Skip to main content

कोडे

लेखक शुचि यांनी मंगळवार, 28/12/2010 05:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रसिद्ध कोडं घालते आहे. आपल्यापैकी बर्‍याच जणांना ते माहीत असण्याचीच शक्यता जास्त आहे. पण ज्यांना माहीत नाही त्यांनी ,याचे उत्तर जालावर शोधण्याआधी कृपया प्रामाणिक प्रयत्न करावा. कोडे सहज सापडू नये म्हणून थोडे अनुवादित केले आहे. (१) एक गाव असतं त्याला म्हणू यात गंगापूर. गंगापूरमध्ये १००० खेडूत रहात असतात. (२) या खेडूतांमध्ये १०० जणांच्या डोळ्यांचा रंग पिंगा असतो तर ९०० जणांच्या डोळ्यांचा रंग असतो काळा. (३) एका धार्मिक प्रथेनुसार या लोकांना स्वतःच्या डोळ्याचा रंग जाणून घेता येत नाही. (४) हे लोक कोणत्याही प्रतिबिंब दाखविणार्‍या वस्तूमध्ये आपले रूप पाहू शकत नाहीत किंवा स्वतःच्या अथवा अन्य कोणाच्या डोळ्याच्या रंगाबद्दल चर्चा करू शकत नाहीत. (५) जर एखाद्याला त्याच्या स्वतःच्या डोळ्यांचा रंग कळलाच तर त्याला दुसर्‍या दिवशी दुपारी , सर्वांसमक्ष मृत्यूदंड ठोठविण्यात येतो. (६) गंगापूरमधील सर्व लोकांची तर्काची बाजू विलक्षण भक्कम आहे.*** *** तर्काने जे काही कळू शकते, ते या लोकांना ताबडतोब कळून येते. (७)सर्व लोक एकदुसर्‍याला पाहू शकतात, एकमेकांची संख्या मोजू शकतात. (८) एकदा एक परदेशी या गावात येतो आणि या जमातीचा संपूर्ण विश्वास प्राप्त करतो. (९) त्याचे खूप आदरातिथ्य होते आणि या आदरतिथ्याच्या आभाराप्रीत्यर्थ तो एक भाषण एका संध्याकाळी देतो. (१०) या भाषणात तो चुकून बोलून जातो की "मित्रांनो माझ्यासारखी पिंग्या डोळ्याची व्यक्ती तुमच्या गावात पाहून मला खूप आश्चर्य वाटलं" (११) आता हे विषद करा त्याच्या या किरकोळ चूकीचा त्या जमातीवर काय परीणाम होईल?

वाचने 41582
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

In reply to by शुचि

मी मस्त दुसर्‍या दिवशी उठले फाशी च्या ठीकाणी गेले. पण राम शाम काही पुढे येईनात.
हे चूक आहे.तिन्ही पिंग्यांना एकदमच कळेल की गावात तीन पिंगे आहेत.(म्हणजे तो स्वतः धरुन अजुन दोन.) त्यामुळे फक्त तिसर्या दिवशीच ते तिघेही फाशीच्या ठिकाणी जातील.कारण गावातील सर्वजण तर्काच्या बाबतीत एकाच पातळीवर आहेत त्यामुळे कुणा एकाला तर्काद्वारे एखादी गोष्ट इतरांच्या आधी कळली असे होणार नाही.बाकी उत्तर पटणेबल!

In reply to by शुचि

२ व्यक्तींचे डोळे पिंगे आहेत समजा - राम आणि शाम . मी राम आहे. मी बघते शामचे डोळे पिंगे आहेत. अन्य सर्व लोकांचे डोळे काळे आहेत. म्हणून मी १ दिवस थांबते. दुसर्‍या दिवशी राम वधस्तंभाकडे जात नाही हे पाहून मला कळते की अरेच्च्या अजून कोणीतरी पिंग्या डोळ्याची व्यक्ती आहे. ती मीच असणार कारण बाकीचे काळे आहेत. हीच गोष्ट रामच्या बाबतीत्देखील सत्य ठरते म्हणून दुसर्‍या दिवशी मला वधस्तंभाकडे नेण्यात येते. जरा स्पश्ट करता काय ?

In reply to by शुचि

उत्तर सापडले प्रेषक शुचि दि. मंगळ, 28/12/2010 - 19:28. १०१ व्या दिवशी सर्व पिंग्या व्यक्तींना मृत्यूदंड होईल हे बरोबर आहे. हेच उत्तर आहे अज्याबात पटले नाही. मुळात पिंगट डोळ्याच्या व्यक्तीला स्वतःच्या डोळ्याचा रंग कळेल कसा? एक होईल फारतर तो पर॑देशी ज्या ज्या व्यक्तीना भेटला असेल त्याना वाटेल की त्यांच्या डोळ्यांचा रंग पिंगट आहे. पण तो वर्‍याच लोकाना भेटला आहे. त्यामुळे नक्की कोणाचे डोळे पिंगट आहेत हा तर्क बरोबर ठरणार नाही. अवांतरः अशी पाशवी प्रथा असूच नये.

In reply to by शुचि

जरा अभिनंदन करा..म्हणजे पुढचे कोडे सोडवायला थोडेफार motivation मिळेल.. बाकी कोडे एकदम मस्त होते..आणखी आहेत का अशी डोकेबाज कोडी?

In reply to by शुचि

आभारी आहे... बर्‍याच जणांच्या शंका आपण मस्त पैकी निवारल्यात..मी प्रवास करत असल्याने उत्तर देऊ नाही शकलो. गंगापूरमधील सर्व लोकांची तर्काची बाजू विलक्षण भक्कम आहे.*** *** तर्काने जे काही कळू शकते, ते या लोकांना ताबडतोब कळून येते. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे हे पण सगळ्यांनी ध्यानात घ्यायला हवे.

समजा गावात दोन पिंग्या डोळ्याच्या व्यक्ती आहेत. तर त्या दोन्ही व्यक्तींना कळेल की गावात ९०० काळे डोळे आणि एक पिंगे डोळे अशी माणसे आहेत. पण स्वत:च्या डोळ्याचा रंग माहित नसल्याने त्या एक दिवस थांबतील. पण पहिल्या दिवशी कोणीच "डोळ्याचा रंग कळला" असे म्हणून पुढे आले नसल्याने त्यांना कळेल की अजून एक व्यक्तीचे डोळे पिंगे आहेत व ती व्यक्ती म्हणजे ती स्वतः.. म्हणून त्या दोन्ही व्यक्ती "डोळ्याचा रंग कळला" म्हणून दुसर्‍या दिवशी पुढे येतील. आणि तिसर्‍या दिवशी मृत्यूदंड स्विकारतील. हेच लॉ़जिक पुढे पुढे वाढवले तर असे कळेल की १०० माणसे पिग्या डोळ्यांची आहेत. त्या प्रत्येक व्यक्तीला गावात (परदेशी सोडून) कळेल की ९९ माणसे पिंग्या डोळ्याची आहेत आणि ९०० काळे डोळे आहेत. पण ९९ दिवस कोणीच "डोळ्याचा रंग कळला" असे न सांगितल्याने १०० दिवशी त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या डोळ्याचा रंग (एकदाचा) कळेल आणि त्या सर्व व्यक्ती १०१ व्या दिवशी मृत्यूदंड स्विकारतील.
जरूरी नाही. ईथे तुम्ही असे ग्रुहीत धरताय की जितकी पिंग्या डोळ्यांची माणसे आहेत, तितके दिवस प्रत्येक पिंग्या डोळ्याचा माणूस कोणीतरी पुढे येण्याची वाट बघेल. अजून एक गोची आहे. जरूरी नाही कि एका दिवशी एक माणूसच पुढे येइल. ( दिलेल्या माहीतीनुसार गावकरी तर्काच्या बाबतीत बाप आहेत. त्यामुळे असा अंदाज ते लावतील हे तर्कात बसत नाही) बाकी आमचा मेंदू कुवतीनुसार विचार करतोय

>>मित्रांनो माझ्यासारखी पिंग्या डोळ्याची व्यक्ती तुमच्या गावात पाहून मला खूप आश्चर्य वाटलं यावरून असं दिसतं की त्याला पिंगट डोळ्यांची एकच व्यक्ती भेटली. त्यामुळे त्याला कोणती पिंगट डोळ्यांची व्यक्ती भेटली हे माहिती असलेल्या आणि त्याला भेटलेल्या इतर सगळ्या लोकांना आपले डोळे काळे आहेत हे कळेल.

