Skip to main content

गविकाकाचा सल्ला.

लेखक मन यांनी शुक्रवार, 10/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात. त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला. तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल. एक टेम्प्लेट केस येथे देत आहे. प्रश्न: काका, मी इयत्ता दहावीत आहे. आमच्या शेजारी एक ताई राहते. तिच्याविषयी माझ्या भावना वेगळ्या आहेत. मला ती खूप आवडते. ती जाता येता माझ्याशी बोलते. नुकतीच ऑफिसला जाताना एकदा ती मला "बाsय" असं म्हणाली. यामुळे तिच्याही मनात फीलिंग्ज आहेत हे मला समजलं. तेव्हापासून माझं तिच्याकडेच लक्ष लागलेलं असतं. तीही जाता येता माझ्याशी बोलते. मी तसं अजून तिच्यापाशी बोललो नाहिये. पण मी सुरुवात कशी करु याविषयी कृपया सल्ला देणे. माझे अभ्यासाचेही नुकसान होत आहे. एक विद्यार्थी. . . गविकाकांचे उत्तरः श्री. रा.रा. विद्यार्थी, नमस्कार. गहन आहे प्रश्न.. पण करतो प्रयत्न. तुम्ही दहावीत आहात. एका शैक्षणिक वर्षास एक मानवी वर्ष या प्रमाणात तुमचे आजपावेतोचे शिक्षण झाले आहे असे मी गृहीत धरतो. म्हणजेच आपण अंदाजे १४ वर्षाचे आहात. तुम्ही उल्लेख केलेली "ती" ऑफिसात जाताना तुम्हाला निरोप घेण्यासदृश हावभाव आणि अविर्भाव करते. बालकामगार गुन्ह्याचे या बाबतीत उल्लंघन झालेले नसून "ती" नोकरी करण्याच्या कायदेशीर वयाची आहे असंही मी गृहीत धरतो. शिवाय ती ऑफिसात कामावर जाते, (बांधकामावर नव्हे) असं उल्लेखावरुन दिसत असल्याने तर्कदृष्ट्या ती किमान डिग्रीपर्यंत शिकली असावी. तस्मात तिचे वय वीस वर्षांच्या वर आहे असेही मी गृहीत धरतो. याचाच अर्थ ती तुमच्यापेक्षा किमान सहा वर्षांनी मोठी आहे. तसे असण्यास काही हरकत नाही. तसे असल्यास ती आवडण्यासही काही हरकत नाही. पण जग हरकतींपेक्षा शक्यतांवर चालत असते हा एक मोठा दु:खद नियम आहे. त्यामुळे कु. (हेही एक गृहीतक मांडायचे अंमळ विसरलो) "ती" हिज आपण आवडत असलात तरी लैंगिक पुनरुत्पादनाच्या उद्देशाने (ज्याला अंकुरावस्थेत प्रेम असेही म्हणतात), आवडत असाल अशी शक्यता बिंदुवत वाटते. त्यामुळे तुमच्या भावनांशी पूर्णपणे सहानुभूति ठेवूनही तुम्ही उल्लेखलेली "ती" तुमची "ही" होण्याची शक्यता नगण्य असल्याने आपण खुद्द हपीसात जाण्याच्या वयापर्यंत कळ काढून त्या वेळी तत्कालीन दहावीतल्या "तीं"ना "हाय" करावेत असे सुचवून पाहतो. तोसवर आपल्या भावनांचे दमन करण्याची गरज नाही. नैसर्गिक गोष्टींना अनैसर्गिक समजू नका इतकेच सांगतो. बाकी दहावीत असल्याने तुम्हांस अधिक स्पष्टीकरण नकोच अशी आशा. आपला का?का?. गवि. . . . ता.क.: वाचकांनीही आपल्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारावेत. दर आठवड्याला किंवा गविकाकांचे जेवण उत्तम झाले असल्यास केव्हाही निवडक प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील. द.ही.: फाजील प्रश्नांना प्रश्नकर्त्याचे दुर्दैव समजले जाईल. --मनोबा व गविकाका

