Skip to main content

तुमच्या देशात....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 13/04/2018 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.' '........' ------ 'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही. 'काय पाहणार हिंदमध्ये?' तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं. मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.' मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.' मी दरवाजे लावून बसते. .....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 60520
प्रतिक्रिया 212

प्रतिक्रिया

In reply to by अभ्या..

...पटणार्‍या उदाहरणांचा उल्लेख न करुन, न पटणार्‍या उदाहरणाकडे दुर्लक्ष करण्याचा हक्क राखून ठेवित आहे.
या वाक्याचे दोन दिशांनी वेगवेगळे अर्थ निघू शकतात.
.....कन्स्ट्रक्टिव्ह सुधार्णा अशा प्रकारच्या परिसंवादातून कशा निर्माण होतात आणि त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात कितपत परिणाम होतो ह्याचे सध्याच्या बघण्यातले एखादे दुसरे उदाहरण दिले तर फार आभारी राहीन साहेब.
ह्या वाक्याचा सर्वसाधारण कल पुर्व गृहीत होत नाही असा आहे . आज चांगले लेख सोशल मिडीयावर सहज फॉर्वर्ड होऊ शकतात. आजचीच कुणाचि पोस्ट आहे ' आंब्याची पारख कशी करावी या संदर्भातला लेख सोशल मिडीयावर फिरत असल्याची. अजून एक उदाहरण सामाजिक - राजकीय विवाद टाळायचा म्हणून उल्लेख करत नाही , पण मी मिपावर अभ्यासपूर्ण पणे प्रथमच संकलीत केलेली माहिती गैरसमज दूर करण्यासाठी वापरली गेलेली स्वतः पाहिली आहे. स्गळ्यात महत्वाचे सकारात्मक दृष्टीकोण . आणि सकारात्मक दृष्टीकोण नसेल तर समजा मी म्हणतो तशी रचनात्मक सुधारना नाही सुचवल्या आणि केवळ भावनाम्चे प्रदर्शन केले तरी शेवटी साध्य काय आहे ? पुढच्या अत्याचारानंतर आधीच्याच प्रतिक्रीया कॉपीपेस्ट मारायच्या ? मधल्या काळात काही सुधारणेची इच्छा हवी की नको . एनी वे आपली आणि अंतरा आनंदाम्ची न्याय व्यवस्थे बाबतची रचनात्मक चर्चा आवडली गेलि आहे.

खरे डॉक्टर,
आणि पुरुष "कणव" असल्याने लिहीत आहेत. त्यात भावनाप्रधानता कमी आणि वस्तुनिष्ठता जास्त जाणवते.
अगदी अगदी. याचं कारण म्हणजे बलात्काराच्या घटना ऐकल्या की पुरुषांचा कल ती समस्या सोडवण्याकडे असतो. आ.न., -गा.पै.

वारंवार घडणा-या या प्रकारच्या घटना मनाला अत्यंत क्लेश देतात. यात पीड़ित कोण आहे आणि देश कुठला आहे यानि काय फरक पडतो व्यक्ति तर माणूसच आहे. पण या परिस्थित मी काय करू शकतो. कैंडल घेवून मोर्चात जावू की whatsaap चा DP बदलू की सोशल मिडिया वर राग व्यक्त करू ? "मी माझ्या कुटुम्बामधले पुरुष, स्त्री कड़े वस्तु म्हणून बघणार नाहीं हे आणि कुटुम्बातली स्त्री, स्वत: वस्तू बनुन गैरफायदा घेणार नाहीं/घेवू देणार नाही याची खात्री करेन. मला नाहीं वाटत हे अवघड आहे कारण मी माणूस असल्याने स्वत: हे नैसर्गिकपणे पाळतो कुणावर उपकार करत नाही." नुसतं “metoo” म्हणून प्रश्न सुटणार नाहीं आणि दुस-याकडे बोट दाखवून मी जबाबदारी टाळू शकत नाही. बाकी “तुमच्या देशात” नी होणारी सुरवात आणि “दरवाजे लावून बसण्याचा” शेवट फ़क्त दुस्र्याकडे बोट दाखवून आपली उद्विग्नता दाखवणे वाटते.