कोणतेही रिप्लाय न पाहता उत्तर देत आहे .. चुकणार आहेच पण असुद्या तरीही ..आणि हे कोडे मला आधी माहिती ही नाहिये .. उत्तराचा एक प्रयत्न : --- १००० जनांमध्ये जर १०० जणांचे डोळे पिंगे असतील तर नियम क्रमांक ४ मध्ये दिलेल्या माहिती प्रमाने ते दुसर्याच्या डोळ्याच्या कलर्स ची पन चर्चा करु शकत नाहित .. म्हणुन जेंव्हा परदेशी जेंव्हा ते स्टेटमेंट करतो तेंव्हा पिंग्या डोळ्याच्यांना हे माहिती आहे की गावात ९९ पिंगे आणि ९०० काळ्या डोळ्याची माणसे आहेत, स्वताच्या डोळ्याच्या रंग त्यांना माहीत नसतो. म्हनुन प्रत्येक पिंग्या डोळ्याच्याला हे माहित असते की इतर लोक ९९ पिंगे आणि ९०० काळे अशे आहेत तर प्रत्येक काळ्या डोळ्याच्याला हे माहित असते की इतर लोक १०० पिंगे आणि ८९९ काळे आहेत ते. म्हणजे १०० पिंगे असणार्यांचा असा ग्रह असतो की मी सोडुन इतर ९९ जण पिंगे आहेत. म्हणुन मग तो ९९ जण पुढे येवुन मरतील असा तर्क करतो .. पण त्याला हे ही माहिती असते की त्या माणसाला कोठे त्याच्या डोळ्याचा रंग माहित आहे, अआणि कोणी दुसर्याच्या डोळ्याची चर्चा पण करु शकत नाहि मग ते पुढे कशे येतील .. आणि आपल्या डोळ्याचा कलर तरी आपल्याला माहित आहे .. तो काळा आहे पिंगा आहे का अजुन कसला आहे काय माहित .. म्हणुन मग ते बाकीच्या ९९ जणांची पुढे येण्याची प्रतिक्षा करतील पण कोणीच पुढे येत नाही तेंव्हा काहीच न बोलता ते पण गप्प असतील .. म्हनजे प्रत्येक पिंग्या डोळ्यावाल्यांची आणि कआळ्या डोळ्यावाल्यांची हीच स्थीती असेन .. आपण आता पिंगे डोळ्यांचेच कन्सिडर करु. प्रत्येक १०० पिंग्या डोळ्याच्या व्यक्तींना हे माहिती आहे की ९९ व्यक्ती पिंग्या डोळ्याच्या आहेत पन त्या पुढे आल्या नाहित .. प्रत्येक पिंग्या डोळ्याची व्यक्ती इतर ९९ जणांच्या पुढे येण्याची वाट पाहत थांबलेली असते .. म्हणुन प्रत्येक पिंग्या डोळ्याची व्यक्ती ९९ जण पुढे येण्याची तर काळ्या डोळ्याची व्यक्ती १०० जण पुढे येण्याची वाट पाहिन .. [ उत्तर बरोबर आहे का ते सांगावे, नसेल तर कसे नाहि ते पण सांगावे ] हे पोस्ट केल्यावर वरती पण पाहतो आहेच म्हणा मी ..

कोणीच मरणार नाहीत. एक दोन माणसांचा तर्क एन क्रमांकापर्यंत खेचता येत नाही. त्या वक्तव्याने काहीच फरक पडणार नाही. पिंगट डोळ्यांचे लोक अल्पसंख्याक असल्याने आरक्षण मागतील :)

आत्तापर्यंतच्या उत्तरात आपण पाहुणा खरं बोलतोय असं गृहीत धरतोय. परदेशी पाहुण्याच्या विधानाची सत्यता लक्षात घ्यायला हवी. शिवाय त्याचा खरं किंवा खोटा बोलण्यामागचा काय हेतू असेल हे तर्कानुसार(गावकरी तर्कशुद्ध आहेत!) तपासायला हवं. त्याने गावकऱ्यांचा विश्वास संपादन करताना 'क्ष' दिवसांत किती असत्यभाषण केलं, त्यावर त्याने केलेलं विधान हे किती टक्के वेळा सत्य आहे (उदा. - तो ७०% वेळा खरं बोलतो) हे कळेल. 'शुचि' ह्यांनी म्हटल्याप्रमाणे हा एक 'ओपन प्रोब्लेम'च वाटतो! शिवाय मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर, एक समजत नाही ते असं की, जरी एखाद्याला त्याच्या डोळ्यांचा रंग समजला तरी तो मृत्यूदंडासाठी स्वयंसेवक का बनेल? ज्याला आपल्या डोळ्यांचा रंग कळला आहे, तो मरणाच्या भीतीने कधीच पुढे होणार नाही. कदाचित पाहुणा बोलण्याची आधीपासून काही लोकांना आपल्या डोळ्यांचा रंग माहितही असेल. शेवटी असं वाटतं की, सगळ्या गावासाठी उत्तम उपाय म्हणजे परदेशी पाहुण्याचं बोलणं असत्य मानून सोडून देणं! एखादी गोष्ट अर्धवटपणे समजून घेऊन नाहक आपल्या गावकरी मित्रांचा बळी देण्याऐवजी ती गोष्ट सोडून दिलेली चांगली.

एका देशात असा नियम असतो, की मृत्युदंड झालेल्या माणसाला "आज मृत्युदंड अमलात आणला जाईल" असे ठाऊक असता कामा नये. मनाची तयारी न करता प्राणांतिक भय होते, तीच खरी शिक्षा! असे त्या देशाचे धोरण होते. जर गुन्हेगाराला अमल करणारा येण्यापूर्वीच समजले की "आज देहदंड आहे" आणि ते तर्कासह सिद्ध करता आले, तर त्या दिवशीचा देहदंड रद्द केला जातो. कारण "तयारीशिवाय प्राणांतिक भय" हीच खरी शिक्षा होती, ती होणार नाही... (कैद्याने "माहीत आहे" असे तर्काने सिद्ध करायला पाहिजे - नाहीतर उगाच प्रत्येक दिवशी कैदी म्हणेल "मला वाटते की आजच देहदंडाचा दिवस आहे.") - - - एकदा एका सोमवारी आरोपीला देहदंडाची शिक्षा झाली. त्याने वेगळीच युक्ती लढवली. त्याने न्यायाधीशाला विनंती केली. "काही करा, पण माझा देहदंड पुढच्या एका आठवड्यातच - पुढच्या सोमवारपर्यंत - झालाच पाहिजेत, असा आदेश द्या." न्यायाधीशाने त्याच्या विनंतीला मान देऊन तशा आदेशावर शिक्कामोर्तब केले. पुन्हा कारागृहात पोचल्यावर कैदी मोठ्याने हसू लागला. "मूर्ख न्यायाधीश! माझे प्राण वाचले!!!" जेलरने विचारले - "कसे काय?" कैदी म्हणाला "इन्डक्शन-विगमनाने!" कैदी पुढे म्हणाला - "बघा... (१) जर येत्या रविवारी रात्रीपर्यंत मी जिवंत असलो, तर माझा देहदंड सोमवारी ठरला आहे, ते मला कळेल. म्हणजे सोमवारी माझा देहदंड शक्य नाही. तो सोमवार बाजूला काढूया. (२) जर येत्या शनिवारी रात्रीपर्यंत मी जिवंत असलो, तर माझा देहदंड रविवारी ठरला आहे, ते मला कळेल. म्हणजे रविवारी माझा देहदंड शक्य नाही. तो रविवार बाजूला काढूया. ... (६) जर आज रात्रीपर्यंत मी जिवंत असलो, तर माझा देहदंड उद्या मंगळवारी ठरला आहे, ते मला कळेल. म्हणजे मंगळवारी माझा देहदंड शक्य नाही. तो मंगळवार बाजूला काढूया. (७) आज सोमवारी माझा देहदंड ठरला असेल, तर ते मला माहीतच झाले आहे. म्हणजे आजही देहदंड देता येणार नाही. हाहाहा!!!!" जेलर म्हणाला, "असेल बुवा तुम्ही म्हणता तसे..." कैद्याचे बोलणे त्याने नोंदवून घेतले. झाले असे की बुधवारी देहदंडाची अमलबजावणी करणारी टीम आली. कैदी ततपप करू लागला "प-प-पण आज दे-दे-देहदंड श-श-शक्य नाही ही सिद्धता मी केली हो-हो-होती" जेलरने त्याच्याच युक्तिवादाची नोंद त्याच्या तोंडापुढे नाचवली - "तर तू मान्य करतोस : तुला तर्काने माहीत नव्हते की आज देहदंड ठरला होता! देहदंड देऊन टाका!" :-( गरीब बिचारा कैदी :-( - - - - (कैद्याचे इन्डक्शन चुकलेले आहे. हे थोड्या विचाराअंती स्पष्ट होईल. त्याच प्रकारे या काळ्या-पिंग्या डोळ्यांच्या कोड्यातले इन्डक्शन चुकलेले आहे.)

