✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा म्हणी

श
श्रीरंग_जोशी यांनी
गुरुवार, 06/21/2012 - 12:28  ·  लेख
लेख
या मागची प्रेरणा मित्रांनो आपल्याला वाटत नाही का की रोजच्या बोलण्यात पारंपरिक म्हणींचा वापर कमी होत चाललाय. चला तर मग, आपण या म्हणी आठवणींच्या कप्प्यातून बाहेर काढूया. हो पण, जश्या च्या तशा नाहीत, तर त्यांना मिपा म्हणींचे स्वरूप देऊन उदा :
  • धाग्यापेक्षा प्रतिसाद जड
  • उथळ लेखनाला प्रतिसाद फार
  • अडला कवी संपादकांचे पाय धरी
  • धागा नको पण प्रतिसाद आवर
  • आपलेच धागे अन आपलेच प्रतिसाद
  • सदस्याची धाव प्रतिसादापर्यंतच
  • व्याकरण नको पण भाषाशुद्धी आवर
  • टंकेल ते डकवेल काय
कृपया हलकेच घ्या.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18549 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

सदस्य नको पण डायरीया

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/21/2012 - 12:44 नवीन
सदस्य नको पण डायरीया आवर. असो... तुम्हाला आमच्याकडून एक छोटी भेट :- Image removed.
  • Log in or register to post comments

डायरिया वरचा श्लेष हेतुतः

बॅटमॅन
गुरुवार, 06/21/2012 - 12:50 नवीन
डायरिया वरचा श्लेष हेतुतः होता की होते होते हो गया? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धन्यवाद!!

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/21/2012 - 13:05 नवीन
परा गुरूजी - आपल्यालाही एक छोटीशी भेट - ऊर्जाबचत करून वाचवलेले पेटतेल Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धन्यवाद जोशी साहेब.

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/21/2012 - 13:40 नवीन
तुमचा कीबोर्ड आणा बरं जरा इकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

कीबोर्ड?

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/21/2012 - 13:54 नवीन
कळले नाही.... कीबोर्ड (कळफलक) - त्यात असे काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

(No subject)

दिपक
गुरुवार, 06/21/2012 - 13:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अरेच्या...

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/21/2012 - 14:02 नवीन
हे काय? पेटतेल एवढे महाग झालेले असताना असा वापर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

श्रीरंग, तुमची जिद्द वाखाणण्यासारखी आहे!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/21/2012 - 16:03 नवीन
सालं मीपाचं वैशिष्ठ्य हेच की पोस्ट ओपन केल्याशिवाय सदस्याच नांव कळत नाही आणि एकदा पोस्ट बघितली की मग राहवत नाही! (आहो, कि-बोर्ड आणि पेट्रोल दोन्ही तुमचंच आहे)... आता निदान मला धन्यवाद तरी म्हणू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अर्ध्या जीलेबीने पिवळे होणे...

अमितसांगली
गुरुवार, 06/21/2012 - 13:25 नवीन
अर्ध्या जीलेबीने पिवळे होणे...
  • Log in or register to post comments

आणखी काही..

अरुण मनोहर
गुरुवार, 06/21/2012 - 13:38 नवीन
कंपूत एकोळी शेर शहाणा धागा तेथे दंगा ऑफीसच्या वेळेवर मिपापत्र दोन शब्दांचा आव त्याला धागा ऐसा ताव
  • Log in or register to post comments

हम्म!

मोहनराव
गुरुवार, 06/21/2012 - 13:46 नवीन
रोज जिलब्या टाके त्याला कोण आवरे! (रोज मरे त्याला कोण रडे) ;)
  • Log in or register to post comments

चार दिवस...

