Skip to main content

विचारशृंखला - संजय उपासनी

लेखक पैसा यांनी सोमवार, 20/10/2014 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री संजय उपासनी सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यासाठी श्री उपासनी यांना धन्यवाद!) ***************** * विचारशृंखला * ****************** आभाळ दाटून आल्यागत विचार दाटून आलेत..... पाऊस पडला नाही तरी डोळे मात्र भरून आलेत.... आठवणींच्या सागरात मासे फिरू लागलेत........ खूप चालावे म्हटले तर पाय भरून आलेत........ मन आणि विचार सरभेसळ होत चाललेत ..... आठवावे म्हटले तरी आठवेनासे झालेत....... विचार हे असे असंबद्ध का झाले...? कधी सुसंबद्ध,कधी असंबद्ध हे रहाटगाडगं विचारांचं... कुठे असेल बरं ह्या विचारांच नेमकं उगमस्थान ? आता ह्या विचारांचाच जरा विचार करावा लागेल.... विश्रांतीसाठी आता निर्विचार व्हावं लागेल...! कवि :- संजय राधाकृष्ण उपासनी गणेशप्रसाद अपार्टमेंट,वरदविनायक नगर, विजय ममता फेम सिनेमामागे,नाशिक -४२२०११. भ्रमणध्वनी-९८२२४५२२४७
दिवाळी अंक वर्ष

वाचने 1839
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया