दिवाळी अंक २०२२ - वळसा - The Detour
'माधोपूर २१० कि.मी. ’ हा फलक वाचताच मीरा वैतागलीच. घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे आधीच काही तास वाहतूक खोळंबा झाला होता. नंतर दुसऱ्याच कुठल्यातरी आतील मार्गाने ती लांबलचक वाहनांची रांग वळवण्यात आली आणि अतिशय मंद गतीने सरकत सरकत अखेर ती पुन्हा हायवेला लागली होती. या सर्व प्रकारांत संध्याकाळ व्हायला आलेली… नेहमीप्रमाणे...
मिसळपाव