गविकाकाचा सल्ला.
पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात.
त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला.
तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल.
एक टेम्प्लेट केस येथे देत आहे.
प्रश्न:
काका, मी इयत्ता दहावीत आहे. आमच्या शेजारी एक ताई राहते. तिच्याविषयी माझ्या भावना वेगळ्या आहेत.
मला ती खूप आवडते. ती जाता येता माझ्याशी बोलते. नुकतीच ऑफिसला जाताना एकदा ती मला "बाsय" असं म्हणाली. यामुळे तिच्याही मनात फीलिंग्ज आहेत हे मला समजलं.
तेव्हापासून माझं तिच्याकडेच लक्ष लागलेलं असतं. तीही जाता येता माझ्याशी बोलते. मी तसं अजून तिच्यापाशी बोललो नाहिये. पण मी सुरुवात कशी करु याविषयी कृपया सल्ला देणे. माझे अभ्यासाचेही नुकसान होत आहे.
एक विद्यार्थी.
.
.
गविकाकांचे उत्तरः
श्री. रा.रा. विद्यार्थी, नमस्कार.
गहन आहे प्रश्न.. पण करतो प्रयत्न.
तुम्ही दहावीत आहात. एका शैक्षणिक वर्षास एक मानवी वर्ष या प्रमाणात तुमचे आजपावेतोचे शिक्षण झाले आहे असे मी गृहीत धरतो. म्हणजेच आपण अंदाजे १४ वर्षाचे आहात.
तुम्ही उल्लेख केलेली "ती" ऑफिसात जाताना तुम्हाला निरोप घेण्यासदृश हावभाव आणि अविर्भाव करते. बालकामगार गुन्ह्याचे या बाबतीत उल्लंघन झालेले नसून "ती" नोकरी करण्याच्या कायदेशीर वयाची आहे असंही मी गृहीत धरतो. शिवाय ती ऑफिसात कामावर जाते, (बांधकामावर नव्हे) असं उल्लेखावरुन दिसत असल्याने तर्कदृष्ट्या ती किमान डिग्रीपर्यंत शिकली असावी. तस्मात तिचे वय वीस वर्षांच्या वर आहे असेही मी गृहीत धरतो.
याचाच अर्थ ती तुमच्यापेक्षा किमान सहा वर्षांनी मोठी आहे. तसे असण्यास काही हरकत नाही. तसे असल्यास ती आवडण्यासही काही हरकत नाही. पण जग हरकतींपेक्षा शक्यतांवर चालत असते हा एक मोठा दु:खद नियम आहे. त्यामुळे कु. (हेही एक गृहीतक मांडायचे अंमळ विसरलो) "ती" हिज आपण आवडत असलात तरी लैंगिक पुनरुत्पादनाच्या उद्देशाने (ज्याला अंकुरावस्थेत प्रेम असेही म्हणतात), आवडत असाल अशी शक्यता बिंदुवत वाटते. त्यामुळे तुमच्या भावनांशी पूर्णपणे सहानुभूति ठेवूनही तुम्ही उल्लेखलेली "ती" तुमची "ही" होण्याची शक्यता नगण्य असल्याने आपण खुद्द हपीसात जाण्याच्या वयापर्यंत कळ काढून त्या वेळी तत्कालीन दहावीतल्या "तीं"ना "हाय" करावेत असे सुचवून पाहतो.
तोसवर आपल्या भावनांचे दमन करण्याची गरज नाही. नैसर्गिक गोष्टींना अनैसर्गिक समजू नका इतकेच सांगतो. बाकी दहावीत असल्याने तुम्हांस अधिक स्पष्टीकरण नकोच अशी आशा.
आपला का?का?.
गवि.
.
.
.
ता.क.:
वाचकांनीही आपल्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारावेत. दर आठवड्याला किंवा गविकाकांचे जेवण उत्तम झाले असल्यास केव्हाही निवडक प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील.
द.ही.:
फाजील प्रश्नांना प्रश्नकर्त्याचे दुर्दैव समजले जाईल.
--मनोबा व गविकाका
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रश्न जाहिर विचारायचे की
हॅ हॅ. व्यनीत आलेले प्रश्न
कित्ती छान छान उत्तरे देता
मी शुभारंभ करतो
लग्न करावे कि करू नये ?
श्री. स्पा यांस अनेकोत्तम
आमचा प्रश्न
तुम्हाला
हॅ हॅ हॅ
...कितवे ???
माझा प्रश्न
मा. श्री. तथास्तु.
गविकाका चड्डीला इलास्टीक
चड्डीविषयी प्रश्न असल्याने
छे छे दहा वर्षे पण खुप झाले.
गविकाका ,
हात्तेरे की!
मला फाटे न फ़ोडणारे उत्तर हवे
काका काका
खंप्लीट गॉन केस
या दोन्ही तरुणी एकत्र पळून
धन्यवाद अने अहमदाबाद भी
आत्तापर्यंतचा सर्वाधिक
गविकाका थंडीत उब कशी आणावी?
गविकाका प्रतिसाद किती मोठा
गविकाकांना विचारायचं असल्याने
गविकाका विचार म्हणजे काय?
गविकाका मराठी टंकन करण्यासाठी
गविकाका आत्मभान जागृत झाले
काहीकाळ ते जागृत करणारे वाचन
माननीय गविचंद्र यांच्या तर्कनिष्ट विचार प्रक्रियेचे केलेले
गविकाका
श्री. इरसालजी.
"ग"चा अर्थ माहीत नसलेस
याचे कारण म्हणजे
काका धन्यवाद
गविकाका मला वाचवा...
मा. श्री योगी९००जी.
धम्माल!
हो.. अगदी अगदी. मी
ते पब्लिकचे सल्ले
गविकाका मराठी सुधरावे यासाठी
काका,
गविकाका न उडणारा प्रतिसाद कसा
हॅ हॅ हॅ
हे प्रश्नाचे उत्तर नाही.
गविकाका तुम्हाला किती
हा प्रश्न गहन आहे. याला
तुमचे समाधान (एकदाचे) व्हावे
प्रश्न कर्त्याचे..