Skip to main content

दिवाळी अंक २०१८

दिवाळी अंक २०२४ - गावातील घर

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 31/10/2024 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

प्रजासत्ताक दिन परेड - दिल्ली - २६ जानेवारी २०१८

लेखक मोदक यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H प्रजासत्ताक दिन परेड - दिल्ली - २६ जानेवारी २०१८ डिसेंबरमधल्या मॅरेथॉन भटकंतीचे प्लॅन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कधीतरी बनवून झाल्यावर 'आता पुढे काय?' हा विचार सुरू होता. अगदी काहीच प्लॅन झाले नाही, तर बडोद्याला जाऊन उत्तरायण बघायचे, असे ठरवले. तितक्यात लक्षात आले की २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन परेड असते.. ती बघता येईल. मग परेडला लागणार्‍या तिकिटाच्या अनुषंगाने शोधाशोध सुरू झाली. दिल्लीच्या एक-दोन ठिकाणांचा पत्ता मिळाला, पण नक्की माहिती मिळत नव्हती.

गुळपापडीच्या वड्या

लेखक पद्मावति यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H गुळपापडीच्या वड्या नमस्कार मिपाकर मंडळी, बघता बघता दिवाळी आलीसुद्धा! घरोघरी फराळाचा खमंग सुगंध दरवळत असेल ना! गोड-तिखट फराळाच्या यादीत मी आज आणखी एका गोडाची भर टाकतेय. म्हटली तर सोपी, म्हटली तर कठीण अशी एक पाककृती आपण बघणार आहोत. सोपी यासाठी की घरात हमखास असलेल्या पदार्थांमधून ही पाककृती बनवता येते. कठीण यासाठी की ही पाककृती बर्‍याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते.

कर्ण आणि कृष्ण

लेखक शैलेन्द्र यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H कर्ण आणि कृष्ण कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे? कृष्ण व्हावे की कर्ण व्हावे? जे आपले असते तेच द्यावे की द्यावे तेही आपले रहावे? रक्तगर्भी वारसा जखमेचा सांभाळून ठेवावा उरात की, स्वतःच्या आशेचेच कवच स्वतःच्या जिवाला शिवावे? परशुरामाचे शाप आळवत खेचावी प्रत्यंच्या रागावून, की कमलकरांनी जग जिंकून पुन्हा कुणाचे रथ हाकावे? तेजाळल्या दुखऱ्या व्यथांचा कुणी सुयोधन बाजार मांडेल की त्याची वाट पाहण्यापेक्षा आपले पार्थ आपण शोधावे? अनाहूत स्वयंवराचा अपमान आयुष्याशी जुग

आंबा काजूकतली

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H आंबा काजूकतली एकदा नेटसर्फिंग करताना 'बिनापाकाची, बिना गॅसची काजूकतली' असे वाचून ती क्लिप उघडली, तर एकदम मस्त रेसिपी मिळाली. त्यात माझे काही बदल केले आणि ही आंबा काजूकतली तयार केली. साहित्य - २ वाट्या काजू, पाऊण वाटी मिल्क पावडर, ३ ते ४ टेबलस्पून दूध, अर्धी वाटी साखर, चमचाभर साजूक तूप, १ लिंबाएवढा आंब्याचा आटवलेला गोळा. आंब्याचा गोळा उपलब्ध नसेल तर नुसती काजूकतलीही करता येईल. तेव्हा साखर पाऊण वाटी लागेल, कारण आंब्याच्या गोळ्यात साखर असते.

चकली

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
चकली दिवाळीच्या फराळात चकली ही अगदी हवीच हवी. पण हवी तेव्हा चकलीची भाजणी उपलब्ध न होणार्‍या ठिकाणी राहिल्यावर कुठली चकली नि काय.. एकदा असाच चकलीचा खमंग विषय चालला असता माझ्या भावजयीने तिच्या आईच्या - डॉ.

अनाहूत

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H
अनाहूत
अज्ञाताच्या देशातून कोणी अनाहूत येतो जड चेतनाच्या सीमा पार पुसून टाकतो धगधूर धुक्यातून क्षणमात्र डोकावतो रस रंग नाद गंध सरमिसळ करतो विझणार्‍या रोमरोमी ज्योती पेटवू बघतो लेखणीच्या टोकापाशी थोडा अडून बसतो मन ओथंबून येता सरसर बरसतो अज्ञाताच्या देशातून कोण अनाहूत येतो? कवितेच्या गावातून शब्द अनवट येतो! भवताल कोंदुनिया दहा अंगुळे उरतो... H

राँग वे पायलट

लेखक श्रीरंग_जोशी यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H राँग वे पायलट १७ जुलै १९३८ - पहाटे सव्वापाचला एक मोनोप्लेन न्यू यॉर्कच्या फ्लॉइड बेनेट फील्ड विमानतळावरून आकाशात झेपावले. या विमानाचा वैमानिक व एकमेव प्रवासी होता डग्लस कॉरिगन. तब्बल २८ तास अन १३ मिनिटांच्या विनाथांबा प्रवासानंतर ते विमान एका विमानतळावर उतरले. विमानाच्या बाहेर पडल्यावर भोवताली जमलेल्या विमानतळाच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून डग्लस म्हणाला, "आय ऍम डग्लस कॉरिगॉन. जस्ट गॉट इन फ्रॉम न्यू यॉर्क. व्हेअर ऍम आय?

प्रेम

लेखक MipaPremiYogesh यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H
प्रेम
प्रेम असतं गाणं दोघांच्या मनात! प्रेम असतं भिजणं चिंब पावसात!! प्रेम असतं नाचणं आनंदाच्या भरात! प्रेम असतं जगणं भान विसरून जीवनात!! प्रेम असतं चांदणं पडलेलं अंगणात! प्रेम असतं मोहरणं मोगऱ्याच्या सुगंधात!! प्रेम असतं फिरणं मोहरलेल्या चैत्रबनात! प्रेम असतं बहरणं शिशिरानंतरच्या वसंतात!! H