वाचने 33060
प्रतिक्रिया 194

प्रतिक्रिया

In reply to by मारकुटे

हॅ हॅ. व्यनीत आलेले प्रश्न अग्राह्य धरले जातील. पब्लिक सदराचे प्रश्न पब्लिकमधेच विचारणे. :) खाजगी असेल तर श्री. रा. रा. मन (सूत्रधार) यांस व्यनि करावा. ते नाव गाळून येथे प्रश्न आणतील. कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देण्याचा हक्क राखून ठेवण्यात येत आहे. उत्तरांना शिरेसली घेतल्यास जबाबदारी प्रश्नकर्त्याची राहील. हा एक गंमतीचा कट्टा आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. इत्यादि. बाकी सूचनापाट्या बनवण्याची जबाबदारी पुणेकर असलेल्या मन यांजवर टाकत आहे.

In reply to by स्पा

लग्न करावे कि करू नये ?(वेडावणारे मुखचिन्ह)
उत्तरः श्री. स्पा यांस अनेकोत्तम प्रणाम. आपण विचारलेल्या प्रश्नाअखेरीस दिलेल्या चिन्हामुळे आपल्या प्रश्नात छद्माचा अंतर्भाव झाला आहे असे जाणवते. तेव्हा प्रथम सल्ला असा की लग्न करावे की नाही या प्रश्नाच्या गंभीर विचाराआधी लग्न या विषयाविषयीचे हे छद्म मनातून काढा. आता तुमचा मूळ प्रश्नः लग्न करावे का नाही. हा निर्णय तसा सोपा आहे. आर्थिक पैलूतून पाहता लग्न करणे हा एक अत्यंत खर्चिक मार्ग ठरु शकतो. मी सध्या आपल्या मनात फक्त भावनिक पैलू आहे असं गृहीत धरतो. म्हणजेच सध्या पोहोण्याच्या तलावाच्या काठावर उभे राहून नाक मुठीत धरुन उडी टाकू की नको अशा विचाराने तुम्ही पुढेमागे हेलकावत आहात. सल्ला असा की उडी टाका. याचे कारण म्हणजे लग्न हे काही दिव्य अद्वितीय अनुभव आहे असे नव्हे, पण आयुष्यात पहिली वीसतीस वर्षे आपण एकटेच असतो. आणि कदाचित उत्तम आरोग्य असल्यास शेवटीही दहावीस वर्षे तरी एकटे असण्याची संधी किंवा सक्ती होण्याची बरीच शक्यता असते. आयुष्य एकच आहे असे गृहीत धरता बिनएकटेपणा, अर्थात कायमचा जोडीदार असण्यातले सुख अनुभवण्याचा ऑप्शन मधल्या काळात घेतला नाही तर उघडं यायचं अन उघडं जायचं या दोन टोकांमधे पूर्णकाळ एकटे राहणे हा एकसुरी ऑप्शनच पदरी पडतो. त्यामुळे एकूण दोन ऑप्शन्सपैकी दोन्ही अनुभवण्याचा ऑप्शन असल्याने एक ऑप्शन ऑप्शनला टाकू नये आणि विवाहसुख अनुभवावे असे सुचवून पाहतो. त्याचे आणखी एक फळ म्हणजे पोरेबाळे. लग्न केल्यास रीतसर बाप होऊन बाळाची मायेची ऊब अनुभवता येते. लहानपणी खुद्द अनुभवलेल्या आईच्या ऊबेपेक्षा जास्त समाधान आणि शांती मिळते. बाकी सर्व रद्दबातल झाले तरी पोरांनी आपल्याला बाबा म्हणून कुशीत शिरणे या क्षणाचा अनुभव लग्नाचे बाकीचे संपूर्ण लडतर झेलण्यास पुरेसा ठरावा. लग्नानंतर आपले अनुभव कळवावेत. आपला काका.

