Skip to main content

मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावे

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 19/02/2015 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
* मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावे गावांच्या नावांच्या अभ्यासाला टोपोनिमी मराठीत स्थलनाम अभ्यास असे म्हणतात. गावांच्या नावांच्या भेंड्या खेळण्या पलिकडे जाऊन विशीष्ट भौगोलीक परिसरातील भाषेचा आणि मानवी स्थलांतराचा ढोबळ अंदाज येण्यास स्थलनाम अभ्यास उपयूक्त ठरू शकतो. अर्थात असे अंदाज ढोबळच असू शकतात त्यावरून अंतीम स्वरूपाचे निष्कर्ष काढणे सयुक्तीक असेलच असे नाही. * आता पर्यंत या धाग्यावर झालेल्या चर्चा ** अणसूर, पनस, फणस , कणस , सणस, अनासपुरे ** कुडाळ / कुडाल / कुटाल आणि चेन्नई / मद्रास ** थिर': थिरूपती, थिरूअनंतपूरम आणि कोविल : नागरकोविल - (मिपा सदस्य मार्गी) ** होसा, आणि उर - पेट्टे, हळे (मिपा सदस्य कंजूस, शेखरमोघे) उर ** मालेगाव - (मिपा सदस्य टोपी) ** मुंगी-पैठण ** आबाद, ग्राद, ग्राम, गाव - (मिपा सदस्य हुप्प्या) ** हिंग्लजा माता आणि स्थळनामे ** वट/वड / वाडी / वादी / वडूज ** बुरुज-बुर्ज-बर्ग-बर्ख - (मिपा सदस्य आदूबाळ) ** रावळपींडी ** प्रत्यत : मळा , मळी किंवा मळा; उदा मालवण, मलावन, करमळी, उसगाळीमाळ, करमळ, हरमळ, पनसामाळ अफगाणीस्तानातील Mala, Gholmala, Karmalay, Kamal Khel, *** सर्वांच्याच चर्चा सहभागाचे आभार. जिथे कमी जागेत सहज शक्य आहे तेथे उपचर्चा चालू करणारे किंवा महत्वपूर्ण माहिती विश्लेषणात योगदान करणार्‍या सदस्यांचा संदर्भाच्या दृष्टीने युक्त जावे म्हणून सदस्य नामोल्लेख कंसात करण्याचा प्रयत्न केला आहे पण प्रत्येक चर्चा सहभागीचे नाम नमुद करणे पूर्ण जागा त्यातच व्यापली जाऊ नये म्हणून टाळले आहे. सर्वांच्याच चर्चा सहभागाचे पुनश्च्च आभार. अलिकडेच आंतरजालावर वाचन करताना श्री लंके मध्ये महारागाम नावाचे तर आझरबैजान देशात लंकारन अशी नावे योगा योगाने वाचण्यात आली. भारतात ur, ner, palli, , veli, cheri, pat, kuppam, padi, , vayal, vani (wani), vali, wadi इत्यादी प्रत्यय असणार्‍या ग्रामनामांची मोठीच संख्या आहे. यातील 'उर', 'नेर', 'पत/पात/पाट', 'वट' हे प्रत्यय असलेली ग्राम नामे इराण मध्येही आढळत असावीत नगर हे प्रत्यय असलेली ग्राम नामे अफगाणीस्तानातही असावीत. यातील बरेच प्रत्यय आपल्या वापरात वाचनात एवढे सरावलेले असतात की सहज जाणवतही नाहीत पण आजकाल आंतरजाल आणि सोप्या संगणकीय सुविधांनी ग्रामनामातील एकसारख्या प्रत्ययांचा अभ्यास करणे सोपे झाले आहे. *भारतातील ग्राम नामे ऑनलाईन शोधण्यायोग्य सुविधा **सेंसस इंडीया **पोस्टल पिनकोड **लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी * अफगाणीस्तानातील गावांची यादी या दुव्यावर उपलब्ध असलेली आढळली * United Nations Group of Experts on Geographical Names यांच्या वेब पेजवर इतर काही देशांसोबतच इराणमधील गावांची नावांची यादीचा दुवा आहे. * युके मधील गावांच्या नावांच्या प्रत्ययांची यादी इंग्रजी विकिपीडियावरील लेखात उपलब्ध आहे. (हा धागा लेख मुख्यत्वे मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावांशी संबधीत असला तरी संदर्भा साठी म्हणून हा दुवा नमूद केला आहे. मला स्वतःला मुख्यत्वे मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांच्या नावातील साधर्म्याची माहिती शोधण्यास आवडते. खासकरून अझरबैजान आणि अर्मेनिया या देशातील ग्रामनामांमध्ये मला सध्या बर्‍या पैकी रस आहे पण अफगाणिस्तान इराणच्या ग्रामनामांच्या सविस्तर याद्या जेवढ्या सहजतेने आंतरजालावर शोधता आल्या तेवढ्या सहजतेने मध्य आशियातील इतर देशांच्या माझ्या शोधात मला मिळाल्या नाहीत. कुणाला त्या उपलब्ध होऊ शकल्यास अथवा मध्य आशियातील नोंद घेण्याजोगी ग्रामनामाची साधर्म्ये आढळल्यास या धागा प्रतिसादातून नोंदवावीत अशी विनंती आहे. * शोधगंगावरील शोध प्रबंध दुवे ** Cultural history of the konkan based on silahara inscriptions Researcher: Paranjape, Binda चॅप्टर ९ पिडीएफ दुवा * माझे स्थलनाम विषयक उप धागे * अंक, वेंक, अंग, वेंग, वेंगुर्ले, वेंगसर, बेंगलूर, वेंकटेश * कोंडा, कोंडाणा; कोंड, कोंडके, कोंडदेव * आटपाटनगर, पाटण, पाटील, पटेल इत्यादी * माझे शब्द व्युत्पत्ती विषयक ईतर धागे * शोध स्तूप आणि स्तव शब्दांचा * मंदिर या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ? * पंक, पाकळी, पाखी, पाखरु, आणि ऋग्वेदातील पाकः * गुढी उभारनी * आषाढीच्या निमीत्ताने पुंडलीकाच्या शोधात पुन्हा एकदा ... * स्थलनाम आणि शब्द व्युत्पत्तीशी संबधीत ईतर धागे * येल्ला आणि तीच्या दासी * राजराजेश्वरी,राजरा, मेसाई, मेसको, मायराणी देवींची माहिती हवी * टवळी आणि सटवी * मिसळपाव बाह्य शब्द व्युत्पत्ती धागे (माझे) * झक मारणे: झक, झक्कू आणि झकास

वाचने 36060
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

In reply to by सिरुसेरि

उर या प्रत्ययाबाबत वर चर्चा झाली आहेच, उर प्रत्ययासोबत येणारी ग्राम नामे बर्‍यापैकी जुनी असावीत त्यामुळे त्यांच्या अर्थांचा विचार करणे रोचक ठरु शकते. * येल्लुर हे देवी नावावरुन येते त्या बद्दल अधिक चर्चा येल्ला आणि तीच्या दासी लेखाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे. * वेल्लुर मधील वेल वनस्पती नावावरुन असण्याची शक्यता वाटते . व चा ब असा उच्चार बदलही होतो आणि बेल्लूर नावाची गावेही सापडतात . ** वेरुळ हे वेलुर - वेरुल - वेरुळ असे झाले नसेल ना असे कधी कधी वाटते , वेरु शब्दाला अजून काही अर्थ असेल तर माहीत नाही * नेलुर / नल्लुर नल आणि नेल या शब्दांना काही विशीष्ट अर्थ असेल तर माहित नाही . दक्षिण भारतीय भाषा बोलताना /उच्चारताना बर्‍याच ग्रामनामान्चा उच्चारण शेवट नल / नेल असा होऊन नन्तर उर प्रत्यय लागताना दिसतो जसे कन्नेलुर , उदा चीन्नालुर , **नल्लुरु ( एक नल्लुरपालम ही आहे गंमत म्हणजे वस्तिस्थान प्रत्ययाला पुन्हा अजून एक वस्तीस्थान प्रत्यय लागण्याचेही प्रकार होतात ) ** काटमनल्लुर कर्नाटकातील या उदाहरणात नल्लुर हा पुर्ण शब्दच प्रत्यय झाल्याचे दिसते आहे 'काटम' कानडीत काही अर्थ असेल ** Muthanallur आहे याचा समास कसा सोडवणार Mutha+nallur की Muthan+allur की Muthanall + ur nallur येणारी दक्षिणेत आणखी बरीच गावे आहेत

अणसूर मधील अणस शब्दावर anas अक्षरांवर महाराष्त्रातील गावांच्या डाटाबेस मध्ये शोध घेतला तर कणस आणि फणस हे शब्द असलेली गाव नावे आहेत . अननस नावाचेही फळ आहे , (हिंदीत अनाज हा शब्द आहे तो अनस -अनास - अनाज असा तयार झाला असू शकतो असे वाटले अर्थात या सर्वाचे मूळ अन्न शब्द आहेच) पण पनस panas नावाची गावे सातारा अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात दिसतात . पपनस आणि फणस बहुधा केवळ कोकणात होतात, नुसते पनस अथवा पणस नावाचे वेगळे काही फळ असू शकेल का अशी शंका वाटून गेली. सणस वाडी नावाची गावे आहेत सणस नावाचीही काही वनस्पती आहे का कि सणस शब्दाचा अजून वेगळा काही अर्थ होतो ? सण शब्द स + अन असा आला असेल का म्हणजे स म्हणजे चांगले अन म्हणजे अन्न असे काही ? की व्युत्पत्ती काही वेगळी आहे ?

In reply to by माहितगार

कोकणात अनासपुरे नावाचे गावही दिसते आणि मला वाटते असे आडनावही आहे, या नावांच्या व्युत्पत्तीचा या निमीत्ताने उलगडा होताना दिसतोय .

नंदीग्राम, नांदगाव, राजनांदगाव ह्यात नंद हा प्रत्यय नंद घराण्यातील राजा किंवा भगवान श्रीकृष्ण ह्यांचा पालक नंदबाबा ह्यांच्याशी तर नसावा? मराठीत नांदने या क्रियापदाशी संबंध नसावा कारण तिन्ही गावे बंगाल,महाराष्ट्र, आणि बिहारमधील आहेत

In reply to by Topi

अन म्हणजे अन्न मिळाल्यावर होणारी भावना म्हणून आनंद शब्द विकसीत झाला असू शकेल किंवा नंदाच्या घरातील सुख समाधान आनंदाची काल्पनिक प्रतिमा असू शकेल. पण शब्दाचा प्रभाव हा नंद कुळ आणि त्याची साहित्यिक आणि सांस्कृतिक दखल झाल्या नंतरचा असावा असे वाटते. आनंदी घरात रहाणे म्हणजे नांदणे हा शब्द विकास स्वतंत्र असावा - आनंद आणि नंद वरुन विकसीत इतरही बर्‍यापैकी शब्द भारतीय भाषात आहेत - त्यावरुन ग्राम नावे विकसीत होण्याची सहसा गरज नसावी . १) स्वतः नंदकुळातील , २ स्वतः नंद कुळातील समजून घेणारे यांचे स्थलांतर किंवा आनंददायी परिवार हा अर्थ होत असल्याने वस्तीस्थानास नंद उपसर्ग असलेली नावे ठेवली गेली असावीत. जिथपर्यंत ग्राम नामांचा संबंध आहे नंद हा उपसर्ग असलेल्या ग्रामनावांची संख्या भारतात आपल्या अंदाजा पेक्षा खूप मोठी असावी. डाटाबेस मधून काही उदाहरणे देतो आणि आणखी पण आहेत पण त्यासाठी वेगळा प्रतिसाद देतो . नंदपूर हे नाव सर्वाधीक दिसतय वर जम्मू पासून सुरवात होताना दिसते आहे. हिमाचल, पंजाब, हरीयाणा , उत्तरा खंड , उत्तर प्रदेश ,बिहार , झारखंड, गुजरात, मध्यप्रदेश,, महाराष्ट्र, यादी पूर्ण नसल्याने ईतर राज्याची नावे आंतर्भूत झाली नसावीत , जशी मिळतील तशी देतो. Nand Garh (118) Nand karan Nandal(94) nandawala Nandgaon (1) Nandgarh Nandha(34) Nandha(53) Nandhuwali Nandi Khalsa (16) Nandiali Nandnaur (23) Nandpur Nandpur Ka Dera Nandrampur Bas(304) Nandsinghwala (8) Nanduki(22) Nanduwali (128)

In reply to by माहितगार

महाराष्ट्रात नंद , नांना, नांद्र हिं अक्षरे असलेल्या गाव नावांचे प्रकारच अदमासे पाऊणे दोनशेच्या आसपास होताहेत त्यात असंख्य गावांना एकच नाव असेल अशी अनेक गृहीत धरा म्हणजे एकुण प्रभाव लक्षात येईल. मध्येच व्यत्यय आल्यामुळे खालील प्रकारचे विश्लेषण पुर्ण होऊ शकले नाही पण अंदाजा येण्यासाठी पुरेसे असावे * ऊपसर्ग (म्हणजे शब्दाच्या आधी) प्रत्यय म्हणजे शब्दा नंतर * नंद ऊपसर्ग : केस, पाच; प्रत्यय: ई , खेड , गाव , गुर * नंदा प्रत्यय : ई, * नांद प्रत्यय : गाव * नांदा प्रत्यय : पूर * नंदूर प्रत्यय : बार * नांदूर उपसर्ग : घाट , जाट * जु-नांदुर्खी * नांद्रा / नांद्रे उपसर्ग : कोट, घाट , देव , * नांदेड * आंनंद प्रत्यत गाव, नगर, ग्राम, वली, वन, व्हाळ, वाडी ; ऊपसर्ग समास : का ,खा, परमा, ** नंदन प्रत्यय : पाडा,वन,वाड,शिवणी

स्वतः नंदकुळातील , २ स्वतः नंद कुळातील समजून घेणारे यांचे स्थलांतर किंवा आनंददायी परिवार हा अर्थ होत असल्याने वस्तीस्थानास नंद उपसर्ग असलेली नावे ठेवली गेली असावीत. परंतु नंदा आडनावे असणारी लोकसंख्या भारतात जास्त नसावी दुसरा पर्याय म्हणजे स्वतःचे नंद कुळातच समावेश करण्याची प्रवृत्ती नंद घराणे बलवान असण्याची वेळची असावी

In reply to by Topi

...परंतु नंदा आडनावे असणारी लोकसंख्या भारतात जास्त नसावी. ऑब्झर्वेशन बरोबर आहे पण आडनावे काळाच्या ओघात बर्‍याच मोठ्या प्रमाणावर बदलू सुद्धा शकतात म्हणुन त्याबद्दल निश्चित निष्कर्ष काढणे कठीण जाते .

स्वतः नंदकुळातील , २ स्वतः नंद कुळातील समजून घेणारे यांचे स्थलांतर किंवा आनंददायी परिवार हा अर्थ होत असल्याने वस्तीस्थानास नंद उपसर्ग असलेली नावे ठेवली गेली असावीत. परंतु नंदा आडनावे असणारी लोकसंख्या भारतात जास्त नसावी दुसरा पर्याय म्हणजे स्वतःचे नंद कुळातच समावेश करण्याची प्रवृत्ती नंद घराणे बलवान असण्याची वेळची असावी