✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

असं वाटतं !

श — श्वेता२४, Wed, 04/25/2018 - 11:19
असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं............... निळंभोर आभाळ सगळं कवेमध्ये घ्यावं...................... गडबडीची सकाळ अन ठरलेलं रुटीन सोबत भाजी-पोळीने भरलेला टीफीन साडेआठची लोकल कधीच चुकवून चालत नाही इकडे तिकडे पाहायला मुळी वेळच मिळत नाही कशाला मग पहाटेची किलबिल ऐकू येईल? फुलणाऱ्या फुलांसोबत मनही फुलुन येईल? म्हणून वाटतं पहाट बनून आपणच उजळून यावं................... असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं ............................ तीचतीच तोंडे तेचतेच काम मशीन बनवून टाकते ऑफीसच्या चार भिंतीत जग बंदीस्त होऊन जाते मग वाटतं घडयाळाचा काटाच उपटून घ्यावा बॉसचा हळूच डोळा चूकवून चक्क पळ काढावा मग मला खुल्या हवेत श्वास घेता येईल? रानामधलं गवत बनून मंद डोलता येईल? वाटतं झऱ्याचं पाणी बनून खळखळ वाहत जावं..................... असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं ........................ कधीतरी वाटतं जरा वेड्यासारखं वागू गरमगरम शिऱ्यामध्ये सॉस घालून खाऊ किंवा सगळेच सरळ चालतात आपण उलटे चालू निरर्थक..., अकारण...., उगीच भटकत राहू मनसोक्त भटकून मात्र थेट घरी येईन आईच्या मांडीवर गाढ झोपून जाईन तेवढ्या काळापुरतं माझं बालपण मला मिळावं................... असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं ............................ - श्वेता

प्रतिक्रिया द्या
6203 वाचन

💬 प्रतिसाद (16)

छान लिहिलंय.

पद्मावति
Wed, 04/25/2018 - 13:34 नवीन
छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments

मस्त कल्पनाविलास.

arunjoshi123
Wed, 04/25/2018 - 13:37 नवीन
मस्त कल्पनाविलास.
  • Log in or register to post comments

पद्मावती व श्री. अजो

श्वेता२४
Wed, 04/25/2018 - 13:42 नवीन
प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मन वढाय वढाय...

एस
Wed, 04/25/2018 - 15:18 नवीन
मन वढाय वढाय... छान कविता. आवडली.
  • Log in or register to post comments

वा श्वेता ताई वा , मस्तय कविता

खिलजि
Wed, 04/25/2018 - 18:27 नवीन
बालपण देगा देवा मुंगी साखरचा रवा आपण पुढे व्हा आम्ही येतोय मागून हे बघा आलोच सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

छान !

सस्नेह
Wed, 04/25/2018 - 19:49 नवीन
छान ! लहान झाल्यासारखं वाटलं !
  • Log in or register to post comments

☺

श्वेता२४
Wed, 04/25/2018 - 20:27 नवीन
प्रतिसाद देणार्यया सर्वांचे आभार!
  • Log in or register to post comments

खुप सुंदर कविता.. आवडली.

पुंबा
गुरुवार, 04/26/2018 - 18:52 नवीन
खुप सुंदर कविता.. आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

श्वेता२४
Fri, 04/27/2018 - 11:24 नवीन
आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

खूप छान..

Secret Stranger
Wed, 07/18/2018 - 12:15 नवीन
खूप छान..
  • Log in or register to post comments

खूप छान

विनोदपुनेकर
गुरुवार, 07/25/2019 - 15:22 नवीन
खूप छान
  • Log in or register to post comments

बंधमुक्त जगावंसं वाटतं. खूप

इरामयी
गुरुवार, 07/25/2019 - 23:09 नवीन
बंधमुक्त जगावंसं वाटतं. खूप खूप छान!
  • Log in or register to post comments

सिक्रेट स्ट्रेन्जर, विनोद, इरामयी,प्रतिसादाबद्दल धन्यवाद

श्वेता२४
Fri, 07/26/2019 - 16:19 नवीन
:))
  • Log in or register to post comments

कधीतरी वाटतं जरा वेड्यासारखं

गड्डा झब्बू
Fri, 07/26/2019 - 18:13 नवीन
कधीतरी वाटतं जरा वेड्यासारखं वागू गरमगरम शिऱ्यामध्ये सॉस घालून खाऊ
:-)) :-)) :-)) आमच्या हापिसातली एक महिला सहकारी नुसत्या भातात सफरचंद आणि अननसाच्या फोडी घालून खाते ते आठवलं एकदम :-)) छान लिहिलंय!
  • Log in or register to post comments

भातात सफरचंद आणि अननसाच्या

जॉनविक्क
Sat, 07/27/2019 - 23:31 नवीन
भातात सफरचंद आणि अननसाच्या फोडी वगैरे काश्मिरी पुलावात पण घालतात :).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गड्डा झब्बू

धन्यवाद गड्डा झब्बू

श्वेता२४
Fri, 07/26/2019 - 20:04 नवीन
:)))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा