Skip to main content

दिवाळी अंक २०२२ - दोन दिलाचं एक पान

लेखक अशोक चौधरी यांनी शनिवार, 05/11/2022 23:00 या दिवशी प्रकाशित केले.

दोन दिलाचं एक पान काळेभोर रेशमी बाल खळीचे तुझे गोरे गाल दिल कलिजा होतो खलास पाहून तुझी गव्हाळ काया बोल तुझे मंजूळ गाणी तू नसतानाही येतात कानी भेटावे तू गं येते मनी व्हावे तू गं माझीच राणी भेटल्यावर बोलत नाही अशी माझी अबोल वाणी अंगकाठी तुझी अशी शेलाटी गालावरती तुझ्या शोभते कल्प केसांची ती वेलांटी तारुण्याचं तू हिरवं...

दिवाळी अंक २०२२ - पाऊस

लेखक प्रशांत यांनी शनिवार, 05/11/2022 22:58 या दिवशी प्रकाशित केले.

कुठून आणू रोज पाऊस? कुठून आणू आभाळ उसनं? खूप जीवघेणं आहे हे मी भिजताना तू सोबत नसणं. भरलेल्या डोळ्यांसमोर आभाळ असं काही बरसतं.. मी वाहून जाते संपूर्ण, मग कुठे ओसरतं... कसं जमतं तुला असं थेंबासारखं तुटन... मला असं भिजवून स्वतः कोरडं राहणं.... अलीकडे येतात ढग आठवणींचे पण मी मात्र जाणूनबुजून बंद करते खिडक्या-दारं आतून......

दिवाळी अंक २०२२ - आला पुन्हा हा पाऊस

लेखक श्याम माळी यांनी शनिवार, 05/11/2022 22:53 या दिवशी प्रकाशित केले.

आला पुन्हा हा पाऊस गंध मातीचा घेऊन ओल्या पावसाच्या सरी गाती मल्हाराची धून सात सुरांवर स्वार आला थेंबाचा कुमार भूल पडली कळीला झाली लाजून ती चूर फुले आसमंत सारा गोड सरींत न्हाऊन ओल्या पावसाच्या सरी गाती मल्हाराची धून बहकले हे आभाळ काळे मेघ ते झिंगले तुडुंबले नदी-नाले नाते आभाळी जुळले हिरव्याशा सावलीला गाली हसले हे ऊन...

दिवाळी अंक २०२२ - करण डिटेक्टिव्ह एजन्सी

लेखक सरिता बांदेकर यांनी शनिवार, 05/11/2022 22:46 या दिवशी प्रकाशित केले.

स्टेफीला आज ऑफिसला पोहोचायला जरा उशीरच झाला. मुंबईतला पाऊस आणि लोकल ट्रेन हे नातं म्हणजे एक अजब रसायन होतं. लोकल ट्रेनला पाऊस अजिबात आवडत नाही. जरा जास्त पाऊस पडला की लगेच रुसून बसते. मग ट्रेनने जाणाऱ्या लोकांची मात्र पंचाईत होते. आज पाऊस तसा कमीच होता पण ट्रेन बाईंचा मूड पावसानं बिघडवला होता. त्यामुळे स्टेफीचा मूड...

दिवाळी अंक २०२२ - अनुत्तरित

लेखक उमेश तुपे यांनी शनिवार, 05/11/2022 22:31 या दिवशी प्रकाशित केले.

एकमेकांशी स्पर्धा करत आकाशाला स्पर्श करू पाहणाऱ्या उंचच उंच झाडांवर त्याची नजर गेली आणि एका विलक्षण समाधानाने त्याने पश्चिमेस पसरलेल्या मावळतीच्या लालसर रंगाकडे वळून पाहिलं. गेल्या कित्येक दिवसांच्या प्रवासात आज पहिल्यांदाच सपाट मैदानापेक्षा काहीतरी वेगळं त्याच्या नजरेस पडलं होतं. या सुखद धक्क्याने त्याची आशा पल्लवित...

दिवाळी अंक २०२२ - चांदभूल

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 05/11/2022 22:23 या दिवशी प्रकाशित केले.

वडिलांना रात्रीच्या गोळ्या देऊन तो कामावर निघाला. वर्षाला सोडून गावी आल्यानंतर दिवस थोडे कठीण गेले होते. आपण वर्षाला समजाविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ती ऐकायलाच तयार नव्हती, म्हणून नाइलाजाने परिस्थिती स्वीकारली. एक एक दिवस जाता जात नाहीये असे वाटत होते. पण काळ त्याच्या वेगाने जात राहिला. बाबा पाय घसरून पडल्यानंतर...

दिवाळी अंक २०२२ - मुघल-ए-आझम - एक रंगलेला किस्सा

लेखक मिडास यांनी शनिवार, 05/11/2022 22:19 या दिवशी प्रकाशित केले.

जर तुमचे जुन्या पिढीबरोबर कधी मतभेद होत नसतील, तर नव्या पिढीत जन्म घेऊन काही उपयोग नाही. दिवाळी हा रांगोळीच्या रंगाचा, उटण्याचा सुगंधाचा आणि फटाक्यांच्या रोशणाईचा सण. मुघल-ए-आझम हा चित्रपट पडद्यावर प्रत्येक क्षणी दिवाळी साजरी करतो. भव्य चित्र चौकटी , रंगीबेरंगी वेशभूषा, अतिमधुर संगीत, शैलीबाज अभिनय आणि पल्लेदार संवाद...

दिवाळी अंक २०२२ - द्वाही

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 05/11/2022 22:12 या दिवशी प्रकाशित केले.

"वाचूनही कविता नच कळली असे न माझे व्हावे कोश कोणते यास्तव घरी मी आणुनी ठेवावे?" विचारले ऐसे मी कविला - हसुनी खिन्न तो वदला, "कविता माझी आजवरी का कळली कोणाला?" "शब्दांची आतशबाजी अन् मोडजोड मी करितो - जरा रेटुनी अर्थ त्यातूनी शोधावा तो मिळतो. जे जे अमूर्त, जटिल, अकल्पित ते ते मजला गमते दुर्बोधाच्या गर्द सावलीत कविता...

दिवाळी अंक २०२२ - रीकर्सिव्ह लूप

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 05/11/2022 22:11 या दिवशी प्रकाशित केले.

एखादी गोष्ट प्रकाशाच्या वेगाने गेली तर तिचा वेग सांगता येईल. पण जर ती त्यापेक्षा अधिक वेगाने गेली, तर? प्रश्न नक्कीच कोड्यात टाकणारा आहे.. म्हणजे बघा, आपण वेग मोजताना ती अ बिंदूपासून ब बिंदूपर्यंत पोहोचली हे आपल्याला दिसतं. त्यासाठी लागलेल्या वेळावरून आपण वेग मोजतो. प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचायला लागलेला वेळ,...

दिवाळी अंक २०२२ - विष्णू, मारुती, जोगेश्वरी इ.

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 05/11/2022 20:39 या दिवशी प्रकाशित केले.

'पुणे तेथे काय उणे' असा एक वाक्प्रचार आहे. हे अर्थातच अनेक क्षेत्रांत सिद्ध झाले आहे. यातील एक क्षेत्र फारसे चर्चेत नाही, ते म्हणजे पुण्यातील विनोदी किंवा काहीशी विचित्र नावे असलेली अनेक लहान-मोठी मंदिरे. मंदिराला मिळालेल्या अशा नावांमागे इतिहास, स्थानिक परंपरा, काही रूढी अशा गोष्टी आहेत. यातील अनेक मंदिरे आता...