In reply to by झेन

"मी माझ्या कुटुम्बामधले पुरुष, स्त्री कड़े वस्तु म्हणून बघणार नाहीं हे आणि कुटुम्बातली स्त्री, स्वत: वस्तू बनुन गैरफायदा घेणार नाहीं/घेवू देणार नाही याची खात्री करेन. मला नाहीं वाटत हे अवघड आहे कारण मी माणूस असल्याने स्वत: हे नैसर्गिकपणे पाळतो कुणावर उपकार करत नाही."
आवडले. यानंतर आपल्या मुलग्यांना स्त्रियांशी माणूस म्हणून वागायला शिकवणे आणि मुलींना स्वसंरक्षणाचे मार्ग शिकवणे हे झाले पाहिजे. एखादी दुर्दैवी घटना तरीही घडली तर ती लपवून, त्यावर पांघरूण न घालता संवाद झाला पाहिजे. प्रत्येक घरात, नात्यात संवाद असला पाहिजे हे महत्त्वाचे आहे. आरोपीना तत्काळ फाशी द्या म्हणून मोकळे होउन आपण आपल्या कामाला लागतो. कोणी असा विचार करत नाही की एखाद्या निरपराधाला त्यात शिक्षा होउ नये. एकांगी कायदे झाले आणि त्याचा फायदा घेऊन उद्या कोणी तुमच्या मुलाला अडकवले तर त्याला फाशी द्या म्हणून तुमच्याकडून मागणी होईल का? या धाग्यावर सुरुवातीला ठीकठाक असलेली चर्चा नंतर आक्रस्ताळी होत गेली. ते अपेक्षित होतेच. धागालेखिकाही सुरुवातीला चर्चेत भाग घेत होत्या नंतर त्या दिसेनाशा झाल्या. कदाचित धाग्याची हाताबाहेर जाणारी परिस्थिती पाहून असेल. प्रत्येकाने आपल्यापुरते बोला ना! ते आणि आम्ही असे सरसकटीकरण कशाला? मागे दिल्ली बलात्कारानंतर हे म्हटले होते की पुन्हा असे काही घडले की मेणबत्त्या मोर्चे वगैरे होईल आणि पुन्हा सगळे थंड होईल. तेव्हा राजकारणासाठी फायदा उठवणे ही गोष्ट विचारात घेतली नव्हती. आता तेही सगळ्यांकडून पुरेपूर होताना दिसत आहे. न्यायालयांच्या आणि पोलिसांच्या नावे बोटे मोडताना ते किती कमी संख्येने आहेत, त्यांच्यावर किती प्रकारचे किती दबाव आहेत याचा कोणी विचार करत नाही. सगळे जे जसे आहे ते तसे माझे आहे. माझा देश आहे. त्यात कितीही कमतरता असो, वैगुण्य असो. "आम्ही घरात आपसात भांडू पण बाहेरच्यांशी वागताना आम्ही १०५" हे जुने शहाणपण आता लोकांना का आठवत नाही?

In reply to by पैसा

+१ राजकारण्यांचे म्हणाल तर बहुतांश सर्वच राजकीय पक्षात स्थिती वाईट असावी. मी अगदी लहानपणी राज्याच्या गृहमंत्र्याने त्याच्या पाठीराख्यांना पाठीशी घातलेले अनुभवले आहे आणि ती व्यक्ती पुढे गृहमंत्री झाली. अनेक किस्से आहेत कोणत्याच राजकारण्यांची बाजु घेण्यात पॉईंट नाही. ३३ % सम्सदीय आरक्षणासाठी प्र्यत्न करणेही पुरेसे नाही घराणेशाहीला आणि मतदानातील वोट बॅन्क प्रकार बंद व्हावयास हवेत. राजस्थानातील एक व्यक्ती सध्या केंद्रीय मंत्रीपदावर असणे खटकते . पण वोट बॅन्क लूज न करणे प्रत्येक पक्ष करत आला आहे. मला वाटते हा विषय सिंहासन या सुपरिचीत मराठी ग्रन्थातही चर्चीत आहे.

In reply to by पैसा

+१.............. नूसता भीती, हतबलता, सन्ताप येवून काहिच होणार नाहिये. भावनिक स्वातंत्र्य शिकवणे खूप महत्वाचे आहे. स्त्री नेच स्त्री ला मदत करायला हवी, judgemental न होता.

In reply to by जूलिया

स्त्री नेच स्त्री ला मदत करायला हवी, judgemental न होता.
लाख वेळा सहमत. आणि या प्रक्रियेत पुरुषांनी स्त्रियांसोबत खांद्याला खांदा लावून भक्कम उभे राहावे.

पुन्हा पुन्हा चुकतेय. धागा स्त्रीचा आहे, म्हनून कुणीच सपोर्ट करत नाहिये. आअम्ही सगळ्याच जणी डॉक्टर खर्‍या.नी नमूद केलेली भीती, हतबलता, सन्ताप अनुभवतोय. तुम्ही समस्या सोडवण्यावर चर्चा भारताबाहेरील लेखिका विरुद्ध भारतातील घटना इकडे नेलीत. आअमच्या मनात , आमच्या देशात कुठल्याही क्शणी आम्ही सुरक्शित नाही ह्याब द्दल जे वाटते ते तुमच्या प्॑र्यन्त पोचतच नहिये.

In reply to by nanaba

@nanaba आपल्यावर बलात्कार होऊ शकतो हि भीती देशातीत आहे. (जगातील प्रत्येक देशातील स्त्रीच्या अंतर्मनातील असलेली भीती). जिथे जितकी जास्त यौनशुचिता तितकी भीती जास्त. आणि या भीतीतुन ८० वर्षाची स्त्री सुद्धा सुटलेली नाही. म्हणूनच मी ८ ते ८० हे वय लिहिले आहे (अर्थात ८ वर्षापेक्षा लहान मुलीला बलात्कार म्हणजे काय हे समजतच नाही)

In reply to by nanaba

आअम्ही सगळ्याच जणी डॉक्टर खर्‍या.नी नमूद केलेली भीती, हतबलता, सन्ताप अनुभवतोय. तुम्ही समस्या सोडवण्यावर चर्चा भारताबाहेरील लेखिका विरुद्ध भारतातील घटना इकडे नेलीत. आअमच्या मनात , आमच्या देशात कुठल्याही क्शणी आम्ही सुरक्शित नाही ह्या ब द्दल जे वाटते ते तुमच्या प्॑र्यन्त पोचतच नहिये.
अहो मॅड म , भारतात होणार्‍या अत्याचारांबाबत मी स्वतः सुद्धा मागे मिपावर लिहिले आहे याचा वर उल्लेख केला आहे ते काय काही ना पोहोचता शो पीस म्हणून लिहिले होते , काही शेंडा बुडुख ? स्त्री समस्या ते कायदे बरेच लेखन आहे माझे मिपावर . - अगदी मेघालयतील स्त्रीला पोषाखावरून दिल्ली क्लब बाहेर काढले ते तृप्ती देसाईंचे आंदोलन चालू असताना शनी मंदिर प्रवेशाची बाजू उचलून धरली आहे ते मनुस्म्र्तीतील स्त्री विषमते बद्दलही आवर्जून लिहिले आहे . तर त्याबद्दलही मी लिहिले आहे -मंदिरात स्त्रियांना पो शाखा सक्ती नसावी वादलो आहे शाखा सक्ती असू नये या बद्दल डॉ खर्यांशी वादलो आहे , आणि स्त्रियांच्या बाजूने मिपावर अनेक वेळा वादलो आहे . स्त्रिया नां जे वाटते पर्यंत पोहोचत नाही ह्या दाव्याला आपल्या कडे नेमके काय आधार आहेत ? दाव्याला काही बूड आहे की नाही ? आणि केवळ भीती घालू नका सुरक्षे बद्दल विचार करा हा रचनात्मक विचार तुमच्या पर्यंत पोहोचतोय कि नाही ? इतर देशातील स्त्रियांच्या वेदना तुमच्या पर्यंत पोहोचतात कि नाही ? माझ्या पर्यंत इतर सर्व देशातील स्त्रियांच्या वेदना पोहोचू शकता असतील तर भारतीय स्त्री बद्दलच्य वेदना पोहोचत नाहीत हा जावई शोध आपण परस्पर कसा काय लावता ? या बद्दल सर्टिफिकेटची माझ्या कडुन अपेक्षेत नेमका पॉईंट काय आहे ? त्या पिरा ताई म्हणतात गुगल शोधून माहिती देतोय पण त्याने परदेशातील वस्तुस्थिती परदेशी स्त्रीच्या वेदनांचे गांभीर्य कसे कमी होते ? बाया द वे माझे ज्ञानकोशीय लेखन वाचन आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे वाचन अत्यंत जुने आहे . चिलीच्या चर्च मधील स्त्रियांवरील अन्याय हा हा धागा पाहिल्या नंतर वाचलेला नसतो तो आधीच वाचून झालेला असतो . ओमानच्या पोलीस दलाचा मी अतिथी राहून आलेला असतो तरीही त्यान्चे खाल्ले म्हणुन आन्धळी भूमिका घेत नाही. मी पिराताईंना त्या च बरोबर आहेत याचे सर्टिफिकेट कालच दिले आहे ते आपल्या प्रमाणे इतरांनाही ज्यांना हवे त्यांनी घेऊन जावे . असो

In reply to by माहितगार

हे पहा माझ्या धाग्यावर salishi sabha खाप आणि जात पंचायत मी वर उल्लेख केलेल्या पश्चिम बंगाल मधील एका आदीवासी स्त्रीवरील सामुहीक अत्याचाराच्या केसचा उल्लेख केला आहे. त्यावर केवळ पैसा ताईंचा प्रतिसाद आहे. मी उपस्थित केलेल्या प्रतिसादाची तारीख आणि त्याच तारखेच्या आसपास उर्वरीत चर्चेत सहभागी माननीय सदस्यांची नावे पहा. आताचे सोईस्कर मापदंड किती खुजे आहेत आपण कसे केवळ टिव्हीच्य बातम्यांनुसार रिअ‍ॅक्ट होतो हे लक्षात येण्यास फारसा वेळ न लागावा. पण एका माननीय सदस्या महोदयांनी म्हटलेच आहे धागा प्रतिसाद लेखक स्त्री असेल तरच कनेक्ट येतो , अत्याचार झालेल्या व्यक्तींशी देणे घेणे नसावे . अजून कुठे खीस पाडायचा ? असो चालायचेच .

एकन्दरीत भारताबाहेर सेफ जागी पोहोचू शकलेल्या इंडियन ओरिजिन नागरिकांनी आहे तिथेच कायम सेफ राहावं. उगीच भारतात परत येऊन जिवाला जोखमीत टाकू नये असं कन्क्लूजन करता यावं.

