✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा म्हणी

श
श्रीरंग_जोशी यांनी
गुरुवार, 06/21/2012 - 12:28  ·  लेख
लेख
या मागची प्रेरणा मित्रांनो आपल्याला वाटत नाही का की रोजच्या बोलण्यात पारंपरिक म्हणींचा वापर कमी होत चाललाय. चला तर मग, आपण या म्हणी आठवणींच्या कप्प्यातून बाहेर काढूया. हो पण, जश्या च्या तशा नाहीत, तर त्यांना मिपा म्हणींचे स्वरूप देऊन उदा :
  • धाग्यापेक्षा प्रतिसाद जड
  • उथळ लेखनाला प्रतिसाद फार
  • अडला कवी संपादकांचे पाय धरी
  • धागा नको पण प्रतिसाद आवर
  • आपलेच धागे अन आपलेच प्रतिसाद
  • सदस्याची धाव प्रतिसादापर्यंतच
  • व्याकरण नको पण भाषाशुद्धी आवर
  • टंकेल ते डकवेल काय
कृपया हलकेच घ्या.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18549 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

आयला "हम बोलेगा तो बोलोगे के

टवाळ कार्टा
Fri, 06/22/2012 - 12:27 नवीन
आयला "हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है." हि लाइन कोणी कोणाची ढापली म्हणायची ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

येऊ द्या तुमच्याकडल्याही

सूड
Fri, 06/22/2012 - 09:59 नवीन
येऊ द्या तुमच्याकडल्याही म्हणी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नवीन सदस्याला धागे

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/22/2012 - 10:06 नवीन
नवीन सदस्याला धागे फार... नवीन सदस्याला उचापत्या फार... (उथळ पाण्याला खळखळाट फार).
  • Log in or register to post comments

'परा' चा कावळा करणे

जोयबोय
Fri, 06/22/2012 - 10:45 नवीन
'परा' चा कावळा करणे
  • Log in or register to post comments

कावळ्याच्या...

श्रीरंग_जोशी
Fri, 06/22/2012 - 10:53 नवीन
कावळ्याच्या (प्रतिसादाच्या) शापानि धागा मरत नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोयबोय

धाग्यावरून..

कापूसकोन्ड्या
Fri, 06/22/2012 - 11:06 नवीन
धाग्यावरून ख.व. गाठणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोयबोय

प्रतिसादातुरांणां न भयं न लज्जा!

कापूसकोन्ड्या
Fri, 06/22/2012 - 11:03 नवीन
१)प्रतिसादातुरांणां न भयं न लज्जा! २)प्रतिसाद येइना, म्हणे धागा जिलब्याचा ३)कसेही मिपावर ( कसेही ज्ञान प्रकाशात)
  • Log in or register to post comments

पापभीरूणां न सुखं न मज्जा

बॅटमॅन
Fri, 06/22/2012 - 12:42 नवीन
पापभीरूणां न सुखं न मज्जा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

जबरी...!

श्रीरंग_जोशी
Sat, 06/23/2012 - 10:00 नवीन
खास करून मेंगळट तरुणांसाठी ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा.. चला धाग्याच्या

गणपा
Fri, 06/22/2012 - 12:50 नवीन
हा हा हा.. चला धाग्याच्या निमित्ताने बरेच जणांच्या आत कोंडलेल्या वाफेला वाट मिळाली म्हणायची की बोळा निघाला म्हण्याचं? ;)
  • Log in or register to post comments

कॉलिंग सखाराम गटणे

बॅटमॅन
Fri, 06/22/2012 - 12:54 नवीन
कॉलिंग सखाराम गटणे :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

ओरिजिनल आयडीला

चावटमेला
Fri, 06/22/2012 - 16:24 नवीन
ओरिजिनल आयडीला डु आयडीची साक्ष टंकता येईना की बोर्ड वाकडा झाकली मूठ शंभर प्रतिसादांची संपादकाच्या जीवावर सदस्य उदार..
  • Log in or register to post comments

मिपा उघडायला आणि आन्तर्जाल जायला....

इंद्रवदन१
Fri, 06/22/2012 - 22:50 नवीन
मिपा उघडायला आणि आन्तर्जाल जायला....
  • Log in or register to post comments

सही...

श्रीरंग_जोशी
Fri, 06/22/2012 - 22:55 नवीन
जालाचे तेल मिपावर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंद्रवदन१

माझे दोन पैसे

मराठे
Fri, 06/22/2012 - 23:00 नवीन
चार दिवस धाग्यांचे, चार दिवस नाड्यांचे. आले सरपंचाच्या मना, तेथे कोणाचे चालेना. धाग्यावरून संस्थळाची परिक्षा.
  • Log in or register to post comments

आवडले...

श्रीरंग_जोशी
Fri, 06/22/2012 - 23:14 नवीन
माझ्याकडून पुन्हा काही प्रतिसाद नको पण खरडी आवर... धाग्यापेक्षा विडंबन मऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

आणखी एक

श्रीरंग_जोशी
Sat, 06/23/2012 - 01:08 नवीन
ज्या गावच्या कविता त्या गावची विडंबने
  • Log in or register to post comments

विडंबने...

श्रीरंग_जोशी
Sat, 06/23/2012 - 01:44 नवीन
१०० विडंबने करून आयडी निर्वाण पावला... पाहताच खरपूस धागा झेपावे विडंबनाकडे... (समर्थांची क्षमा मागून)
  • Log in or register to post comments

दमडीचं नाही वाचन अन

शिल्पा ब
Sun, 06/24/2012 - 08:43 नवीन
दमडीचं नाही वाचन अन प्रतिसादाला नाही फुरसत राहतो त्या परदेशातल्या पंतप्रधानाचे वेडेचाळे गोड प्रतिसादांचा भुकेला ब्लॉग अन खरडी उचकी लेखापेक्षा प्रतिसादच जास्ती डोक्याले सुटली खाज अन कीबोर्डाला नाही लाज
  • Log in or register to post comments

कुणाच्या मनात काय?

श्रीरंग_जोशी
Sun, 06/24/2012 - 20:42 नवीन
  • नवसदस्याच्या मनात भांबावणे
  • प्रतिसादकर्त्याच्या मनात टवाळकी करणे
  • Log in or register to post comments

और भी :-)

श्रीरंग_जोशी
Mon, 06/25/2012 - 04:35 नवीन
  • चित्रपटापेक्षा परीक्षण भारी
  • तुम्ही कराल ते परीक्षण आम्ही करू ते विडंबन
  • प्रतिक्रिया लिहीन तेथे वाद घालीन
  • Log in or register to post comments

कुणाच्या धाग्यावर...

श्रीरंग_जोशी
Mon, 06/25/2012 - 05:54 नवीन
कुणाच्या धाग्यावर... कुणाचे वाजे?
  • Log in or register to post comments

कंट्रोल यार... ओय नही होता यार....

श्रीरंग_जोशी
Mon, 06/25/2012 - 06:24 नवीन
प्रसंगी धाग्यावर प्रतिसाद रगडिता विडंबनही उमळे...
  • Log in or register to post comments

मजेदार धागा.. आमची भर.. १.

मराठमोळा
Mon, 06/25/2012 - 07:20 नवीन
मजेदार धागा.. आमची भर.. १. नकटीच्या कवितेला सतराशे साठ रसग्रहणं २. प्रतिसाद नको पण टोमणे आवर ३. पंख लागून उडावे परी डु आयडी निशी उरावे. ४. संस्थळ हक्क मालकाचा, रुबाब कंपुचा ५. वेळ बघून धागे प्रसवावेत (अंथरुण पाहुन...) ६. सदस्य भांडत आणि वाचक मजा घेत. (आंधळ दळतं..) ७. आपला व्यनी ठेवायचा झाकुन आणि दुसर्‍याची खरड पहायची वाकून ८. आयत्या कच्च्या मालावर विडंबनोबा.. ९. धागा तरो आनी संपादक मरो. १०. कंपूवाचून धागा तरला. (औषधावाचून..) ११. प्रतिसादक सोडून धागाकर्त्याला सुळी (चोर सोडून संन्याशाला सुळी) :)
  • Log in or register to post comments

ममो - एकदम ११...!!

श्रीरंग_जोशी
Mon, 06/25/2012 - 08:28 नवीन
एकाहून एक भारी. याला म्हणतात अनुभवी फलंदाजाची फटकेबाजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

एक धागा सुखाचा शंभर धागे

आशु जोग
Sat, 06/30/2012 - 19:59 नवीन
एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे -- कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात सरपंचाचे
  • Log in or register to post comments

ही मिपा म्हण कशी?

श्रीरंग_जोशी
Sun, 07/01/2012 - 10:12 नवीन
अर्धवटरावांनी मिपा ट्रेंड्स धाग्यावर खालील ओळी लिहिल्या आहेत. एक धागा ममोचा | शंभर धागे मिपाचे || भयकारी हे सत्य वाचका, तुझीया अभिव्यक्तीचे ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

अजून एक

श्रीरंग_जोशी
Mon, 07/02/2012 - 21:01 नवीन
धागा असेल दमदार तर विडंबन होईल जोमदार...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा