पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात.
त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला.
तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल.
एक टेम्प्लेट केस येथे देत आहे.
प्रश्न:
काका, मी इयत्ता दहावीत आहे. आमच्या शेजारी एक ताई राहते. तिच्याविषयी माझ्या भावना वेगळ्या आहेत.
मला ती खूप आवडते. ती जाता येता माझ्याशी बोलते. नुकतीच ऑफिसला जाताना एकदा ती मला "बाsय" असं म्हणाली. यामुळे तिच्याही मनात फीलिंग्ज आहेत हे मला समजलं.
तेव्हापासून माझं तिच्याकडेच लक्ष लागलेलं असतं. तीही जाता येता माझ्याशी बोलते. मी तसं अजून तिच्यापाशी बोललो नाहिये. पण मी सुरुवात कशी करु याविषयी कृपया सल्ला देणे. माझे अभ्यासाचेही नुकसान होत आहे.
एक विद्यार्थी.
.
.
गविकाकांचे उत्तरः
श्री. रा.रा. विद्यार्थी, नमस्कार.
गहन आहे प्रश्न.. पण करतो प्रयत्न.
तुम्ही दहावीत आहात. एका शैक्षणिक वर्षास एक मानवी वर्ष या प्रमाणात तुमचे आजपावेतोचे शिक्षण झाले आहे असे मी गृहीत धरतो. म्हणजेच आपण अंदाजे १४ वर्षाचे आहात.
तुम्ही उल्लेख केलेली "ती" ऑफिसात जाताना तुम्हाला निरोप घेण्यासदृश हावभाव आणि अविर्भाव करते. बालकामगार गुन्ह्याचे या बाबतीत उल्लंघन झालेले नसून "ती" नोकरी करण्याच्या कायदेशीर वयाची आहे असंही मी गृहीत धरतो. शिवाय ती ऑफिसात कामावर जाते, (बांधकामावर नव्हे) असं उल्लेखावरुन दिसत असल्याने तर्कदृष्ट्या ती किमान डिग्रीपर्यंत शिकली असावी. तस्मात तिचे वय वीस वर्षांच्या वर आहे असेही मी गृहीत धरतो.
याचाच अर्थ ती तुमच्यापेक्षा किमान सहा वर्षांनी मोठी आहे. तसे असण्यास काही हरकत नाही. तसे असल्यास ती आवडण्यासही काही हरकत नाही. पण जग हरकतींपेक्षा शक्यतांवर चालत असते हा एक मोठा दु:खद नियम आहे. त्यामुळे कु. (हेही एक गृहीतक मांडायचे अंमळ विसरलो) "ती" हिज आपण आवडत असलात तरी लैंगिक पुनरुत्पादनाच्या उद्देशाने (ज्याला अंकुरावस्थेत प्रेम असेही म्हणतात), आवडत असाल अशी शक्यता बिंदुवत वाटते. त्यामुळे तुमच्या भावनांशी पूर्णपणे सहानुभूति ठेवूनही तुम्ही उल्लेखलेली "ती" तुमची "ही" होण्याची शक्यता नगण्य असल्याने आपण खुद्द हपीसात जाण्याच्या वयापर्यंत कळ काढून त्या वेळी तत्कालीन दहावीतल्या "तीं"ना "हाय" करावेत असे सुचवून पाहतो.
तोसवर आपल्या भावनांचे दमन करण्याची गरज नाही. नैसर्गिक गोष्टींना अनैसर्गिक समजू नका इतकेच सांगतो. बाकी दहावीत असल्याने तुम्हांस अधिक स्पष्टीकरण नकोच अशी आशा.
आपला का?का?.
गवि.
.
.
.
ता.क.:
वाचकांनीही आपल्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारावेत. दर आठवड्याला किंवा गविकाकांचे जेवण उत्तम झाले असल्यास केव्हाही निवडक प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील.
द.ही.:
फाजील प्रश्नांना प्रश्नकर्त्याचे दुर्दैव समजले जाईल.
--मनोबा व गविकाका
वाचने
33111
प्रतिक्रिया
194
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रश्न जाहिर विचारायचे की
हॅ हॅ. व्यनीत आलेले प्रश्न
In reply to प्रश्न जाहिर विचारायचे की by मारकुटे
कित्ती छान छान उत्तरे देता
In reply to हॅ हॅ. व्यनीत आलेले प्रश्न by गवि
मी शुभारंभ करतो
लग्न करावे कि करू नये ?
In reply to मी शुभारंभ करतो by स्पा
श्री. स्पा यांस अनेकोत्तम
In reply to लग्न करावे कि करू नये ? by गवि
आमचा प्रश्न
In reply to लग्न करावे कि करू नये ? by गवि
तुम्हाला
In reply to आमचा प्रश्न by अर्धवटराव
हॅ हॅ हॅ
In reply to तुम्हाला by विकास
...कितवे ???
