मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रिकेट विश्वचषक २०११ फायनल

प्रशांत · · काथ्याकूट
नमस्कार , क्रिकेट विश्वचषक २०११ चा अंतिम सामना चालू झाला आहे. आजच्या सामन्याचे धावते वर्णन लिहिण्यासाठी हा धागा काढला आहे

वाचने 58164 वाचनखूण प्रतिक्रिया 417

राजेश घासकडवी Sat, 04/02/2011 - 15:19
९ ओव्हर्स २८ ला १. बोलिंग छान चालू आहे. फिल्डिंगही मजबूत आहे. असंच चालू रहायला पाहिजे. टॉसचा काय घोळ झाला नक्की? मला बघायला मिळालं नाही.

In reply to by राजेश घासकडवी

चिंतामणी Sat, 04/02/2011 - 17:48
वर्डकप फायनलच्या टॉसचे वेळी धोनी आणि संगकारा "तु तु मैं मैं" करत होते. मॅच अंपायर म्हणला की कॉल ऐकायला नाही आला.

प्रशांत Sat, 04/02/2011 - 15:20
धोनि नेहमी प्रमाणे टॉस हरला आणि झहिर ने अतिशय सुंदर गोलंदाजी करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. विशेष म्हणजे फिल्डिंग अतिषय उत्तम... लंका २८ /१ --- ९ ओव्हर

सखी Sat, 04/02/2011 - 15:22
वाटच पहात होते तुमच्या धाग्याची :) दोन दिवस मिपा चालत नव्हतं माझ्याइकडे. लंकेने टॉस जिंकला. आत्तापर्यंतचा स्कोअर - SL 30/1 (9.4 Ovs) पण काय सुरेख फिल्डिंग करताहेत आपले लोक :)

दोन वेळेस टॉस सॉरी नाणेफेक करावी लागली हे विश्वकरंडक क्रिकेटला गालबोट वाटले राव मला. असो, श्रीलंका धावसंख्या ३४ धावा ११ षटके पूर्ण आणि एक फलंदाज बाद. :) मिपा सुरळीत केल्याबद्दल धन्यु.......! -दिलीप बिरुटे

जम बसायच्या आत संगकारा आणि जयवर्धने गेले पाहिजेत. मग झालं. दोनशे पन्नासच्या आत धावा होतील ? मंडळी आपले काय अंदाज ? ६५/२ अठरा षटकानंतर. -दिलीप बिरुटे

प्रशांत Sat, 04/02/2011 - 16:15
श्रीलंका २० ओव्हर ८३ रण २ विकेट... रण रेट ४ च्यावर गेला लक्षात असु द्या .... दोनीहि फलंदाज चांगले आहेत..... श्रीशांतचे १० ओव्हर संपवण्याच्या मार्गावर.... कदाचित सचिनला बॉलिंग टाकावी लागेल?

In reply to by सखी

यशोधरा Sat, 04/02/2011 - 16:24
हेहे :) म्हटला, म्हटला :) मी म्हणणारच होते सखी तू "श्लोक" म्हण म्हटल्यावर कोणीतरी त्यावरच सुरु होईल म्हणून.. अंधश्रद्धा वगैरे... :)

In reply to by यशोधरा

सखी Sat, 04/02/2011 - 16:31
पहेले बारी संगा की, फिर जयवर्धने. अपर्णा अग परवा आमचे २-४ अंदाज बरोबर आले म्हणून बाकी मिपाकर म्हणत होते आम्ही श्लोक वगैरे म्हणून यज्ञाला बसलो की काय. तरी बरं लताबाईंसारखा उपास मी नाही करु शकले :)

''अरे ह्या श्रीशांत चे काय करावे ? धोनीला त्याच्या जागी रैना किंवा सेहवाग आणावा लागणार . महिला आणी संगकारा अश्या हौशी फिरकी गोलदाजांची वाट पाहत आहे . मुळात युवराज ला ह्या अही महींनी चोपला तर मग धोनी काय करणार ? नेहरा ला मिस करतोय .

In reply to by निनाद मुक्काम …

प्रशांत Sat, 04/02/2011 - 16:30
अरे आपला सचिन आहे ना.. मागच्या सेमिफायनल मधे श्रीलंके सोबत २ विकेट घेतल्या होत्या त्याने... १००/२ रण झालेत

यशोधरा Sat, 04/02/2011 - 16:26
अरे परवा सगळे त्या नेहराला शिव्या घालत होते पण शेवटी त्यानेही वाटा उचलला ना स्वतःचा भारताच्या विजयात तसाच श्रीशांतही उचलेल. धीर धरा की :)

In reply to by यशोधरा

त्यावेळी सर्वप्रथम मी म्हटले '' आज नेहरा काहीतरी वेगळे करणार '' तेव्हा प्रीती मनोहर ह्यांनी तेरे मुह मी घी शक्कर असे लिहिल्याचे आठवते . येथे घी नसल्याने मग बटर आणी शक्कर से तोंड गोड केले . हे दोघ फिरकी गोलंदाजी लीलया खेळतात .म्हणून चिंता बाकी सचिन आहे .हेही खरे ( त्याने गोलंदाजी केली नाही तरी .कृष्णा प्रमाणे '' हाती न धरी शस्त्र मी ,गोष्टी सांगे युक्तीच्या चार '' ह्या उक्तिनुसार चार नियमित गोलंदाजांना आपल्या विशाल अनुभवाचा डोस वेळोवेळी पाजावा .)

In reply to by सोत्रि

सखी Sat, 04/02/2011 - 16:55
अहो ह्या मॅचचे रेकॉर्ड व्हायचे भलत्या कारणासाठी, बॉलरलाच आउट दिले म्हणून! आत्तापर्यंत महाग ठरलाय, खरयं पण १-२ विकेट घेतल्या तर मदतच होईल.

चतुरंग Sat, 04/02/2011 - 16:53
एकदम मिडिऑकर आहे राव! :( त्याच्याकडून ना रन थांबवल्या जाताहेत, ना विकेट, नेहराला का घेतला नाही ह्याचा पश्चात्ताप होतअसणार धोनीला. त्याच्या ओवर्स अत्ताच संपवून टाका राव नाहीतर शेवटी त्याची बिनपाण्याने करतील!

In reply to by विसुनाना

रनिंग ऑन पिच ची एक वॉर्निंग मिळालीच आहे. पुढच्या दहा वॉर्निंगा एकदमच देऊन डिबार करा. हाहाहा. आरं हे विसुनानाला आवरा रे कोणी ! :) एखादं ओझं पेलावेच लागेल आजच्या दिवशी. १३९/३ ओव्हर.३१

In reply to by चतुरंग

गणपा Sat, 04/02/2011 - 17:00
रंगाशेट त्याला नाईलाजाने घेतलय. नेहरा बोटाचे हाड मोडुन बसला आहे. पण पेन किलर घेउन खेळता आलं असत त्याला. बॉलिंग टाकणारा हात बरा आहे. तशी ही त्याच्या कडुन कोणी बॅटिंगची अपेक्षा ठेवलीच नसती. वर्ल्डकप फायनल तेही मायदेशात....... ऐसा मोका जिंदगी में बार बार नही मिलता किसिको.

प्रशांत Sat, 04/02/2011 - 16:55
युवराज आणि झहिर यांनी या विश्वचषक मधे चांगली गोलंदाजी केली. झहिर अप्रतिम गोलंदजी करत आहे तर युवि पहिजे तेव्हा विकेट काढतो.... गुडलक युवराज..... हरभजन च्या गोलंदाजी मुळे दबाव येतो.. आणि त्याचा फायदा दुसर्‍या गोलंदाजाला (भारताला) होतो

श्रीशांत जेव्हा राखीव खेळाडू म्हणून इतर सामन्यात ड्रेसिंग रूम मध्ये किती छान दिसायचा . आपल्या सहकार्यांचे कौतुक काय करायचा ,टाळ्या वाजवून कायकाय हावभाव करायचा , उगाच त्याला त्रास देण्यासाठी धोनीने भर उन्हांचे मैदानात उतरवले . अश्विन व त्याच्या कंपूचा मुख्य सूत्रधार निवड समितीचा सदस्य श्रीकांतची हाय लागली आहे .आमच्या श्री ला .

In reply to by चतुरंग

जयवर्धनेची बायको तर जयवर्धनेला ग्राऊंडवरच थांब म्हणून खुणावते आहे. आणि आपण ग्राउंडवरुन जाण्याचा आग्रह धरतोय. :) -दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर Sat, 04/02/2011 - 17:26
कोहली कोहली ची~अ‍ॅक्शन भलतीच क्यूट आहे... परेरा आणि कापुगेदरा मारतील नंतर..... चेतेश्वर पुजाराचा स्टान्स सुद्धा छान आहे... कुंबळे गोड दिसतोय

विकास Sat, 04/02/2011 - 17:35
अजून काही पुढची विकेट पडत नाही, म्हणून एक माझ्या प्रतिसादामुळे पडेल का ते पहातो. ;)

In reply to by चतुरंग

विकास Sat, 04/02/2011 - 17:40
179/4 आमच्या प्रतिसादाने भल्याभल्यांच्या विकेट पडतात असे आता म्ह्णू शकेन! ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशांत Sat, 04/02/2011 - 17:45
धोनी रिव्ह्यु घ्यायला नव्हता. युवराज ने जोर लावल्यामुळे रिव्ह्युव घेतला. चांगला निर्णय... आता जयवर्धने गेला म्हणजे झाले...

विकास Sat, 04/02/2011 - 17:53
रनरेट कमी ठेवण्यात यश आले आहे... आता जयवर्धने जायची गरज आहे...

In reply to by विकास

सखी Sat, 04/02/2011 - 17:57
आता जयवर्धने जायची गरज आहे... - जा, जा, टाटा बाय बाय.

विकास Sat, 04/02/2011 - 18:02
क्रिकटाईम लागत नाही :( दुसरे कुठले संस्थळ माहीत आहे का?