Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 06/21/2012 - 12:28
या मागची प्रेरणा मित्रांनो आपल्याला वाटत नाही का की रोजच्या बोलण्यात पारंपरिक म्हणींचा वापर कमी होत चाललाय. चला तर मग, आपण या म्हणी आठवणींच्या कप्प्यातून बाहेर काढूया. हो पण, जश्या च्या तशा नाहीत, तर त्यांना मिपा म्हणींचे स्वरूप देऊन उदा :
  • धाग्यापेक्षा प्रतिसाद जड
  • उथळ लेखनाला प्रतिसाद फार
  • अडला कवी संपादकांचे पाय धरी
  • धागा नको पण प्रतिसाद आवर
  • आपलेच धागे अन आपलेच प्रतिसाद
  • सदस्याची धाव प्रतिसादापर्यंतच
  • व्याकरण नको पण भाषाशुद्धी आवर
  • टंकेल ते डकवेल काय
कृपया हलकेच घ्या.
  • Log in or register to post comments
  • 18549 views

प्रतिक्रिया

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 06/21/2012 - 12:44

Permalink

सदस्य नको पण डायरीया

सदस्य नको पण डायरीया आवर. असो... तुम्हाला आमच्याकडून एक छोटी भेट :- Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 06/21/2012 - 12:50

In reply to सदस्य नको पण डायरीया by परिकथेतील राजकुमार

Permalink

डायरिया वरचा श्लेष हेतुतः

डायरिया वरचा श्लेष हेतुतः होता की होते होते हो गया? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 06/21/2012 - 13:05

In reply to सदस्य नको पण डायरीया by परिकथेतील राजकुमार

Permalink

धन्यवाद!!

परा गुरूजी - आपल्यालाही एक छोटीशी भेट - ऊर्जाबचत करून वाचवलेले पेटतेल Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 06/21/2012 - 13:40

In reply to धन्यवाद!! by श्रीरंग_जोशी

Permalink

धन्यवाद जोशी साहेब.

तुमचा कीबोर्ड आणा बरं जरा इकडे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 06/21/2012 - 13:54

In reply to धन्यवाद जोशी साहेब. by परिकथेतील राजकुमार

Permalink

कीबोर्ड?

कळले नाही.... कीबोर्ड (कळफलक) - त्यात असे काय आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 06/21/2012 - 13:59

In reply to कीबोर्ड? by श्रीरंग_जोशी

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 06/21/2012 - 14:02

In reply to (No subject) by दिपक

Permalink

अरेच्या...

हे काय? पेटतेल एवढे महाग झालेले असताना असा वापर?
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on गुरुवार, 06/21/2012 - 16:03

In reply to अरेच्या... by श्रीरंग_जोशी

Permalink

श्रीरंग, तुमची जिद्द वाखाणण्यासारखी आहे!

सालं मीपाचं वैशिष्ठ्य हेच की पोस्ट ओपन केल्याशिवाय सदस्याच नांव कळत नाही आणि एकदा पोस्ट बघितली की मग राहवत नाही! (आहो, कि-बोर्ड आणि पेट्रोल दोन्ही तुमचंच आहे)... आता निदान मला धन्यवाद तरी म्हणू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by अमितसांगली on गुरुवार, 06/21/2012 - 13:25

Permalink

अर्ध्या जीलेबीने पिवळे होणे...

अर्ध्या जीलेबीने पिवळे होणे...
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on गुरुवार, 06/21/2012 - 13:38

Permalink

आणखी काही..

कंपूत एकोळी शेर शहाणा धागा तेथे दंगा ऑफीसच्या वेळेवर मिपापत्र दोन शब्दांचा आव त्याला धागा ऐसा ताव
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on गुरुवार, 06/21/2012 - 13:46

Permalink

हम्म!

रोज जिलब्या टाके त्याला कोण आवरे! (रोज मरे त्याला कोण रडे) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 06/21/2012 - 13:52

Permalink

चार दिवस...