In reply to by धनंजय

इंडक्शन ...... N=१ ला हा सिद्धांत खरा ठरतो. N करता खरा आहे हे गृहीत धरा. = N दिवसांनतर N पिंगे आत्महत्या करतात आता बघू यात N+१ केस. N पिन्गे आणि सीता N व्या दिवशी सगळे जमतात कोणीच फाशीच्या ठीकाणी जात नाही सीता विचार करते (गृहीतकानुसार त्यांनी जायला पाहीजे होतं) अरे म्हणजे अजून एक पिंगा आहे. मीच की काय? अर्थातच. तिला जसा साक्षात्कार क्झाला तसाच अन्य N पिंग्यांना होतो. N+१ व्या दिवशी सर्व पिंगे फासावर जातात इंडक्शन फुलफिलड!!!!

In reply to by शुचि

n वरून n+1ची सिद्धता करायची असते. तशी येथे होत नाही.
N करता खरा आहे हे गृहीत धरा. = N दिवसांनतर N पिंगे आत्महत्या करतात
पण तुम्ही तर म्हणाला की N दिवसांनी आत्महत्या केलेली नाही. म्हणजे पहिल्या दिवशी रामने आत्महत्या केलेली नाही. दुसर्‍या दिवशी राम आणि श्यामने आत्महत्या केलेली नाही. ठरवा बुवा - त्यांनी आत्महत्या केली आहे, की केली नाही आहे? बरे असे बघू : "गृहीत धरा की Nव्या दिवशी N पिंगे आत्महत्या करत नाहीत." (तिथून N+१व्या दिवशी N+1 आत्महत्या करतात असा तर्क तुम्ही करू शकता. पण N-नाही वरून N+१-होय अशी सिद्धता होते. इन्डक्शन मध्ये एक तर N-नाही वरून N+१-नाही, किंवा दुसरे तर N-होय वरून N+१-होय, अशी सिद्धता दाखवायला हवी होती.) शिवाय वरचे गृहीत N=1 पिंगा साठी असिद्ध होते. कारण एकच पिंगा असला तर तो आत्महत्या करेलच. मग "आत्महत्या करत नाही" असे कसे म्हणता येईल? असो. पुन्हा विचार करून बघतो... (सेकंड ऑर्डर नॉलेज वगैरे काय प्रकार विकीपेडियामध्ये दिला आहे, त्याबद्दल विचार करतो.) - - - मृत्युदंडाच्या इन्डक्शनमध्ये चूक कुठली ते कळले काय? हीच होती. कैद्याचे इन्डक्शन चूक नसेल, तर बुधवारी एक्झिक्यूशन टीम आली तेव्हा कैद्याला कळले कसे नाही? - - -

ही संपुर्णप्रक्रिया मी पायरी पायरीने देतो त्यामुळे (माझ्या मते) असलेली इंडक्शनची चुक लक्षात येण्यास मदत होईल. मी त्य १००० लोकांपैकी एक आहे असे समजा. उदाहरणा दाखल, मला तीन पिंगे दिसत आहेत. मी कोण हे मला माहित नाही. पहिला दिवस. मी तिन पिंगे पहात आहे. मला माहित आहे की प्रत्येक पिंगा दोन पिंग्याकडे पहात आहे आणि माझ्या बाबत दोन शक्यता आहेत. पहिली शक्यता मी काळा, दुसरी पिंगा. पहिली शक्यता ध्यानात घेउ. आता मला माहित आहे प्रत्येक पिंग्याला हे ज्ञान आहे की दोन पिंगे आहेत. म्हणजे प्रत्येक पिंगा काय विचार करेल? पुन्हा दोन शक्यता. पिंगा विचार करेल की मी काळा आहे, आणि दोघे पिंगे किंवा मी ही पिंगा(म्हणजे तीन) ह्यातली पहिली शक्यता. प्रत्येक पिंगा विचार करेल की (जर मी काळा असेल तर) दोन्ही पिंगे एकमेकांना पाहतील. ते दोघेही दोन शक्यतांचा विचार करतील की मी काळा किंवा पिंगा. मी जर काळा असेन तर समोरचा पिंगा इतर सर्व काळे पाहुन पुढे येईल. पण हे होणार नाही. म्हणजे पहिल्याच दिवशी तिघांपैकी प्रत्येक पिंग्याची अपेक्षा असेल की इतर दोघांनाही आता कळले आहे की दोन पिंगे खात्रीने आहेत. हे ज्ञान झाल्यावर, (तीन पैकी प्रत्येक पिंगा विचार करेल) मी जर काळा असेन तर दोघांनाही एव्हाना कळले आहे की ते दोघेच पिंगे आहेत. पण तरीही ते पुढे आले नाहीत तर अर्थातच मी सुद्धा पिंगा आहे! म्हणजेच तीनही पिंग्यांना पहिल्याच दिवशी ज्ञान झाले की मी ही पिंगा आहे, आणि दोन पिंगे मी पाहु शकत आहे. आता माझी अपेक्षा असेल की मी जर काळा असेन तर ह्या तिघाही पिंग्यांना एव्हाना कळले आहे की ते तिघेच पिंगे आहेत. हे जर खरे असेल तर ते तिघे लगेच समोर आत्महत्येकरता समोर येतील. ते जर आले नाहीत तर मी विचार करेन की माझा विचार चुकीचा आहे. ..... ह्या प्रकारे निवाडा पहिल्याच दिवशी व्हायला हवा. (जर हे लोक एकमेकांसमोर आत्महत्येच्या वेळीच प्रथमच आले, आणि एक सेकंदाची ती वेळ टळुन गेल्यावर पुन्हा पुढची वेळ उद्याच येणार असेल तर तुमचे १०० दिवसांचे इंडक्शन बरोबर येईल.)

In reply to by Nile

मी आहे I(काळी) मला P1 , P२, P३ पिंगे दिसत आहेत. P1 ला वाटत आहे तो आहे काळा आता जाऊ या P1 च्या जगात. P1 ला माहीत आहे P२ त्याच्या स्वतःच्या डोळ्याचा रंग पाहू शकत नाही. P1 ला दिसतो आहे P२ पिंगा P३ ने P1 आणि P२ ला पाहीलं आहे आणि म्हणून तो पुढे येत नाही. त्यामुळे P1 ला कळतं की अ‍ॅकॉर्डींग टू P३, २ पिंगे आहेत. मग उरला कोण तो स्वतः अशा रीतीने P२ आणि P३ ला देखील कळतं की ते पिंगे आहेत ........................ पहील्याच दिवशी. ________________________________________________ द थिअरम फेल्स!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

नाईल, हे कसं वाटतय बघा - (१) एकूण ४ जणं आहेत. (२) मी I (काळी) आहे. (३) p1, p2, p3 हे पिंगे आहेत. (४) p1 समजतोय तो काळा आहे. (५)p1 ला दिसतय p2, p3 पिंगे आहेत. (६) p2 पहील्या दिवशी दुपारी बाहेर येत नाही = कोणीतरी कमीत कमी एक जण अजून पिंगा आहे. (एवढाच अर्थ निघतो. डोंट रीड बिटवीन द लाइन्स) p1 साळसूदपणे समज करतो की तो पिंगा p3 आहे. (स्वतःला p१ संशयाचा फायदा देतो) (७)दुसर्‍या दिवशी दुपारी परत p२ बाहेर निघत नाही आणि p3 देखील बाहेर पडत नाही याचा अर्थ = अजून एक पिंगा आहे = तो स्वतः च म्हणजे p१ (३) तीसर्‍या दिवशी तीघे फासावर लटकतात.

