✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गविकाकाचा सल्ला.

म
मन यांनी
Fri, 01/10/2014 - 14:26  ·  लेख
लेख
पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात. त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला. तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल. एक टेम्प्लेट केस येथे देत आहे. प्रश्न: काका, मी इयत्ता दहावीत आहे. आमच्या शेजारी एक ताई राहते. तिच्याविषयी माझ्या भावना वेगळ्या आहेत. मला ती खूप आवडते. ती जाता येता माझ्याशी बोलते. नुकतीच ऑफिसला जाताना एकदा ती मला "बाsय" असं म्हणाली. यामुळे तिच्याही मनात फीलिंग्ज आहेत हे मला समजलं. तेव्हापासून माझं तिच्याकडेच लक्ष लागलेलं असतं. तीही जाता येता माझ्याशी बोलते. मी तसं अजून तिच्यापाशी बोललो नाहिये. पण मी सुरुवात कशी करु याविषयी कृपया सल्ला देणे. माझे अभ्यासाचेही नुकसान होत आहे. एक विद्यार्थी. . . गविकाकांचे उत्तरः श्री. रा.रा. विद्यार्थी, नमस्कार. गहन आहे प्रश्न.. पण करतो प्रयत्न. तुम्ही दहावीत आहात. एका शैक्षणिक वर्षास एक मानवी वर्ष या प्रमाणात तुमचे आजपावेतोचे शिक्षण झाले आहे असे मी गृहीत धरतो. म्हणजेच आपण अंदाजे १४ वर्षाचे आहात. तुम्ही उल्लेख केलेली "ती" ऑफिसात जाताना तुम्हाला निरोप घेण्यासदृश हावभाव आणि अविर्भाव करते. बालकामगार गुन्ह्याचे या बाबतीत उल्लंघन झालेले नसून "ती" नोकरी करण्याच्या कायदेशीर वयाची आहे असंही मी गृहीत धरतो. शिवाय ती ऑफिसात कामावर जाते, (बांधकामावर नव्हे) असं उल्लेखावरुन दिसत असल्याने तर्कदृष्ट्या ती किमान डिग्रीपर्यंत शिकली असावी. तस्मात तिचे वय वीस वर्षांच्या वर आहे असेही मी गृहीत धरतो. याचाच अर्थ ती तुमच्यापेक्षा किमान सहा वर्षांनी मोठी आहे. तसे असण्यास काही हरकत नाही. तसे असल्यास ती आवडण्यासही काही हरकत नाही. पण जग हरकतींपेक्षा शक्यतांवर चालत असते हा एक मोठा दु:खद नियम आहे. त्यामुळे कु. (हेही एक गृहीतक मांडायचे अंमळ विसरलो) "ती" हिज आपण आवडत असलात तरी लैंगिक पुनरुत्पादनाच्या उद्देशाने (ज्याला अंकुरावस्थेत प्रेम असेही म्हणतात), आवडत असाल अशी शक्यता बिंदुवत वाटते. त्यामुळे तुमच्या भावनांशी पूर्णपणे सहानुभूति ठेवूनही तुम्ही उल्लेखलेली "ती" तुमची "ही" होण्याची शक्यता नगण्य असल्याने आपण खुद्द हपीसात जाण्याच्या वयापर्यंत कळ काढून त्या वेळी तत्कालीन दहावीतल्या "तीं"ना "हाय" करावेत असे सुचवून पाहतो. तोसवर आपल्या भावनांचे दमन करण्याची गरज नाही. नैसर्गिक गोष्टींना अनैसर्गिक समजू नका इतकेच सांगतो. बाकी दहावीत असल्याने तुम्हांस अधिक स्पष्टीकरण नकोच अशी आशा. आपला का?का?. गवि. . . . ता.क.: वाचकांनीही आपल्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारावेत. दर आठवड्याला किंवा गविकाकांचे जेवण उत्तम झाले असल्यास केव्हाही निवडक प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील. द.ही.: फाजील प्रश्नांना प्रश्नकर्त्याचे दुर्दैव समजले जाईल. --मनोबा व गविकाका
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32758 वाचन

