Skip to main content

याकुब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने

लेखक विद्यार्थी यांनी शनिवार, 25/07/2015 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनचे फाशी वाचवण्याचे सर्व पर्याय संपत आल्यामुळे त्याला लवकरच फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली. फाशी प्रकरणाचा गाजावाजा होणे ही आजकालचीच गोष्ट वाटते कारण भारतात स्वातंत्र्यापासून अनेक लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची एवढ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे आठवत नाही. समाजातील काही उदार मतवादी लोकांना अतिरेकी, नक्षलवादि, अट्टल गुन्हेगार यांच्या मानवाधिकाराच्या चर्चा करून आणि त्यांच्याबद्दल समाजात नाहक सहानुभूती निर्माण करण्याची घाणेरडी सवय लागली आहे. आणि असे करून ते स्वतःची दुकाने चालवत असतात. फाशी झालेल्या गुन्हेगाराची जात, धर्म याबद्दल वक्तव्ये करून राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार तर फारच घृणास्पद आहेत. बॉम्बस्फोटामध्ये मारले गेलेले सर्व भारतीय नागरिक होते. त्यांची जात किंवा धर्म पाहून त्यांना मारले नव्हते तर मग फाशी झालेल्या या अतिरेक्याच्या धर्माची चर्चा का? भारतात फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा असावी किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण याकुब मेमनने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केलेली मदत आणि या स्फोटांमध्ये २५७ निष्पाप लोकांचे गेलेले बळी, हे भारतीय कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. याशिवाय याकुब मेमनला कायद्यानुसार स्वतःला वाचवण्याचे मिळणारे सारे पर्याय मिळाले आणि त्याने ते वापरालेसुद्धा. गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?

वाचने 50333
प्रतिक्रिया 277

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

गिरीश कुबेर यांची पातळी सुमार केतकर यांच्यापेक्षाहि खाली गेली. त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला भरायला पाहिजे. १००% सहमत !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aao Huzoor Tumko... :- KISMAT

In reply to by सुबोध खरे

गिरीश कुबेर यांची पातळी सुमार केतकर यांच्यापेक्षाहि खाली गेली.
गेल्या काही महिन्यांमधले गिरीश कुबेर यांचे अग्रलेख वाचून डॉक्टरसाहेबांच्या या मताशी नक्कीच सहमत आहे. विशेषतः कालचा अग्रलेख अगदीच सुमार होता.

In reply to by सुबोध खरे

लेखामध्ये वेगळी बाजू मांडण्यचा प्रयत्न केला आहे
मी माझ्या प्रतिसादामध्ये कुठेही संपादकीय लेखाचा समर्थन केला नाहीये. किंवा याकूबाचा समर्थन केला नाही किंवा फाशीला विरोध केला नाही . चर्चा होताना वर्तमान पत्रामधला एक संदर्भ दिला जेणेकरून काही लोकांची भावना काय आहे त्याचा परामर्श घेता यावा . ते लिहिलेले मला मान्य आहे असा अर्थ कसा काय काढलात ? माझ्यावर का बरसता ??

In reply to by कपिलमुनी

कायप्पा वर आलेला मंदार जोशी नामक व्यक्तीचा प्रतिसाद.... इथे मंदार जोशी काही डू आयडी ने असल्यास आणि त्यांना हे इथे असे टाकणे मान्य नसल्यास किंवा आणखी काही कारणाने काही तांत्रिक झोल असल्यास हा प्रतिसाद उडवावा ------------------------------------------------------------------- आदरणीय वंदनीय माननीय विवेकवादी अंधश्रद्धानिर्मूलनपटू राजमान्य राजश्री श्री गिरीश कुबेर साहेब, कोपरापासून नमस्कार. लोकसत्ता घ्यायचे बंद केल्यापासून आणि ते तुम्हाला कारणांसहित कळवल्यापासून एका वर्षाच्या आत तुम्हाला पुन्हा पत्र लिहायची वेळ येईल असे वाटले नव्हते. पण तुम्ही तुमच्या असामान्य लेखनप्रतिभेने अप्रतीम संपादकीय अग्रलेख लिहून तुमच्याशी संवाद साधायला भाग पाडलेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुमचा हा लेख फॉरवर्ड मधून आला तेव्हा आधी तुमच्याच वृत्तपत्रात विनोदी सदर लिहीणार्‍या तंबी दुराई सदृश्य कुणीतरी लिहीला आहे असा आधी समज झाला होता, पण तो अखेर गैरसमज ठरला. या लेखाबद्दल तुमचा तीव्र निषेध. फाशीबाबत, देहांत शासनाबाबत मतभेद असल्यास गैर नाही. मात्र त्याच्या नावाखाली एका देशद्रोह्याचे, दहशतवाद्याचे किती उदात्तीकरण करायचे? सारासार विचार करण्याच्या नावाखाली सामान्य जनतेचा बुद्धीभ्रम करण्याचा किती प्रयत्न करायचा? आपण लेखाच्या सुरवातीला म्हणता, याकुब मेमन माफीचा साक्षीदार ठरला, आणि अपराधी देखील. हे साफ चूक आहे. तो माफीचा साक्षीदार कधीही नव्हता, आणि तो शरणही आला नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी भारतात परतण्याचा निर्णयही घेतला नाही. रॉ संस्थेच्या ज्या रामन साहेबांच्या लेखाचा आपण हवाला देता, त्याच रामन साहेबांनी एका लेखात स्पष्टपणे म्हटलं आहे की पाकिस्तानच्या आय.एस.आय. या गुप्तहेर संघटनेच्या देखरेखीखाली असलेल्या मेमन कुटुंबियांनी याकूबला 'भारतात परतणे कितपत श्रेयस्कर' याचा आढावा घ्यायला नेपाळमधे असलेल्या त्याच्या नातेवाईकाशी व एका वकीलाशी सल्लामसलत करायला नेपाळला पाठवलं होतं. या दोघांनीही त्याला पुन्हा कराचीला परतण्याचा सल्ला दिला. तो कराचीला परस्पर पळून जाण्यासाठी विमान पकडण्याच्या तयारीत असताना नेपाळ पोलीसांनी त्याला ओळखला, आणि वेगाने त्याची रवानगी भारतात करण्यात आली. बरं आपण रामन यांचे सोडून देऊ. गेले बिचारे. त्यांची साक्ष काही काढता येत नाही आता. पण विमानतळावर त्याला पकडणार्‍या नेपाळी पोलीस अधिकार्‍याची मुलाखत आपण हे अचाट संपादकीय लिहीण्याच्या आधी बघितली का? माझ्या अंदाजाप्रमाणे नसेलच. मग त्या कटातला पाकिस्तानचा सहभाग उघड करावा या अटीवर त्याला भारत सरकारने माफीचा साक्षीदार करण्याचा करार केला हे कुठल्या आधारावर लिहीता? मुळात भारतात होत असलेल्या घातपाती कारवायात आणि दहशतवादी घटनात पाकिस्तानचा सहभाग आहे हे तो पर्यंत अनेको वेळा सिद्ध झालेले असताना आणि अगदी १९९३ बाँबस्फोटांचा तपास करतानाही अन्य मार्गाने निदर्शनास आलेले असताना आपण पाकिस्तानचे नक्की काय वाकडे केले जे याकुबच्या खुलाशाने करु शकणार होतो? मग ज्यातून पुढे काहीही कारवाई करता येणार नाही आणि मिळाली तरी जिची विश्वासार्हता संशयास्पदच आहे अशी माहिती 'उघड' करण्यास कारणीभूत ठरणारा असा वेडगळ आणि तद्दन निरुपयोगी करार भारत सरकारने कसा काय केला असेल असे मज पामराच्या बुद्धीलाही पडणारे प्रश्न तुम्हाला पडले नसतील असे आम्ही कसे मानावे? वादासाठी आपण गृहित धरू की सरकारने त्याच्याशी काही गुप्त करार केला होता. तुम्हाला एक बाळबोध उदाहरण देतो. माझ्या घरात एक उंदीर धुमाकूळ घालतो आहे. मी त्याला पकडायला आत बुंदीचा लाडू ठेऊन एक पिंजरा लावतो. तो त्या पिंजर्‍यात फसतो. आता तुम्ही मला सांगा, निव्वळ विध्वंसक अशी ओळख असलेल्या उंदराला मी मारून टाकावे की त्याला प्रेमाने मांडीवर घेऊन प्रेमाने तो लाडू खायला द्यावा आणि मग सोडून द्यावे? पुढे तुम्ही तोडलेले तारे तुम्हाला कदाचित पुढचा मेगासेसे किंवा गेला बाजार बुकर पुरस्कारही देऊन जातील. "मेमन कुटुंबीय मूळचे गुजरातेतले आणि आद्य व्यवसाय चांदीची तस्करी". मेमन कुटुंबीयांच्या या स्मगलिंगच्या धंद्याबाबत हे वाक्य तुम्ही इतक्या सहजपणे लिहून जाता, की वाचणार्‍यांचा समज व्हावा की चांदीची तस्करी म्हणजे एखाद्याचे रस्त्यालगत असलेले सायकलचे पंक्चर काढायचे अनधिकृत दुकान असावे किंवा रेल्वेत सीटखाली सापडलेली दहाची नोट एखाद्या प्रवाशाने खिशात टाकावी इतकी क्षुल्लक बाब! तुम्ही म्हणता की एका अशक्त व्यवस्थेने दुसर्‍या अशक्ताचा बळी घेतला. खालच्या दोन कोर्टात चाललेले खटले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, मग याकुबने दाखल केलेले क्युरेटीव्ह पेटीशन, राष्ट्रपतींकडे केलेले दयेचे अर्ज, आणि डेथ वॉरंटवर स्टे आणण्याचे प्रयत्न हे सगळे सगळे आपल्या न्यायव्यवस्थेने त्याला बचावाच्या पुरेपूर संधी दिल्या याची साक्ष नव्हे काय? मग तुमच्याकडे तुमच्या "वस्तुस्थिती" व "निर्विवाद सत्य" या शब्दांपलिकडे जाऊन तीन न्यायालयात, ज्यात अर्थात सर्वोच्च न्यायालय आहेच, जे पुरावे सादर होऊन गुन्हा सिद्ध झाला त्यांच्याहून वरचढ पुरावा आहे का? नसल्यास तुम्ही व्यवस्थेला अशक्त असे संबोधून खालच्या न्यायालयांचाच नव्हे तर फाशी जायच्या दिवशीही पहाटे साडेचार वाजता याकुबचे म्हणणे ऐकून घेणार्‍या सर्वोच्च न्यायालयाही अवमान करत आहात याची तुम्हांस जाणीव आहे काय? हाच अशक्त याकुब एक धंदेवाईक चार्टर्ड अकाउंटंट होता. म्हणजेच तुमच्या भाषेत सनदी लोकपाल होता. ही परीक्षा किती कठीण असते हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. सनदी लेखपाल म्हणजे अशिक्षित, अडाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी नव्हे. इतका हुशार असलेल्या हा अशक्त याकुबला आपण ज्याच्या "चोरट्या" धंद्यांचे पैसे फिरवतो आहोत, लेखापरिक्षण करतो आहोत तो आपला सशक्त थोरला भाऊ टायगर काय धंदे करतो आहे याची कल्पना नव्हती असे "अधिकृत वस्तुस्थिती"च्या नावाखाली तुम्ही ठोकून देताना तुम्ही किती तर्कदुष्ट विधान करत आहात याची तुम्हालाच जाणीव नसावी. त्याच्याच पुढे तुम्ही म्हणता "त्याचे (म्हणजे टायगरचे) चोरटे व्यापार कुटुंबियांस ठाऊक होते" आणि मग लगेच "परंतू त्यापुढे जाऊन तो दहशतवादी कृत्यात सहभागी आहे हे कुटुंबास ज्ञात नव्हते". हे म्हणजे ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा बोरीवली ते चर्चगेट रेल्वे प्रवास करणारा एक चाकरमानी साईड बिझनेस म्हणून प्रवासात पाकीटमारीचा धंदा करीत असे आणि ते त्याच्या कुटुंबीयांस ठावूक नसे अशी एखादी सुरस कथा कथा सांगावी अशा प्रकारे आपण सांगता. तसेच, एकीकडे याकुबला 'काही म्हणजे काही माहित नव्हतं हो' असा टाहो फोडतानाच "तो माफीचा साक्षीदार होता आणि आहे. याचा दुसरा अर्थ असा की तो निरपराध नाही." असेही म्हणून जाता. कुबेर साहेब, एक पे रेहेना, एक तो काही माहित नै बोलना नैतो निरपराध बोलना. लेकीन प्लीजच कोलांट्याउड्या मत मारना. पुढचा भाग अधिक मनोरंजक आहे. टायगरचे दहशतवादी धंदे जर त्याच्या कुटुंबियांस माहित नव्हते, तर त्याचे वडील पाकिस्तानात आय.एस.आय.च्या कचाट्यात काय फिरत फिरत चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेले की सहज पर्यटनाला गेले असताना ते आय.एस.आय ने त्यांना कचाट्यात पकडले? म्हणे, 'बाँबस्फोट चौकशीत टायगरचा हात असल्याचे उघड झाले तेव्हा पाकिस्तानात आय.एस.आय.च्या कचाट्यात असलेल्या त्याच्या वडिलांनी कुटुबाच्या देखत त्याला चोपले'. आईआईगं. हे वाचून माझे ड्वाले पाणावले हो. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे भारतात शामच्या आईनंतर थेट टायगरचे बाबाच. आपण टायगरला पकडू शकत नाही, दाऊदला लटकावू शकत नाही याचा अर्थ आपण हातात सापडलेल्या याकुबला सोडून द्यायला हवा होता? जिथे निर्विवादपणे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवादी कसाबविषयी देखील अनेकांना माणूसकीचे उमाळे येतात, त्या आपल्या भारत देशात सापडलाय तर "लटकावून टाका फासावर" इतकं सोपं आहे? आपल्या या अचाट आणि अतर्क्य संपादकीयात आपण याकुबच्या धर्माचा उल्लेख करुन तुम्ही योग्य तो खोडसाळपणा केलेला आहेच. भारतात आतापर्यंत फाशी दिलेल्या कैद्यांपैकी किती जण मुसलमान होते ते तपासून बघणार का जरा? त्यातच संजय दत्तचाही उल्लेख करुन तुम्ही तुमचा अजेंडा स्पष्ट केलेला आहे आणि त्या तूलनेत याकुबचा गुन्हा चक्क किरकोळ ठरवून काय सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे न समजण्याइतके आता तुमचे वाचक दुधखुळे राहिलेले नाहीत. संजय दत्तला सवलती मिळतात, ते कायद्याने. दाऊद व टायगरला परत आणण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोत ते आपले सरकार अंतर्गत व आंतरराष्ट्रीय कायदे पाळत असल्यानेच. आणि आता याकुब फासावर गेलाय तो ही सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावरच. तेव्हा 'उचलला याकुब, लटकवला फासावर' हे वाक्य 'उचलली जीभ लावली टाळ्याला' शैलीत आपण बरळू नये, हेच उत्तम. आणखी एक. बॉम्बस्फोटात मेलेल्या २५७ निरपराध नागरिक आणि शेकडो जखमींची चौकशी करा जरा. आमचा उन्माद जाऊद्या हो, किमान चाळीसहून अधिक शस्त्रक्रिया झालेल्या आणि अजूनही काचा अंगात असलेल्या, आणि ते कमी म्हणून की काय उजवा हातही निकामी झालेल्या माणसाबद्दल किंवा वयाच्या तेराव्या वर्षी आईचा तुकडे तुकडे झालेला मृतदेह बघायला ज्याला लागला त्या व्यक्ती विषयी जरा उमाळा येऊ द्या. गिरीश कुबेर साहेब, मी मूळचा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी. इयत्ता दुसरीत मराठी वाचायला शिकलो तेव्हापासून लोकसत्ता वाचतो आहे. मला मराठी वाचनाची गोडी निर्माण होण्यामागे लोकसत्ताचे नियमित वाचन हे आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सातेक वर्षांपूर्वी पुण्यात स्थलांतरित झालो तेव्हा सुरवातीला पेपरच घेत नव्हतो. मुलं शाळेत जाऊ लागली म्हणून त्यांना चांगलं मराठी वाचायला मिळेल या आशेने पावरफुल आणि पवारफुल सकाळ न घेता लोकसत्ता घेणे पसंत केले कारण लोकसत्तावरचे प्रेम आणि श्रद्धा.....हो श्रद्धा. ती एक मोठी अंधश्रद्धा होती हे आपण मागेच सिद्ध केले होतेत, आणि आज हे संपादकीय लिहून तेव्हाचा लोकसत्ता घेणे बंद करण्याचा माझा निर्णय किती योग्य होता हे तुम्ही मला दाखवूनच दिलेत. माधव गडकरी लोकसत्ताच्या संपादकपदावर होते तो पर्यंत लोकसत्ता हे एक वाचनीय वर्तमानपत्र होता. नंतर त्याला उतरती कळा लागली. अरुण टीकेकर, कुमार केतकर यांनी यथास्थित गरळ ओकून झाल्यावर आता तुम्ही लोकसत्ताला ढगात पाठवण्याच्या कामी कुठलीही कसर सोडलेली दिसत नाही. लोकसत्ताचे हल्लीचे लिखाण प्रचंड एकांगी होत चालले आहे. कुणीही काहीही बोलले, किंवा एखादा विषय मांडला, किंवा काही घटना घडली की लगेच त्यावर इयत्ता तिसरी ड च्या उत्साहात बातमी छापलीच पाहीजे असा पायंडा अलिकडे लोकसत्तात पडला होता, त्या बालीश गरळोओकीत नंतर मोदी सरकार आल्याने नवा जोम आला. एखाद्या घटनेशी, गोष्टीशी, किंवा केलेल्या विधानाशी संबंधित असलेल्या आणि असू शकणार्‍या असंख्य गोष्टींचा एकत्रितपणे विचार आणि अभ्यास करुन अन्वयार्थ काढायचा व मगच अग्रलेख लिहायचा असतो किंवा बातमी द्यायची असते हे लोकसत्ताच्या गावीही उरलेले नाही. तोच वारसा आपण समर्थपणे पुढे चालवत आहात हे पाहून संतोष जाहला. कुठलेही वर्तमानपत्र किंवा अंक हा एकांगी असेल आणि त्याचा गाभा हा द्वेषमूलक असेल तर तो फार काळ दर्जा आणि लोकप्रियता आणि पर्यायाने खपही टिकवून ठेवू शकत नाही. तेव्हा संपादक गिरीश कुबेरमहाशय, पेपर चालवताय तर बातम्या देण्याचे काम करा. देशाच्या न्यायव्यवस्थेचा आणि न्यायालयांचा आदर करायला शिका. उगाच समाजाला मार्ग दाखवण्याच्या नावाखाली शाब्दिक कोलांट्याउड्या मारण्याच्या आगाऊपणा करत जाऊ नका. वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन करायला तुम्ही "लोकमान्य" नाही आणि तुमच्या या संपादकीयावरुन पुन्हा सिध्द झालेले आहे की तुमची नियतही साफ नाही. तेव्हा लवकर सुधारा. नाहीतर मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधे रस्त्यावरच्या मवाल्यागत वागून थोतरीत खाणारा राजदीप आणि अनेकांनी तोंडात शेण घातलं तरी रोज न चुकता बरळणारा निखिल वागळे यांच्या रांगेत लोक तुम्हाला कधी नेऊन बसवतील तुम्हालाच पत्ता लागावयाचा नाही. पुन्हा एकदा, या संपादकीयाबद्दल लोकसत्ता व तुमचा तीव्र निषेध. आपला नम्र मंदार दिलीप जोशी

