मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०१४

आजही माझ्याचपासुन दूर मीही

स्नेहदर्शन ·
आजही माझ्याचपासून दूर मीही तू जशी आहे तसा मजबूर मीही भेटण्या जितकी मला उत्सुक असते ये, व्यथे ये, तेवढा आतुर मीही जेवढे जातो जवळ, ती लांब जाते वाटते आता राहावे दूर मीही लागला होता तिला माझा लळा पण, प्रेमही केले तसे भरपूर मीही एवढे शिकलो यशस्वी डाव त्यांचे, जाहलो बघ खेळताना क्रूर मीही सांगणारे सांगता लाखो कहाण्या नीट आता वाचतो मजकूर मीही ----स्नेहदर्शन​

भाषेची विभक्ति

वेल्लाभट ·
खरं तर, मराठी, तिची अस्मिता, अभिमान वगैरे यांचा विचार तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांनी करणं, म्हणजे अगदी क्षुल्लक आहे. तो करण्याची जबाबदारी ठराविक लोकांकडे सोपवलेली आहे. ते लोक वेळ बघून, सोयीस्करपणे तो करतही असतात. पण क्षुल्लक गोष्टींवर वेळ घालवतोच आपण. असाच मीही घालवत होतो. पेपर वाचत होतो. एक बातमी अगदी ठळक छापलेली दिसली. श्रीनगरच्या पुरात इतके इतके मराठी लोक अडकले. बातमी वाचून राग आला. राग याचा की श्रीनगरचा पूर हे राष्ट्रीय संकट आहे. असं असताना त्यात इतके मराठी अडकले, इतके बंगाली अडकले, इतके तामिळ अडकले...

कविता कशी उपभोगावी

शरद ·
कै. इन्दिरा संतांनी म्हटले आहे " कूकर लावून शिटी होईपर्यंत कथा वाचून होते. जेवण झाल्यावर लोळत लोळत कादंबरी वाचून बाजूला करता येते पण कवितेचे वाचन असे करता येत नाही. कथा-कादंबरी वाचनानंतर पुस्तकातले तरंग दूर होतात. पण कवितेचे तसे नाही. मनरंजनाबरोबर काव्यात आणखी काहीतरी सामावलेले असते " कवयित्री म्हणून त्यांनी काव्याला झुकते माप दिले आहे कां ? मी कविता करत नाही तरीही मला तरी तसे वाटत नाही.. शालेय कविता ( त्यातल्या आजही बर्‍याच पाठ आहेत) सुरेख होत्या पण त्या भावकविता नव्हेत.

कथा

अनाहिता ·
(अनाहिता महिला विभागातर्फे सगळ्याजणींनी मिळून कथा/लेखन करण्याच्या प्रयोगाला आलेलं हे फळ आहे. यशोधरा यांची मुख्य कथाकल्पना आणि त्याला इतर सर्वजणींची मदत. संपादकीयामधे याचा उल्लेख केला आहेच! सहभागासाठी सर्वांना धन्यवाद!) ****************** भिवाण्णा पार सटपटून गेला होता.... गेल्या एक वर्षा दीड वर्षात आक्रीतच घडत चाललं होतं जणू, पार अगदी त्याच्या आवाक्याबाहेरचं! कसं नी काय, काय उमगायलाच तयार नव्हतं त्याला. विचार करकरून डोकं फुटायची वेळ आली होती आता!

दिवाळीतले जी टीव्ही कार्यक्रम

माम्लेदारचा पन्खा ·
दिवाळीतले "जी" टीव्हीवरचे खास कार्यक्रम ( मिपा मेम्ब्रांसाठी जनहितार्थ प्रसारित ) (सूचना - आपल्या जबाबदारीवर सदर साहित्य वाचावे. उल्लेखित व्यवसायांबद्दल कोणतेही साम्य आढळल्यास योगायोग समजावा....(चला मी सुटलो !!) ) १) "बोम मिनिष्टर"- भावजी रोज संध्याकाळी वेगवेगळ्या वहिनींना भेटायला त्यांच्या घरात जातात ऑफिशियली.....घरातले सगळे घरीच असतात.... शिवाय सगळ्या गावाला बोलावून ठेवलेलं असतं घरी....शूटिंगचा क्यामेरामन रोज एक डिस्प्रिन खातो सगळ्यांची एकमेकांशी असलेली नाती ऐकून. भावजिंशी सगळ्या गावाची ओळख ,नमस्कार, चमत्कार झाल्यावर अर्धा एपिसोड संपतो.

तुझाच होऊनी

पद्मश्री चित्रे ·
तृुणात पाहतो तुला, फुलात मी न्याहाळतो तुझाच सूर होउनी, चराचरात गुंजतो तुझ्याच अंतरी तुला नकळता मी राहातो होउनी मी मंद गंध तुला हळु खुणावतो तुझाच अश्रु होऊनी पापणी मी भिजवतो तुझेच मौन होऊनी अधरी मी विसावतो उदास रात्री या तुझ्या बनूनी चंद्र पाहतो अंगणात मीच आणि पारिजात बरसतो श्वास मी भास मी तुझ्या समीप राहतो तुझाच होऊनी तुला तुझ्यातुनी हिरावतो पद्मश्री चित्रे

Escape from Alcatraz

स्पार्टाकस ·
एस्केप फ्रॉम अल्कात्राझ *********************************************************************************** सॅन फ्रान्सिस्को! अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरील एक अत्यंत प्रसिद्ध आणि महत्वाचे शहर! कॅलिफोर्नियाच्या उत्तरेकडील सॅन फ्रान्सिस्को उपसागराच्या किनार्‍यावर वसलेल्या शहराचा इतिहास हा गेल्या अडीचशे वर्षांच्या आतबाहेरचा आहे. २९ जून १७७६ रोजी स्पॅनिश रहिवाश्यांनी या शहराची उभारणी सुरू केली. गोल्डन गेट इथे एक लहानसा किल्ला बांधण्यात आला. १८४९ मध्ये कॅलिफोर्नियात सोन्याचा शोध लागल्यावर या शहराची भरभराट झाली.

सिंहासन

मीराताई ·
नव्यानेच आलेल्या त्या दोघ तरुणांशी प्राथमिक चर्चा झाली आणि सरदारांची भव्य मुद्रा समाधानाने उजळली. ते पाहून त्या दोघांनाही हुरूप आला. त्यांच्या आशांना पंखच पंख फुटले. सरदारांच्या मार्गदर्शनाने आपण किती धन्य झालो आहोत हे त्या दोघांनी पुन्हा एकदा आदबीने विदीत केले. सरदारांनी त्यांच्याकडे कृपाकटाक्ष टाकून एक मंद स्मित केले. आणि त्यांना आपल्या गोटात दाखल करून घेतल्याचा संकेत केला. आधीच रूजू झालेल्या शिलेदारांनी त्या नवागतांचे मोठया उत्साहाने स्वागत केले. ते दोघे तरुण जात असता सरदार त्या दिशेने मोठया संतुष्ट मुद्रेने पाहात होते.

जाणीव

संदीप डांगे ·
दृश्य १ वर्दळीचा रस्ता, फार गजबज माजलेली, वाहने भरधाव, हळूहळू जसा रस्ता सुचेल तशी वाट काढत पळत होती, अचानक मोठा आवाज झाला, गर्दी थांबली, एक म्हातारे साठीतले गृहस्थ अचानक थांबावे लागल्याने स्कूटर वरून तोल जाऊन रस्त्यावर पडले, इतर लोक बघत होते, एक दोघे पुढे आले, एकाने स्कूटर उचलली, दुसऱ्याने त्यांना हात देऊन उठवले, आजोबांचे हाड मोडल्यासारखे जाणवत होते, तो मुलगा त्यांची विचारपूस करत होता, "चल रे विजय, उशीर होतोय आपल्याला, इंटरव्यू आहे आणि काय बसलायस समाजसेवा करत", त्याचा मित्रा त्याच्या वर खेकसला, "मोठ्या मुश्किलीने कुणीतरी सालं बोलावते आपल्याला, त्यातही उशीर झाला तर बोंबच", विजय न