💬 प्रतिसाद (194)

प्रतिक्रिया

प्रश्न जाहिर विचारायचे की

मारकुटे
Fri, 01/10/2014 - 14:31 नवीन
प्रश्न जाहिर विचारायचे की व्यनीत?
  • Log in or register to post comments

हॅ हॅ. व्यनीत आलेले प्रश्न

गवि
Fri, 01/10/2014 - 14:35 नवीन
हॅ हॅ. व्यनीत आलेले प्रश्न अग्राह्य धरले जातील. पब्लिक सदराचे प्रश्न पब्लिकमधेच विचारणे. :) खाजगी असेल तर श्री. रा. रा. मन (सूत्रधार) यांस व्यनि करावा. ते नाव गाळून येथे प्रश्न आणतील. कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देण्याचा हक्क राखून ठेवण्यात येत आहे. उत्तरांना शिरेसली घेतल्यास जबाबदारी प्रश्नकर्त्याची राहील. हा एक गंमतीचा कट्टा आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. इत्यादि. बाकी सूचनापाट्या बनवण्याची जबाबदारी पुणेकर असलेल्या मन यांजवर टाकत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

कित्ती छान छान उत्तरे देता

मारकुटे
Fri, 01/10/2014 - 14:55 नवीन
कित्ती छान छान उत्तरे देता तुम्ही गविकाका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मी शुभारंभ करतो

स्पा
Fri, 01/10/2014 - 14:34 नवीन
गवी काका लग्न करावे कि करू नये :P
  • Log in or register to post comments

लग्न करावे कि करू नये ?

गवि
Fri, 01/10/2014 - 14:50 नवीन
लग्न करावे कि करू नये ?(वेडावणारे मुखचिन्ह)
उत्तरः श्री. स्पा यांस अनेकोत्तम प्रणाम. आपण विचारलेल्या प्रश्नाअखेरीस दिलेल्या चिन्हामुळे आपल्या प्रश्नात छद्माचा अंतर्भाव झाला आहे असे जाणवते. तेव्हा प्रथम सल्ला असा की लग्न करावे की नाही या प्रश्नाच्या गंभीर विचाराआधी लग्न या विषयाविषयीचे हे छद्म मनातून काढा. आता तुमचा मूळ प्रश्नः लग्न करावे का नाही. हा निर्णय तसा सोपा आहे. आर्थिक पैलूतून पाहता लग्न करणे हा एक अत्यंत खर्चिक मार्ग ठरु शकतो. मी सध्या आपल्या मनात फक्त भावनिक पैलू आहे असं गृहीत धरतो. म्हणजेच सध्या पोहोण्याच्या तलावाच्या काठावर उभे राहून नाक मुठीत धरुन उडी टाकू की नको अशा विचाराने तुम्ही पुढेमागे हेलकावत आहात. सल्ला असा की उडी टाका. याचे कारण म्हणजे लग्न हे काही दिव्य अद्वितीय अनुभव आहे असे नव्हे, पण आयुष्यात पहिली वीसतीस वर्षे आपण एकटेच असतो. आणि कदाचित उत्तम आरोग्य असल्यास शेवटीही दहावीस वर्षे तरी एकटे असण्याची संधी किंवा सक्ती होण्याची बरीच शक्यता असते. आयुष्य एकच आहे असे गृहीत धरता बिनएकटेपणा, अर्थात कायमचा जोडीदार असण्यातले सुख अनुभवण्याचा ऑप्शन मधल्या काळात घेतला नाही तर उघडं यायचं अन उघडं जायचं या दोन टोकांमधे पूर्णकाळ एकटे राहणे हा एकसुरी ऑप्शनच पदरी पडतो. त्यामुळे एकूण दोन ऑप्शन्सपैकी दोन्ही अनुभवण्याचा ऑप्शन असल्याने एक ऑप्शन ऑप्शनला टाकू नये आणि विवाहसुख अनुभवावे असे सुचवून पाहतो. त्याचे आणखी एक फळ म्हणजे पोरेबाळे. लग्न केल्यास रीतसर बाप होऊन बाळाची मायेची ऊब अनुभवता येते. लहानपणी खुद्द अनुभवलेल्या आईच्या ऊबेपेक्षा जास्त समाधान आणि शांती मिळते. बाकी सर्व रद्दबातल झाले तरी पोरांनी आपल्याला बाबा म्हणून कुशीत शिरणे या क्षणाचा अनुभव लग्नाचे बाकीचे संपूर्ण लडतर झेलण्यास पुरेसा ठरावा. लग्नानंतर आपले अनुभव कळवावेत. आपला काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