In reply to by गवि

श्री. स्पा यांस अनेकोत्तम प्रणाम. या प्रश्नाच्या गंभीर विचाराआधी लग्न या विषयाविषयीचे हे छद्म मनातून काढा.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif आता तुमचा मूळ प्रश्नः लग्न करावे का नाही. हा निर्णय तसा सोपा आहे. आर्थिक पैलूतून पाहता लग्न करणे हा एक अत्यंत खर्चिक मार्ग ठरु शकतो. मी सध्या आपल्या मनात फक्त भावनिक पैलू आहे असं गृहीत धरतो. म्हणजेच सध्या पोहोण्याच्या तलावाच्या काठावर उभे राहून नाक मुठीत धरुन उडी टाकू की नको अशा विचाराने तुम्ही पुढेमागे हेलकावत आहात. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif साफ खपल्या गेलो आहे =))

In reply to by विकास

एकदा दालन तयार झालं कि मिपाकरांच्या सपोर्ट देण्या-घेण्याला तसाही ऊत येईल. आणि तिथेही कंपूबाजी करुन ग्रूप थेरपीची हौस भागवुन घेतील मिपाकर ;)

In reply to by जेपी

मा. श्री. तथास्तु. आपणास कितपत मऊ क्वायर हवे आहे याची मर्यादा प्रत्येकाच्या गादीविषयक आवडीनिवडीवर ठरत असल्याने हा निर्णय अंदाजानेच घ्यावा असे माझे मत आहे. काथ्याच्या गादीवर बसल्यावर काही टोचू नये इतपत बारीक कुटावा. धन्यवाद.

In reply to by मारकुटे

चड्डीविषयी प्रश्न असल्याने प्रश्नकर्त्याचे वय दहा वर्षे किंवा कमी आहे असे गृहीत धरतो. आपापला वयोगट समजून नाडी बांधता सोडता यायला लागेपर्यंत इलॅस्टिक वापरावे, अन्यथा लघुदुर्घटना होऊ शकतात. तसेच कृपया फक्त गहन प्रश्नच विचारावेत. कळावे.

In reply to by गवि

छे छे दहा वर्षे पण खुप झाले. नुकताच जन्म झाला आहे आमचा ;) एक महिना किंवा थोडा जास्त. हा प्रश्न गहन कसा नाही यावर आपले मत मांडावे ही नम्र विनंती

गविकाका , फ़ाट्यावर मारण्याला माज म्हणतात का? असल्यास तो कसा उतरावावा?

अडचण-१ मी एक शाम-ळु तरुण आहे.आमची एक कुटुंब मैत्रिण आहे पण तिला सतत पट्ट्य्यानेच बोलायची सवय आहे कधी कधी ती तोंडातही मारते, क्रुपया काय करावे हे सुचवावे. अडचण-२ तसेच माझे एकदा गावात व एकदा रात्रपाळीवर असताना दोन तरुणींशी संधान जुळले त्यातल्या दोघीही मला चुना लावुन घरातील तसेच माल मधील शोपिंग केलेले सामान(ते सामान नव्हे) घेवुन पळुन गेल्या सध्या मी एकटाच हात चोळत बसलो आहे काय करु ?

In reply to by इरसाल

या दोन्ही घटना तुमच्याबाबत घडल्या आहेत काय? चमचाभर पाण्यात नाक बुडवून वगैरे... आमचेही २ प्रश्न १) तुमच्याकडे कोल्हापुरी चपला आहेत का नाही? त्यांचा शस्त्र म्हणून वापर करता येतो हे माहित आहे का? २) या दोन्ही तरुणी एकत्र पळून गेल्या किंवा कसे?

In reply to by पैसा

१) दुसर्‍या कारणामुळे घरात एकही चमचा शिल्लक राहिलेला नसल्याने आपला सल्ला फॉलो करु शकत नाही क्षमस्व. २) या दोन्ही तरुणी एकत्र पळून गेल्या किंवा कसे? भेंडी हमने तो उ बारे में सोचा ही नही.इ तो नया अँगलवा आ गया, कहानी मा टिवस्ट !!!! त्या पळुन गेल्यावर आम्ही पोस्ट इन्क्वायरी केलेली नाही.