In reply to by शुचि

शुचि, मला वाटतं हे २ किंवा ३ पिंगे एवढंच ग्रूहीत धरल्यामुळे घोळ होतोय. मी सरळ १०० पिंगट आणि ९०० काळे यांचंच उदाहरण घेतो. समजा, मी पिगट डोळ्यांचा आहे. आणि मी ते भाषण ऐकलं, तर मी म्हणेन, हो आता इथे तर ९९ पिंगट डोळ्यांच्या व्यक्ती आहेत. त्यातल्या कोणत्याही एकाला उद्देशून तो पाहुणा ते वाक्य बोलला असेल. आणि हाच विचार प्रत्येक पिंगट डोळ्यांचा माणुस म्हणेल. 'मी तर पिंगट डोळ्यांचा नाही ना?' ही शंका कुणाच्याही मनात येण्याचं कारणच नाही. आणि एवढं गणित मांडण्याचं देखील कारण नाही. ती शंका तेव्हा आली असती जेव्हा त्यांने म्हटलं असतं की अशा १०० व्यक्ती पाहून आश्चर्य वाटलं वगैरे. कारण ह्या केस मध्ये पहिल्याच दिवशी बेनिफीट ओफ डाऊट देऊन तो मॅटरच संपेल.

In reply to by शुचि

शुची जी मला हे पटत नाहिये .. का नाहि पटत दे देतो आहे . .आनि खाली माझे कालचे उत्तर ही देतो आहे , संधर्भ असावा म्हणुन येथे p1,p2,p3 अवैजी मी आपली नावे घेतो .. म्हणजे जरा रीअल टच होइल .. यावर तुम्ही मला हे बरोबर आहे की चुक हे पण सांगा (चुक असो वा बरोबर, विचार करताना मजा येते आहे ) -- समजा मी गणेशा , शुची आणि निले अशी ३ माणसे पिंगे डोळे असणारे आहेत आणि एकुन १० माणसांपैकी असे गृहीत धरु या. १. परदेशी माणसाच्या त्या वाक्यामुळे सगळी १० माणसे विचलीत होतात ... काळी पण आणि पिंगी पण २. मला माहित आहे ( गणेशाला) की शुची आणि निले , पिंगे डोळे असणारे आहेत ३. त्याचवेळी शुची आणि निले ला पण इतर दोघे पिंगे डोळे असणारे वाटत आहेत. ४. त्याचवेळी इतर ७ जणांना गणेशा, शुची आण निले अशी ३ माणसे पिंगे डोळे असणारे आहेत हे माहित असते. ५. मात्र कोणालाच स्वताच्या डोळ्याचा रंग माहित नाहिये. काळ्या डोळ्याच्या व्यक्तीला पण माहित नाही. ६. मग मी (गणेशा), शुची आणि निले हे पुढे येण्याची वाट पाहत असणार .. तसेच इतर ७ जण आम्ही ३ घे पुढे यण्याची वआट पाहत असणार आणि शुची , गणेशा आणि निले तर निले शुची आणि गणेशा पुढे येण्याची वाट पाहत असणार .. (येथे प्रत्येक व्यक्ती पुढे येण्यासाठी १ -१ दिवस का वाट पाहते हे सांगावे काहीच कळत नाही एका व्यक्ती साठी १ दिवस का वाट पहावी ) ७. गणेशा च्या मनात विचार असतो की शुची पुढे येत नाहि कारण ती निले पुढे येण्याची वाट पहात आहे ( त्याच्या नुसार २ च पिंगे डोळे असणारे आहेत.) आणि निले पुढे येत नाहि कारण तो शुची पुढे येण्याची वाट पाहत आहे. असेच शुची आणि निले पण विचार करत असतात ८. असेच इतर ७ जन पण हे तिघे पुढे असेच येत नसतील म्हणुन थांबले असतील. अआणि त्यांनाही त्यांच्या डोळ्याचा कलर कोठे माहित आहे. माझ्या मते इथपरेंतच उत्तर आहे .. सगअ‍ॅळ वेटींग स्टेट ला असणार आहेत बस्स. ---------------------------- माउ यांनी दिलेल्या २ जणांच्या कन्सिडरेशनेच फक्त उत्तर मिळते २ पेक्षा जास्त जण असले तर ते वेटींग मध्ये जाते .. कसे ते मी समजावुन सांगतो फक्त २ जन घेवुन. १. समजा मी (गणेशा) आणि शुची पिंगे डोळे असणारे आहोत .. निले आणि एकुन ८ जन काळे डोळे असणारे आहेत. २. परदेशी माणसाच्या त्या वाक्यामुळे सगळी १० माणसे विचलीत होतात ... काळी पण आणि पिंगी पण ३. गणेशा ला हे माहित आहे की फक्त शुची पिंगी आहे आणि इतर सगळे काळे डोळे असणारे आहेत. ४. त्याच वेळी शुची ला माहिती आहे फक्त गणेशा पिंगे डोळे असणारा आहे बाकी इतर सगळे काळे डोळे असणारे आहेत. ५. मग गणेशा म्हणतो शुची का पुढे येत नाहिये नक्कीच दुसरे कोणी तरी पिंगे पुढे येण्याची ती वाट पाहत आहे.. पण इतर सगळे तर काळे डोळे असणारे आहेत .. अरे रे .. म्हणजे मी एकटाच असा आहे की माझे डोळे पिंगे आहेत आणि ती माझीच पुढे येण्याची वाट पाहत आहे.. सेम टाईम ला शुची पण हेच विचार करते .. ६. आता दोघांना हे माहिती होते की आपण पिंगे डोळ्याचे आहोत आणि ते दोघे आपण पिंगे डोळ्याचे आहोत हे कळाअले आहे म्हणुन पुढे येतात (ओके कीती वेळ वाट पाहिली दोघांनी यासाठी १ दिवस धरला आहे , कारण एक जण ५ मिनिटात विचार करत असेन आणि दुसरा १० मिनिटात विचार करत असेन त्या पेक्षा एक युनिक टाईम ते विचार करायला घेतात म्हणुन १ दिवस हे प्रमाण धरले आहे असे वाटले येथे उत्तर देताना .. असो ) पण जर दोघां ऐवजी तिघे केले तर वरती दिल्याप्रमाणे वेटींग स्टेटच राहणार कारण त्यांना वाटणार हे आपापसात वेट करत आहे.. असो, तुम्हीच व्यवस्थीत सांगा पुन्हा
माझे कालचे उत्तर १००० जनांमध्ये जर १०० जणांचे डोळे पिंगे असतील तर नियम क्रमांक ४ मध्ये दिलेल्या माहिती प्रमाने ते दुसर्याच्या डोळ्याच्या कलर्स ची पन चर्चा करु शकत नाहित .. म्हणुन जेंव्हा परदेशी जेंव्हा ते स्टेटमेंट करतो तेंव्हा पिंग्या डोळ्याच्यांना हे माहिती आहे की गावात ९९ पिंगे आणि ९०० काळ्या डोळ्याची माणसे आहेत, स्वताच्या डोळ्याच्या रंग त्यांना माहीत नसतो. म्हनुन प्रत्येक पिंग्या डोळ्याच्याला हे माहित असते की इतर लोक ९९ पिंगे आणि ९०० काळे अशे आहेत तर प्रत्येक काळ्या डोळ्याच्याला हे माहित असते की इतर लोक १०० पिंगे आणि ८९९ काळे आहेत ते. म्हणजे १०० पिंगे असणार्यांचा असा ग्रह असतो की मी सोडुन इतर ९९ जण पिंगे आहेत. म्हणुन मग तो ९९ जण पुढे येवुन मरतील असा तर्क करतो .. पण त्याला हे ही माहिती असते की त्या माणसाला कोठे त्याच्या डोळ्याचा रंग माहित आहे, अआणि कोणी दुसर्याच्या डोळ्याची चर्चा पण करु शकत नाहि मग ते पुढे कशे येतील .. आणि आपल्या डोळ्याचा कलर तरी आपल्याला माहित आहे .. तो काळा आहे पिंगा आहे का अजुन कसला आहे काय माहित .. म्हणुन मग ते बाकीच्या ९९ जणांची पुढे येण्याची प्रतिक्षा करतील पण कोणीच पुढे येत नाही तेंव्हा काहीच न बोलता ते पण गप्प असतील .. म्हनजे प्रत्येक पिंग्या डोळ्यावाल्यांची आणि कआळ्या डोळ्यावाल्यांची हीच स्थीती असेन .. आपण आता पिंगे डोळ्यांचेच कन्सिडर करु. प्रत्येक १०० पिंग्या डोळ्याच्या व्यक्तींना हे माहिती आहे की ९९ व्यक्ती पिंग्या डोळ्याच्या आहेत पन त्या पुढे आल्या नाहित .. प्रत्येक पिंग्या डोळ्याची व्यक्ती इतर ९९ जणांच्या पुढे येण्याची वाट पाहत थांबलेली असते .. म्हणुन प्रत्येक पिंग्या डोळ्याची व्यक्ती ९९ जण पुढे येण्याची तर काळ्या डोळ्याची व्यक्ती १०० जण पुढे येण्याची वाट पाहिन ..