श्री. स्पा यांस अनेकोत्तम

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/10/2014 - 19:25 नवीन
श्री. स्पा यांस अनेकोत्तम प्रणाम. या प्रश्नाच्या गंभीर विचाराआधी लग्न या विषयाविषयीचे हे छद्म मनातून काढा.>>> Image removed. आता तुमचा मूळ प्रश्नः लग्न करावे का नाही. हा निर्णय तसा सोपा आहे. आर्थिक पैलूतून पाहता लग्न करणे हा एक अत्यंत खर्चिक मार्ग ठरु शकतो. मी सध्या आपल्या मनात फक्त भावनिक पैलू आहे असं गृहीत धरतो. म्हणजेच सध्या पोहोण्याच्या तलावाच्या काठावर उभे राहून नाक मुठीत धरुन उडी टाकू की नको अशा विचाराने तुम्ही पुढेमागे हेलकावत आहात. >>> Image removed. साफ खपल्या गेलो आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आमचा प्रश्न

अर्धवटराव
Fri, 01/10/2014 - 21:00 नवीन
>>लग्नानंतर आपले अनुभव कळवावेत. -- त्याकरता मिपावर 'केवल वयोस्कोके लिये' दालन सुरु करावं काय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तुम्हाला

विकास
Fri, 01/10/2014 - 21:20 नवीन
"दालन" म्हणायचे आहे का "सपोर्ट ग्रूप" (फॉर ग्रूप थेरपी)? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

हॅ हॅ हॅ

अर्धवटराव
Fri, 01/10/2014 - 23:17 नवीन
एकदा दालन तयार झालं कि मिपाकरांच्या सपोर्ट देण्या-घेण्याला तसाही ऊत येईल. आणि तिथेही कंपूबाजी करुन ग्रूप थेरपीची हौस भागवुन घेतील मिपाकर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

...कितवे ???

विनोद१८
Fri, 01/10/2014 - 22:58 नवीन
असे विचारायचे आहे का तुम्हाला ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

माझा प्रश्न

जेपी
Fri, 01/10/2014 - 14:38 नवीन
गवि काका काथ्या किती कुटावा ?
  • Log in or register to post comments

मा. श्री. तथास्तु.

गवि
Fri, 01/10/2014 - 14:53 नवीन
मा. श्री. तथास्तु. आपणास कितपत मऊ क्वायर हवे आहे याची मर्यादा प्रत्येकाच्या गादीविषयक आवडीनिवडीवर ठरत असल्याने हा निर्णय अंदाजानेच घ्यावा असे माझे मत आहे. काथ्याच्या गादीवर बसल्यावर काही टोचू नये इतपत बारीक कुटावा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

गविकाका चड्डीला इलास्टीक

मारकुटे
Fri, 01/10/2014 - 14:39 नवीन
गविकाका चड्डीला इलास्टीक असावी का नाडी?
  • Log in or register to post comments

चड्डीविषयी प्रश्न असल्याने

गवि
Fri, 01/10/2014 - 14:56 नवीन
चड्डीविषयी प्रश्न असल्याने प्रश्नकर्त्याचे वय दहा वर्षे किंवा कमी आहे असे गृहीत धरतो. आपापला वयोगट समजून नाडी बांधता सोडता यायला लागेपर्यंत इलॅस्टिक वापरावे, अन्यथा लघुदुर्घटना होऊ शकतात. तसेच कृपया फक्त गहन प्रश्नच विचारावेत. कळावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

छे छे दहा वर्षे पण खुप झाले.