थेट लिहायचं टाळत होते ते लिहीतेच. माहितगार, गापै आणि इतर काही यांचा सात्विक संताप समजला. कोणतं सोल्युशन शोधताय? स्त्री हे सॉफ्ट टार्गेट आहे, काही प्रमाणात असणार. त्यामुळेच सक्षम राज्य आणि न्यायव्यवस्थेचा तिला आधार वाटतो. लोकशाही देशात ही व्यवस्था नामक काही चीज असते. ती कुठे हरवलीय ते शोधा. कठुआ इथल्या घटनेत वकीलांनी आरोपींवर गुन्हा दाखल होताना घातलेला हैदोस थोर वाटतोय का? का, जगात असंही कुठे कुठे होतं त्याचीही आकडेवारी फेकणार आहात? भले ते निरपराध असतील , मग न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का वकीलांचाच? हे धोकादायक नाही वाटत? आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा निघणे त्यात राज्यातील दोन मंत्र्यांनी सहभागी होणे हे व्यवस्थेचे काय बारा वाजलेत हे दाखवतं आणि माझ्या दृष्टीने हे जास्त भीतिदायक आहे. (प्रकरण फार गाजल्यावर त्यांना राजीनामे द्यावे लागले ते गाजलं नसतं तर या मंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात आजून काय काय केलं असतं?) उन्नावमध्ये पिडीतेच्या वडिलांचाच पोलिस कोठडीत झालेला मृत्यू, हे माझ्या दृष्टीने जास्त धोकादायक आहे. कुठली उदाहरणं देताय? कुठेय ते सुशासन? (भले गेली साठ वर्षही ते विजनवासातच होतं असं मानूया) कुणाची पाठराखण करताय? का, कश्यासाठी? कुठे नेताय विषय? घाणेरड्या गुन्ह्याला, गुन्हा करणार्‍याला राज्यव्यवस्थेत कळीच्या पदावर असणार्‍यांनी पाठीशी घालायचा, उघड गुंडागर्दीच्या जोरावर वाचवायचा प्रयत्न करणं हे फार फार धोकादायक नाही वाटत का? आणि या अश्या गोष्टी माझ्या देशात घडाव्यात हे पुरेसं वेदनादायक नाही का? अश्यावेळी इतर देशातही महिलांवर अत्याचार होतात, उघड खून पडतात ह्याची भली थोरली आकडेवारी वाचून आम्ही मेरा देश महान गाणं गात बसायचं का? गुन्हा हीणकस आहेच पण तो करणार्‍याला निव्वळ गुंडागर्दीच्या जोरावर वाचवणारे जास्त गुन्हेगार आहेत आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या त्याची तीव्रता कमी दाखवण्याचे प्रयत्न करणारेही.

In reply to by अंतरा आनंद

एक मिनीट इथे कुणीही कशाची पाठराखण करत नाहीए . हा गोड गैरसमज डॉक्यातून लौकरात लौकर काढून टाकावा हि नम्र विनन्ती

In reply to by माहितगार

एक मिनीट इथे कुणीही कशाची पाठराखण करत नाहीए .
याला अनुमोदन, वरही मी हेच विचारले आहे कि एखादा (कोणाचाही) प्रतिसाद समर्थनार्थ असेल तर तो दाखवून द्यावा.

In reply to by बिटाकाका

हो ना, आणि सोल्युशन कसले हुडकताय म्हणजे? सक्षम न्यायव्यवस्था हा फक्त सॉफ्ट टार्गेट असल्याने स्त्रियांनाच नव्हे तर सर्वच गरीब, पीडीत, शोषित, पापभिरुंना हक्काचा न्याय मार्ग वाटतो ह्यात वेगळे काही नाही. किंबहुना ह्या सर्वानाच का वाटतो हे महत्त्वाचे आहे. ह्या सर्वांवरचे अन्याय, अत्याचार, शोषण हे काही नवीन नाही पण त्यावरचा मार्ग आपल्यालाच काढावा लागेल ना? न्यायव्यवस्था ही किती सक्षम आहे, ती कशी स्व समर्थ होईल हे पाहणे महत्वाचे आहे. झुंडशाही, अधिकार, पैशाची मस्ती, राजकीय फायदे ह्या सर्वांपेक्षा न्यायव्यवस्था परे असली पाहिजे. उलट ह्या सर्वांना न्यायव्यवस्थेचाच धाक असला पाहिजे. आपापल्या सोयीने कायदा वाकवणारा प्रत्येक जण गुन्हेगारच असतो. लोकशाही, न्यायव्यवस्था, दंडव्यवस्था ह्या काही समाजापेक्षा वेगळ्या नाहीत. भले स्त्रीपुरुषांसाठी काही कायदे वेगळे असतील पण अंतिमतः माणुस हे सर्वोच्च मुल्य मानून कायदे तयार करुन त्याची सर्व निरपेक्ष अंमलबजावणी होणे हेच समाजासाठी हितकर आहे. हे करताना स्त्री/पुरुष, गरीब/श्रीमंत, सबल/दुर्बल असा भेद न करता जे आतापर्यंत झालेय ते आपणच केलेय, होतेय त्यामध्ये पण आपला सहभाग होता आणि जे काही करायचेय ते आपल्याहातूनच होणारे इतका विश्वास असला तरी बस्स. तात्पुरता फायदा पाहून स्वताडनापेक्षा कठोर स्वपरिक्षण आणि सुजाणत्व अंगी बाण्वणे व ते आपण जिथे बदल घडवू शकतो त्या येणार्‍या पिढीत जास्त रुजवणे जास्त महत्वाचे आहे. निदान ह्या गोष्टींसाठी तरी स्त्रियांचा रोल खूपच महत्वाचा आहे.

In reply to by अभ्या..

न्यायव्यवस्था ही किती सक्षम आहे, ती कशी स्व समर्थ होईल हे पाहणे महत्वाचे आहे. झुंडशाही, अधिकार, पैशाची मस्ती, राजकीय फायदे ह्या सर्वांपेक्षा न्यायव्यवस्था परे असली पाहिजे. उलट ह्या सर्वांना न्यायव्यवस्थेचाच धाक असला पाहिजे.
हेच म्हणतेय मी. पण 'इथेही असं होतं तिथेही असं होतं', ह्या सगळ्यामध्ये ही चर्चा भलतीकडेच जाते आहे.

In reply to by अंतरा आनंद

ती चर्चा कोणीही भलतीकडे घेऊन गेलेलं नाही हे नम्रपणे नमूद करतो. धागाकर्त्याने मुळात भारतात जाऊ नका इथूनच सुरुवात केलेली आहे आणि म्हणून इतर लोक हा भारत आहे म्हणून असे आहे असे नसून इतर देशातही घडते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे परत एकदा वरपासून धागा आणि प्रतिसाद (क्रमाक्रमाने) वाचा असे सुचवेन म्हणजे लक्षात येईल कि सगळे मुद्दे कसे एकमेकांशी निगडित आहेत. --------------------------------------- राहता राहिला प्रश्न व्यवस्थेचा, लोकशाहीचा तर मोर्चे काढणारे जोपर्यंत - गुन्हा सिद्ध न झालेल्या आरोपींसाठी लोकशाही मार्गाने मोर्चे काढत आहेत तोपर्यंत त्याला आक्षेप व्यवस्था कोणत्या आधारावर घेईल? कृपया इथे मुद्दा नीट समजून घ्यावा, हे आरोपींचे समर्थन नाही. न्यायालयाने फाशी दिलेल्या, राष्ट्र्पतीने दयाअर्ज फेटाळलेल्या गुन्हेगारांसाठी सुद्धा इथे मोर्चे निघतात आणि ते नक्कीच गैर आहे असे माझे स्पष्ट मत आहे. पण लोकशाही मार्गाने मोर्चे काढले तर त्रास काय असा प्रश्न विचारला जातो. इथे अजून त्यांचे गुन्हे सिद्ध व्हायचे आहेत. ते गुन्हेगार असतील तर ते नक्की सिद्ध व्हावं आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी हि कुठल्याही सामान्य माणसाची मनोमन इच्छा असणारच, याबद्दल शंका बाळगू नये. पण म्हणून कुठल्याही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये हेही व्यवस्थेने पाहणे गरजेचे आहे. गुन्हेगारांच्या कायदेशीर कारवाईत कोणी आड येत असेल तर कायदा त्याची काळजी घेत आहेच. ----------------------------------------- कठोर शिक्षांमुळे समाज बदलेल याबाबत मी वैयक्तिकरित्या साशंक आहे. माझ्यामते तरी प्रत्येकाने स्वतःच्या घरातील स्त्री-पुरुष यांना याबाबीतीत जागरूक आणि सुसंस्कृत करणं हा वर आलेला उपाय जास्त परिणामकारक वाटतो.

In reply to by गवि

हेच आहे ना , तोंड देखले समर्थ करुन प्रत्यक्षात मनात वेगळे विचार आणावेत नाही का ? चालु द्या !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

In reply to by माहितगार

अहो.. विनोदनिर्मितीचा एक क्षीण प्रयत्न करुन पाहिला बस्स. पण तो विनोद चोच वासून उताणा पडला.. इ.मृ.शां.दे.

In reply to by अभ्या..

१ ) अभ्या नव्हे अभ्याराव म्हटले आहे . आदर यथास्थित आहे . २) पिंक टाकली गेली वाटळ्याचे कारण उपप्रतिसाद देऊन नमुद केले आहे.

In reply to by अंतरा आनंद

@अंतरा ताई लोकशाही देशात ही व्यवस्था नामक काही चीज असते. ती कुठे हरवलीय ते शोधा. आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा निघणे त्यात राज्यातील दोन मंत्र्यांनी सहभागी होणे हे व्यवस्थेचे काय बारा वाजलेत हे दाखवतं आणि माझ्या दृष्टीने हे जास्त भीतिदायक आहे. सलमान खान काळवीट प्रकरणापासून ते झोपलेल्या लोकांकर गाडी चालवून त्यांना जीवे मारण्याच्या खटल्यात आरोपी होता तेंव्हा हि असेच मेणबत्त्या लावून बॉलिवूड मधील गणंग आणि उदारमतवादी लोक मोर्चे काढले होते तेंव्हा काही कुणाचा संताप अनावर झाल्याचे वाचले नव्हते किंवा लोकशाहीला खतरा असल्याचे वाचले नव्हते. आणि याच सलमान खान ने याकूब मेमनला पाठिंबा दिला होता हे हि हेच लोक विसरले होते. http://www.india.com/showbiz/salman-khan-defends-yakub-memon-morcha-ous… https://www.thequint.com/news/india/under-attack-salman-khan-retracts-h… शेवटी माणसे आपल्याला पाहिजे तोच अर्थ काढत असतात हे खरे. आणि याचा राजकारणी पुरेपूर फायदा घेतात हेही तितकेच खरे.