In reply to by गणेशा

वेटींग लिस्ट कशी काय? ६. मग मी (गणेशा), शुची आणि निले हे पुढे येण्याची वाट पाहत असणार .. तसेच इतर ७ जण आम्ही ३ घे पुढे यण्याची वआट पाहत असणार आणि शुची , गणेशा आणि निले तर निले शुची आणि गणेशा पुढे येण्याची वाट पाहत असणार .. इथे तुम्ही एक गोष्ट विचार नाही घेतली. मला इतर सर्वांचे डोळ्याचे रंग दिसत आहेत. म्हणजे ज्यांचे डोळे पिंगे नाहीत ते पण मला माहित आहेत. त्यामुळे समजा पहिले दोन दिवस शुचि आणि निले पुढे नाही आले..म्हणजेच आणखी एक व्यक्ती पिंग्या डोळ्याची आहे..आणि ती व्यक्ती म्हणजेच मीच..हाच विचार शुचि आणि निले पण करणार कारण त्यांचे लॉजिकर थिंकिंग पण माझ्यासारखेच चांगले आहे. यामुळेच तिसर्‍या दिवशी मी, शुचि आणि निले तिघेही पुढे येणार... हेच ४,५,६....न लोकांच्या बाबतीत घडेल..

In reply to by योगी९००

प्रथमता धन्यवाद .. बाकी सर्व म्हणत आहेत त्यामुळे असेच बरोबर असेल्ही पण मला तरीही शंका आहे.. बोलतो .. ---- >> त्यामुळे समजा पहिले दोन दिवस शुचि आणि निले पुढे नाही आले..म्हणजेच आणखी एक व्यक्ती पिंग्या डोळ्याची आहे हे असे ही असेल ना की शुचि आणि निले पुढे नाही आले तर मला वाटेल की ते दोघे एकमेकांसाठी वाट पाहत आहे. म्हनुन मी ही काहीच हालचाल नाहि करणार . तसेच निले आणि शुची करेन. म्हाणुन वेटींग मधेय असतील सगळे. -- कारण फक्त दोघेच पिंगे डोळ्याचे असताना, एका पिंगे डोळे असणार्या व्यक्तीला हे माहित असते की जर दुसरी व्यक्ती पुढे येत नाहि आणि इतर सगळे काळे डोळ्याचे असतील तर ती वेट करत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे मीच आहे. कारण बाकी सगळे काळ्या डोळ्याचे आहे हे नक्कीच त्याला माहित असते. परंतु वरील उदाहरणात सांगितल्या प्रमाणे हे नक्की होत नाही की हे लोक पुढे येत नाहियेत त्या अर्थी ते माझ्या पुढे येण्याची वाट पाहत आहेत ते . कारण त्या उदाहरणात असे वाटते .. की शुची पुढे येत नाही कारण निले पिंग्या डोळ्याचा आहे त्यामुळे ती त्याची वाट पाहते आहे, आणि निले येत नाहि कारण तो शुचीची वाट पाहत आहे, येथे मी पिंग्या डोळ्याचा आहे व हे दोघे माझी वाट पाहत आहे हे कसे काय कळते आहे ?

In reply to by गणेशा

धन्यवादाबद्दल आभार.. सर्वजण येथे लॉजिकली विचार करत आहेत. आणि सर्वांचे लॉजिक चांगले आहे. त्यामुळे "ते एकमेकांची लॉजिकली पुढे येण्याची वाट पहात आहेत" असे समजावे... हे असे ही असेल ना की शुचि आणि निले पुढे नाही आले तर मला वाटेल की ते दोघे एकमेकांसाठी वाट पाहत आहे. येथे एकमेकांची वाट पहात आहेत हे कोठल्या अर्थाने? जर इमोशनली विचार केला तर कोणीच मरायला पुढे येणार नाही. समजा माझे डोळे काळे असते..तर शुचि आणि निलेला फक्त एकच व्यक्ती पिंग्या डोळ्याची दिसणार..त्यामुळे जर पहिल्या दिवशी कोणीच पुढे नाही आले तर त्या दोघांनाही कळणार की अजून एक व्यक्ती पिंग्या डोळ्याची आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ते स्वतः.. ह्याच प्रमाणे जर माझे डोळे पिंगे आहेत तर मी विचार करणार की "च्यायला दोन दिवस मला समोर दोन पिंग्या दिसत असून त्या दोन व्यक्ती पुढे येत नाही आहेत..म्हणजेच आणखी एकजण आहे पिंग्या डोळ्याचे..आणि ते म्हणजेच मी स्वतः..चला मरूया आता..!!!"

In reply to by योगी९००

"च्यायला दोन दिवस मला समोर दोन पिंग्या दिसत असून त्या दोन व्यक्ती पुढे येत नाही आहेत..म्हणजेच आणखी एकजण आहे पिंग्या डोळ्याचे..आणि ते म्हणजेच मी स्वतः..चला मरूया आता..!!!" हे आवडले आणि "चला मरुया आता .. !! हे वाचुन मस्त हसु आले .. धन्यवाद. कदाचीत मला १०० % तुमचे म्हणने नाहि पटत आहे तरी माझीच चुक होत आहे काहितरी असे माणुन थांबतो .. तरीही दोन गोष्टी बोलतो १. (खरे तर येथे १ दिवस टाईम मुळ कोड्यात नाहिये .. आणि तर्काने विचार करता प्रत्येका साठी १ दिवस दिल्यामुळे येथे तुम्ही म्हणता तसे ही उत्तर येवु शकते आहे असे वाटत आहे) पण समजा त्या नागरीकाच्या भाषणा नंतर लगेच सगळे तर्क लावु शकले असते तर मी म्हणतो तेच उत्तर(मी दिलेले) मला बरोबर वाटते आहे. कारण कोण नक्की कोणासाठी थांबले आहे हे कळणारच नाही जे मला म्हणावयाचे होते . येथे एकाला पुढे यायला १ दिवस लागतो ह्याच तर्कामुळे तुम्ही म्हणाल्याला कोड्याच्या उत्तराची शक्यता आहे .. बरोबर .. ? २. तरीही खालील एक गोष्ट मी का लिहिली होती ते सांगतो .. माझ्या मनाच्या सम्जुतीसाठी, >> येथे एकमेकांची वाट पहात आहेत हे कोठल्या अर्थाने ? अहो एकमेकांची वाट पाहणे म्हणजे दोघांना माहिती आहे आपण पिंगे असा अर्थ न घेता . एकाला म्हणजे शुची ला वाटते आहे की निले पिंग्या डोळ्याचा आहे म्हणुन ती त्याची वाट पाहत आहे .. अआणि निले ला वाटत आहे शुची पिंग्या डोळ्याची आहे म्हणुन तो तीच्या पुढे येण्याची वाट पाहत आहे. आणि या तर्कामध्ये मी मात्र कोठल्या डोळ्याचा आहे हे माहीत नसताना ही, जरी ते दोघे पुढे आले नाहीत तर आणखिन एक व्यक्ती पिंग्या डोळ्याची आहे म्हनुन ते थांबले आहेत हा तर्क नक्कीच निघु शकत नाहि .. ते एकमेकांसाठी थांबलेत असाही तर्क होउ शकतो .. असो .. पुढील कोड्याच्या प्रतिक्षेत

जर शहरात १०० पिंगट डोळ्यांचे लोक आहेत तर तो परदेशी काय म्हणतो आहे त्याबद्दल कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. आजुबाजुला जर ९९ / १०० पिंगट डोळ्यांचे लोक असतील तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आणी जर माझ्या स्वतंच्या डोळ्याचा रंग जर मला माहिती नसेल तर तो काळा, पिंगा, निळा, ब्राउन काहीही असु शकतो असे मी गृहीत धरेन. मुद्दलात किती पिंग्या डोळ्याचे लोक आहेत हे मला माहित नाही ना? मग मला ९९ पिंग्या डोळ्याचे लोक दिसत आहेत त्या अर्थी मी धरुन १०० असणार असा तर्क लोक कसे काय लावु शकतील? आणि जर लावु शकत नसतील तर त्यांच्या डोळ्यांचा रंग त्यांना कधीच कळणार नाही (बाकीच्या अटी लक्षात घेता). त्यामुळे कोणालाच काहीच फरक पडणार नाही.

१०० हाबिणंदण! सेंचुरी पार केलेला शुचितैंचा अजुन एक धागा.. ह्यानिमित्ताने तैंना मिपावरची तेंडुलकर हा किताब का देण्यात येऊ नये? :P

In reply to by कानडाऊ योगेशु

भावी तेंडुलकर असे म्हणूया :) किंवा भावी ब्रॅडमन म्हणायलाही हरकत नसावी... अ‍ॅव्हरेजच इतका तगडा आहे!

In reply to by स्वानन्द

...किंवा भावी ब्रॅडमन म्हणायलाही हरकत नसावी...
ब्रॅडवुमन कसे वाटते? (दाढी खाजवणारी स्माईली)

In reply to by कानडाऊ योगेशु

चुकून बॅडवुमन असे वाचले.. (शुचि ह.घ्या.) (दाढी खाजवणारी स्माईली की दाढी खाजवणारा स्माईली ..???) (कोड्याचे उत्तर बरोबर दिल्याने मिशीला तुप लावून मिशीला पिळणारा स्माईली)

नाईल यांनी चपखल तर्क लढवला आहे. हे ओपन कोडे आहे याची मला खात्री पटली आहे. (सध्या तरी ;) ) नाईल यांचे अभिनंदन.

In reply to by शुचि

(आम्ही निलेच म्हणतो आहोत आजुनही माहित नाहि काय बरोबर ते ? असो ) निले यांचे खरेच अभिनंदन .. त्यांनि केलेला रिप्लाय मला सर्वात जास्त आवडला ..आणि बर्याचश्या प्रमाणात पटला. त्यांचा रिप्लाय पाहुन मी जवळ जवळ ३० मिनिटे विचार करत होतो( "ढ" असल्युआने वेळ लागला , वाईट वाटुन घेवु नये ) .. १ दिवस वेट करायचे प्रत्येकासाठी हे त्यानी खुप चपलख पणे सांगितले आहे की एकाच दिवसात कसे होयील हे .. आवडले मनापासुन सलाम .. --- तरीही माणसाचा स्वभाव हा जोपर्यंत दुसर्याचे पुर्ण पणे पटत नाहि तो पर्यंत काही तरी त्रुटी आहेतच असे जे वाटते असे माझे झाले आहे. मी त्या त्रूटी येथे देतो .. निले आणि शुची किंवा खादाड माउ यांनी किंवा कोणी ही याचे प्लीज एकदा निरसन करावे .. त्यांचय उत्तरातील काही भाग असा आहे .. >> अ. म्हणजे पहिल्याच दिवशी तिघांपैकी प्रत्येक पिंग्याची अपेक्षा असेल की इतर दोघांनाही आता कळले आहे की दोन पिंगे खात्रीने आहेत. >> ब. हे ज्ञान झाल्यावर, (तीन पैकी प्रत्येक पिंगा विचार करेल) मी जर काळा असेन तर दोघांनाही एव्हाना कळले आहे की ते दोघेच पिंगे आहेत. पण तरीही ते पुढे आले नाहीत तर अर्थातच मी सुद्धा पिंगा आहे! मला वाटलेल्या त्रूटी १ली त्रुटी : 'अ' मध्ये जेंव्हा निले सांगत आहेत की तीन पिंग्यांपैकी प्रत्येकाला हे नक्की माहिती आहे की दोन पिंगे नक्की आहेत त्यावेळी तीन पैकी इतर २ जण पिंगे पाहुन त्यांचे ते मत आहे, त्या नंतर 'ब' मध्ये जेंव्हा ते म्हणत आहेत की ते जर स्वता काळे असतील तर इतर दोघांना हे कळलेच आहे की ते दोघे पिंगे आहेत , यामधील " ते दोघे" हे चुकीचे आहे , प्रत्येकाला इतर दोघे पिंगे आहेत हे पाहुन खात्री आहे की येथे २ पिंगे खात्रीने आहेत , स्वताला धरुन दोघे पिंगे आहेत हे कोणालाच माहिती नाहिये त्यापैकी .. २ री त्रुटी : त्यांच्या काही लाईन्स >> प्रत्येक पिंगा विचार करेल की (जर मी काळा असेल तर) इतर दोन्ही पिंगे एकमेकांना पाहतील. ते दोघेही दोन >> शक्यतांचा विचार करतील की मी काळा किंवा पिंगा. मी जर काळा असेन तर समोरचा पिंगा इतर सर्व काळे पाहुन पुढे येईल. पण हे होणार नाही. मला येथे असे म्हणायचे आहे की निलेंनी जे हे लिहिले आहे ना प्रत्येक पिंगा विचार करेल की (जर मी काळा असेल तर) तर नंतर राहिलेल्या २ पिंग्यानेच उदाहरण दिले आहे .. २ मध्ये ते का पुढे आले नाहित हे ते बरोबर बोलत आहेत. पण पुन्हा ते लिहित आहेत ना की त्यातील एक पिंगा असा विचार करेन मी जर काळा असेन तर समोरचा पिंगा इतर सर्व काळे पाहुन पुढे येईल हे फक्त २ पिंगे कन्सिडर करुनच होउ शकते हो. आणि याला नंतर आपण का वाढवतो आहे ? मला विचाराय्चे आहे येथे तुम्ही एकाच वेळेस ५ पिंगे आहेत असे धरले तर प्रत्येक पिंग्याला खात्रीने हे माहित होयील की येथे ४ पिंगे आहेत आणि मग मला सांगाल का त्या प्रत्येकाला कसे कळेल की ते स्वता ५ वा पिंगा आहे हे सांगाल का प्लीज . क्रुपया २/३ पिंगे घेवुन सांगु नका ते मला कळले आहे, एकाच वेळेस ५ पिंगे आहेत आणि त्यांना इतर ४ पिंगे दिसत आहेत हे गृहीत धरुन सांगा. आणि एका दिवसात कसे होते हे सांगितले तर माझ्याकडुन एक बक्षिस तुम्हाला हे नक्की . कारण या कोड्यामध्ये १०० जण आहेत आणि ते एकाच वेळेस सगळे पाहत आहे. २/३ च्या गृप मध्ये नाहियेत ते .. त्रूटी ३ : (हि फक्त निलेंसाठी लिहितोय मी) वरच्या दोन्ही तृटी जरा वेळ आपण बाजुला ठेवु या .. आणि ही वाक्ये कन्सिडर करु यात मला हे कळत नाहिये , जर शंभर जण असतील असे गृहीत घरले आणि त्यात फक्त ३ पिंगे गृहीत धरले आणि ९७ काळे आणि हे तीन पिंगे सगळॅ एकत्र आहेत (हे आहेच कोड्यामध्ये) तर यावेळेस निले यांची खाली दिलेली वाक्य पाहिली तर असे लक्षात येइल की वाक्ये : >>हे ज्ञान झाल्यावर, (तीन पैकी प्रत्येक पिंगा विचार करेल) मी जर काळा असेन तर दोघांनाही एव्हाना कळले आहे की ते >> दोघेच पिंगे आहेत. पण तरीही ते पुढे आले नाहीत तर अर्थातच मी सुद्धा पिंगा आहे! येथे जेंव्हा त्या २ पिंग्या ना कळेल आहे की ते पिंगे आहेत तरी ते पुढे आले नाहीत तर तिसरा पिंगा जे म्हणेल (तो स्वताला काळा समजतोय) तेच इतर ९७ जन पण म्हणतील ना ( त्यांना कोठे माहित आहेत ते काळे आहेत) आणी निले या एकाच कारणासाठी बाकीचे ९७ जण तिघांसाठी वेट करत आहेत हे दाखवण्यासाठी येथे १ दिवस प्रत्येक पिंग्या साठी घेतला आहे. नाहितर जेंव्हा २ जण पिंगे असुनही पुढे येत नाही तेंव्हा तिसरा मीच असे म्हणुन एकाच वेळी सगळॅ पुढे येतील ना . (कारण त्या ९७ जणांना त्याच वेळेस वाटत असते की हे तीघे पिंगे पुढे आले नाहित तर चौथा पिंगा मिच आहे .. भले ते चुकीचे का असेना ) आणि जर असे होत असेन तर त्यांचे तर्क करण्याची ताकद परिपुर्ण नाही हे पण सिद्ध होते . एका दिवसा मध्ये माझी ही तिसरी त्रूटी तुम्ही नाही दुर करु शकत निले असे मला मनापासुन वाटते आहे, तरी तुमचय उत्तराच्या प्रतिक्षेत आहे. नक्कीच तुम्ही नीट सांगताल ही खात्री आहे. माझी चुक असली तर शमस्व - गणेशा