मारकुटे
Fri, 01/10/2014 - 15:01 नवीन
छे छे दहा वर्षे पण खुप झाले. नुकताच जन्म झाला आहे आमचा ;) एक महिना किंवा थोडा जास्त. हा प्रश्न गहन कसा नाही यावर आपले मत मांडावे ही नम्र विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गविकाका ,

अभ्या..
Fri, 01/10/2014 - 14:45 नवीन
गविकाका , फ़ाट्यावर मारण्याला माज म्हणतात का? असल्यास तो कसा उतरावावा?
  • Log in or register to post comments

हात्तेरे की!

पैसा
Fri, 01/10/2014 - 15:16 नवीन
तुला धन्याच्या म्हशींबद्दलचं उत्तर हवं आहे का साधं सरळ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मला फाटे न फ़ोडणारे उत्तर हवे

अभ्या..
Fri, 01/10/2014 - 15:31 नवीन
मला फाटे न फ़ोडणारे उत्तर हवे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काका काका

इरसाल
Fri, 01/10/2014 - 14:48 नवीन
अडचण-१ मी एक शाम-ळु तरुण आहे.आमची एक कुटुंब मैत्रिण आहे पण तिला सतत पट्ट्य्यानेच बोलायची सवय आहे कधी कधी ती तोंडातही मारते, क्रुपया काय करावे हे सुचवावे. अडचण-२ तसेच माझे एकदा गावात व एकदा रात्रपाळीवर असताना दोन तरुणींशी संधान जुळले त्यातल्या दोघीही मला चुना लावुन घरातील तसेच माल मधील शोपिंग केलेले सामान(ते सामान नव्हे) घेवुन पळुन गेल्या सध्या मी एकटाच हात चोळत बसलो आहे काय करु ?
  • Log in or register to post comments

खंप्लीट गॉन केस

पैसा
Fri, 01/10/2014 - 15:24 नवीन
या दोन्ही घटना तुमच्याबाबत घडल्या आहेत काय? चमचाभर पाण्यात नाक बुडवून वगैरे... आमचेही २ प्रश्न १) तुमच्याकडे कोल्हापुरी चपला आहेत का नाही? त्यांचा शस्त्र म्हणून वापर करता येतो हे माहित आहे का? २) या दोन्ही तरुणी एकत्र पळून गेल्या किंवा कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

या दोन्ही तरुणी एकत्र पळून

परिंदा
Fri, 01/10/2014 - 18:18 नवीन
या दोन्ही तरुणी एकत्र पळून गेल्या किंवा कसे? >> षटकार!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

धन्यवाद अने अहमदाबाद भी

इरसाल
Sat, 01/11/2014 - 09:57 नवीन
१) दुसर्‍या कारणामुळे घरात एकही चमचा शिल्लक राहिलेला नसल्याने आपला सल्ला फॉलो करु शकत नाही क्षमस्व. २) या दोन्ही तरुणी एकत्र पळून गेल्या किंवा कसे? भेंडी हमने तो उ बारे में सोचा ही नही.इ तो नया अँगलवा आ गया, कहानी मा टिवस्ट !!!! त्या पळुन गेल्यावर आम्ही पोस्ट इन्क्वायरी केलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आत्तापर्यंतचा सर्वाधिक

टवाळ कार्टा
Fri, 01/10/2014 - 14:49 नवीन
आत्तापर्यंतचा सर्वाधिक प्रतिसादांचा धागा कोणता???....असो.. ३००+ साठी शुभेछ्छा :)
  • Log in or register to post comments

गविकाका थंडीत उब कशी आणावी?