In reply to by सुबोध खरे

काळवीट प्रकरण आणी सदर अत्याचार प्रकरणाची ग्रॅव्हिटी समान आहे का? घटनेच्या पालनाची शपथ घेतलेल्या लोकप्रतिनिधींनी रेपच्या आरोपींना अटक होऊ नये, साधी केसदेखिल रजिस्टर होऊ नये यासाट्।ई मोर्चे काढणे, प्रशासनावर दबाव आणणे हे लोकशाहीला खतरा मध्ये येत नाही का?
असेच मेणबत्त्या लावून बॉलिवूड मधील गणंग आणि उदारमतवादी लोक मोर्चे काढले होते
याचा काही पुरावा? की आपलं असंच ठोकून दिलंत? सदर प्रकरणात हिंदूत्ववादी संघटना आणी जम्मुतील भाजपच्या आमदारांनी जे केलं त्याला सुद्धा समर्थन करायचे असेल तर अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे.
तेंव्हा काही कुणाचा संताप अनावर झाल्याचे वाचले नव्हते किंवा लोकशाहीला खतरा असल्याचे वाचले नव्हते.
तुम्ही सिलेक्टिव्ह रीडींग करता त्यात बाकीच्यांचा काय दोष? त्यावेळीदेखिल सलमानच्या विरोधात प्रचंड रोष सोशल मिडियात दिसला होता. न्यायालयाच्या निकालातील कमजोर मुद्दे दाखवून देणारे वृत्तांकन कित्येक माध्यमातून झाले होते.
आणि याच सलमान खान ने याकूब मेमनला पाठिंबा दिला होता हे हि हेच लोक विसरले होते.
झालं आणलंत याकुब मेमनला? आता कुठल्याही प्रतिवादाला देशद्रोही ठरवण्याची सोय झाली. नाही?

In reply to by पुंबा

याकूब मेमन ला न्यायालयाने खालील गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले होते आणि ते खालच्या न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत ग्राह्य धरले गेले होते म्हणूनच त्याला फाशी झाली होती. संशयाचा फायदा सुद्धा न देता ते सुद्धा रात्री ३ वाजता सर्वोच्च न्यायालय चालू ठेवून . Criminal conspiracy to carry out terrorist act and disruptive activities, and murder -- Death Aiding and abetting and facilitating in a terrorist act -- Life imprisonment Illegal possession and transportation of arms and ammunition --- Rigorous imprisonment for 14 years Possessing explosives with intent to endanger lives ---- Rigorous imprisonment for 10 years तेंव्हा याकूब मेमन हा दोषी आणि देशद्रोहीच आहे आणि त्याला पाठिंबा देणारा कोणीही माणूस हा देशद्रोहाच्या गुन्ह्यात सामील आहे असेच मझे स्पष्ट मत आहे. बाकी गुन्ह्यांच्या गंभीरतेचा आणि मोर्चांचा संबंध आपण लावला आहे. आणि तेच बॉलिवूड मधील गणंग तेंव्हा "लोकशाहीला धोका" म्हजणून टाहो फोडत होते त्यांनी तर आता लोकशाही मृत जाहीर करून तिचे श्राद्धहि घालायला पाहिजे. की आपलं असंच ठोकून दिलंत? असंच ठोकून दिलं समजा. http://zeenews.india.com/people/salman-khan-convicted-b-town-celebs-ext… https://tribune.com.pk/story/1678105/4-salman-khans-jail-sentence-sends… सध्या त्याला ५ वर्षाची शिक्षा झाली आहे तरी हे बोकड त्याला "SUPPORT"करत आहेत. त्यांच्या दृष्टीने कायदा न्यायालये यांची काहीच किंमत नाही. पैसे हेच सर्वस्व असणाऱ्या संस्थेबद्दल( बॉलिवूड) मला तिळमात्र आदर नाही. In his book Being Salman Khan, journalist and writer Jasim Khan investigates the incident in some detail, but finally decides the only thing bhai is really guilty of is his own bad boy image. Khan the writer offers up several theories to bolster Khan the actor's innocence – Salman has Pashtun ancestors, and ... https://thewire.in/culture/the-toxic-masculinity-of-salman-khan खणलं तर जुनं सुद्धा भरपूर सापडेल पण जाऊ द्या मी वरच म्हटलं आहे कि

शेवटी माणसे आपल्याला पाहिजे तोच अर्थ काढत असतात हे खरे.