  1. चार दिवस संपादकांचे
  2. धाग्यात नाही तर विडंबनात कुठून येणार
  3. प्रतिसादांत दंगल धाग्यात चंगळ
  4. (वाङमय) चोरीचा मामला हळू हळू बोंबला
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on गुरुवार, 06/21/2012 - 15:44

In reply to चार दिवस... by श्रीरंग_जोशी

Permalink

१. रिकामा रंगा अन बिनकामाचा

१. रिकामा रंगा अन बिनकामाचा दंगा... :bigsmile: 2. आपलाच धागा अन आपलेच प्रतिसाद.. :bigsmile:
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Sat, 06/23/2012 - 09:22

In reply to १. रिकामा रंगा अन बिनकामाचा by पक पक पक

Permalink

रिकामा रंगा

रिकामा रंगा , धाग्याला तुंबड्या लावी.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 06/21/2012 - 13:55

Permalink

-पोरींच्या आयडीने पोरगेच

-पोरींच्या आयडीने पोरगेच फार.. -भरवशाची आयडी पण निघाला टोणगा.. -ज्या गावचा आयडी..त्याच गावचा आयपी.. (अर्थात गावाची थाप मारताना आयपी सांभाळा..) - आयडीच्या जिवावर बायडी उदार.. -अगं अगं डू आयडी, मशीन तरी बदल..
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 06/21/2012 - 14:11

In reply to -पोरींच्या आयडीने पोरगेच by गवि

Permalink

फर्मास...

फारच दमदार आहेत तुमच्या मिपा म्हणी..
  • आयपी सलामत तो आयडी पचास
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 06/21/2012 - 16:21

In reply to -पोरींच्या आयडीने पोरगेच by गवि

Permalink

जे ब्बात गवि !!

नाव सोनाक्षी आणि हातात आपट्याची पानं !! ;) डुआयडीची कर्म आयडीस काळ.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on गुरुवार, 06/21/2012 - 18:40

In reply to जे ब्बात गवि !! by सूड

Permalink

आक्षी आक्षी काय समय सुचक का

आक्षी आक्षी काय समय सुचक का काय तसली पत्रिकिर्या.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 06/21/2012 - 13:59

Permalink

एक भर

(सक्रीय) सभासद कमी कंपू फार.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 06/21/2012 - 13:58

Permalink

स्वताच्या धाग्याला

स्वताच्या धाग्याला स्वताचेच प्रतिसाद :)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 06/21/2012 - 14:01

Permalink

अजून एक म्हण

धागा टिचभर (अहो रूपं अहो ध्वनी) प्रतीसाद पानभर :p
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on गुरुवार, 06/21/2012 - 14:38

Permalink

आपला तो धागा दुसर्‍याच्या

आपला तो धागा दुसर्‍याच्या त्या जिलब्या :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 06/21/2012 - 21:43

In reply to आपला तो धागा दुसर्‍याच्या by बाळ सप्रे

Permalink

क्लास !!

:) पर्फेक्ट म्हण. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on गुरुवार, 06/21/2012 - 14:54

Permalink

दम नाही लिखाणाला आणि अक्षरं

दम नाही लिखाणाला आणि अक्षरं डकवा मिपाला टंकत्या लाज की वाचत्या लाज? शुद्धलेखन येईना म्हणे टंकनदोष!
  • Log in or register to post comments

Submitted by अजातशत्रु on गुरुवार, 06/21/2012 - 16:39

Permalink

मिपावरुन जात नाही ती

  • मिपावरुन जात नाही ती जात
  • नाकात बोलणार्‍यास अशुद्ध लेखनाचा त्रास
  • शब्दांचे किस पाडता प्रतिसादांचाही पाऊस पडे
  • कारवायी नंतर
  • धागा गेला प्रतिसाद गेले ,हाती आले रडगाणे
    • Log in or register to post comments

    Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 06/21/2012 - 17:52

    In reply to मिपावरुन जात नाही ती by अजातशत्रु

    Permalink

    हे अनुभव वाटत ..

    >>धागा गेला प्रतिसाद गेले ,हाती आले रडगाणे
    • Log in or register to post comments

    Submitted by उदय के'सागर on गुरुवार, 06/21/2012 - 19:58

    Permalink

    प्रतिसांदांवरुन धाग्याची

    प्रतिसांदांवरुन धाग्याची परीक्षा :) (शिता वरुन भाताची परीक्षा)
    • Log in or register to post comments

    Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 06/21/2012 - 20:05

    In reply to प्रतिसांदांवरुन धाग्याची by उदय के'सागर

    Permalink

    आवडली...

    धागाकर्त्यास ठेच प्रतिसादकर्ता शहाणा....
    • Log in or register to post comments

    Submitted by खडीसाखर on गुरुवार, 06/21/2012 - 21:00

    Permalink

    ....