याकुबला फाशी दिल्याचे अजिबात दु:ख नाही. पण आज सकाळपासून चॅनेलवाल्यांनी जी रनिंग कॉमेंटरी चालू केली होती ती उद्वेगजनक होती. आचरट मिडिया अशावेळेस दोन्ही बाजूने तेढ वाढवण्याचा प्रयत्न करते. त्याचे देशांत काय परिणाम होतील, त्याची त्यांना पर्वाच नाही.

मि माझ्या सकाळच्या प्रतिसदात तेच लिहिले होते "म्हणुनच ह्याना नेपाळ्मधुन हाकलले होते"

झालं ... संपलं ... गेला याकुब ! जन्नत मधे ७२ व्हर्जिन्स मधे खुष असेल तो ! मिपावर जातीवादी आणि व्यक्तिद्वेषी एकांगी आणि प्रचारकी वादविवाद बंद करा . आता बस्स करा . वातावरण निवळु द्या !

लोकसत्ताच्या गिरीश कुबेरांच्या अग्रलेखातील खालील परिच्छेद वाचून धन्य झालो. विशेषतः मेमन बंधूंच्या वडीलांनी मेमनला चोपले हा जावईशोध वाचून कुबेरांचे पूर्वाश्रमी केतकर यांच्या एका त्रिखंडात गाजलेल्या परखड अग्रलेखातील खालील वाक्य आठविले. १९८४ साली दिल्लीत शिखांविरूद्ध दंगल उसळलेली असताना राजीव गांधी जीवाची पर्वा न करता दंगल शमविण्यासाठी गल्लीबोळातून हिंडत होते. http://www.loksatta.com/sampadkiya-news/death-penalty-to-yakub-memon-11…
अधिकृत वस्तुस्थिती अशी आहे की टायगरच्या या पाताळयंत्री उद्योगाची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना नव्हती. याकूब या कुटुंबाचा सनदी लेखापाल. त्यासही आपला थोरला भाऊ नक्की कोणत्या उद्योगात मग्न आहे, हे माहीत नव्हते. त्याचे चोरटे व्यापार कुटुंबीयास ठाऊक होते. परंतु त्यापुढे जाऊन तो दहशतवादी कृत्यात सहभागी आहे, हे कुटुंबास ज्ञात नव्हते. त्याचमुळे बॉम्बस्फोट चौकशीत जेव्हा टायगर मेमन याचा हात असल्याचे उघड झाले तेव्हा पाकिस्तानात आयएसआयच्या कचाटय़ात असलेल्या मेमन बंधूंच्या वडिलांनी कुटुंबात सर्वादेखत टायगरला चोपले. त्याच वेळी आपली कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी आणि टायगर वगळता अन्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यात पुढाकार होता थोरले मेमन आणि याकूब याचा. परंतु तसे करणे धोक्याचे होते. कारण ही सर्व मंडळी आयएसआयच्या तावडीत होती. आयएसआयने त्यांची अेाळख पुसून टाकली होती आणि त्यांना बनावट पारपत्रेदेखील देण्यात आली होती. तरीही भारतीय गुप्तचर यंत्रणांनी त्यांचा छडा लावून त्यांच्याशी संधान बांधले. यातही पुढाकार होता याकूबचाच. काठमांडू येथून पाकिस्तानात परतण्याच्या प्रयत्नात असताना याकूब अलगदपणे भारतीय गुप्तचरांच्या हाती लागला. काहींच्या मते तो अपघात होता तर एका वर्गाच्या मते याकूबने पत्करलेली ती शरणागती होती. तो पाकिस्तानात परतला असता तर आयएसआयने टायगरप्रमाणेच त्याच्याही मुसक्या आवळल्या असत्या, हे उघड आहे. त्यामुळे तो योग्य वेळी भारताच्या हाती लागला. तो स्वत:हून शरण आला की आपण त्यास पकडले याबाबत संदिग्धता असली तरी एक बाब निर्वविाद सत्य आहे. ती म्हणजे आपल्या सरकारने त्यास त्या वेळी अभय देण्याचे वचन दिले आणि त्या बदल्यात त्याने बॉम्बस्फोटातील पाकिस्तानी सहभाग उघड करावा, असा हा करार होता. याचा अर्थ याकूब हा माफीचा साक्षीदार होता आणि आहे. याचा दुसरा अर्थ असा की तो निरपराध नाही. परंतु याचा अर्थ असा निश्चितच नाही की मुख्य आरोपीचा भाऊ आहे आणि मुख्य आरोपी हाती लागणे शक्य नसल्याने जो कोणी हाती लागला त्यास फासावर लटकावले जावे.

whatsapp वर एक नोंद फिरत आहे जशी च्या तशी भाषांतर करून देत आहे ,पदरचे काही नाही कसाबला बाळासाहेब घेऊन गेले याकुब ला कलाम आता फक्त दावूद ला परत आण पवार साहेब वाट पहात आहे तसेच माझे ह्या घडा मोडी वरचे लेखन नक्की बघाच

In reply to by पाटीलअमित

घडा मोडी हा शब्द असा का लिहिलाय? एकदम वाचलं तर घोडा घोडी दिसतंय. हे साहेब शुद्धलेखनासाठी प्रसिद्ध होणार बहुतेक! याकुब आणि दावूद ही नवीन बारशी!!! गंमतीत घ्या...

गेल्या बावीस वर्षांत एकदा तरी याकूब मेमन किंवा त्याच्या कुटुंबियांनी बाँबस्फोटात मरण पावलेल्यांबद्दल चकार शब्द काढला आहे का? पश्चात्तापाचा एक शब्द फाशी जातानाही याकूबच्या तोंडून आला का?

हा कोणी महात्मा होता का? याला गाडायला इतके सगळे लोक? आता याच्या कबरीला धार्मिक रंग दिले नाहीत म्हणजे मिळवली! बाकी, धर्मांध पक्षांनी त्यांचा डाव साधलेला आहे, याकुबला सहानुभूती मिळवून देऊन! आता त्यांना पाठींबा देणारे अजून काही लोक पैदा होतील! वोट बँक अजून मजबूत होईल! हे असले वातावरण परकीय शक्तींना फायदा देणारेच होणार आहे, फक्त काडी टाकायची गरज कि इथले लोक आपापसात भिडतील! वाईट वाटत जे काही चालू आहे ते पाहून... burial

In reply to by शब्दबम्बाळ

ह्याला नागपूर मधेच गाडणार होते ,पण मुंबईला खास इंडिगो चे विमान करून आणले काही गरज नसताना ==================================== आजची स्वाक्षरी रावणाचे उदाती कारण

In reply to by शब्दबम्बाळ

मला कुणी सांगेल अक हा काय प्रकार आहे. कसाबला जसा पुरुन टाकला. कुणालाही काहीही पत्ता नव्हता की कुठे, केव्हा, कसा... मग ह्याचा असा "सोहळा" काय करत आहेत? याकुब शहीद असल्या सारखं काय वागत आहेत हे लोक. एका अत्यंत गंभीर गुन्ह्यासाठी त्याला अत्यंत दुर्मिळ अशी फाशीची शिक्षा झाली. तो मेला. विषय संपला. आता काय चादरी वाहुन औरंगजेबाप्रमाणे त्यालाही "पीर" का काय म्हणतात ते बनवणार की काय हे लोक?

In reply to by पिलीयन रायडर

यामागे नक्की काहीतरी मोठं शिजताना जाणवतंय.... अजून चित्र स्पष्ट होत नाही मात्र नक्कीच काहीतरी मोठी उलथापालथ घडेल असा अंदाज आहे. बिहार निवडणुक जवळ आहे पण या परिस्थितीत लोकमत लालू नितीश कड़े झुकेल. अर्थात तसंच ठरलेलं असेल तर तसंही.... हे नैसर्गिक/उत्स्फूर्त किंवा सरळसोट नाहीये एवढं खात्रीशीर!

In reply to by पिलीयन रायडर

ज्या प्रकारे कसाब आणि अफझल गुरूची शिक्षा अंमलात आणली त्यानंतर कोर्टाने गाईडलाईन्स दिल्या आणि त्यानुसार आधी जाहीर करून शिक्षा द्यावी लागली. म्हणून नंतरचा तमाशा तथाकथीत मानवतावादी करू शकले आणि एक दिवस का होईना सुप्रिम कोर्टाच्या न्यायाधिशांची अक्षरशः झोप लांबवू शकले... फाशी नंतर अंत्यसंस्कार कुठे करायचे हे ठरवायचा हक्क त्या तुरूंगातील पोलीसप्रमुखाला असतो. त्याच्याकडे नातेवाईकांनी केलेली विनंती तो अमान्य करू शकतो. येथे त्यांनी दिली पण काही अटींवर की जास्त गाजवाजा करायचा नाही तसेच नंतर त्याच्या कबरीची समाधी करायची नाही. मला खात्री आहे, तसे केले गेले तर ते अधिकृतपणे तात्काळ पाडले जाईल. त्याचबरोबर त्याचे पार्थिव परत कुटूंबियांना देण्यात काही गैर नाही. किंबहूना त्यामुळे तथाकथीत मानवतावाद्यांच्या अजून एक बोंब मारण्याच्या संधीस बूच बसले.

In reply to by विकास

म्हणजे त्याच्यावर थडगे बांधायचे नाही. दफनविधी किमान आवश्यक तितकाच करणे , मृतदेहाचे फोटो न घेणे , अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी न जमवणे इ इ अटी आहेत.

In reply to by शब्दबम्बाळ

हा कोणी महात्मा होता का? याला गाडायला इतके सगळे लोक? लांड्यांचा तथाकथित "इमान" हा त्यांच्या धर्माशी असतो, देशास ते महत्व देत नाहीत. { याला फारच कमी मुसलमान अपवाद आहेत ज्यांचा इमान या मातीशीच होता आणि आहे,सर्वच मुसलमानांना मी द्रोशद्रोही पारड्यात टाकणार नाही, पण ही संख्या कमीच ! } ही सर्व मंडळी या देशात राहण्याच्या लायकीची नाहीत ! अगदी काश्मिरातही दहशदवाद्यांच्या जनाजा उठल्यावर तर अख्खा गाव लोटतो ! या लोकांनी उच्च शिक्षण जरी घेतले तरी यांचा माथेफेरुपणा आणि कट्टरता त्या शिक्षणा पेक्षा वरचढ ठरते हे याकुबच्या उदाहरणातुन स्पष्ट होते....इथे काही दिड शाहणे "बाबरी ढाचा" पाडला त्याची रिअ‍ॅक्शन च्या डिंग्या मारत आहेत पण हजारो वर्ष हिंदूची देवळे पाडली गेली त्यांची संपती, बायका भोगल्या त्याची परतफेड हिंदूंनी करावयाची ठरवल्यास काय होइल ? हिंदुस्थानात "माज" करणार्‍या लांड्यांनी जरा पाकिस्तानातल्या त्यांच्या जातभाईंकडे पहावे म्हणजे आपण किती सुखात आहोत याची जाणिव त्यांना होइल. ही लांड्यांची जमात हिंदूस्थानात कुठेही हिंदूंशी मिळुन मिसळुन राहिल्याचे दिसुन येणार नाही ! यांचे "हिरवे" मोहल्ले कायमच वेगळे असतात ! बोकडदाढी ठेवुन आणि टोप्या घालुन आपण कस्से सच्चे आणि कट्टर मुसलमिन आहोत हे दाखवण्या पलिकडे आणि डझनभर पोर पैदा करण्या पलिकडे यांचे इतर कुठलेही जिवीत उद्देश्य नसावे असेच वाटते ! बारा महिने १३ काळ यांचा "इस्लाम " खतरे में... अरे तुमच्या वर्तनामुळे जगभरात "इस्लाम" बदमनाम झाला आणि होतो आहे याची काळजी करा... पण नाही हे असेच देशद्रोही व्यक्तींच्या जनाज्याला गर्दी करतील आणि ढुंगण वर करुन अल्लाहु अकबरची बांग देतील ! वरच्या फोटोतील गर्दीतुन या समाजाची "खरी" मानसिकता कळुन येते. एक वाचनिय दुवा :- अशिक्षितपणा परवडला, चुकीचं शिक्षण नको! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-Chandan Sa Badan... :- Saraswatichandra

अचानक ह्याच्या (श्त्रु सिन्हा) अकलेचे घोडे कसे जागरुक झाले देव जाने...राम जाने !!!

In reply to by अलक निरन्जन

मुलीच्या करियरचा प्रश्न आहे ! सलमानचे पोस्टर फाडणार्‍या एकानेही शत्रुघ्न सिन्हा व जेठमलानीचा निषेध केलेला नाही. हेदेखील गंभीरच आहे.