In reply to by सुबोध खरे

माझ्यापुरता वाद मी इथेच थांबवत आहे कारण मूळ विषय जास्त गंभीर आहे आणि श्री पुम्बा यांच्याशी वितंडवाद घालण्याची माझी बिलकुल इच्छा नाही. त्यांचा प्रतिसाद शेवटचा असला तरी चालेल आणि मी चूक आहे असे त्यांनी म्हटले तरी चालेल. माझा अंतरा ताईंना प्रतिसाद एवढाच होता कि असे मोर्चे स्वतःच्या अजेंड्यासाठी निघत आले आहेत. त्याला घाबरून लोकशाही हरवली वगैरे म्हणण्याचे कारण नाही. अफझल तेरे कातिल जिंदा है सारख्या घोषणा भर दिल्लीत देऊनही लोकशाही एक मायक्रॉन सुद्धा हलणार नाही. आपल्या माहितीसाठी लिहीत आहे कि श्री राहुल गांधी यांच्यावर सुद्धा बलात्काराचा आरोप आहे आणि तो समाजवादी पक्षाच्या आमदाराने केलेला आहे आणि प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.श्री राहुल गांधींना अजामीनपात्र गुन्ह्यात अटक का झाली नाही यासाठी मोर्चा काढल्याचे मला तरी आठवत नाही. दुवा पाहून घ्या नाही तर परत म्हणतील असेच ठोकून दिले. https://www.firstpost.com/politics/rahul-gandhi-asks-sc-to-dismiss-base…

In reply to by सुबोध खरे

डॉक, मायनर करेक्शन ,, शेवटच्या परिच्छेदात क्रियापद आहे एवजी होता असे करुन घ्यावे . (बाकी अमुक एका =कोणत्याही अ ते ज्ञ -पक्षाचे राजकारणी धुतल्या तांदळा सारखे आहेत अशी स्थिती दुर्दैवाने भारतात नसावी असे वाटते असो.)

In reply to by कपिलमुनी

मुनीवर पुढच्या वेळी आरोप करताना माहिती पडताळून घेत चला . आपला दुवा पाहिला श्री राजीव गांधी याना आरोपातून मुक्त केले आहे हे बरोबरच आहे. मीच काय कोणीही सामान्य माणूसच काय अगदी टोकाचा त्यांचा द्वेष्टा असला तरी श्री राजीव गांधी यांनी बलात्कार केला असेल असे म्हणणार / मानणार नाही. मुळात मी आरोप केलेलाच नाही. मी त्यांच्यावर आरोप आहे आणि तो एका आमदाराने केला आहे असेच लिहिलेले आहे. हि माहीती देण्याचे कारण एवढेच कि श्री राहुल गांधींना अजामीनपात्र गुन्ह्यात अटक का झाली नाही यासाठी मोर्चा काढल्याचे मला तरी आठवत नाही. पुरोगामी, समाजवादी साम्यवादी आणि उदारमतवादी याना कुठेही "हिंदुत्व" दिसले कि काही तरी जळल्याचाच वास येतो. आणि
मग भारत कसा असहिष्णू झाला आहे याबद्दल त्यांचा टाहो फोडणे सुरु होते
यावर हि टिप्पणी होती. खाली श्री ट्रेंड मार्क यांनी लिहिलेला प्रतिसाद जसाच्या तसा देत आहे. राहुल गांधी वरही बलात्काराची केस चालू आहे म्हणल्यावर तत्परतेने कोर्टानी बाइज्जत बरी केलंय म्हणून दाखवणारे हे मात्र सोयीस्कर रित्या विसरतात की आसिफाच्या घटनेत पण पुजाऱ्यावर फक्त पोलिसांनी आरोप ठेवलेत. पण संपूर्ण देश, समस्त भारतीय पुरुष आणि हिंदू धर्म बदनाम करायला फक्त पोलिसांचे आरोपच पुरेसे आहेत नाही का?

In reply to by सुबोध खरे

कायतर गडबड हाय काय? तुमाला राहुल गांधी म्हणायचे असेल बहुतेक. **************************************** प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे यावर स्पष्टीकरण म्हणून त्यांचा दुवा असेल असे घ्या. अर्थात तुमच्या आणि ट्रेडमार्क यांच्या नुसत्या आरोपांवरून केल्या जाणाऱ्या दांभिक प्रचाराच्या मुद्द्याशी सहमत!

In reply to by अंतरा आनंद

संपूर्ण सहमत झुंडशाहीच्या जोरावर कायद्याला आपले काम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न बार असोशिएशन, हिंदू एकता मंच आणी भाजपाच्या आमदारांनी केला आहे. आज सोशल मिडियावर पाहिले तरी भाजपाचे पेड ट्रोल्स ज्या प्रकारे पिडितेवरच चिखलफेक करत आहेत, आरोपींचं निर्लज्जपणे समर्थन करत आहेत, कित्येकजन तर बलात्काराचे सुद्धा आडून आडून समर्थन करत आहेत ते तीव्र संताप आणणारे आहे. जिकडे तिकडे धर्म घुसडणारे आज इतक्या क्रूर घटनेवर सुद्धा धर्माच्या आधारे पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न्म करताहेत. शेम! शेम! शेम!

In reply to by पुंबा

हे आरोप सिद्ध करणारा सज्जड पुरावा आहे का? क्रेडिबल न्यूज चॅनेलची बातमी, एडिट न केलेले व्हिडीओ आणि फोटोशॉप न केलेले फोटो टाका.