मारकुटे
Fri, 01/10/2014 - 14:49 नवीन
गविकाका थंडीत उब कशी आणावी?
  • Log in or register to post comments

गविकाका प्रतिसाद किती मोठा

मारकुटे
Fri, 01/10/2014 - 14:50 नवीन
गविकाका प्रतिसाद किती मोठा असावा?
  • Log in or register to post comments

गविकाकांना विचारायचं असल्याने

सूड
Fri, 01/10/2014 - 14:51 नवीन
गविकाकांना विचारायचं असल्याने जरा विचार करुन विचारावं म्हणतो. ;)
  • Log in or register to post comments

गविकाका विचार म्हणजे काय?

मारकुटे
Fri, 01/10/2014 - 14:52 नवीन
गविकाका विचार म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

गविकाका मराठी टंकन करण्यासाठी

मारकुटे
Fri, 01/10/2014 - 14:53 नवीन
गविकाका मराठी टंकन करण्यासाठी चांगला कीबोर्डड्रायवर कोणता?
  • Log in or register to post comments

गविकाका आत्मभान जागृत झाले

मारकुटे
Fri, 01/10/2014 - 14:54 नवीन
गविकाका आत्मभान जागृत झाले असल्यास त्याला कसे झोपवावे?
  • Log in or register to post comments

काहीकाळ ते जागृत करणारे वाचन

गवि
Fri, 01/10/2014 - 15:01 नवीन
काहीकाळ ते जागृत करणारे वाचन थांबवल्यास कंटाळून आत्मभानाच्या आत कर्बद्विप्रणील वायू जमा होईल आणि ऑपॉप पुन्हा झोपी जाईल. यानेही फरक न पडल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

माननीय गविचंद्र यांच्या तर्कनिष्ट विचार प्रक्रियेचे केलेले

बर्फाळलांडगा
Fri, 01/10/2014 - 14:54 नवीन
विडंबन आवडले आहे
  • Log in or register to post comments

गविकाका

इरसाल
Fri, 01/10/2014 - 14:57 नवीन
गगनविहारी म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments

श्री. इरसालजी.

गवि
Fri, 01/10/2014 - 14:59 नवीन
श्री. इरसालजी. गगनविहारी या शब्दाचा अर्थ "ग" ची बाधा झालेला आणि हवेत चालणारा मनुष्य असा होतो. "ग"चा अर्थ माहीत नाही. क्षमस्व. -काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

"ग"चा अर्थ माहीत नसलेस

बर्फाळलांडगा
Fri, 01/10/2014 - 15:04 नवीन
ग गन विहारी म्हणजे अर्थ माहीत नसलेली बंदूक घेउन फिरणारा असा अर्थ होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

याचे कारण म्हणजे

बर्फाळलांडगा
Fri, 01/10/2014 - 15:05 नवीन
अर्थ नसलेली बंदूक घेउन आपण फिरणार नाही याची खात्री आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बर्फाळलांडगा

काका धन्यवाद

इरसाल
Fri, 01/10/2014 - 15:08 नवीन
माझ्या दोन अनुत्तरीत प्रश्नांचे काय ? (वर विचारलेले)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गविकाका मला वाचवा...

योगी९००
Fri, 01/10/2014 - 15:04 नवीन
गविकाका मला वाचवा... प्रश्न १ कुठ्ल्या मार्गाने माझ्या आत्म्याला अनुभूती मिळून माझ्या मनोज्ञ मानसिकतेला महदोत्क्ट प्रचिती मिळेल..? प्रश्न २ माझा नवाकोरा महागडा मोबाईल हरवला आहे, तो मी कसा परत मिळवू?
  • Log in or register to post comments

मा. श्री योगी९००जी.