In reply to by गणेशा

अ' मध्ये जेंव्हा निले सांगत आहेत की तीन पिंग्यांपैकी प्रत्येकाला हे नक्की माहिती आहे की दोन पिंगे नक्की आहेत त्यावेळी तीन पैकी इतर २ जण पिंगे पाहुन त्यांचे ते मत आहे, त्या नंतर 'ब' मध्ये जेंव्हा ते म्हणत आहेत की ते जर स्वता काळे असतील तर इतर दोघांना हे कळलेच आहे की ते दोघे पिंगे आहेत , यामधील " ते दोघे" हे चुकीचे आहे , प्रत्येकाला इतर दोघे पिंगे आहेत हे पाहुन खात्री आहे की येथे २ पिंगे खात्रीने आहेत , स्वताला धरुन दोघे पिंगे आहेत हे कोणालाच माहिती नाहिये त्यापैकी ..
ही त्रुटी नाही हे मी प्रतिसादात स्पष्ट केलेच आहे. रिव्हर्स इंजिनीअरींग ने विचार करा. तिन पैकी प्रत्येक पिंगा दोन पिंगे पहात आहे. तो विचार करेल. "दोन्ही पिंगे (मी जर काळा असेन तर) एक-एक पिंगा पहात आहेत. ते (इतर दोघे पिंगे) विचार करतील की जर मी काळा असेन तर ह्या तिसर्‍या पिंग्यांला माहिती होईल की तो एकटाच(कारण तो इतर सर्व लोकांना पाहु शकतो) पिंगा आहे आणि तो पुढे येईल, असे जर झाले नाही तर अर्थातच मीही पिंगा आहे". हा विचार तिघेही पिंगे करतील. (थोडक्यात, कोणीही एकटा पिंगा असता तर तो पुढे आला असता, तसे झाले नाही, म्हणजे इतर दोन पिंगे पाहु शकणार्‍यांना हे पटले की त्या दोघांनांही(आपण स्वतः एक असे धरुन) दोन पिंगे आहेत हे ज्ञान झाले आहे.
मला विचाराय्चे आहे येथे तुम्ही एकाच वेळेस ५ पिंगे आहेत असे धरले तर प्रत्येक पिंग्याला खात्रीने हे माहित होयील की येथे ४ पिंगे आहेत आणि मग मला सांगाल का त्या प्रत्येकाला कसे कळेल की ते स्वता ५ वा पिंगा आहे हे सांगाल का प्लीज .
आकडा महत्त्वाचा नाही, हे ही तीनच्या उदाहरणाप्रमाणेच आहे, फक्त विचाराच्या दोन पायर्‍या वाढतील.पाच पिंग्यांचे उदाहरण थोडक्यात सांगतो. पहिली पायरी. प्रत्येक पिंगा ४ पिंगे पाहतो. (आपण काळे आहोत असे विचार करुन तो विचार करेल) ते चारही पिंगे ३ पिंगे पाहु शकतात. म्हणजे ते चौघेही पिंगे असा विचार करतील, (मी जर काळा असेन) तर ह्या तिन पिंग्यांपैकी प्रत्येक पिंगा दोन पिंगे पाहु शकेल. म्हणुन हे तिघेही पिंगे असा विचार करतील की (मी जर काळा असेन) तर ह्या दोघांपैकी प्रत्येक पिंग्याला दोनच पिंगे आहेत हे ज्ञान होईल. (हे वरील प्रमाणे) आणि दोघे पुढे येतील. जर नाही आले, तर तीन पिंगे आहेत.... ते पुढे येतील... नाही आले तर चार पिंगे असायला हवेत.. ते पुढे येतील... नाही आले तर ५ पिंगे हवेत. असा विचार हे पाचही पिंगे करतील आणि पुढे येतील. कारण हे पाचही पिंगे फक्त ४ पिंगे पाहु शकतात, त्यामुळे, स्वतः पिंगे असलो तरी सहा पिंगे(किंवा स्वतः सोडुन इतर कोणता पाचवा पिंगा) असण्याची कोणतीच शक्यता नाही हे ज्ञान त्यांना आहे.
येथे जेंव्हा त्या २ पिंग्या ना कळेल आहे की ते पिंगे आहेत तरी ते पुढे आले नाहीत तर तिसरा पिंगा जे म्हणेल (तो स्वताला काळा समजतोय) तेच इतर ९७ जन पण म्हणतील ना ( त्यांना कोठे माहित आहेत ते काळे आहेत)
ह्या प्रश्नाचे निराकरण वरती कोठेतरी झाले होते. तीन पिंगे जर असतील तर एखादा काळा हा विचार तिन पिंगे पुढे येइतो करणार नाही. कारण प्रत्येक काळा ३ पिंगे पाहु शकतो, मात्र प्रत्येक पिंगा २च पिंगे पाहु शकतो. म्हणुन ही शंका काळ्याच्या डोक्यात तीनही पिंगे पुढे जाईतो येणार नाही. आणि ३ही पिंगे इतर सर्व काळे आहे आणि आपण तिघेच पिंगे आहोत हे ज्ञान झाल्यावर पुढे जातीलच. थोडक्यात, काळी व्यक्ती आणि पिंगी व्यक्ती यांच्या विचारात एक पायरीचा फरक आहे. आधली पायरी (पिंग्यांनी पुढे येणे पुर्ण झाल्याशिवाय काळा कुठल्याही तर्कावर येउ शकत नाही.) आशा आहे तुमच्या शंका मला समजल्या आहेत आणी त्यांचे निराकरण मी केले आहे. अवांतरः माझे नाव नाईल आहे, पण मला निले, निळे, निळ्या, निळोबा वगैरे काहीही म्हणले तरी चालेल. :-)