In reply to by मारकुटे

काहीकाळ ते जागृत करणारे वाचन थांबवल्यास कंटाळून आत्मभानाच्या आत कर्बद्विप्रणील वायू जमा होईल आणि ऑपॉप पुन्हा झोपी जाईल. यानेही फरक न पडल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

In reply to by इरसाल

श्री. इरसालजी. गगनविहारी या शब्दाचा अर्थ "ग" ची बाधा झालेला आणि हवेत चालणारा मनुष्य असा होतो. "ग"चा अर्थ माहीत नाही. क्षमस्व. -काका

गविकाका मला वाचवा... प्रश्न १ कुठ्ल्या मार्गाने माझ्या आत्म्याला अनुभूती मिळून माझ्या मनोज्ञ मानसिकतेला महदोत्क्ट प्रचिती मिळेल..? प्रश्न २ माझा नवाकोरा महागडा मोबाईल हरवला आहे, तो मी कसा परत मिळवू?

In reply to by योगी९००

मा. श्री योगी९००जी. प्रथम समस्या जटिल आहे. इसपगुल, धौतीयोग चूर्ण वगैरे वापरुन पहायला हरकत नाही. फायदा न झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. दुसर्‍या समस्येबाबतः समस्या जटिल किंवा गहन नसल्याने प्रश्न डिसक्वालिफाय होत आहे. क्षमस्व.

बाकी पब्लिकने आपापले सल्ले द्यायला तात्त्विकदृष्ट्या हरकत नसावी!

In reply to by पैसा

हो.. अगदी अगदी. मी आठवड्यातून एकदाच देणार आहे. बाकी सर्व पब्लिकच्या सल्ल्यांसाठीच आहे. :)

काका, तुम्हाला टंचनिका आपलं टंकनिका कुठे मिळाली? तिला तुम्ही कसे खुश ठेवता? उत्तरांचे छाप तुम्ही तयार करुन ठेवलेत का? तुम्ही गविकाका कसे झालात?

In reply to by पैसा

हे प्रश्नाचे उत्तर नाही. गांभीर्याने विचारलेल्या प्रश्नांना गांभीर्याने उत्तरे दिली जावीत अशी अपेक्षा गैर नसावी. प्रदुषण झाले आहे श्वास घेतांना त्रास होतो काय करु या प्रश्नाला प्रदुषण झाले म्हणून श्वास घेऊ नका असे उत्तर चुकीचे असते.

In reply to by मारकुटे

हा प्रश्न गहन आहे. याला प्रश्नराज हा किताब दिला पायजे. हा प्रश्न धागाकर्ते श्री. मन यांस विचारणे लागू ठरावे. बाकी आपण एकटेसुद्धा पुरेश्या संख्येने प्रतिसाद देता आहातच त्यामुळे प्रतिसादसंख्येचा तुटवडा पडण्याची काळजी करणे हे उपाशी माणसाने आगोदरच हाजमोला मागवून ठेवण्यापैकी आहे.

प्रश्न तुमचा उत्तर राजा गोसावींचे या सदराची आठवण झाली. आता आमचा प्रश्नः धर्म्/विज्ञान,जात्-पात,राजकारण,पुरोगामी/प्रतीगामी,निवासी/अनिवासी यावरील बिनबुडाचे वाद या पल्याड ही काही जग आहे हे जालीय (स्वयंभू)विचारवंताना *new_russian* \m/ \M/ कधी कळेल (आणि पचनी पडेल)*blush* :-[ :[ ;'> ;-. :blush:

In reply to by सूड

आलटून्/पालटून(१) वापरण्याची प्रथा(२) आहे बुवा(३)... तळटीपा: १.आलटून्/पालटून म्हणजे तुमची बाजू कुठली "धागा कर्त्याची की विरोधी पक्षाची" त्यानुसार सोईस्कर. २.प्रथा म्हणजे परंपरा नव्हे "परंपरा" म्हटले की तुम्ही रूढीवादी अगदी बुरसट्लेल्या विचारांचे गणले जाल. ३ सदर माहीती "जुण्या आणि जाणत्या" मिपाकराने नाव न सांगण्याचे अटीवर दिली आहे तेव्हा ईत्यलम.

गविकाका.. अर्धवट सोडलेले "वाड्यात.." कधी पुर्ण करणार?

स्त्री अन पुरुष यात श्रेष्ठ कोण ?

In reply to by बर्फाळलांडगा

माननीय बर्फाळलांडगा, सदर धागा हा प्रश्न विचारुन उत्तरे मिळवण्यासाठी आहे. प्रश्न विचारुन पेच निर्माण करण्यासाठी नाही. तेव्हा प्रश्न विचारण्यामागे उत्तर मिळवण्याचा उद्देश असावा, उत्तरकर्त्याची उत्तरपूजा बांधण्याचा उद्देश नसावा. स्त्रीपुरुष एकसमान आहेत असं म्हणून पाहतो.

In reply to by बर्फाळलांडगा

जीवन भाऊ हे फार उत्तुंग व्यक्तीमत्व आहे.त्यामुळे त्यांनी स्वतःचा ब्लॉग पण काढला आहे. आपण तिथे जावून त्यांना हवे ते विचारू शकता. त्यांच्या ब्लॉगचा पत्ता देत आहे. http://agakke.blogspot.in/2013/04/jay-maharastra.html

In reply to by बर्फाळलांडगा

ह्या अशा जीवनरंगी लेखांच्या बाबतीत आम्ही फर्स्टच आहोत आणि असणार. त्याचे काय आहे, मुद्दाम गहन विचार कर्रुन पाडलेल्या बिन-केशरी आणि घट्ट पाकातल्या लेखांपेक्षा (प्रतिसादांपेक्षा) हे बरेच नाही का?

In reply to by मुक्त विहारि

जीवनभौ च्या बोल्गवर खालील ब्रीद वाक्य आढळले. "मी मराठी मानुस माला नहीं कोणाची भीती ....जय महाराष्ट्र"

गविकाका, उलाला उलाला... हे गाणे पाहुन माइंड "डर्टी" झाल्यास काय करावे ? ;)

In reply to by पैसा

तेच तर विचारले आधी. त्याचे धड कुणी उत्तर देत नाही. याचाच अर्थ न उडणारे प्रतिसाद कसे द्यायचे कुणालाच माहित नाही. याचाच अर्थ आताचे संपादक त्या निकषानुसार संपादक झालेले नाहीत. म्हणूनच वरचा प्रश्न विचारला.

In reply to by मारकुटे

याचाच अर्थ आताचे संपादक त्या निकषानुसार संपादक झालेले नाहीत
दिला पाय शेपटीवर.... :)

In reply to by मारकुटे

संपादक न होणे हा आपल्या आयुष्यातला तातडीचा आणि गहन प्रश्न आहे का? बाकीचे प्रश्न पाहता तसं वाटत नाही.

जीवन भौंचा साल्ला बर्फाळलांडगा - Fri, 10/01/2014 - 15:16नवीन सदर कवा सुरु व्हनार ? हा साल्ला कोण???

In reply to by सूड

कारण बराच गहन विचार आणि मुद्दाम वेळ खर्च कर्रून पण इथे बर्‍याच जणांना ते जमत पण नाही. ह्यासाठी बहूदा नावीक होवून , चीनच्या समुद्रात बर्फाच्या रंगाच्या प्राण्याची सोबत घेत टंकत असावेत. वरील उप-प्रतिसाद सूड यांनाच आहे. हे वेगळे सांगायला नकोच.

In reply to by सूड

कोणाच्याही डोक्यावर मिरे वाटण्याची स्टँडर्ड ऑपरेटिङ्ग प्रोसिजर काय ?
संपादक व्हावे. त्यांच्याही डोक्यावर मिरे वाटायचे असतील तर सामनामध्ये सदरलेखन करावे.

गविकाका आपले लाडके नसलेल्यांचा धागा,त्यांची रनिंग कॉमेंट्री डोक्यात जात असेल तर इस्त्री शक्तीची जाज्वल्य पावर दाखवुन भरकटवावा का?