In reply to मी शुभारंभ करतो by स्पा
माझा प्रश्न
मा. श्री. तथास्तु.
In reply to माझा प्रश्न by जेपी
गविकाका चड्डीला इलास्टीक
चड्डीविषयी प्रश्न असल्याने
In reply to गविकाका चड्डीला इलास्टीक by मारकुटे
छे छे दहा वर्षे पण खुप झाले.
In reply to चड्डीविषयी प्रश्न असल्याने by गवि
गविकाका ,
हात्तेरे की!
In reply to गविकाका , by अभ्या..
मला फाटे न फ़ोडणारे उत्तर हवे
In reply to हात्तेरे की! by पैसा
काका काका
खंप्लीट गॉन केस
In reply to काका काका by इरसाल
या दोन्ही तरुणी एकत्र पळून
In reply to खंप्लीट गॉन केस by पैसा
धन्यवाद अने अहमदाबाद भी
In reply to खंप्लीट गॉन केस by पैसा
आत्तापर्यंतचा सर्वाधिक
गविकाका थंडीत उब कशी आणावी?
गविकाका प्रतिसाद किती मोठा
गविकाकांना विचारायचं असल्याने
गविकाका विचार म्हणजे काय?
गविकाका मराठी टंकन करण्यासाठी
गविकाका आत्मभान जागृत झाले
काहीकाळ ते जागृत करणारे वाचन
In reply to गविकाका आत्मभान जागृत झाले by मारकुटे
माननीय गविचंद्र यांच्या तर्कनिष्ट विचार प्रक्रियेचे केलेले
गविकाका
श्री. इरसालजी.
In reply to गविकाका by इरसाल
"ग"चा अर्थ माहीत नसलेस
In reply to श्री. इरसालजी. by गवि
याचे कारण म्हणजे
In reply to "ग"चा अर्थ माहीत नसलेस by बर्फाळलांडगा
काका धन्यवाद
In reply to श्री. इरसालजी. by गवि
गविकाका मला वाचवा...
मा. श्री योगी९००जी.
In reply to गविकाका मला वाचवा... by योगी९००
धम्माल!
हो.. अगदी अगदी. मी
In reply to धम्माल! by पैसा
ते पब्लिकचे सल्ले
In reply to धम्माल! by पैसा
गविकाका मराठी सुधरावे यासाठी
काका,
गविकाका न उडणारा प्रतिसाद कसा
हॅ हॅ हॅ
In reply to गविकाका न उडणारा प्रतिसाद कसा by मारकुटे
हे प्रश्नाचे उत्तर नाही.
In reply to हॅ हॅ हॅ by पैसा
गविकाका तुम्हाला किती
हा प्रश्न गहन आहे. याला
In reply to गविकाका तुम्हाला किती by मारकुटे
तुमचे समाधान (एकदाचे) व्हावे
In reply to हा प्रश्न गहन आहे. याला by गवि
प्रश्न कर्त्याचे..
In reply to तुमचे समाधान (एकदाचे) व्हावे by मारकुटे
"शाम सुंदर" मधील
>>विचारवंताना
In reply to "शाम सुंदर" मधील by नाखु
छे हो! मिपा वर हे दोन्ही शब्द...
In reply to >>विचारवंताना by सूड
तुम्ही "कितवी" बाजू आहात?
In reply to छे हो! मिपा वर हे दोन्ही शब्द... by नाखु
तुम्हाला
In reply to >>विचारवंताना by सूड
गविकाका..
+११११ केळ्याचं काय झालं?
In reply to गविकाका.. by पिलीयन रायडर
शिकरण केलं
In reply to +११११ केळ्याचं काय झालं? by प्यारे१
गविकाका
माननीय बर्फाळलांडगा,
In reply to गविकाका by बर्फाळलांडगा
उत्तरकर्त्याची उत्तरपूजा
In reply to माननीय बर्फाळलांडगा, by गवि
ROFL, LOL, lol _/\_
In reply to माननीय बर्फाळलांडगा, by गवि
मस्त भागा.
जीवन भौंचा साल्ला
@ बर्फाळलांडगा.....
In reply to जीवन भौंचा साल्ला by बर्फाळलांडगा
अर्थातच तुमच्या नंतर
In reply to @ बर्फाळलांडगा..... by मुक्त विहारि
थँक्स....
In reply to अर्थातच तुमच्या नंतर by बर्फाळलांडगा
जीवनभौ च्या बोल्गवर खालील
In reply to @ बर्फाळलांडगा..... by मुक्त विहारि
मला तर जलपर्णीबरोबर साक्षात
In reply to जीवनभौ च्या बोल्गवर खालील by खटपट्या
धन्यवाद....
In reply to मला तर जलपर्णीबरोबर साक्षात by आदूबाळ