In reply to by Nile

नाईल जी मनपुरर्वक आभार ... पहिली पायरी. प्रत्येक पिंगा ४ पिंगे पाहतो. (आपण काळे आहोत असे विचार करुन तो विचार करेल) ते चारही पिंगे ३ पिंगे पाहु शकतात. म्हणजे ते चौघेही पिंगे असा विचार करतील, (मी जर काळा असेन) तर ह्या तिन पिंग्यांपैकी प्रत्येक पिंगा दोन पिंगे पाहु शकेल. म्हणुन हे तिघेही पिंगे असा विचार करतील की (मी जर काळा असेन) तर ह्या दोघांपैकी प्रत्येक पिंग्याला दोनच पिंगे आहेत हे ज्ञान होईल. (हे वरील प्रमाणे) आपण दिलेला वरचा खुलासा अप्रतिम आहे .. मान गये आणि बक्षीस तुम्हाला दिलेच पाहिजे हे पटले .. ----------- माह्या चुका : चुक १. मी जे म्हणत होतो की ५ पिंगे असतील तर प्रत्येक पिंग्याला ४ पिंगे दिसतील आणि प्रत्येकाला हे माहित नाही स्वताच्या डोळ्याचा रंग काय आहे त्यामुळे त्यांना वाटेल ह्यां चौघांना पण हेच वाटत असेल की स्वताच्या डोळ्याचा रंग माहित नसल्याने ते पण त्यांना जे पिंगे डोळ्याचे दिसत आहे ते पुढे येण्याची वाट पाहतील , प्रत्येक जण असाच एकमेकांची वाट पाहिन .. माझी चुक अशी होती की प्रत्येक ५ पिंग्याला जर कळाले ४ पिंगे आहेत तर ते ४ पिंगे स्वताला काळे समजुन काय विचार करतील की राहिलेले ३ पिंगे आहेत , ते जर स्वताला काळे समजुन काय विचार करतील ..... असा विचार मी नक्कीच केला नाही त्यामुळे मी माझेच उत्तर बरोबर माणत होतो. तुमचे आभार, मला हे फक्त आत्ता उलगडले आहे तरी छान वाटते आहे , तुम्ही सोडवल्याने तुमचा आनंद काय असेल ते मी समजतो . चुक २ : काळ्या आणि पिंग्या लोकांमध्ये एक पायरी कमी आहे हे माहित आहे मला, म्हनुनच येथे दिवसांवरुन ठरवले आहे त्यामुळे ५ व्या दिवशी पाचही काळे पुढे येतील.. तुम्ही म्हणता ते पटले आहे येथे ही तरीही एक शंका आहे .. जर सगळे पिंगे एकाच दिवशी एकाच वेळेस पुढे येतात की प्रत्येक पिंगा एकाच दिवशी एकापाठोपाठ पुढे येतात .. माझ्या मते सगळे जण एकाच वेळेस पुढे येतात .. मग असे असेल तेंव्हा ५ पिंगे जसे विचार करतील तसेच काळे पण विचार करत असतील ना. मला जरा वेळ असल्यास स्टेप ने ते पुद्।ए कशे येतील आणि त्यावेळेस २ काळे घेवुन ते काय विचार करतील ते ही हवे आहे, वेळ असल्यास पण .. माजेहे शंका माझ्या मते बरोबर आहे, पण तुम्ही त्याला उत्तर देवु शकता ही खात्री आहे म्हणु८न बोललो . असो आपले मनपुर्वक आभार - गणेशा

In reply to by गणेशा

विचार करायची पायरी. प्रत्येक पायरीला विचार करायला किती वेळ लागतो ते अलाहिदा. म्हणुन एक अधिक पायरी काळ्यांकरता असेल.

"मित्रांनो माझ्यासारखी पिंग्या डोळ्याची व्यक्ती तुमच्या गावात पाहून मला खूप आश्चर्य वाटलं" या वाक्यात खेडुतांना नवी असलेली कोणतीही नवी माहिती नाही. सबब ते आजपर्यंत ज्या गृहितकावर जगत आले -की - 'गंगापूरमध्ये 'क्ष' पिंगट डोळ्यांची माणसे आहेत आणि 'य' काळ्या डोळ्यांची माणसे आहेत. माझ्या डोळ्यांचा रंग काळा, पिंगट अथवा इतर कोणताही असू शकतो.' - त्या गृहितकात बदल होण्याची कोणतीही शक्यता नाही. तेव्हा त्यांच्या आयुष्यात कोणताही फरक पडणार नाही. पण जर ते वाक्य असे असते की - "मित्रांनो, तुमच्या गावात केवळ पिंगट किंवा काळे डोळे असलेल्याच व्यक्ती आहेत हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं" - तर त्याच क्षणी आपण संपलो ही जाणीव प्रत्येकाला झाली असती. इंडक्शनने आपल्याला १०१ व्या दिवशी किंवा १०२ व्या दिवशी आत्महत्या करावी लागणार हे कळले असते. शिवाय मूळ कोड्यात 'देहदंड दिला जातो' पेक्षा ते 'स्वेच्छेने आत्महत्या करतात' असा बदल जास्त सुस्पष्ट वाटतो.

In reply to by विसुनाना

लॉजिक या विषयामधे "कॉमन नॉलेज" नावाची जी कन्सेप्ट आहे ती इथे लागू आहे असे वाटते. एखादी गोष्ट "सर्वांना माहीत असणे" आणि "ती गोष्ट सर्वांना माहीत आहे हे सर्वांना माहीत होणे" या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तेच इथे झालंय. परदेसी बाबूने नवीन माहिती दिलेली नाहीच मुळी. पण सर्वांना एकत्र दिली आणि त्यामुळे फरक पडला. "राजा नागडा आहे" सारखे. अधिक स्पष्ट करता येत नाहीये. पण हे असं आहे.

In reply to by गवि

तर्काने जे काही कळू शकते, ते या लोकांना ताबडतोब कळून येते.
-हे वाक्य महत्त्वाचे आहे. असे असल्याने तेथे एकूण १००० लोक आहेत, ९९+९०० / १००+८९९ पिंगट आणि काळे (डोळ्यांचे)लोक आहेत आणि उरलेला 'मी' कोणत्याही रंगाचे डोळे असणारा असू शकतो या गोष्टी तेथील प्रत्येकाला 'ताबडतोब' आणि 'आपोआप' तर्काने कळलेल्या आहेत. त्यामुळे ते सार्वत्रिक ज्ञान आहेच. (विकीवरील कॉमन नॉलेजचे आर्टिकल वाचले.तरीही - असो.)

In reply to by विसुनाना

कॉमन नॉलेज असे विकी आर्टिकल शोधू पाहता जनरल नॉलेज (सामान्य ज्ञान) अशा अर्थाचे आर्टिकल हाती येत आहे. ते काहीतरी वेगळेच दिसते या विषयापेक्षा. तुम्ही म्हणताय तो वेरियंट आहे का आर्टिकलचा? काय टायटल आहे? एक्च्युअली तर्काने जे काही कळू शकते, ते या लोकांना ताबडतोब कळून येते. वाला तुमचा मुद्दाही बिनतोड आहे. मला हे कोडं खूपच कन्फ्यूज करतंय. कोणीतरी उत्तर सांगूनही डोक्यात गोंधळ वाढतोय.

In reply to by विसुनाना

असे असल्याने तेथे एकूण १००० लोक आहेत, ९९+९०० / १००+८९९ पिंगट आणि काळे (डोळ्यांचे)लोक आहेत आणि उरलेला 'मी' कोणत्याही रंगाचे डोळे असणारा असू शकतो विसुनाना : शुचि जी नीं नंतर २-३ रिप्लाय नंतर हे सांगितले आहे की तेथील लोकांना १००+९०० असे समिकरण माहित नाहिये.. ते चुकुन द्यायचे राहिले आहे असो

In reply to by विसुनाना

कोणतीही नवी माहिती नाही.
विसुनानांशी सहमत आहे, असेच काहीसे उत्तर सुरुवातीला मी दिले होते, पण हे ट्रीव्हिअल उत्तर झाले. (अर्थात, एकच पिंगा असता तर हे ट्रिव्हिअल नाही)