गवि
Fri, 01/10/2014 - 15:22 नवीन
मा. श्री योगी९००जी. प्रथम समस्या जटिल आहे. इसपगुल, धौतीयोग चूर्ण वगैरे वापरुन पहायला हरकत नाही. फायदा न झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. दुसर्‍या समस्येबाबतः समस्या जटिल किंवा गहन नसल्याने प्रश्न डिसक्वालिफाय होत आहे. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

धम्माल!

पैसा
Fri, 01/10/2014 - 15:04 नवीन
बाकी पब्लिकने आपापले सल्ले द्यायला तात्त्विकदृष्ट्या हरकत नसावी!
  • Log in or register to post comments

हो.. अगदी अगदी. मी

गवि
Fri, 01/10/2014 - 15:06 नवीन
हो.. अगदी अगदी. मी आठवड्यातून एकदाच देणार आहे. बाकी सर्व पब्लिकच्या सल्ल्यांसाठीच आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ते पब्लिकचे सल्ले

बर्फाळलांडगा
Fri, 01/10/2014 - 15:07 नवीन
उडवू नयेत यावर हरकत आहे काय त्यावर अवलंबून असेल नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गविकाका मराठी सुधरावे यासाठी

मारकुटे
Fri, 01/10/2014 - 15:05 नवीन
गविकाका मराठी सुधरावे यासाठी काय करु?
  • Log in or register to post comments

काका,

प्यारे१
Fri, 01/10/2014 - 15:05 नवीन
काका, तुम्हाला टंचनिका आपलं टंकनिका कुठे मिळाली? तिला तुम्ही कसे खुश ठेवता? उत्तरांचे छाप तुम्ही तयार करुन ठेवलेत का? तुम्ही गविकाका कसे झालात?
  • Log in or register to post comments

गविकाका न उडणारा प्रतिसाद कसा

मारकुटे
Fri, 01/10/2014 - 15:06 नवीन
गविकाका न उडणारा प्रतिसाद कसा द्यावा?
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

पैसा
Fri, 01/10/2014 - 15:08 नवीन
प्रतिसाद दिला नै की उडण्याचा सवाल येत नै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

हे प्रश्नाचे उत्तर नाही.

मारकुटे
Fri, 01/10/2014 - 15:20 नवीन
हे प्रश्नाचे उत्तर नाही. गांभीर्याने विचारलेल्या प्रश्नांना गांभीर्याने उत्तरे दिली जावीत अशी अपेक्षा गैर नसावी. प्रदुषण झाले आहे श्वास घेतांना त्रास होतो काय करु या प्रश्नाला प्रदुषण झाले म्हणून श्वास घेऊ नका असे उत्तर चुकीचे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गविकाका तुम्हाला किती

मारकुटे
Fri, 01/10/2014 - 15:07 नवीन
गविकाका तुम्हाला किती प्रतिसाद हवे आहेत?
  • Log in or register to post comments

हा प्रश्न गहन आहे. याला

गवि
Fri, 01/10/2014 - 15:12 नवीन
हा प्रश्न गहन आहे. याला प्रश्नराज हा किताब दिला पायजे. हा प्रश्न धागाकर्ते श्री. मन यांस विचारणे लागू ठरावे. बाकी आपण एकटेसुद्धा पुरेश्या संख्येने प्रतिसाद देता आहातच त्यामुळे प्रतिसादसंख्येचा तुटवडा पडण्याची काळजी करणे हे उपाशी माणसाने आगोदरच हाजमोला मागवून ठेवण्यापैकी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे

तुमचे समाधान (एकदाचे) व्हावे

मारकुटे
Fri, 01/10/2014 - 15:21 नवीन
तुमचे समाधान (एकदाचे) व्हावे ही आमची इच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

प्रश्न कर्त्याचे..

नाखु
Fri, 01/10/2014 - 15:29 नवीन
समाधान हाच आमचा संतोष.. अस काहीसं गवि काकांच असाव असा कयास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा