Skip to main content

दिवाळी अंक २०१४

सुख आहे तरी कुठे - शशिकांत पानट

लेखक पैसा यांनी सोमवार, 20/10/2014 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री शशिकांत पानट हे एक हॉलिवुड कलाकार आहेत. सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून आकाश गायकी यांच्याद्वारा ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे.

तलकाडू : एक प्रवास

लेखक चौथा कोनाडा यांनी सोमवार, 20/10/2014 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
मला जर कुणी सांगितलं असतं की तुला अनपेक्षितपणे अचानक, वाळूत बुडून गेलेल्या मंदिर संस्कृतीला भेट द्यायचा योग येणार आहे, तर मी अजिबात विश्वास ठेवला नसता. “वेळेशी शर्यत” करत हा योग साधला गेला त्याचीच ही कहाणी! म्हैसूर मधली ती प्रसन्न सकाळ अवतरली. बाकीचे सगळे आवरे पर्यंत म्हटलं,जरा लॉजच्या बाहेर जाऊन चौकशी करून यावी. रस्त्यावर येऊन एका स्वच्छ छानशा हॉटेल मध्ये शिरलो. शिरता क्षणी एका सुंदर भव्य पोस्टरने माझे लक्ष वेधून घेतले. टिपिकल दाक्षिणात्य पध्द्तीच्या गोपुराच्या व सुंदर कळस असलेले मंदिर मनाला भुरळ घालत होते. खाली मंदिराचे नाव वाचले “श्रीकान्तेश्वर शिवालय, नंजनगुड”.

खुमासदार मिरासदार

लेखक मित्रहो यांनी सोमवार, 20/10/2014 07:34 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना मिरासदारांची साक्षीदार ही कथा आम्हाला धडा म्हणून होती. तेंव्हापासून तो सक्षीदार मनात घर करुन होता पण मिरासदारांची पुस्तके वाचण्याचा योग बरीच वर्षे काही आला नाही. साक्षीदार मात्र मनात पक्का भरला होता. मराठी आणि इंग्रजी मधे बराच वाचन प्रवास करुन झाल्यानंतर त्या साक्षीदाराने परत आपल्या अस्तित्वाची साक्ष दिली. यावेळेला मी क्षणाचाही विलंब न करता बुकगंगावर ‘मिरासदारी’ची ऑर्डर दिली. त्यानंतर मग ‘चकाट्या’, ‘भोकरवाडीच्या गोष्टी’, ‘माझ्या बापाची पेंड’ सारे घरी घर करुन गेले. मराठीत ग्रामीण कथा म्हटली की जी काही मोजकी नावे डोळ्यासमोर येतात त्यात द. मा. मिरासदार हे नाव फार मोठे आहे.

रविवार हा सुखाचा.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 20/10/2014 07:33 या दिवशी प्रकाशित केले.
'अगं ए! जरा मस्त पैकी चहा टाक की एक' 'आधीच सकाळपासून दोन वेळा झाला आहे.' - स्वयंपाकघरातून नको त्या वेळी सत्यकथन. 'पण मला अजून एक हवा आहे.' मी चिवट. 'आंघोळ करा आधी. नाहीतर जेवणही मिळणार नाही.' - स्वयंपाकघर निर्वाणीवर. निदान रविवार सारख्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी तरी आंघोळ अनिवार्य नसावी असं माझं प्रांजळ मत आहे. पण अधिक वाद घालून रविवार सारख्या सुट्टीचे सकाळी सकाळीच विसर्जन करावे असे कुठल्याही अनुभवी नवर्‍याला वाटत नाही. नाईलाजाने उठलो.

वेगळ्या वाटेवर - संजीत (उर्फ बंकर) रॉय - बेअरफूट कॉलेज

लेखक मोदक यांनी सोमवार, 20/10/2014 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
. संजीत रॉय. डेहराडूनच्या प्रख्यात डून स्कूल मधून शालेय शिक्षण. दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन डिग्री. कॉलेज दरम्यान व नंतर काही वर्षे स्क्वॅश या खेळामध्ये प्राविण्य. ३ वर्षे नॅशनल स्क्वॅश चँपीयन - १९६५, १९६७ व १९७१. एक यशस्वी, स्वप्नवत करीयर.. अत्यंत उज्ज्वल भवितव्य खुणावत असताना या तरूणाने थोड्याश्या कुतुहलानेच बिहारच्या दुर्गम भागामध्ये दुष्काळी मदतकार्या

बाकरवडी

लेखक इशा१२३ यांनी सोमवार, 20/10/2014 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! सगळ्यांकडे दिवाळीची तयारी झाली असेलच. दिवाळीचा फराळ काय काय बनवलात? लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, चिरोटे, अनारसे असतातच, पण एखादा नवीन पदार्थ केला जातोच. या वेळेस मी केलीये बाकरवडी! तशा पुण्यात चितळे मामा, हलवाई काका, जोशी अशा अनेक चवीच्या बाकरवड्या मिळतात.

एक पणती

लेखक एस यांनी सोमवार, 20/10/2014 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
     "इथे येताना अजिबात माज करायचा नाही. कोण कधी घोडा काढून डोक्याला लावेल हे सांगता येत नाही. इथे सगळे असेच येडझवे येतात. कुणाचा धक्का लागला, काहीही झालं तरी आपलीच चूक असल्यासारखं गुपचाप पुढे निघून जायचं. कुणाशी काही बोलायला जाऊ नकोस. काही अडचण आली तर सरळ मला फोन लावायचा. मी येतोच."

आनंद १

लेखक असंका यांनी सोमवार, 20/10/2014 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
. कंफ्युज्ड अकौंटंट

मी, सियाचेन आणि कारगिल युद्ध…!

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 27/10/2013 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
सुधीर मुतालीक जम्मू-काश्मीरमधल्या कुपवाडाजवळील केरन भागात पाकिस्तानने पुन्हा एकदा घुसण्याचा आगाऊपणा केला. आपल्या सेनेला त्या भागात दहा दिवस झुंजून घाण साफ करावी लागली. अर्थात तो प्रभाग स्वच्छ झाला आणि होणारच होता. १९७१ साली भारताकडून अत्यंत अपमानास्पद मार खाल्ल्याचा व्रण आपल्या ध्वजावर ठेवून पाकिस्तान गेली ४२ वर्षे वावरतो आहे. त्या मार खाण्याने अक्कल येउन भारताशी मैत्रिपूर्ण सबंध ठेवण्यात खरे तर पाकिस्तानचे हित आहे. पण त्यांच्या ठायी शहाणपण असते, तो तर पाकिस्तान कसचा? त्यानंतर त्यांचा रडीचा डाव चालू राहिला.