवडी या नेमक्या कोणत्या मोबदल्यात जोपासल्या जाव्यात हा मुद्दा प्रकर्षाने वरती येतोच येतो. नव्हे सुसंस्कृत समाजाचे ते लक्षण आहे.

In reply to by चतुरंग

तुमचा मुद्दा सपशेल मान्य आहे. (आणि हे मी अगदी पहिल्या प्रतिसादातही मान्य केले आहे!) मला इतकेच म्हणायचे आहे की इथे आपण कळफलक बडवून किंवा कुणालाही टारगेट करून "आहे त्या परिस्थीतीमध्ये" किती बदल होणार आहे? समजा हे सगळे प्रतिसाद वाचून वेल्लाभट यांचे हृदयपरिवर्तन झाले आणि त्यांनी आणखी १० लोकांना सोबत घेवून ढोल पथकाला 'जय महाराष्ट्र' केला तरी "इम्पॅक्ट फॅक्टर" कमीच राहणार. त्यापेक्षा इतका त्रास होतो आहे तर योग्य मार्ग शोधून संपूर्ण राज्यातले ढोल ताशे बंद करण्यास पुढाकार घेणे जास्ती उपयुक्त नाही का?

In reply to by मोदक

थेंबे थेंबे तळे साचे. ज्याची जेवढी ऐपत तेवढे प्रयत्न त्यांना करू द्या. प्रत्येक माणूस काय आण्णा हजारे नसतो.

In reply to by जातवेद

ठीक आहे.. हे ही मान्य. पण कोणी प्रॅक्टीकल सोल्यूशनसाठी प्रयत्न करत आहेत का? करत असल्यास मला संपर्क साधावा. मी ही खारीचा वाटा उचलेन.

In reply to by मोदक

माझे कान ही माझी खाजगी मालमत्ता नव्हे काय? इथे ढोलांच्या आवाजामुळे काय त्रास होतो यावर किमान दोन हृदयस्पर्शी प्रतिसाद आलेत. ते अनुभवजन्य असावेत एवढे कळकळीचे आहेत. तरिही तुम्हाला ढोल वाजवायचेच असतीत तर वाजवा, (ह, आम्ही काय म्हण्तोय याचा आवाज तुमच्या मनापर्यंत पोचू नये यासाठी त्यांची आवश्यकता आहेच.) पण त्याचं असं निलाजरं समर्थन तरी करु नका. तुमच्यासारख्या सुसंस्कृतांनी केलेलं हे समर्थन बघून खांडेकरांचं शिर्षक आधीपेक्षा जास्त पटतय.

In reply to by अंतरा आनंद

याच न्यायाने माझे नाक आहे पुणे-मुंबईत किती प्रदुषण आहे. गाड्या बंद केल्या पाहीजेत. माझी गाडी आहे सतत खड्ड्यामधुन गेल्यामुळे टायर आउट झाला. महापालिकेकडुन पैसे घेतले पाहिजेत. माझा मेंदु आहे मोबाईल टॉवर आणि घरोघरीच्या वायफाय राउटरच्या लहरींंमुळे वाईट परिणाम होतोय. कुठे कुठे बोलणार. मोदक म्ह्णालाय त्याप्रमाणे शक्य असेल तर लोकांना बदलावे नाहीतर आपण बदलावे.

कायतरी म्हणे ढोलपथक! काहींना आवडत असेल ढोल बडवणे वगैरे, पण आम्हाला ऐकायला नाही आवडत हं. आता काहींना दारू आवडते म्हणून काय आम्ही.. ........त्याच्या दारूच्या वास घ्यायचा?

अरे मोदक.. इथे बोलुन काहीच फरक पडणार नाही म्हणतोस.. आणि असं म्हणत म्हणत पन्नस प्रतिसाद का देतो आहेस? तू दे ना सोडुन..

In reply to by पिलीयन रायडर

बेसीक मधले घोळ पॉईंट आऊट करतो आहे - बाकी काही नाही. खालच्या संभाषणामध्ये न कळण्यासारखे काय आहे सांग बघू. *****भाकरी***** खरंच? त्या लेखात 'कलेवर' शब्द वापरलाय तो अगदी बरोबर वापरलाय - लोकांच्या मनाची कलेवरंच झाल्येत. ढोल-ताशांच्या आवाजावरनंच नाही तर बाकी बर्‍याच ठीकाणी तुझा उपाय अंमलात आणता येईल नाही का? म्हणजे बघ, रस्त्यांवरचे खड्डे, गलिच्छ राजकारण, मोबाईल फोन कंपन्यांकडून मिळणारी भिकार ग्राहकसेवा, वगैरे वगैरे अनेक गोष्टिनी होणार्‍या त्रासाची तीव्रता कमी करायचा सोपा उपाय - आपल्या नियंत्रणाबाहेर आहे हे मान्य करायचं. वा रे मिपाकर!! *****मोदक***** मी पुन्हा एकदा सांगतो आहे. अन्याय सहन करू नका. राजकारण वगळता वरच्या प्रत्येक गोष्टीसाठी; (ज्या गोष्टी स्मार्ट क्रायटेरीयामध्ये बसतात) उत्तरे मिळवणे तुमचा हक्क आहे आणि त्यासाठी जास्ती त्रास घ्यावा लागत नाही. तुम्हाला जेन्यूईनली उत्तरे हवी असतील तर माझाच एक धागा आहे.. त्यावर लिहा. मिपाकर नक्की मदत करतील. *****भाकरी***** बँकेचं उदाहरण ईथे कसं लागू आहे कळलं नाही. एका स्पेसिफिक प्रकारचं ट्रान्झॅक्शन बँक मॅनेजर करत नव्हता कींवा पैसाने लिहिलंय तसा काही प्रकार असला तर नीट करत नव्हता. त्याच्यात आणि सार्वजनिक ठीकाणी असह्य आवाज करण्यात काय साम्य आहे नाही कळलं मला. तुम्ही "मिपाकर नक्की मदत करतील." म्हणताय. तसं वाटलं म्हणूनच वेल्लाभटशी बोलत होतो ईथे. पण त्याने तर असा आपल्या वाजवण्याचा त्रास झाला तरी वाजवत राहिन असं स्पष्ट सांगितलंय.