कोडे
एक प्रसिद्ध कोडं घालते आहे. आपल्यापैकी बर्याच जणांना ते माहीत असण्याचीच शक्यता जास्त आहे. पण ज्यांना माहीत नाही त्यांनी ,याचे उत्तर जालावर शोधण्याआधी कृपया प्रामाणिक प्रयत्न करावा. कोडे सहज सापडू नये म्हणून थोडे अनुवादित केले आहे.
(१) एक गाव असतं त्याला म्हणू यात गंगापूर. गंगापूरमध्ये १००० खेडूत रहात असतात.
(२) या खेडूतांमध्ये १०० जणांच्या डोळ्यांचा रंग पिंगा असतो तर ९०० जणांच्या डोळ्यांचा रंग असतो काळा.
(३) एका धार्मिक प्रथेनुसार या लोकांना स्वतःच्या डोळ्याचा रंग जाणून घेता येत नाही.
(४) हे लोक कोणत्याही प्रतिबिंब दाखविणार्या वस्तूमध्ये आपले रूप पाहू शकत नाहीत किंवा स्वतःच्या अथवा अन्य कोणाच्या डोळ्याच्या रंगाबद्दल चर्चा करू शकत नाहीत.
(५) जर एखाद्याला त्याच्या स्वतःच्या डोळ्यांचा रंग कळलाच तर त्याला दुसर्या दिवशी दुपारी , सर्वांसमक्ष मृत्यूदंड ठोठविण्यात येतो.
(६) गंगापूरमधील सर्व लोकांची तर्काची बाजू विलक्षण भक्कम आहे.***
*** तर्काने जे काही कळू शकते, ते या लोकांना ताबडतोब कळून येते.
(७)सर्व लोक एकदुसर्याला पाहू शकतात, एकमेकांची संख्या मोजू शकतात.
(८) एकदा एक परदेशी या गावात येतो आणि या जमातीचा संपूर्ण विश्वास प्राप्त करतो.
(९) त्याचे खूप आदरातिथ्य होते आणि या आदरतिथ्याच्या आभाराप्रीत्यर्थ तो एक भाषण एका संध्याकाळी देतो.
(१०) या भाषणात तो चुकून बोलून जातो की "मित्रांनो माझ्यासारखी पिंग्या डोळ्याची व्यक्ती तुमच्या गावात पाहून मला खूप आश्चर्य वाटलं"
(११) आता हे विषद करा त्याच्या या किरकोळ चूकीचा त्या जमातीवर काय परीणाम होईल?
प्रतिक्रिया
धन्यवादाबद्दल आभार..
"च्यायला दोन दिवस मला समोर
जर शहरात १०० पिंगट डोळ्यांचे
१०० हाबिणंदण! सेंचुरी पार
भावी तेंडुलकर असे म्हणूया
...किंवा भावी ब्रॅडमन
हॅ हॅ
नाईल - चपखल तर्क
(आम्ही निलेच म्हणतो आहोत
अ' मध्ये जेंव्हा निले सांगत
माझ्या चुका ---
विचार करायची पायरी. प्रत्येक
कोणतीही नवी माहिती नाही.
लॉजिक या विषयामधे "कॉमन
ती गोष्ट सर्वांना माहीत आहे हे सर्वांना माहीत होणे
कॉमन नॉलेज असे विकी आर्टिकल
असे असल्याने तेथे एकूण १०००
पुन्हा एकदा
कोणतीही नवी माहिती
Pagination