मिपा ही विचारांचे आदान-प्रदान करण्याचे माध्यम आहे की विचार प्रसूती केंद्र ;)

In reply to by मी_आहे_ना

असे माझे मत आहे. अर्थात बरेच जण अति विचार कर्रुन आणि मुद्दाम आपला आणि इतरांचा वेळ खर्च करतात, तो भाग निराळा. आणि आजकाल असे बरेच जण ह्या दोन-चार महिन्यांत प्रकट झाले आहेत. वरील उप-प्रतिसाद हा "मी_आहे_ना" ह्यांनाच आहे...

गविकाका, खालील गाड्यांपैकी एक गाडी घ्यायची ठरवली आहे.कुठची घ्यावी(फक्त डिझेल मॉडेल) १)मारुती स्विफ्ट-VDI 2)फियाट पुन्टो- MJD-Dynamic 3)टोयोटा एटियॉस लिव्हा ४)फोक्स्वॅगन पोलो महिन्याला जास्तीत जास्त १०००कि.मी.,वापर दररोज. कृपया सल्ला द्यावा.

In reply to by चिरोटा

श्रीयुत चिरोटा, आपला प्रश्न समजला. आपण आधीच उत्तम संक्षिप्त यादी बनवली आहे. यामुळे आता काम अत्यंत सोपे आहे. निर्दिष्ट चार वाहनांपैकी चौथ्या क्रमांकाचे फोक्सवॅगन पोलो हे वाहन या यादीतले सर्वाधिक खरेदीयोग्य वाहन आहे असे मत देत आहे. जर्मन इंजिनियरिंगची तुलना बाकीच्यांशी होऊ शकत नाही. किंवा तुलनाच होऊ शकते आणि फोक्सवॅगन / स्कोडा या प्रॉडक्ट लाईनच्या मोटारी श्रेष्ठ ठरतात. शुभेच्छा. गविकाका

ग्रँड आय १० घ्या

In reply to by बॅटमॅन

रा. बॅटमॅन, पाशवी शक्ती हा शब्द आपण "स्त्री"जमातीला उद्देशून वापरला आहात हे गृहीत धरतो. हेच का गृहीत धरतो याचं कारण म्हणजे वेड पांघरणे जमत नसणे या स्वरुपाचे आहे. सल्ला असा की पाशवी शक्ती हा दुरित शब्द आधी आपल्या शब्दकोषातून काढून टाका. डीलीट करता न आल्यास हाईड तरी करा. शिवाय कोणत्याही प्रकारची वेसण घालण्याची कोणतीही इच्छा मनात बाळगू नका. वेसण घालणारे आपण कोण? अशा दृष्टीने स्वतःकडे पहा. वरील सर्व मुद्दे स्त्रीशक्तीच्या समोर पुन्हापुन्हा बोलून मांडत रहा. त्यामुळे तुमच्याविषयीचे सर्व समज दूर होऊन काही काळात ऑपॉप त्यांना वेसण घातल्याप्रमाणे सर्व फायदे तुम्हाला मिळतील. फार जास्त वेसण बसल्यास विवाहाची जबाबदारीही आपणाकडे चालून येऊ शकते. एकूण ध्येय साध्य करण्याकडे वाटचाल असणे महत्वाचे. प्रत्येक वेळी संघर्ष किंवा क्रांती हाच उपाय नव्हे. आपला सौम्य गविकाका

In reply to by गवि

पाशवींचे पाशवीपण जावो अशा अर्थी विचारतो होतो हो ;) त्या पाशवीपणाला वेसण कशी घालावी ;) तरी, सल्ल्याबद्दल धन्यवाद हेवेसांनल. आपला (सौम्यरौद्रकरुणविनोदबीभत्समिश्रित) बट्टाचार्य.

In reply to by बॅटमॅन

वेसण घालायचा प्रयत्न केल्यास शिंगे रोखून अंगावर येण्याची शक्यता अमर्याद प्रमाणात आहे. त्यापेक्षा प्रेमाने पेंड सरकी खायला घालावी. जे आजपर्यंत कोणालाही जमलं नाही त्याची स्वप्ने कृपया बघू नयेत.