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/21/2012 - 13:52 नवीन
  1. चार दिवस संपादकांचे
  2. धाग्यात नाही तर विडंबनात कुठून येणार
  3. प्रतिसादांत दंगल धाग्यात चंगळ
  4. (वाङमय) चोरीचा मामला हळू हळू बोंबला
  • Log in or register to post comments

१. रिकामा रंगा अन बिनकामाचा

पक पक पक
गुरुवार, 06/21/2012 - 15:44 नवीन
१. रिकामा रंगा अन बिनकामाचा दंगा... :bigsmile: 2. आपलाच धागा अन आपलेच प्रतिसाद.. :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

रिकामा रंगा

कुंदन
Sat, 06/23/2012 - 09:22 नवीन
रिकामा रंगा , धाग्याला तुंबड्या लावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

-पोरींच्या आयडीने पोरगेच

गवि
गुरुवार, 06/21/2012 - 13:55 नवीन
-पोरींच्या आयडीने पोरगेच फार.. -भरवशाची आयडी पण निघाला टोणगा.. -ज्या गावचा आयडी..त्याच गावचा आयपी.. (अर्थात गावाची थाप मारताना आयपी सांभाळा..) - आयडीच्या जिवावर बायडी उदार.. -अगं अगं डू आयडी, मशीन तरी बदल..
  • Log in or register to post comments

फर्मास...

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/21/2012 - 14:11 नवीन
फारच दमदार आहेत तुमच्या मिपा म्हणी..
  • आयपी सलामत तो आयडी पचास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

जे ब्बात गवि !!

सूड
गुरुवार, 06/21/2012 - 16:21 नवीन
नाव सोनाक्षी आणि हातात आपट्याची पानं !! ;) डुआयडीची कर्म आयडीस काळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आक्षी आक्षी काय समय सुचक का

५० फक्त
गुरुवार, 06/21/2012 - 18:40 नवीन
आक्षी आक्षी काय समय सुचक का काय तसली पत्रिकिर्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

एक भर

चिंतामणी
गुरुवार, 06/21/2012 - 13:59 नवीन
(सक्रीय) सभासद कमी कंपू फार.
  • Log in or register to post comments

स्वताच्या धाग्याला

कपिलमुनी
गुरुवार, 06/21/2012 - 13:58 नवीन
स्वताच्या धाग्याला स्वताचेच प्रतिसाद :)
  • Log in or register to post comments

अजून एक म्हण

चिंतामणी
गुरुवार, 06/21/2012 - 14:01 नवीन
धागा टिचभर (अहो रूपं अहो ध्वनी) प्रतीसाद पानभर :p
  • Log in or register to post comments

आपला तो धागा दुसर्‍याच्या

बाळ सप्रे
गुरुवार, 06/21/2012 - 14:38 नवीन
आपला तो धागा दुसर्‍याच्या त्या जिलब्या :-)
  • Log in or register to post comments

क्लास !!

अर्धवटराव
गुरुवार, 06/21/2012 - 21:43 नवीन
:) पर्फेक्ट म्हण. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

दम नाही लिखाणाला आणि अक्षरं

अरुण मनोहर
गुरुवार, 06/21/2012 - 14:54 नवीन
दम नाही लिखाणाला आणि अक्षरं डकवा मिपाला टंकत्या लाज की वाचत्या लाज? शुद्धलेखन येईना म्हणे टंकनदोष!
  • Log in or register to post comments

मिपावरुन जात नाही ती

अजातशत्रु
गुरुवार, 06/21/2012 - 16:39 नवीन
  • मिपावरुन जात नाही ती जात
  • नाकात बोलणार्‍यास अशुद्ध लेखनाचा त्रास
  • शब्दांचे किस पाडता प्रतिसादांचाही पाऊस पडे
  • कारवायी नंतर
  • धागा गेला प्रतिसाद गेले ,हाती आले रडगाणे
    • Log in or register to post comments

    हे अनुभव वाटत ..

    कपिलमुनी
    गुरुवार, 06/21/2012 - 17:52 नवीन
    >>धागा गेला प्रतिसाद गेले ,हाती आले रडगाणे
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: अजातशत्रु

    प्रतिसांदांवरुन धाग्याची

    उदय के'सागर
    गुरुवार, 06/21/2012 - 19:58 नवीन
    प्रतिसांदांवरुन धाग्याची परीक्षा :) (शिता वरुन भाताची परीक्षा)
    • Log in or register to post comments

    आवडली...

    श्रीरंग_जोशी
    गुरुवार, 06/21/2012 - 20:05 नवीन
    धागाकर्त्यास ठेच प्रतिसादकर्ता शहाणा....
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: उदय के'सागर

    ....

