Skip to main content

दिवाळी अंक २०१४

नित्यनूतन दीपावली - भरत उपासनी

लेखक पैसा यांनी सोमवार, 20/10/2014 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री भरत उपासनी सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे.

ओळख बहारिनची

लेखक विशाखा पाटील यांनी सोमवार, 20/10/2014 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
अरबी समुद्राच्या आखाताच्या किनार्‍यावर वसलेले देश म्हणजे आखाती देश. तेलसमृद्ध, इस्लामधर्मीय आणि वाळवंट अशी या देशांची ओळख. आखाती देशांमधलाच बहारीन हा एक लहानसा देश आहे. सौदी अरेबियाच्या पश्चिमेला वसलेलं हे नगरराज्य म्हणजे लहानमोठ्या ठिपक्याएवढ्या बेटांचा समूह आहे. सर्व बेटांचं एकत्रित क्षेत्रफळ मुंबईएवढंच. 706 चौरस किलोमीटर एवढाच यातल्या छत्तीस बेटांचा विस्तार. या देशाच्या एका टोकाला खजुराच्या वाड्या; तर दुसर्‍या टोकाला वैराण रखरखीत वाळवंटाचा पसारा. मूळ बहारीनींएवढेच परदेशी नागरिक या देशात राहातात. या सर्वांची मिळून लोकसंख्या बारा लाखाच्या आसपास आहे. परदेशी लोकांमध्ये सर्वात जास्त भारतीय.

विचारशृंखला - संजय उपासनी

लेखक पैसा यांनी सोमवार, 20/10/2014 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री संजय उपासनी सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यासाठी श्री उपासनी यांना धन्यवाद!) ***************** * विचारशृंखला * ****************** आभाळ दाटून आल्यागत विचार दाटून आलेत..... पाऊस पडला नाही तरी डोळे मात्र भरून आलेत.... आठवणींच्या सागरात मासे फिरू लागलेत........ खूप चालावे म्हटले तर पाय भरून आलेत........ मन आणि विचार सरभेसळ होत चाललेत .....

ग्रंथसखा -श्याम जोशी

लेखक अजया यांनी सोमवार, 20/10/2014 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना मी एक स्वप्न पाहिलं होतं, सर्व बाजूनी पुस्तकांनी भरलेल्या घरात मी राहते आहे. अभ्यास नाही, तहान भूक नाही. फक्त पुस्तकं आणि मी. पहाटे पडलं होतं का काय माहिती नाही पण ते स्वप्न मी प्रत्यक्षात अवतीर्ण झालेलं पाहिलं, आमच्या बदलापूरच्या ग्रंथसखा ग्रंथालयात, वाचन संस्कृतीच्या माहेरी, माझ्या माहेरी, माझ्या काकामुळे . बदलापूरभूषण श्याम जोशी सर हे बदलपूरातलं चिरपरिचीत नाव. जोशी सर म्हणजे मराठी साहित्याचा चालताबोलता ज्ञानकोश! जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तकं पोचली पाहिजेत्, वाचली गेली पाहिजेत्, बदलापूरासारख्या ठिकाणी संदर्भ ग्रंथ उपलब्ध झाले पाहिजेत या वेडाने झपाट्लेला हा माणूस.

पेत्रा दरी (पेत्रा व्हॅली) जॉर्डन

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 20/10/2014 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७...

एक नाते - अनोखे

लेखक वैशाली हसमनीस यांनी सोमवार, 20/10/2014 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
एक नाते — अनोखे

     माणूस जन्मल्यापासून त्याच्या जीवनात अनेक नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरूवात होते. कोणतेही मूलभूत प्रश्न मनात येण्याआधीच ही नाती तयार होतात. पुढे ह्या नात्यांची दृढता किंवा कमजोरपणा व्यक्तिसापेक्ष ठरू शकते. आई-मूल, बाप-मूल, बहीण-भाऊ, पती-पत्नी, मित्र-मैत्रिणी, काका, मामा, मावशी, आत्या इ. अनेक नाती जन्माला येतात. आपल्या साहित्यात यातील अनेक नात्यांचे भरभरून गोडवे गायलेले ठिकठिकाणी दिसून येतात.

नरकचतुर्दशी

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 20/10/2014 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी किंवा दीपावली चे महोत्सवात रुपांतर कधी झाले कदाचित कोणीच सांगू शकणार नाही. वसुबारसेपासुन सुरु होउन भाऊबीजेला (किंवा देवदिवाळीला) संपणार्‍या या उत्सवाचे बीज कशात याचे मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. उत्सव फार जुना खरा. स्कंद आणि पद्म पुराणात दिवाळीचे संदर्भ सापडतात. नवरात्रातल्या अष्टमीपासुन ते आश्विनातल्या अमावस्येपर्यंत पार्वतीने शिवाची आराधना केली आणि प्रसन्न होउन शिवाने पार्वतीला स्वत:मध्ये एकरुप करुन घेतले. हाच तो अर्धनारिनटेश्वराचा अवतार. आश्विनातल्या अमावस्येला हा अवतार अस्तित्वात आला म्हणुन हा दिवाळीचा उत्सव महत्वाचा.

पाटिशप्ता

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 20/10/2014 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
पाटिशप्ता बंगाली मिठाया ह्या बंगाली मुलींप्रमाणेच गोड असतात. की त्या मिठायाच लहानपणापासून खाल्ल्यामुळे बंगाली मुली एवढ्या गोड होत असतील? तात्पर्य काय, तर त्या (म्हणजे मिठाया) न आवडणारा विरळाच. पाटिशप्ता हा असाच सणासुदीला केला जाणारा एक पारंपारिक पदार्थ. मूळ रेसिपीत गूळ-खोबर्‍याचं सारण करून ते तांदळाच्या पॅनकेकमधे भरून त्याचा रोल करतात. तसं बघायला गेलं तर हे म्हणजे आपल्या मोदकांचंच फ्लॅट व्हर्जन आहे. पण हेच जरा खालील वेगळ्या पद्धतीने केल्यावर डिश एकदम रिच झाली. घ्या तर मग... दिवाळीला घरच्यांना हा वेगळ्या चवीचा पदार्थ खायला घालून आनंद द्विगुणित करा.