Skip to main content

क्रिकेट विश्वचषक २०११ फायनल

लेखक प्रशांत यांनी शनिवार, 02/04/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , क्रिकेट विश्वचषक २०११ चा अंतिम सामना चालू झाला आहे. आजच्या सामन्याचे धावते वर्णन लिहिण्यासाठी हा धागा काढला आहे

वाचने 58267
प्रतिक्रिया 417

प्रतिक्रिया

९ ओव्हर्स २८ ला १. बोलिंग छान चालू आहे. फिल्डिंगही मजबूत आहे. असंच चालू रहायला पाहिजे. टॉसचा काय घोळ झाला नक्की? मला बघायला मिळालं नाही.

In reply to by राजेश घासकडवी

वर्डकप फायनलच्या टॉसचे वेळी धोनी आणि संगकारा "तु तु मैं मैं" करत होते. मॅच अंपायर म्हणला की कॉल ऐकायला नाही आला.

धोनि नेहमी प्रमाणे टॉस हरला आणि झहिर ने अतिशय सुंदर गोलंदाजी करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. विशेष म्हणजे फिल्डिंग अतिषय उत्तम... लंका २८ /१ --- ९ ओव्हर

वाटच पहात होते तुमच्या धाग्याची :) दोन दिवस मिपा चालत नव्हतं माझ्याइकडे. लंकेने टॉस जिंकला. आत्तापर्यंतचा स्कोअर - SL 30/1 (9.4 Ovs) पण काय सुरेख फिल्डिंग करताहेत आपले लोक :)

दोन वेळेस टॉस सॉरी नाणेफेक करावी लागली हे विश्वकरंडक क्रिकेटला गालबोट वाटले राव मला. असो, श्रीलंका धावसंख्या ३४ धावा ११ षटके पूर्ण आणि एक फलंदाज बाद. :) मिपा सुरळीत केल्याबद्दल धन्यु.......! -दिलीप बिरुटे

आपली बॉडी लॅंग्वेज अतिषय पॉझिटिव! एकदम मस्तच वाटतंय बघायला! भज्जीवर तुटून पडणार हे बहुधा!

श्रीशांत बाबारे, काहीही कर पण पुन्हा नो बॉल टाकू नकोस.

In reply to by सखी

सखी बोलते तसेच होते अशी आमची श्रद्धा होत चालली आहे. :) -दिलीप बिरुटे [श्रद्धाळू]

Sri Lanka 58/1 (14.3 ov) Sri Lanka RR 4.00 Bowling PP 27/0 (4.3) RR 6.00 Last 5 ovs 28/0 RR 5.6

उट

पार्टनरशिप फार धोकादायक व्हायच्या आतच...

जम बसायच्या आत संगकारा आणि जयवर्धने गेले पाहिजेत. मग झालं. दोनशे पन्नासच्या आत धावा होतील ? मंडळी आपले काय अंदाज ? ६५/२ अठरा षटकानंतर. -दिलीप बिरुटे

श्रीलंका २० ओव्हर ८३ रण २ विकेट... रण रेट ४ च्यावर गेला लक्षात असु द्या .... दोनीहि फलंदाज चांगले आहेत..... श्रीशांतचे १० ओव्हर संपवण्याच्या मार्गावर.... कदाचित सचिनला बॉलिंग टाकावी लागेल?

शी(!)संतला कसेही करून संपवला पाहिजे. नाटक्या लेकाचा.

In reply to by विसुनाना

विकेट मिळवायच्या नावानं बोंब. उगाच खुन्नस देत असतो. -दिलीप बिरुटे

In reply to by सखी

हेहे :) म्हटला, म्हटला :) मी म्हणणारच होते सखी तू "श्लोक" म्हण म्हटल्यावर कोणीतरी त्यावरच सुरु होईल म्हणून.. अंधश्रद्धा वगैरे... :)

In reply to by यशोधरा

पहेले बारी संगा की, फिर जयवर्धने. अपर्णा अग परवा आमचे २-४ अंदाज बरोबर आले म्हणून बाकी मिपाकर म्हणत होते आम्ही श्लोक वगैरे म्हणून यज्ञाला बसलो की काय. तरी बरं लताबाईंसारखा उपास मी नाही करु शकले :)

In reply to by सखी

अरे तुम्हि श्लोक म्हणने बंद नका करू... रण रेट ४.६० झालाय जयवर्धनेला पाठवा लवकर

''अरे ह्या श्रीशांत चे काय करावे ? धोनीला त्याच्या जागी रैना किंवा सेहवाग आणावा लागणार . महिला आणी संगकारा अश्या हौशी फिरकी गोलदाजांची वाट पाहत आहे . मुळात युवराज ला ह्या अही महींनी चोपला तर मग धोनी काय करणार ? नेहरा ला मिस करतोय .

In reply to by निनाद मुक्काम …

अरे आपला सचिन आहे ना.. मागच्या सेमिफायनल मधे श्रीलंके सोबत २ विकेट घेतल्या होत्या त्याने... १००/२ रण झालेत

अरे परवा सगळे त्या नेहराला शिव्या घालत होते पण शेवटी त्यानेही वाटा उचलला ना स्वतःचा भारताच्या विजयात तसाच श्रीशांतही उचलेल. धीर धरा की :)

In reply to by यशोधरा

त्यावेळी सर्वप्रथम मी म्हटले '' आज नेहरा काहीतरी वेगळे करणार '' तेव्हा प्रीती मनोहर ह्यांनी तेरे मुह मी घी शक्कर असे लिहिल्याचे आठवते . येथे घी नसल्याने मग बटर आणी शक्कर से तोंड गोड केले . हे दोघ फिरकी गोलंदाजी लीलया खेळतात .म्हणून चिंता बाकी सचिन आहे .हेही खरे ( त्याने गोलंदाजी केली नाही तरी .कृष्णा प्रमाणे '' हाती न धरी शस्त्र मी ,गोष्टी सांगे युक्तीच्या चार '' ह्या उक्तिनुसार चार नियमित गोलंदाजांना आपल्या विशाल अनुभवाचा डोस वेळोवेळी पाजावा .)

अजून विकेट काढता आली नाही राव तुम्हाला..ह्या. युवराज घेरे विकेट. २६ षटकानंतर १११/२. -दिलीप बिरुटे

Sri Lanka 111/2 (25.6 ov) Sri Lanka RR 4.26 Last 5 ovs 25/0 RR 5.0