    खडीसाखर
    गुरुवार, 06/21/2012 - 21:00 नवीन
    १. उचलला कळ्फलक बडवला खरडायला (उचलली जीभ लावली टाळ्याला) २. डू आयडी ची खोड 'निलंबना' शिवाय जात नाही (जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही) ३. प्रतिसादापुरते लेखन (ताकापुरते रामायण) ४. धागाकर्ता हिंडतो आन्तरजालाशी चित्त त्याचे प्रतिसादाशी (घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी)
    • Log in or register to post comments

    १. डायरी घेवून मागे लागणे..

    गणेशा
    गुरुवार, 06/21/2012 - 21:21 नवीन
    १. डायरी घेवून मागे लागणे.. २. अतिधागे त्याचा शर्ट फाटका.. ३. लिहायला गेलो कविता, झाला काथ्याकुट ४. अर्धे लिहायचे आणि सगळीकडे जायचे ५. यकु आला रे आला ६. धाग्यात सुटली खाज, तर प्रतिसादात कशाला लाज ?
    • Log in or register to post comments

    एक नंबर...

    श्रीरंग_जोशी
    गुरुवार, 06/21/2012 - 21:27 नवीन
    मित्रा, फारच सडेतोड म्हणी मांडल्यात रे. शेवटची तर खासच...!! आणखी एक... विडंबनात नाही भाव अन म्हणा त्यास वॉव!!
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: गणेशा

    ७. कठीण समय येता ग्रुप कामास

    गणेशा
    गुरुवार, 06/21/2012 - 21:36 नवीन
    ७. कठीण समय येता ग्रुप कामास येतो ८. विचारांविना काथ्याकुट व्यर्थ आहे. ९. लिहिणार्‍याला पळ म्हणायचे, आणि पळणार्‍या ला लिही म्हणायचे १०. कामाचा ना धामाचा, धागा टाकतो नेमाचा ११. समुद्रावर हजर अन विहिरीवर नजर १२. कामापुरता गणा अन ताकापुरती पैसा १३. सोत्रीस पावशेर १४. कुठे गविंचे लेख आणि कुठे आयडीच फेक
    • Log in or register to post comments

    अगायाया

    रमताराम
    गुरुवार, 06/21/2012 - 22:10 नवीन
    काय अब्यास काय अब्यास. _/\_ -ररीष पुणेकर
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: गणेशा

    अजुन एक कोणाला कशाचं अन "क्ष"

    शिल्पा ब
    गुरुवार, 06/21/2012 - 22:19 नवीन
    अजुन एक कोणाला कशाचं अन "क्ष" ला कंपुचं.
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: गणेशा

    मा. कविवर्य श्री. गणेशा,

    ५० फक्त
    Fri, 06/22/2012 - 08:03 नवीन
    मा. कविवर्य श्री. गणेशा, तुम्हास मिपाम्हणीरत्न असा पुरस्कार आणि एक चुरचुर नान आमचेकडुन सादर भेट.
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: गणेशा

    कर काथ्याकुट ,हो विचार जंत (

    निनाद मुक्काम …
    गुरुवार, 06/21/2012 - 21:45 नवीन
    कर काथ्याकुट ,हो विचार जंत ( पी हळद...) कंपू बाहेरच्याचा लेख अळणी दोन कंपुंमध्ये राडा , मूकवाचकांचा फायदा ( दोघांचे भांडण ..) मिपात राहून कंपूशी वैर घेऊ नये.
    • Log in or register to post comments

    आमचे २ पैसे !!

    अर्धवटराव
    गुरुवार, 06/21/2012 - 21:55 नवीन
    १) काळे गेले, गुगळे गेले, आता मलाही वीट आलाय २) मिपाचे धर्म तीनच ( आपापल्या मगदुराप्रमाणे ठरवावे) ३) थत्ते मियां तो थत्ते मियां, 'क्ष' मियां ...अरे देवा ४) मी नाहि कंपुतली, खरड बघा आतली ५) टंकना न जाने संपादक तेढा अर्धवटराव
    • Log in or register to post comments

    काळे गेले, गुगळे गेले, आता

    गणेशा
    गुरुवार, 06/21/2012 - 21:59 नवीन
    काळे गेले, गुगळे गेले, आता मलाही वीट आलाय
    आवडली एकदम. ती ४ थी वाली मला जमतच नव्हती .. बरी झाली लिहिली ती म्हण
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: अर्धवटराव

    आणखी काही....

    सूड
    गुरुवार, 06/21/2012 - 22:11 नवीन
    डुआयडी खाई नी आयडी बोंबलत जाई. अंगात नाही बळ डुआयडी काढून पळ खर्‍याचं खोटं नि डुआयडीचं नाव मोठं.. डुआयडी करी बाता नि आयडी खाई लाथा..
    • Log in or register to post comments

    हाहाहा !!! "तोंड दाबून

    विश्वनाथ मेहेंदळे
    गुरुवार, 06/21/2012 - 22:46 नवीन
    हाहाहा !!! "तोंड दाबून बुक्क्यांचा मार" ला एखादी म्हण काढ ना रे !!!
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: सूड

    जुन्या मिपावरची...

    अरुण मनोहर
    Fri, 06/22/2012 - 03:29 नवीन
    तोंड दाबून जनरल डायरचा मार...
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

    सरपंच... सरपंच... सरपंच...

    श्रीरंग_जोशी
    Fri, 06/22/2012 - 03:51 नवीन
    सरपंच... सरपंच... सरपंच... (महाश्वेता मालिकेतील 'जगदंब... जगदंब... जगदंब' च्या धर्तीवर)
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

    हा हा हा विमे काका ही घ्या.....

    लीलाधर
    Fri, 06/22/2012 - 08:27 नवीन
    तोंड दाबून बुक्क्यांचा मार अजून १ म्हण ही घ्या :-D :-D प्रतिसाद सोडून स्मायल्याच फार :-D
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

    देवरूखकर,

    किसन शिंदे
    Fri, 06/22/2012 - 08:24 नवीन
    भयकंर चिडला आहात जणू.? ;)
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: सूड

    एवढ्या सौजन्यपूर्ण प्रतिसादात

    सूड
    Fri, 06/22/2012 - 12:21 नवीन
    एवढ्या सौजन्यपूर्ण प्रतिसादात तुम्हाला चीड कुठे दिसली ? मी चिडावं असं काही घडलंय का ?
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: किसन शिंदे

    गावंढ्या गावात एकोळी

    अरुण मनोहर
    Fri, 06/22/2012 - 04:04 नवीन
    गावंढ्या गावात एकोळी सवाशिण टंकून टंकून दमले आणि संपादकपदी लागले उधळले कंपूवीर, खरडवह्या फुंकते उथळ धाग्याला प्रतिसाद फार शंभर उंडग्यांचे तर एक विचारजंताचे (सौ सुनार की तो एक लोहार की) तुझ्या धाग्याला लागलं ***
    • Log in or register to post comments

    कोणाचे हे लेख....

    श्रीरंग_जोशी
    Fri, 06/22/2012 - 08:33 नवीन
    कोणाचे हे लेख, धागा हा कोणाचा, डुप्लिकेट आयडी त्याचा तोची जाणे.... (संत ज्ञानेश्वरांची क्षमा मागून)
    • Log in or register to post comments

    =))

    पैसा
    Fri, 06/22/2012 - 08:51 नवीन
    धागा आणि बर्‍याच प्रतिक्रिया फारच आवडल्या आहेत! आणखी भर घालू शकले असते पण.....
    • Log in or register to post comments

    पण?

    श्रीरंग_जोशी
    Fri, 06/22/2012 - 09:01 नवीन
    पण काय?
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: पैसा

    पैसातैना असं म्हणायचं आहे

    ५० फक्त
    Fri, 06/22/2012 - 09:35 नवीन
    पैसातैना असं म्हणायचं आहे - हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है.
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
    • 1
    • 2
    • ›
    • »

    मिसळपाव वर स्वागत आहे.

    प्रवेश करा

    • नवीन खाते बनवा
    • Reset your password
    मिसळपाव.कॉम बद्दल
    • 1आम्ही कोण?
    • 2Disclaimer
    • 3Privacy Policy
    नवीन सदस्यांकरीता
    • 1सदस्य व्हा
    • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
    लेखकांसाठी
    • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
    • 2लेखन मार्गदर्शन
    संपर्क
    • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
    • 2अभिप्राय द्या
    • 3संपर्क साधा
    © 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा