✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सगळीकडे सारखेच

च — चांदणे संदीप, Tue, 04/17/2018 - 11:55
सकाळी सकाळी क्रिकेट खेळायला मैदानावर जमल्यावरच्या गप्पा ते यूपी बिहारवाले लै भुरटे विश्वास न ठेवण्याच्या लायकीचे दिल्ली हरयाणावाले तर आगाव एकजात सगळे माजोरडे साले गुजराती मारवाडी तर काय लुटायलाच बसलेत सारे चांगले वाटतात बाहेरून पण हे मल्लू मद्राशी पक्के आतल्या गाठीचे आसामी बंगाली पण त्यातलेच गोड बोलून गंडा बांधणारे दुपारी जेवल्यानंतर टपरीवर जमलो चहा बिडीकाडी करत बोलू लागलो धुळे जळगाव खानदेशवाले अमुक हे नागपूर विदर्भवाले तमुक सांगली सोलापूरवाले साले दुष्काळी आडमुठे अर्धवट नाशिक नगरी सातारा कोल्हापूरवाले पण त्यातलेच आणि कोकणी एक नंबर चिक्कू बीड उस्मानाबादी तर मजाच गडचिरोली चंद्रपूरवाले नक्सली अहो, बाकी परवडले पण हे पुन्यामुंबइकडले अतिशहाणेच रात्री जेवल्यानंतर घराबाहेर पडलो सोसायटीतल्या बेंचवर येऊन बसलो हे एक्स बिल्डींगवाले काय समजतात स्वतःला त्या वाय बिल्डींगवाल्यांची तर लायकी आहे का? त्या पलिकडच्या सोसायटीत रोज नवी प्रकरणे असतात आमदाराचा मेव्हणा राहतो म्हणून या सोसायटीचा माज त्या अमक्या सोसायटीची झोपडपट्टी झालीये आणि हे मोक्याची जागा मिळवून बसलेत साले डि मार्ट ह्यांच्या समोर उभा राहतंय म्हणजे साला आता भाव येणार ह्यांच्या फ्लॅटला ह्यांच्याकडेच कसा आधी रस्ता, ड्रेनेजलाईन? आम्ही काय रूमाल टाकून जागा धरल्यात का? मित्रांना व्हाट्सअप वर सांगितलं एकदाचं बाहेरच्या देशातून ऑफर आलीये जॉबची कुठेही जा पण मिडल ईस्टला आजिबात जाऊ नको ऑस्ट्रेलियात सगळ्यात जास्त मारतात आपल्याला न्यूझीलंडमध्ये तर शेजारी उभे पण राहत नाहीत आफ्रिकन देशात किडनीच काय हार्टही घेतात युरोप जर्मनी पण आधीसारखं सेफ राहिलं नाही अमेरिकेत तर कधी कुठे गोळी लागेल माहित नाही इंडोनेशिया थायलंडमध्ये काहीही खातात सौदी, कतार वगैरे लै डेंजर बाबा, नकोच! रशिया, आईसलँड तुझ तूच ठरव गारठून मरायच का कसं करायचं? रात्री झोपताना खाटावर विचार आला एवढीच तर जागा पाहिजे आपल्याला! - संदीप चांदणे

प्रतिक्रिया द्या
4756 वाचन

💬 प्रतिसाद (17)

मस्त ... आवडली

विशुमित
Tue, 04/17/2018 - 12:19 नवीन
मस्त ... आवडली
  • Log in or register to post comments

हायला,

अभ्या..
Tue, 04/17/2018 - 12:31 नवीन
हायला, एकच लंबर सॅन्डीबाबा,
रात्री झोपताना खाटावर विचार आला एवढीच तर जागा पाहिजे आपल्याला!
एपिक
  • Log in or register to post comments

आहा. मस्तच!

पद्मावति
Tue, 04/17/2018 - 13:20 नवीन
आहा. मस्तच!
  • Log in or register to post comments

मस्तय. (बहुधा) ना. सी.

अंतरा आनंद
Tue, 04/17/2018 - 14:35 नवीन
मस्तय. (बहुधा) ना. सी. फडकेंचा "आतले आणि बाहेरचे" असा लघुनिबंध आहे तो आठवला. ( नावात चुकभूल दे. घे.)
  • Log in or register to post comments

मस्त

अनन्त्_यात्री
Tue, 04/17/2018 - 19:23 नवीन
पटली!
  • Log in or register to post comments

वाह! क्या बात है!

एस
Tue, 04/17/2018 - 20:46 नवीन
वाह! क्या बात है!
  • Log in or register to post comments

सुंदर !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 04/17/2018 - 21:10 नवीन
सुंदर ! चपखल वेचक टोले लगावले आहेत ! :) पण, मुद्दे दुर्दैवाने खरे आहेत. :(
  • Log in or register to post comments

सुंदर

प्रचेतस
Tue, 04/17/2018 - 21:59 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

चांदण्यांतल

नाखु
Tue, 04/17/2018 - 22:48 नवीन
दाहक ऊन अगदी योग्यवेळी!!! चर्चा चोथ्या गारपीटग्रस्त कोओरडवाहू नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments

उत्तम!!!

जव्हेरगंज
Tue, 04/17/2018 - 23:29 नवीन
उत्तम!!!
  • Log in or register to post comments

सुरेख!

रुपी
Wed, 04/18/2018 - 01:13 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

उदाहरणार्थ थोरच वगैरे.

चित्रगुप्त
Wed, 04/18/2018 - 04:15 नवीन
उदाहरणार्थ थोरच वगैरे.
  • Log in or register to post comments

लै भारी!

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/18/2018 - 06:22 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

मस्त लिहिली आहे , सँडी भाई

खिलजि
Wed, 04/18/2018 - 12:17 नवीन
मस्त लिहिली आहे , सँडी भाई सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

मस्त...

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 04/20/2018 - 18:09 नवीन
सुरेखच आवडली कविता पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मस्तं कविता! आवडली :)

अनुप ढेरे
Fri, 04/20/2018 - 20:09 नवीन
मस्तं कविता! आवडली :)
  • Log in or register to post comments

मस्त! मस्त!!

शाली
Wed, 05/02/2018 - 16:55 नवीन
मस्त! मस्त!!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा