मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा म्हणी

श्रीरंग_जोशी · · काथ्याकूट
या मागची प्रेरणा मित्रांनो आपल्याला वाटत नाही का की रोजच्या बोलण्यात पारंपरिक म्हणींचा वापर कमी होत चाललाय. चला तर मग, आपण या म्हणी आठवणींच्या कप्प्यातून बाहेर काढूया. हो पण, जश्या च्या तशा नाहीत, तर त्यांना मिपा म्हणींचे स्वरूप देऊन उदा :
  • धाग्यापेक्षा प्रतिसाद जड
  • उथळ लेखनाला प्रतिसाद फार
  • अडला कवी संपादकांचे पाय धरी
  • धागा नको पण प्रतिसाद आवर
  • आपलेच धागे अन आपलेच प्रतिसाद
  • सदस्याची धाव प्रतिसादापर्यंतच
  • व्याकरण नको पण भाषाशुद्धी आवर
  • टंकेल ते डकवेल काय
कृपया हलकेच घ्या.

वाचने 18607 वाचनखूण प्रतिक्रिया 79

In reply to by श्रीरंग_जोशी

संजय क्षीरसागर गुरुवार, 06/21/2012 - 16:03
सालं मीपाचं वैशिष्ठ्य हेच की पोस्ट ओपन केल्याशिवाय सदस्याच नांव कळत नाही आणि एकदा पोस्ट बघितली की मग राहवत नाही! (आहो, कि-बोर्ड आणि पेट्रोल दोन्ही तुमचंच आहे)... आता निदान मला धन्यवाद तरी म्हणू नका.

अरुण मनोहर गुरुवार, 06/21/2012 - 13:38
कंपूत एकोळी शेर शहाणा धागा तेथे दंगा ऑफीसच्या वेळेवर मिपापत्र दोन शब्दांचा आव त्याला धागा ऐसा ताव

मोहनराव गुरुवार, 06/21/2012 - 13:46
रोज जिलब्या टाके त्याला कोण आवरे! (रोज मरे त्याला कोण रडे) ;)

श्रीरंग_जोशी गुरुवार, 06/21/2012 - 13:52
  1. चार दिवस संपादकांचे
  2. धाग्यात नाही तर विडंबनात कुठून येणार
  3. प्रतिसादांत दंगल धाग्यात चंगळ
  4. (वाङमय) चोरीचा मामला हळू हळू बोंबला

गवि गुरुवार, 06/21/2012 - 13:55
-पोरींच्या आयडीने पोरगेच फार.. -भरवशाची आयडी पण निघाला टोणगा.. -ज्या गावचा आयडी..त्याच गावचा आयपी.. (अर्थात गावाची थाप मारताना आयपी सांभाळा..) - आयडीच्या जिवावर बायडी उदार.. -अगं अगं डू आयडी, मशीन तरी बदल..

अजातशत्रु गुरुवार, 06/21/2012 - 16:39
  • मिपावरुन जात नाही ती जात
  • नाकात बोलणार्‍यास अशुद्ध लेखनाचा त्रास
  • शब्दांचे किस पाडता प्रतिसादांचाही पाऊस पडे
  • कारवायी नंतर
  • धागा गेला प्रतिसाद गेले ,हाती आले रडगाणे
  • खडीसाखर गुरुवार, 06/21/2012 - 21:00
    १. उचलला कळ्फलक बडवला खरडायला (उचलली जीभ लावली टाळ्याला) २. डू आयडी ची खोड 'निलंबना' शिवाय जात नाही (जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही) ३. प्रतिसादापुरते लेखन (ताकापुरते रामायण) ४. धागाकर्ता हिंडतो आन्तरजालाशी चित्त त्याचे प्रतिसादाशी (घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी)

    गणेशा गुरुवार, 06/21/2012 - 21:21
    १. डायरी घेवून मागे लागणे.. २. अतिधागे त्याचा शर्ट फाटका.. ३. लिहायला गेलो कविता, झाला काथ्याकुट ४. अर्धे लिहायचे आणि सगळीकडे जायचे ५. यकु आला रे आला ६. धाग्यात सुटली खाज, तर प्रतिसादात कशाला लाज ?

    In reply to by गणेशा

    श्रीरंग_जोशी गुरुवार, 06/21/2012 - 21:27
    मित्रा, फारच सडेतोड म्हणी मांडल्यात रे. शेवटची तर खासच...!! आणखी एक... विडंबनात नाही भाव अन म्हणा त्यास वॉव!!

    गणेशा गुरुवार, 06/21/2012 - 21:36
    ७. कठीण समय येता ग्रुप कामास येतो ८. विचारांविना काथ्याकुट व्यर्थ आहे. ९. लिहिणार्‍याला पळ म्हणायचे, आणि पळणार्‍या ला लिही म्हणायचे १०. कामाचा ना धामाचा, धागा टाकतो नेमाचा ११. समुद्रावर हजर अन विहिरीवर नजर १२. कामापुरता गणा अन ताकापुरती पैसा १३. सोत्रीस पावशेर १४. कुठे गविंचे लेख आणि कुठे आयडीच फेक

    कर काथ्याकुट ,हो विचार जंत ( पी हळद...) कंपू बाहेरच्याचा लेख अळणी दोन कंपुंमध्ये राडा , मूकवाचकांचा फायदा ( दोघांचे भांडण ..) मिपात राहून कंपूशी वैर घेऊ नये.

    अर्धवटराव गुरुवार, 06/21/2012 - 21:55
    १) काळे गेले, गुगळे गेले, आता मलाही वीट आलाय २) मिपाचे धर्म तीनच ( आपापल्या मगदुराप्रमाणे ठरवावे) ३) थत्ते मियां तो थत्ते मियां, 'क्ष' मियां ...अरे देवा ४) मी नाहि कंपुतली, खरड बघा आतली ५) टंकना न जाने संपादक तेढा अर्धवटराव

    In reply to by अर्धवटराव

    गणेशा गुरुवार, 06/21/2012 - 21:59
    काळे गेले, गुगळे गेले, आता मलाही वीट आलाय
    आवडली एकदम. ती ४ थी वाली मला जमतच नव्हती .. बरी झाली लिहिली ती म्हण

    सूड गुरुवार, 06/21/2012 - 22:11
    डुआयडी खाई नी आयडी बोंबलत जाई. अंगात नाही बळ डुआयडी काढून पळ खर्‍याचं खोटं नि डुआयडीचं नाव मोठं.. डुआयडी करी बाता नि आयडी खाई लाथा..

    अरुण मनोहर Fri, 06/22/2012 - 04:04
    गावंढ्या गावात एकोळी सवाशिण टंकून टंकून दमले आणि संपादकपदी लागले उधळले कंपूवीर, खरडवह्या फुंकते उथळ धाग्याला प्रतिसाद फार शंभर उंडग्यांचे तर एक विचारजंताचे (सौ सुनार की तो एक लोहार की) तुझ्या धाग्याला लागलं ***

    पैसा Fri, 06/22/2012 - 08:51
    धागा आणि बर्‍याच प्रतिक्रिया फारच आवडल्या आहेत! आणखी भर घालू शकले असते पण.....

    गणपा Fri, 06/22/2012 - 12:50
    हा हा हा.. चला धाग्याच्या निमित्ताने बरेच जणांच्या आत कोंडलेल्या वाफेला वाट मिळाली म्हणायची की बोळा निघाला म्हण्याचं? ;)

    चावटमेला Fri, 06/22/2012 - 16:24
    ओरिजिनल आयडीला डु आयडीची साक्ष टंकता येईना की बोर्ड वाकडा झाकली मूठ शंभर प्रतिसादांची संपादकाच्या जीवावर सदस्य उदार..

    मराठे Fri, 06/22/2012 - 23:00
    चार दिवस धाग्यांचे, चार दिवस नाड्यांचे. आले सरपंचाच्या मना, तेथे कोणाचे चालेना. धाग्यावरून संस्थळाची परिक्षा.

    श्रीरंग_जोशी Sat, 06/23/2012 - 01:44
    १०० विडंबने करून आयडी निर्वाण पावला... पाहताच खरपूस धागा झेपावे विडंबनाकडे... (समर्थांची क्षमा मागून)

    शिल्पा ब Sun, 06/24/2012 - 08:43
    दमडीचं नाही वाचन अन प्रतिसादाला नाही फुरसत राहतो त्या परदेशातल्या पंतप्रधानाचे वेडेचाळे गोड प्रतिसादांचा भुकेला ब्लॉग अन खरडी उचकी लेखापेक्षा प्रतिसादच जास्ती डोक्याले सुटली खाज अन कीबोर्डाला नाही लाज

    श्रीरंग_जोशी Mon, 06/25/2012 - 04:35
    • चित्रपटापेक्षा परीक्षण भारी
    • तुम्ही कराल ते परीक्षण आम्ही करू ते विडंबन
    • प्रतिक्रिया लिहीन तेथे वाद घालीन

    मराठमोळा Mon, 06/25/2012 - 07:20
    मजेदार धागा.. आमची भर.. १. नकटीच्या कवितेला सतराशे साठ रसग्रहणं २. प्रतिसाद नको पण टोमणे आवर ३. पंख लागून उडावे परी डु आयडी निशी उरावे. ४. संस्थळ हक्क मालकाचा, रुबाब कंपुचा ५. वेळ बघून धागे प्रसवावेत (अंथरुण पाहुन...) ६. सदस्य भांडत आणि वाचक मजा घेत. (आंधळ दळतं..) ७. आपला व्यनी ठेवायचा झाकुन आणि दुसर्‍याची खरड पहायची वाकून ८. आयत्या कच्च्या मालावर विडंबनोबा.. ९. धागा तरो आनी संपादक मरो. १०. कंपूवाचून धागा तरला. (औषधावाचून..) ११. प्रतिसादक सोडून धागाकर्त्याला सुळी (चोर सोडून संन्याशाला सुळी) :)

    आशु जोग Sat, 06/30/2012 - 19:59
    एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे -- कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात सरपंचाचे

    In reply to by आशु जोग

    श्रीरंग_जोशी Sun, 07/01/2012 - 10:12
    अर्धवटरावांनी मिपा ट्रेंड्स धाग्यावर खालील ओळी लिहिल्या आहेत. एक धागा ममोचा | शंभर धागे मिपाचे || भयकारी हे सत्य वाचका, तुझीया अभिव्यक्तीचे ||