In reply to by सुबोध खरे

मुलगी षिनिमावाली आहे. दाउदचे पाय चाटले नाहीत तर तिचे करियर मरेल की !

In reply to by जडभरत

आम्ही लुंगी सोडली असं कधी म्हटलं ? आज गुरुपौर्णिमा आहे. सर्व धोतराना लुंगीच्या शुभेच्छा !

काल चेपुवर फिरणारा एक मेसेज.. "धर्मासाठी जिहाद करा ,मेल्यावर जन्नत भेटेल" अश्या विचाराने प्रवृत्त झालेले लोकं फाशीची शिक्षा झाल्यावर दयेचा अर्ज का करतात ?

In reply to by चिनार

युद्ध्हात मेलास तर स्वर्ग मिळेल असे भगवानानी उवाच करूनही अर्जुन इहलोकीच्या राज्यासाठी का लढला ? डायरेक्ट मर्रुन स्वर्गातच का नाही गेला ?

In reply to by dadadarekar

दादा, प्रश्न कळला नसेल तर तसं सांगा ..मी समजावून सांगतो..उत्तरादाखल संबंध नसलेले प्रश्न विचारू नका.. राहिला प्रश्न तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा.. अर्जुन ईहलोकाच्या 'राज्यासाठी' युद्ध लढला नाही. ते युद्ध धर्म आणि अधर्म यांच्यातलं होतं. आता धर्म कुठला आणि अधर्म कुठला याबाबतीत तुमचे विचार मला ऐकवू नका. फक्त एका गोष्टीचा विचार करता आला तर करा.भगवंताने केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्याच घरातल्या आणि आपल्याच धर्मातल्या अधर्मी लोकांविरुद्ध्ह तो लढला. "आपल्या धर्माबाहेरचे सगळे काफिर" अशी सरळसोट व्याख्या त्याने केली नाही. अर्जुन इहलोकीच्या राज्यासाठी का लढला ? डायरेक्ट मर्रुन स्वर्गातच का नाही गेला ? आता युद्धात त्याला कोणी मारू शकले नाही म्हणून त्याने युद्ध संपल्यावर आत्महत्या करायला हवी होती असे तुमचे मत असेल तर तुमची बुद्धी कीव करण्याचाही लायकीची नाही. एक अवांतर, रामगोपाल वर्माच्या मुंबई हल्ल्यावर आलेल्या सिनेमात एक शेवटचा प्रसंग आहे. 'जिहाद के लिये मरोगे तो जन्नत मिलेगी' असं कसाबला त्याच्या गुरूने सांगितले असते. पोलिस कमिशनर नाना पाटेकर त्याला त्याच्या मित्रांचे मृतदेह दाखवायला शवागृहात नेतो आणि सांगतो.. "जन्नत की बात छोड..जहन्नुम का दरवाजा भी खट्खटाया होगा ना इन दरिन्दोने , तो वाह बैठे दरबान ने भी इनके **** पे लाथ मारी होगी"

मला वाटते आरडिएक्स बाबरीमशीद पडल्याच्या एकवर्ष अगोदर उतरवले गेले होते....मग बाबेरी मशीदचा आणि मुंबईच्या स्फ़ोटांचा काय संबंध ?

संपादकांना नम्र विनंती हा धागा उडवावा, अप्रकाशित करावा किंवा मागे ढकलावा किंवा किमान नाव तरी बदलावे. बास की... किती वेळा ते याकुब याकुब करायचं. च्यामारी.

माफ़ करा खालील पत्र हे इंग्रजीत आहे व् त्याचे मराठी भाषांतर होऊ शकते (कार्यबाहुल्यामुळे मी करू शकलो नाही) तरीही त्याचा अपेक्षित परिणाम हा इंग्रजीत साधला जाऊ शकतो हे मात्र मनापासून वाटले An Open Letter By A Cop To Those Opposing Death Penalty To Yakub Memon. Dear “Intelligentsia” of India, I am not a TV panelist. I am not a “human rights” activist. I am not a lawyer. I am not a political commentator. I am not a best-selling author. I am not the son or grandson of a famous man. I am an aam aadmi. More than an aam aadmi, I am an officer in the Indian Police force. And I am writing this letter to all of you, after seeing your robust defence of a terrorist. Why I mention who I am is important because unlike all of you, I don’t sit in plush AC offices and write editorials seeking clemency for a murderer. Nor do I visit TV studios and shout myself hoarse. Instead I meet such killers every single day. But I don’t meet them for cocktail parties or at press conferences (like some of you do). I meet them on the road, in the streets, with weapons in their arms and hate in their eyes. I have been in situations with them where they would not hesitate a single moment before pulling the trigger on me, but I have to consider all the ramifications like “human rights”, “due process” and “fake encounter” before I save my life and of the innocent people around me. Given the above I believe I am in a far better position to comment on a mass murderer like Yakub Memon than any of you are. To defend this criminal, multitudes of arguments have been put forth by what are now called “Adarsh Liberals” in our society. Luckily, almost no one has pleaded that he is innocent. The situation is such that Indians have to be grateful to our “Intelligentsia” for such small mercies. But one common hypothesis put forward by many is that Yakub Memon surrendered to the Indian authorities, and then cooperated with the investigations. Plain lies. Late B Raman, one of India’s finest intelligence officers wrote this in his article: "He had come to Kathmandu secretly from Karachi to consult a relative and a lawyer on the advisability of some members of the Memon family, including himself, who felt uncomfortable with Pakistan’s Inter-Services Intelligence, returning to India and surrendering to the Mumbai police. The relative and the lawyer advised him against surrender due to a fear that justice might not be done to them. They advised Yakub to go back to Karachi. Before he could board the flight to Karachi, he was picked up by the Nepal police on suspicion, identified and rapidly moved to India." This was yesterday confirmed on some news channels when they interviewed the Nepali police officer. He re-iterated that there was no deal and Yakub was fleeing to Karachi. Then why are our “Intelligentsia” hell bent on stating otherwise? Let me put it another way: I know there is a rat in my house, and I place a laddoo in a trap. The rat gets caught and then pleads for mercy saying that he had come to “surrender” because I had offered him a “laddoo” (deal). Do I let him live? The second common argument is “but we are against death penalty. It is barbaric and does not serve as deterant , it has not reduced the no. of murders" This argument is as rediculous as telling a Soldier on the border 'Plz don't shoot the enemy..bcoz killing an enemies has not reduced the number of wars in the worId' or as absurd as saying that 'Scrap IPC, bcoz IPC has not helped us to reduce the no. of crimes.' Just because we are from the police force doesn’t mean we do not value human life. But in the case of a terrorist, what choice do we have? Do we preserve him hoping heh will reform? Can terrorists who come with guns in their hands and an unshakable belief that what they are doing (killing innocent people) is right, be ever reformed? Forget reformation, keeping such a dastardly mind alive is a big security risk too. Every time he is shifted from jails we have to be our toes to see if any attempt will be made by his gang members to either kill him, so that he is silenced or rescue him, so that he can continue his activities. And there is always the risk that one fine day his friends will hold some innocent civilians hostage and demand his release, so that we can put our lives at risk all over again to re-capture him. You want to abolish death penalty? Go ahead, but not for terrorists. Some of our “intelligentsia” have been crying that “due processes of law” have not been followed in this case. It is a shame that a case which is going for 2 decades, which has been debated at multiple levels of the judiciary, even at the highest level, is still subjected to scrutiny by mis-informed, half-read, cretins sitting in AC cabins and reading op-eds. If you did have a problem with the process, why did you not raise your voice in 2013 when he was sentenced to death? Why now when his death is imminent? Are these delaying tactics? Where do your loyalties lie dear “Intelligentsia”? I sincerely hope all these people are tried for contempt of court.Terrorists and criminals today are abusing our liberal process of Justice by resorting to D2...Delay and Derail... And finally there are some utter lowlifes who have given this entire thing a political, communal and even casteist colour. How can one party whichever it may be, be held responsible for a Supreme Court verdict, which has taken 2 decades and during which time multiple political parties have fought in courts against Yakub Memon? Do you have even an iota of conscience and rationality left in you when you make such absurdly illogical statements to defend a terrorist? In the aftermath of the Gurdaspur attacks, it has been reported that now India may be a j of the ISIS. In such situations Indians must unite and fight such a huge demon. But given how our “Intelligentsia” are hell bent in sowing seeds of discord among us, I fear we will be easy targets for such groups. While we keep shouting Hindu-Muslim, Brahmin-Dalit, BJP-Congress, I fear these terrorists will rip my poor country apart. – A “thulla”

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वाचनीय पण ह्या वाक्यांवर विश्वास ठेवणे कठीण आहे-
He had come to Kathmandu secretly from Karachi to consult a relative and a lawyer on the advisability of some members of the Memon family, including himself, who felt uncomfortable with Pakistan’s Inter-Services Intelligence, returning to India and surrendering to the Mumbai police. The relative and the lawyer advised him against surrender due to a fear that justice might not be done to them
कोणताही अट्टल गुन्हेगार व्हिडियो शुटींग्,खोटे पास्पोर्ट्स घेऊन दुसर्या देशात जाईल्?आय.एस.आय किंवा टायगरने त्याला असे जाऊ कसे दिले?तेही नेपाळला? सी.बी.आय.चे शंतनु सेन म्हणतात-we induced him. त्यावेळी पोलिस खात्यातल्याच एका कडून (खरी-खोटी माहित नाही) खालील माहिती मिळाली होती. १)टायगर मेमन हा दाउदच्या अनेक ऑपरेटर्सपैकी एक होता. २)पोलिसांच्या व स्थानिक प्रशासनाच्या पाठिंब्यावरच दाउद आपले साम्राज्य चालवायचा व अजूनही चालवतो. ३)दाउदने टायगरला मदत केल्याचे स्पष्ट झाल्यावर रॉ ने वरील मुद्द्याचा फायदा उठवला.म्हणजे थोडक्यात 'मेमन कुटूंबियांपैकी एकाला तरी भारतात पाठव नाहीतर तुझे येथील साम्राज्य उद्धव्स्त करू." अशी तंबी दाउदला दिली. ४)शेवटी याकुब तयार (स्वेच्छेने वा नाईलाजाने)झाला. त्याला नुसता पकडायचा नव्हता तर पाकिस्तानचा हात ह्यामागे आहे हेही दाखवायचे होते.म्हणून मग तेथील व्हिडियो शूटिंग्,पाकिस्तानी पास्पोर्ट्स वगैरे हा माल त्याच्या बॅगेत भरून त्याला पाठवले गेले.(कोणताही सराईत गुन्हेगार नकली पास्पोर्ट्स व व्हिडियो शूटिंग घेऊन परक्या देशात जात नाही. त्या देशाने काही ठोस आश्वासन दिले तरच तो जाईल.) याकुबला तसे आश्वासन रॉ ने दिले होते.म्हणूनच 'याकुबला फाशी देता कामा नये' असे मत हे सर्व ऑपरेशन करणारे रॉ चे बी.रमण ह्यांचे होते. अर्थात न्यायालयच्या/कायद्याच्या दृष्टिकोनातून अशा बॅक-डोअर आश्वासनांना अर्थ नसतो. २००६ साली ह्याचा अंदाज याकुबला आला. व नंतर आता फाशी अटळ आहे हे कळून चुकले.

In reply to by चिरोटा

फक्त दोन महत्वाच्या गोष्टी... १. आंतरराष्ट्रिय स्तरावर पोलिसांना हवे असलेले सराईत गुन्हेगार त्यांच्या खर्‍या नावांनी आणि खर्‍या पासपोर्टवर हिंडत असते तर किती छान झाले असते... त्यांना पकडायला पोलिसांना काहीच त्रास झाला नसता. त्यांची ओळख पटविण्याचे काम तर इमिग्रेशनच्या काँप्युटरनेच केले असते ! आणि अश्या गुन्हेगारांना अनेक खोटे पासपोर्ट बाळगायची गरज पडली नसती. सत्य हे आहे ही गुन्हेगारी जगत छुपी कामे, फसवेगिरी आणि इतरांच्या डोळ्यात धूळफेक करणे यावरच चालू शकते... चालते. २. बी. रमण यांचे रॉ मधले आणि शासनातले स्थान इतके मोठे नव्हते की ते आंतरराष्ट्रिय गुन्हेगाराला फाशी पासून संरक्षण देण्याचे वच॑न देवू शकतील. असा निर्णय केवळ (अ) अत्युच्च दर्जाचा शासकीय अधिकारी (पंतप्रधान अथवा कमीतकमी मध्यवर्ती मंत्रीमंडळातला संबंधीत कॅबिनेट मंत्री) अथवा (आ) लोकसभा, घेवू शकते. उदा. अबू सालेम प्रकरण. ३. अगदी कोणी जबाबदारीच्या बाहेर जाऊन खाजगी / शाब्दिक वचन दिले असले तरी ते सरकार आणि न्यायव्यवस्थेवर बंधनकारक असू शकत नाही. अनितीच्या चिखलात लोळणार्‍या गुन्हेगारांना असे अमिष दाखवून उंदरासारखे त्यांच्या बिळाबाहेर काढून सापळ्यात पकडले आणि न्यायपूर्ण निवाड्यानंतर देहांत शासन दिले तर त्यात फार अनितीकारक आहे असे वाटू नये... कारण अश्या एका गुन्हेगाराला पकडून शिक्षा केल्याने भविष्यात शेकडो निरपराध नागरिकांचा जीव वाचू शकतो. उदाहरणार्थ, मसूद अझर (लोकसभेवरचा हल्लेखोर), अहमद ओमर सईद आणि मुश्ताक अहमद झरगर यांच्या सारखे दहशतवादी भारताच्या ताब्यात असताना त्यांना खटले चालवून देहांताची शिक्षा झाली असती तर त्यांची सुटका होऊ शकली नसती आणि त्यांच्या पुढच्या अतिरेकी कारवाया न झाल्यामुळे किती तरी निष्पाप जीव वाचले असते. तसे न झाल्याने आजही भारतातील आणि विशेषतः काश्मीरमधील कित्येक निरपराध मरत आहेत... मरत राहतील. बाकी चालू द्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

असा निर्णय केवळ (अ) अत्युच्च दर्जाचा शासकीय अधिकारी (पंतप्रधान अथवा कमीतकमी मध्यवर्ती मंत्रीमंडळातला संबंधीत कॅबिनेट मंत्री) अथवा (आ) लोकसभा, घेवू शकते. ईए काका, एक तांत्रिक मुद्दा सांगतो, विथ योर परमिशन अझ्युम्ड , रॉ चा फूल फॉर्म आहे "रिसर्च एंड एनालिसिस विंग" अर्थात हे खाते पुर्णपणे स्वतंत्र असे "खाते" नसते अन्यथा त्याचे सगळे प्रोसीडिंग्स अन एक्टिविटी ह्या पार्लियामेंट मधे डिस्कस कराव्या लागल्या असत्या, हे बाह्यगुप्तचर खाते प्राइम मिनिस्टर्स ऑफिस उर्फ़ पीएमओ च एक "विंग" म्हणुन काम करते अर्थात त्याला संवैधानिक अस्तित्व नाही , इंटेलिजेंस ब्यूरो सुद्धा असाच एक कांस्टिटूशनलिटी नसलेला विभाग आहे, इंटेलिजेंस ब्यूरो ची सर्वोच्च अथॉरिटी म्हणजे गृहमंत्री/ प्रधानमंत्री असतात पण रॉ ही फ़क्त न फ़क्त प्रधानमंत्री साहेबांसच रिपोर्ट करते त्यामुळे रामन ह्यांनी त्याला ओढायला हा वादा केला असेल ही गृहीत शक्यता अतिशय रास्त ठरते