In reply to by पैसा

हॅ हॅ हॅ. वाटलंच कोणीतरी प्रतिनिधी मध्ये येणारच. प्रत्यक्षापेक्षा जाल भयंकर या नात्याने सर्व पाशवी शक्ती जालावर अजूनच जास्त नखरे करतात असे दिसते आहे. तस्मात प्रतिपादनास तितपतच महत्त्व दिलेले आहे.

In reply to by बॅटमॅन

गविकाकांनी सांगितलं तेच सांगितलं बाबा तुला. तरी पटेना. लग्न झाल्यावर तुझं कसं व्हायचं लै काळजी लागून राहिलीय. तू आपला संकटांचा नाश करणारं मारुती स्तोत्र न चुकता म्हणत जा.

In reply to by पैसा

लग्न झाल्यावर तुझं कसं व्हायचं लै काळजी लागून राहिलीय.
मला तर याच्या बायकोचं कसं व्हायचं याची जास्त काळजी लागून र्‍हायलीय.....a

In reply to by सस्नेह

चलो अच्छा है. कुणाला आमची तर कुणाला आमच्या होणार्‍या बायकोची चिंता लागलीये. तस्मात काळजी ब्यालन्स्ड झाली हे उत्तम झालं ;)

In reply to by बॅटमॅन

तुला सांगतो ब्याट्या , आपल्या बघण्याचे, ठरल्याचे, झाल्याचे अन सुखात चालाल्याचे इथे अज्याबात सांगायचे नाही, दाखवायचे नाही अन कळु तर बिलकुल द्यायचे नै. ;-) .................. हितचिन्तक अभ्या

In reply to by अभ्या..

अंह... जितका वेळ आपल्याला वाटते की आपण सुखात आहोत...तो पर्यंत "तीचे" "नवर्याला ताटाखालचे मांजर कसे बनवावे" याचे ट्रेनिंग चालु असते

In reply to by पैसा

केल्यास शिंगे रोखून अंगावर येण्याची शक्यता अमर्याद
शिंगे आमच्याकडेही आहेत... याल अंगावर तर घेऊ शिंगावर!

In reply to by बॅटमॅन

"पाशवी शक्तींना वेसण कशी घालावी?" आता खूद्द तुम्हालाच असा प्रश्र्न पडला म्हणजे कमाल झाली. बहुदा "डु आय.डी" जास्त प्रबळ झालेल्या दिसत आहेत. पण चिंता नसावी, जी़व़ऩ भा़ऊंचा़ ले़ख़ वाचले आ़णि़ त्या़व़ऱ प्रति़सा़द़ दिले की अशा पाशवी शक्ती पळून जातात, असे अनूमान आहे.

In reply to by मुक्त विहारि

जीवनरंगी मिठाई खाल्ली की नथूगुग्गुळवटीच काय, पशूगुग्गुळवटीसकट सर्व वट्या खाणार्‍यांचा बन्दोबस्त पक्का हे बाकी खरं!!! अन पुल म्हणाले त्याप्रमाणे पेढा बनवण्यापेक्षा हलवायाची मैतरकी अधिक गोडीची. हलवाई इथे मिपावरच असल्याने टेण्षण इल्ले. धन्यवाद सल्ल्याबद्दल!!!

In reply to by बॅटमॅन

तुमचे पंख आमच्या कडे वळू नयेत, ह्याचाच आम्ही प्रयत्न करतो. (तुमच्या पंखाच्या नुसत्या दर्शनाने बर्‍याच जणांची धोतरे सुटली आहेत.) ह.घ्या.

In reply to by मुक्त विहारि

हाहाहा =)) पण काका, आम्ही आपले गुणी पुतणे आहोत. तेव्हा कृपादृष्टी असू द्यावी. ( गुणांमध्ये आलोकनाथ आणि गटणे या दोघांना चीतपट करणारा) बट्टमण्ण.

In reply to by बॅटमॅन

मी पण हेच म्हणणार होतो. तो वामन परवडला, निदान स्वर्ग तरी मिळतो. तुम्ही १/२ वाक्यातच आस्मान दाखवता. असो.... भले भले साक्षी आहेत (क्रुपया "सा" ह्या अक्षराच्या कान्हा/मात्रा ह्यांची तोडमोड करू नये आणि अनुस्वार तर बिलकूल देवू नये.मी "साक्षी"च म्हणालो आहे.)

In reply to by मुक्त विहारि

भले भले साक्षी आहेत (क्रुपया "सा" ह्या अक्षराच्या कान्हा/मात्रा ह्यांची तोडमोड करू नये आणि अनुस्वार तर बिलकूल देवू नये.मी "साक्षी"च म्हणालो आहे.)
कान्ह्याची मोडतोड करणे कंस, जरासंध, पूतनामावशी वगैरे जबराट मंडळींनाही जमले नाही. आम्ही किस झाड के वटवाघूळ?

हे असले धागे बरे सं.पा मंड्ळ उडवित नाहकाय? आणि आमचा "३१ डिसेंबरचा आंमंत्रणाचा" मात्र प्रकाशीत करण्यागजोगा वाटाला नाही हे कारण देवुन उडविला होता. का हो व गविकाका काय कारण होते आता तरी सांगाल काय?

In reply to by प्रमोद देर्देकर

त्यांनी आधीच सांगितलंय ना प्रश्न हे उत्तर मिळण्याच्या अपेक्षेने विचारलेले असावेत, पेचात टाकून उत्तरदात्याची उत्तरपूजा बांधण्यासाठी नव्हे. तुमचा प्रश्न दुसर्‍या क्याट्यागरीतला आहे.

टेन्शन च्या टेन्शन मुळे टेन्शन चा प्रॉब्लेम कसा सोडवावा?

लोकांना संपादक का व्हावसं वाटतं?

In reply to by अनुप ढेरे

सुखाचा जीव दु:खात घालावासा वाटतो तेव्हा "येरे कुत्र्या आणि चाव मला" अशा भावविभोर अवस्थेत लोक संपादक व्हायला तयार होतात.

In reply to by बर्फाळलांडगा

परत स्त्रिया? तुम्हाला एकतर स्त्रिया फार आवडतात किंवा अजिबात आवडत नाहीत! नेमका काय प्रकार आहे? बाकी तुमचे विंग्रजीवरचे प्रभुत्व बघता तुम्हाला मराठी म्हणी वैग्रे माहिती असण्याची शक्यता फार कमी दिसते! म्हणून सांगते की "आ बैल मुझे मार" या अर्थाची ती मराठी म्हण आहे. एखादे म्हणींचे पुस्तक वाचलेत तर त्यात सापडेल.

In reply to by पैसा

एकदाच उत्तर देतो मला विविध स्त्रियाँ बद्दल प्रेम आदर ममत्व भीती तिरस्कार व कामेच्छा/वासना आशा व्यक्ती स्थिति परत्वे विविध भावभावना आहेत. आपलाही मराठीचा अभ्यास कमी दिसतो अन्यथा ध चा मा केला तर काय घडते हे माहीत असता बैलाचा कुत्रा करून आता ती घोडचुक पोलिटिकली करेक्ट करायचा या प्रतिसादातुन प्रयत्न केला नसता हे लक्षात ठेवा. टिप: हां उप प्रतिसाद सार्वजनिकआहे म्हणजेच मुद्दाम गहन विचार करून फक्त पैसा यांना मर्यादित ठेवलेला नाही हे सुज्ञास वेगळे ....

In reply to by बर्फाळलांडगा

"आ बैल मुझे मार" या अर्थाची ती मराठी म्हण आहे


In reply to by आदूबाळ

@ मारकुटेकाकांचा हल्ला कसा थांबवावा? >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif संपादकांनी कात्री घेऊन रात्री ऑपरेशन करावे, पक्षी >> हल्लेरूपी 'गळवं' काढून टाकावीत! :D

हाहाहा मस्त बॅटींग केलीये गविकाकांनी :) गविकाका गविकाका "डायरी लिहीण्याचे फायदे व तोटे" विषद कराल का?