    १. उचलला कळ्फलक बडवला खरडायला (उचलली जीभ लावली टाळ्याला) २. डू आयडी ची खोड 'निलंबना' शिवाय जात नाही (जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही) ३. प्रतिसादापुरते लेखन (ताकापुरते रामायण) ४. धागाकर्ता हिंडतो आन्तरजालाशी चित्त त्याचे प्रतिसादाशी (घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी)
    • Log in or register to post comments

    Submitted by गणेशा on गुरुवार, 06/21/2012 - 21:21

    Permalink

    १. डायरी घेवून मागे लागणे..

    १. डायरी घेवून मागे लागणे.. २. अतिधागे त्याचा शर्ट फाटका.. ३. लिहायला गेलो कविता, झाला काथ्याकुट ४. अर्धे लिहायचे आणि सगळीकडे जायचे ५. यकु आला रे आला ६. धाग्यात सुटली खाज, तर प्रतिसादात कशाला लाज ?
    • Log in or register to post comments

    Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 06/21/2012 - 21:27

    In reply to १. डायरी घेवून मागे लागणे.. by गणेशा

    Permalink

    एक नंबर...

    मित्रा, फारच सडेतोड म्हणी मांडल्यात रे. शेवटची तर खासच...!! आणखी एक... विडंबनात नाही भाव अन म्हणा त्यास वॉव!!
    • Log in or register to post comments

    Submitted by गणेशा on गुरुवार, 06/21/2012 - 21:36

    Permalink

    ७. कठीण समय येता ग्रुप कामास

    ७. कठीण समय येता ग्रुप कामास येतो ८. विचारांविना काथ्याकुट व्यर्थ आहे. ९. लिहिणार्‍याला पळ म्हणायचे, आणि पळणार्‍या ला लिही म्हणायचे १०. कामाचा ना धामाचा, धागा टाकतो नेमाचा ११. समुद्रावर हजर अन विहिरीवर नजर १२. कामापुरता गणा अन ताकापुरती पैसा १३. सोत्रीस पावशेर १४. कुठे गविंचे लेख आणि कुठे आयडीच फेक
    • Log in or register to post comments

    Submitted by रमताराम on गुरुवार, 06/21/2012 - 22:10

    In reply to ७. कठीण समय येता ग्रुप कामास by गणेशा

    Permalink

    अगायाया

    काय अब्यास काय अब्यास. _/\_ -ररीष पुणेकर
    • Log in or register to post comments

    Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 06/21/2012 - 22:19

    In reply to ७. कठीण समय येता ग्रुप कामास by गणेशा

    Permalink

    अजुन एक कोणाला कशाचं अन "क्ष"

    अजुन एक कोणाला कशाचं अन "क्ष" ला कंपुचं.
    • Log in or register to post comments

    Submitted by ५० फक्त on Fri, 06/22/2012 - 08:03

    In reply to ७. कठीण समय येता ग्रुप कामास by गणेशा

    Permalink

    मा. कविवर्य श्री. गणेशा,

    मा. कविवर्य श्री. गणेशा, तुम्हास मिपाम्हणीरत्न असा पुरस्कार आणि एक चुरचुर नान आमचेकडुन सादर भेट.
    • Log in or register to post comments

    Submitted by निनाद मुक्काम … on गुरुवार, 06/21/2012 - 21:45

    Permalink

    कर काथ्याकुट ,हो विचार जंत (

    कर काथ्याकुट ,हो विचार जंत ( पी हळद...) कंपू बाहेरच्याचा लेख अळणी दोन कंपुंमध्ये राडा , मूकवाचकांचा फायदा ( दोघांचे भांडण ..) मिपात राहून कंपूशी वैर घेऊ नये.
    • Log in or register to post comments

    Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 06/21/2012 - 21:55

    Permalink

    आमचे २ पैसे !!

    १) काळे गेले, गुगळे गेले, आता मलाही वीट आलाय २) मिपाचे धर्म तीनच ( आपापल्या मगदुराप्रमाणे ठरवावे) ३) थत्ते मियां तो थत्ते मियां, 'क्ष' मियां ...अरे देवा ४) मी नाहि कंपुतली, खरड बघा आतली ५) टंकना न जाने संपादक तेढा अर्धवटराव
    • Log in or register to post comments

    Submitted by गणेशा on गुरुवार, 06/21/2012 - 21:59

    In reply to आमचे २ पैसे !! by अर्धवटराव

    Permalink

    काळे गेले, गुगळे गेले, आता

    काळे गेले, गुगळे गेले, आता मलाही वीट आलाय
    आवडली एकदम. ती ४ थी वाली मला जमतच नव्हती .. बरी झाली लिहिली ती म्हण
    • Log in or register to post comments

    Submitted by सूड on गुरुवार, 06/21/2012 - 22:11

    Permalink

    आणखी काही....

    डुआयडी खाई नी आयडी बोंबलत जाई. अंगात नाही बळ डुआयडी काढून पळ खर्‍याचं खोटं नि डुआयडीचं नाव मोठं.. डुआयडी करी बाता नि आयडी खाई लाथा..
    • Log in or register to post comments

    Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 06/21/2012 - 22:46

    In reply to आणखी काही.... by सूड

    Permalink

    हाहाहा !!! "तोंड दाबून

    हाहाहा !!! "तोंड दाबून बुक्क्यांचा मार" ला एखादी म्हण काढ ना रे !!!
    • Log in or register to post comments

    Submitted by अरुण मनोहर on Fri, 06/22/2012 - 03:29

    In reply to हाहाहा !!! "तोंड दाबून by विश्वनाथ मेहेंदळे

    Permalink

    जुन्या मिपावरची...

    तोंड दाबून जनरल डायरचा मार...
    • Log in or register to post comments

    Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 06/22/2012 - 03:51

    In reply to जुन्या मिपावरची... by अरुण मनोहर

    Permalink

    सरपंच... सरपंच... सरपंच...

    सरपंच... सरपंच... सरपंच... (महाश्वेता मालिकेतील 'जगदंब... जगदंब... जगदंब' च्या धर्तीवर)
    • Log in or register to post comments

    Submitted by लीलाधर on Fri, 06/22/2012 - 08:27

    In reply to हाहाहा !!! "तोंड दाबून by विश्वनाथ मेहेंदळे

    Permalink

    हा हा हा विमे काका ही घ्या.....

    तोंड दाबून बुक्क्यांचा मार अजून १ म्हण ही घ्या :-D :-D प्रतिसाद सोडून स्मायल्याच फार :-D
    • Log in or register to post comments

    Submitted by किसन शिंदे on Fri, 06/22/2012 - 08:24

    In reply to आणखी काही.... by सूड

    Permalink

    देवरूखकर,

    भयकंर चिडला आहात जणू.? ;)
    • Log in or register to post comments

    Submitted by सूड on Fri, 06/22/2012 - 12:21

    In reply to देवरूखकर, by किसन शिंदे

    Permalink

    एवढ्या सौजन्यपूर्ण प्रतिसादात

    एवढ्या सौजन्यपूर्ण प्रतिसादात तुम्हाला चीड कुठे दिसली ? मी चिडावं असं काही घडलंय का ?
    • Log in or register to post comments

    Submitted by अरुण मनोहर on Fri, 06/22/2012 - 04:04

    Permalink

    गावंढ्या गावात एकोळी

    गावंढ्या गावात एकोळी सवाशिण टंकून टंकून दमले आणि संपादकपदी लागले उधळले कंपूवीर, खरडवह्या फुंकते उथळ धाग्याला प्रतिसाद फार शंभर उंडग्यांचे तर एक विचारजंताचे (सौ सुनार की तो एक लोहार की) तुझ्या धाग्याला लागलं ***
    • Log in or register to post comments

    Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 06/22/2012 - 08:33

    Permalink

    कोणाचे हे लेख....

    कोणाचे हे लेख, धागा हा कोणाचा, डुप्लिकेट आयडी त्याचा तोची जाणे.... (संत ज्ञानेश्वरांची क्षमा मागून)
    • Log in or register to post comments

    Submitted by पैसा on Fri, 06/22/2012 - 08:51

    Permalink

    =))

    धागा आणि बर्‍याच प्रतिक्रिया फारच आवडल्या आहेत! आणखी भर घालू शकले असते पण.....
    • Log in or register to post comments

    Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 06/22/2012 - 09:01

    In reply to =)) by पैसा

    Permalink

    पण?

    पण काय?
    • Log in or register to post comments

    Submitted by ५० फक्त on Fri, 06/22/2012 - 09:35

    In reply to पण? by श्रीरंग_जोशी

    Permalink

    पैसातैना असं म्हणायचं आहे

    पैसातैना असं म्हणायचं आहे - हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है.
    • Log in or register to post comments

    Pagination

    • पान 1
    • पान 2
    • Next page Next ›
    • Last page Last »

    प्रवेश करा

    • नवीन खाते बनवा
    • Reset your password

    © 2026 Misalpav.com