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

रामन हे तेव्हा रॉ मध्ये पाकिस्तान डेस्क प्रमुख होते. याकुबची १९९४ मध्ये मधु त्रिहानने दीर्घ मुलाखत घेतली आहे जी यु.ट्युबवर आहे.सहसा तपास यंत्रणा गुन्हेगाराला तपास पूर्ण झाल्याशिवाय मुलाखती द्यायला परवानगी कधीही देत नाहीत.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सहमत. माझा मुद्दा हाच होता की न्यायसंस्थेवरचे एखाद्या शिक्षेच्या प्रकाराबद्दलचे बंधन हा अत्युच्च स्तराचा "राजकिय" "निर्णय" असतो, तो दोन राष्ट्रांत घेतला जातो, तो डिआयबी/सेक्रेटरी स्तराचा अधिकारी घेऊ शकत नाही. (तेन्ला पावर नस्ते ;) ) म्हणून कोणत्याही गुप्तचर संस्थेच्या, कोणत्याही अधिकार्‍याला, कोणत्याही गुन्हेगाराच्या शिक्षेच्या स्वरुपाबद्दल कोणतीही खात्री देता येत नाही. फारतर प्रशासनातर्फे तुझ्या बाजूने कमी शिक्षेसाठी रदबदली करण्याचा प्रयत्न करेन इतके मोघम आणि "अंतीम निर्णयासंबंधी कोणतीही जबाबदारी नसलेले आश्वासन" देता येते, खात्री (प्रॉमिस) नाही. रामन यांच्या दाव्यामागे... (अ) तुम्ही म्हणता तसा राजकीय डाव असू शकतो, किंवा (आ) आपण दिलेल्या शब्द प्रत्यक्षात येणार नाही यामुळे लागलेली रुखरुख / अहंकाराला (इगो) बसलेला धक्का असावा आणि पुस्तकातील विधाने म्हणजे संबंधिताना "मी माझा शब्द पाळण्यासाठी माझ्या परीने शक्य ते सगळे केले" असा पडद्याआडून दिलेला संदेश असावा.

बाबरी पाडल्यानंतर या देशात दहशतवादी कारवाया सुरु झाल्या हे सत्य नाकारन्यामागे हिंदुत्ववाद्यांचा स्वार्थ लपला आहे.भारतातले हिंदू मुस्लिम सौख्य अस्थिर करुन लोकसभेतला आपला चार टाळक्यांचा पक्ष कसा वाढेल याच्या खटपटीत संघ परिवार होता.त्यासाठी पद्धतशीरपणे रथयात्र काढल्या गेल्या,लोकांची माथी भडकवण्यात आली व नव्वदच्या दशकात हे लोक झटपट सत्तेपर्यंत पोचले. सत्तालालसेपोटी स्वजनांना(हिंदूना) दहशतीच्या आणी अस्थिरेच्या खाईत लोटणारे हिंदुत्ववादी हे याकुब मेमन जास्त गुन्हेगार आहेत.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

>>> बाबरी पाडल्यानंतर या देशात दहशतवादी कारवाया सुरु झाल्या हे सत्य नाकारन्यामागे हिंदुत्ववाद्यांचा स्वार्थ लपला आहे. बाबरी पडण्यापूर्वी या देशात दहशतवादी कारवाया सुरू नव्हत्या हा जावईशोध लावल्याबद्दल फुलबॉटल डबियस यांचे अभिनंदन! माईंना असले संशोधक 'हे' मिळाल्याबद्दल माईंचे देखील अभिनंदन!

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

बाबरी पाडायला चिथावणी देणारे लोक आज ती जबाबदारी नाकारतात . कारण ते फाशीला घाबरतात. आणि गंमत म्हणजे भाजपाप्रेमी लोक , जिहादासाठी मरायला तयार असणारा याकूब दयेचा अर्ज का करतो ? असा प्रश्नही विचारतात ! फाशीची भीती फक्त भाजपाच्या नेत्यानाच वाटते का ? स्फोटात करोडोची संपत्ती गेली म्हणे. मंदिराच्या नावाने १४०० कोट रु गोळा करुन काखा वर करण्यासमोर हे नुकसान किरकोळच !

लोकसत्ता च्या अग्र लेखावर लोकसत्ता फेसबुक पेजवर आलेली प्रतिक्रिया - प्रात: स्मरणीय, आदरणीय, विवेक वादी श्री. रा.रा. कुबेरजींच्या चरणांस सर्वप्रथम वंदन! खुपच सुंदर अग्रलेख आहे. मेमनच्या वडीलांनी त्यांना मुलांनी काय केलय हे कळल्यावर कानाखाली मारल वगैरे वर्णन वाचुन थेट 'शामची आई' या धर्तीवर 'टायगरचे बाबा' अस काही प्रकरण वाचत आहोत असच वाटलं! ........याकुब हा कुटुंबाचा 'केवळ सनदी लेखापाल होता' अस म्हणत आपण दाखविलेले शब्द भांडाराच ऐश्वर्य पाहता आपणास शंकरशेठ का काय कसलीशी सगळ्यात भारी शिष्यवृत्ती द्यावी वाटते.... संजय दत्त च्या केसचा ऊल्लेख करत आपण काय साधु इच्छिता हे सुद्न्यांना समजलेच आहे..... आपण २२ वर्षे न्याय व्यवस्थेने काथ्याकुट करुन निकाल दिल्यावरही त्याची समीक्षा करता हा आपला अधिकार पाहता 'लोकसत्तास' भारतीय लोकशाहीचा पाचवा स्तंभ भविष्यात मानले जाईलसा भरवसा वाटतो..... असो. एक शेवटची विनंती. उद्या गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर आपणाकडून विवेकाची दीक्षा हवी आहे. आपले चरण पुजण्यासाठी कोठे येवुन भेटावे? सोयीस्कर वेळ सांगावी ही प्रार्थना.

एम आय एमचे खासदार जनाब असौद्दीन ओविसी यांचे म्हणने मला अतिशय योग्य वाटते,जर याकुब मेमनला फाशी दिली आहे तर तोच न्याय गुजरात दंगलीतील आरोपि कोदनानी व ईतरांनाही लावला पाहिजे.त्याच बरोबर मालेगावात बॉम्बस्फोट घडवून निष्पाप मुस्लिमांचा जिव घेणार्या क्रुरकर्मा जनरल पुरोहीत ,साध्वी(?)प्रज्ञा सिंग यांच्या वरील केस त्वरीत संपवावी व त्यांना फासावर द्यावे.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

>>> एम आय एमचे खासदार जनाब असौद्दीन ओविसी यांचे म्हणने मला अतिशय योग्य वाटते, अभिनंदन नानासाहेब! >>> जर याकुब मेमनला फाशी दिली आहे तर तोच न्याय गुजरात दंगलीतील आरोपि कोदनानी व ईतरांनाही लावला पाहिजे. बरोब्बर! नानासाहेब तुम्ही या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करा. प्रशांत भूषण, काटजू, इंदिरा जयसिंग इ. नामवंत वकील तुमच्या याचिकेसाठी लढतील. तुम्ही निधर्मांधांचे नीलाक्षतनय व्हाल हा अजून एक फायदा! >>> त्याच बरोबर मालेगावात बॉम्बस्फोट घडवून निष्पाप मुस्लिमांचा जिव घेणार्या क्रुरकर्मा जनरल पुरोहीत ,साध्वी(?)प्रज्ञा सिंग यांच्या वरील केस त्वरीत संपवावी व त्यांना फासावर द्यावे. सैन्यात 'जनरल' हे फार मोठे पद आहे (उदा. जनरल वैद्य). पुरोहित हे जनरल नसून कर्नल आहेत. तस्मात, वाचन आणि ज्ञान वाढवा. तो खटला अजून सुरू झालेला नाही आणि त्यांना जवळपास ७ वर्षे विनाजामीन तुरूंगात डांबूनसुद्धा अजून आरोपपत्र सुद्धा दाखल झालेले नाही. तरी सुद्धा कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह इ. मंडळींनीच मालेगावात बॉम्बस्फोट घडविले अशी तुमची खात्री दिसते. ही खात्री असेल तर खटला सुरूच तरी कशाला करायचा? त्यांना खटला न चालविताच थेट फाशी द्यावे यासाठी तुम्ही अजून एक जनहित याचिका दाखल करा. एकंदरीत नानासाहेबांची 'टॉपगिअर'मध्ये वेगात जात असलेली 'फिलॉसॉफी' आणि 'ग्रेट थुंकिंग' पाहून आम्ही धन्य झालो

In reply to by श्रीगुरुजी

तो खटला अजून सुरू झालेला नाही आणि त्यांना जवळपास ७ वर्षे विनाजामीन तुरूंगात डांबूनसुद्धा अजून आरोपपत्र सुद्धा दाखल झालेले नाही. खरं की काय? असे विनाजामीन, विना खटला (आणि आरोप सिद्ध न करता) डांबल्याबद्दल मग ते स्वाक्षरीवाले ४० जण आणि अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल आता आपल्या सरकारला धारेवर धरणार तर! ;) मोदी सरकारचे आता काही खरे नाही!

