अटक मटक, सारण चटक!
अटक मटक, सारण चटक!
दोस्तहो, दिवाळीतलं गोग्गोड खाताना मध्येच काही चटकदार हवं असं वाटतंय ना? मग आता मी देतेय दोन पाककृती. आता दिवाळी म्हटलं की कॅलरी, व्यायाम, वजन असले शब्द ऐकले की पापच लागणार बरं का. त्यामुळे या पाककृती दिवाळी पेश्शल आहेत. (म्हणजे थोडक्यात तळलेल्या आहेत) नाहीतरी सध्या तेला-तुपाच्या कढया असतीलच ओट्यावर. तर पहा करून. एक आहे चीझी मिरची वडा आणि दुसरी चीझी मॅट/लहरिया सामोसा. यात पाककृती दोन असल्या, तरीही मी सारण मात्र एकच वापरलं आहे.
मिसळपाव