In reply to by विकास

ऑक्टोबर २००८ मध्ये या सर्वांना अटक करून मोक्का लावण्यात आला. मोक्का (हे टाडा/पोटा कायद्याचे महाराष्ट्रीय रूप) कायद्यान्वये अटक केलेल्यांना जामीन मिळत नाही. काही महिने महाराष्ट्र पोलिसांनी तपास केला. जेव्हा जेव्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचा विषय येण्याची शक्यता होती तेव्हा तेव्हा हा तपास विविध तपाससंस्थांकडे पाठवून 'अजून तपास सुरू आहे आणि काही नवीन माहिती बाहेर येण्याची शक्यता असल्याने तपास पूर्ण झालेला नाही व त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावरच आरोपपत्र दाखल करता येईल" असा युक्तीवाद करून आरोपपत्र दाखल केले गेले नाही. सुरवातीला महाराष्ट्र पोलिस खाते, काही महिन्यांनी महाराष्ट्र एटीएस, नंतर एक एसआयटी, नंतर सीबीआय, नंतर अजून एक एसआयटी, नंतर एनआयए अशा विविध संस्थांकडे तपास वर्ग करण्यात आला. आजतगायत कोणताही पुरावा मिळाल्याचे ऐकिवात नाही. दरम्यान आरोपी तुरूंगात सडत होते. साध्वी, पुरोहित व इतरांचा कबुलीजबाबासाठी तुरूंगात प्रचंड छ्ळ करण्यात आला, साध्वीला जेवणात मांसाहार देणे, अश्लील चित्रे/मासिके देणे, तिला कर्करोग झाला असतानासुद्धा उपचारासाठी जामिनाला विरोध करणे अशा कृत्यांमधून युपीएने आपली हिंदूविरोधी मानसिकता दाखवून दिली. काही वर्षांपूर्वी साध्वीच्या वडिलांचे निधन झाल्यावर अंतिम दर्शनासाठी फक्त २ तास तुरूंगाबाहेर काढायला सुद्धा सरकारी वकीलाने विरोध करून तिला वडीलांचे अंतिम दर्शन घेऊन दिले नाही. ऑक्टोबर २००८ पासून हे सर्वजण तुरूंगात आहेत. आजवर कणभरही पुरावा मिळालेला नाही. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर जाहीर खोटे आरोप केले गेले. एका पत्रकार परीषदेत सीबीआय ने सांगितले की लष्कराने कर्नल पुरोहितांना ६ टन आरडीएक्स पुण्याहून काश्मिरला पोहोचविण्यासाठी दिले होते. ते आरडीक्स पुरोहितांनी काश्मिरला न पोचविता त्याचा वापर मालेगाव बॉम्बस्फोटात केला. हे ऐकल्यावर दुसर्‍याच दिवशी लष्करातील प्रमुख अधिकार्‍यांनी पत्रकार परीषद घेऊन हे खोटे असल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार लष्करात आरडीक्स सारखा स्फोटक पदार्थ एकट्यादुकट्या व्यक्तीच्या हवाली केला जात नाही. तसेच लष्करात प्रत्येक गोळीचा देखील हिशेब ठेवलेला असतो. अशा परिस्थितीत कर्नल पुरोहितांना लष्कर आरडीक्स देणे अशक्य आहे आणि समजा दिले असले तर ते बेपत्ता झाल्याचे लष्कराला न समजणे अशक्य आहे. हे ऐकल्यावर सीबीआयने आपले आरोप मागे घेतले. सर्व आरोपींची आतापर्यंत कमीतकमी ४ वेळा नार्को टेस्ट घेतलेली आहे. एकापेक्षा जास्त वेळा नार्को टेस्ट घेतलेले हे पहिलेच प्रकरण असावे. नार्को टेस्टमधूनही काही मिळाले नाही. एका नार्को टेस्ट नंतर स्वामी दयानंद नावाचा आरोपी १२ तासांहून अधिक काळ बेशुद्ध होता तेव्हा तपासयंत्रणांचे धाबे दणाणले होते. नंतर एनआयने असे उठविले की स्वामी असीमानंदांना तुरूंगात सेवेसाठी एक मुस्लिम सेवेकरी दिला होता. हा मुस्लिम आरोपी याच बाम्बस्फोटात आधी पकडलेल्या १०-१२ मुस्लिमांपैकी होता. त्याच्या सेवेने स्वामी असीमानंदांचे मन विरघळले आणि आपल्यामुळे या मुस्लिमावर खोटा आरोप झाला आहे असे वाटून ते व्यथित झाले आणि त्यांनी बॉम्बस्फोटातील आपल्या सहभागाची कबुली दिली. हे प्रसिद्ध झाल्यावर दुसर्‍या दिवशी असीमानंदांनी सांगितले की असा कोणताही सेवेकरी तुरूंगात आपल्याला दिलेला नव्हता आणि आपण अशी कोणतीही कबुली आपण दिलेली नाही. तुरूंगात असलेल्या कोणत्याही आरोपीला दुसरा आरोपी सेवेसाठी दिलेला नसतो. त्यामुळे तपास यंत्रणांची ही थापही लगेच उघडकीला आली. या सर्वांवर मोक्का लागू होतो का नाही याची सुनावणी गेली साडेचार वर्षे सुरू आहे. युपीएने अर्थातच ही सुनावणी जास्तीत जास्त लांबविण्याचा प्रयत्न केला. २०१४ मध्ये सरकार बदलल्यावर काहीसा वेग आला. २-३ महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की उच्च न्यायालयाने मोक्काचा विचार न करता नवीन न्यायाधीश नेमून जामिनावर विचार करावा. त्यावर विचार सुरू झाला आहे. सध्या प्रकरण इथपर्यंत आले आहे. युपीएच्या काळात या सर्वांना समझोता एक्स्प्रेस, हैदराबादेतील मक्का मशिदीबाहेरील बॉम्बस्फोट, अजमेर येथील बॉम्बस्फोट इ. प्रकरणातही अडकविण्याचा प्रयत्न झाला. युपीएच्या काळात या सर्वांना इतक्या खोलवर आणि घट्ट अडकविलेले आहे की त्यातून सुटण्यास खूप कालावधी लागणार आहे. तोपर्यंत यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले असेल.

In reply to by श्रीगुरुजी

साध्वीच्या स्कूटरचा वापर करुन स्फोट झाला होता ना ?

कधी नव्हे ते कधी जिओ बद्दल म्हणवेसे वाटते जियो मेरे जियो कुठलेही तिखट मीठ न लावता पाकिस्तान मध्ये याकुब बद्दल दिलेली बातमी पाहून आपल्या डेली सोप प्रेरित मिडिया ची भणंगगिरी पाहून डोके फिरते.

बाबरी , अदवानी , सध्वीची स्कूटर , मंदिराचे चौदाशे कोटी .... यावर चर्चा येताच देशभक्त लोक गायब झाले.

In reply to by dadadarekar

केवळ गायब नाहि झाले... जन्नतला गेलेल्या मसिहाच्या बिदाईनिमीत्त आयोजीत प्रसाद भोजनाला गेलेत.

In reply to by dadadarekar

देशभक्त लोक गायब ? आणि तुम्ही कोण देशद्रोही ?

In reply to by dadadarekar

अरे काढा ना तुम्ही धागा. हिंदू दहशतवादावर. मजा येईल बघा. मुखवटे आणि चेहरे ही दिसतील.

प्रशांत भूषणला चोपलं श्रीरामसेनेच्या माणसाने. अशा घटनेचा निव्वळ निषेध करुन भागणार नाहि. जन्माची अद्दल घडावी अशी शिक्षा झाली पाहिजे. आज हे वकिलांवर हात उगारणार. उद्या कोर्टाचा घास घ्यायला बघणार. यांना वेळीच आवरायला हवं.