In reply to by ट्रेड मार्क

१.
http://indianexpress.com/article/india/kathua-gangrape-jk-bjp-ministers…
२. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/kathua-ra… ३. https://qz.com/1252951/the-kathua-gang-rape-and-murder-is-a-cause-of-ce… ४. https://www.ndtv.com/india-news/kathua-rape-murder-bandh-called-by-lawy… ५. https://timesofindia.indiatimes.com/india/kathua-minor-rape-murder-lawy… फेबुवर या विषयीच्या बातम्यांवर येणार्‍या विषारी कमेंट्सची लिंक इथे देऊ शकत नाही. आपण स्वत: पहाल तर रक्त उकळवणार्‍या टिप्पण्ण्या पिडितेबद्दल, तिच्या कुटुंबावर केलेल्या आढळतील. माझ्यासाठी हा विषय राजकारणाचा नक्कीच नाही. मात्र, इथेसुद्धा ज्यांना हिंदू- मुस्लिम दिसतेय त्यांच्या माणूस असण्याबद्दल शंका वाटते एवढं नक्की..

In reply to by पुंबा

सर्व लिंक्स व त्याखालील प्रतिक्रिया वाचल्या. सर्व प्रतिक्रियांमध्ये या घटनेचा भरपूर निंदा करून गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. मग कोठे आहे पिडितेवरच चिखलफेककरत व आरोपींचं निर्लज्जपणे समर्थन? कोठे आहे बलात्काराचे सुद्धा आडून आडून समर्थन करणारे? कोठे आहेत क्रूर घटनेवर सुद्धा धर्माच्या आधारे पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न्म करणारे? जर तुम्हाला वरील लिंक्स मध्ये हे दिसले असतील तर दाखवा आणि ते १) भाजपचा, २) पेड आणि ३) ट्रोल्स आहेत हे सिद्ध करा.

In reply to by श्रीगुरुजी

पुंबा, आपला तीव्र संताप ओसरला असेल तर आपण जे आरोप केलेत त्याच्या समर्थनार्थ पुरावे द्याल का? आपण आधी ज्या लिंका दिल्यात त्यात आपण जे आरोप केलेत तसे काहीही आढळले नाही. धन्यवाद. आपला नम्र, श्री गुरूजी

In reply to by श्रीगुरुजी

पुंबमहाराजांकडे पुरावे नव्हतेच. तसंही त्यांना बलात्काराची शिकार झालेल्या मुलीविषयी काही देणंघेणं दिसत नाही. फक्त या घटनेचा वापर करून भाजपबद्दल असलेला आपला राग व्यक्त करण्याची संधी साधून घेतली. त्यासाठी अर्थातच भाजपवर खोटेनाटे आरोप करून आगपाखड करावी लागली.

In reply to by पुंबा

माझ्यासाठी हा विषय राजकारणाचा नक्कीच नाही. मात्र, इथेसुद्धा ज्यांना हिंदू- मुस्लिम दिसतेय त्यांच्या माणूस असण्याबद्दल शंका वाटते एवढं नक्की.. बरोबर आहे. पण कोण हिंदू-मुस्लिम करतंय ते दाखवा आणि ते १) भाजपचे, २) पेड व ३) ट्रोल्स आहेत हे तीनही आरोप सिद्ध करा.

In reply to by श्रीगुरुजी

अशा प्रकारे हे ही प्रकरण टिपिकल मोडवर गेलेले आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. . ठयांकस मोदीकाका, आज नाश्ता सुरेख होता. मिपा मात्र अधून मधून बंद पडू देऊ नकात. थ्यांक्स अ लॉट

In reply to by अभ्या..

जेव्हा पुंबा महाराजांनी भाजप, पेड, ट्रोल्स इ. फेकायला सुरूवात केली, तेव्हा हे होणारच.

In reply to by पुंबा

आज सोशल मिडियावर पाहिले तरी भाजपाचे पेड ट्रोल्स ज्या प्रकारे पिडितेवरच चिखलफेक करत आहेत, आरोपींचं निर्लज्जपणे समर्थन करत आहेत, कित्येकजन तर बलात्काराचे सुद्धा आडून आडून समर्थन करत आहेत ते तीव्र संताप आणणारे आहे. याला काही पुरावा? का आपलं दिलं ठोकून?

In reply to by पुंबा

ही कठुआची घटना जानेवारीमध्ये घडली, स्थानिक लोक तेव्हापासून निष्पक्ष तपासाची मागणी करत आहेत. कठुआ मधील स्थानिकांचं काय म्हणणं आहे बघा. केस CBI कडे द्यावी म्हणून लोक आधीपासून निदर्शनं करत होते पण आता आवई अशी उठवण्यात आली की बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ लोक निदर्शन करत आहेत. आता ३ महिन्यानंतर अशी काय चक्र फिरली की एकदम सगळ्यांना जाग आली? नवीन बनवलेल्या SIT ने एका पुजाऱ्याला आरोपी केल्यानंतर कलाकारांपासून ते राहुल गांधीपर्यंत सगळे एकदम ऍक्टिव्ह झाले? आश्चर्याची गोष्ट म्हणजे कठुआनंतर लहान मुलींवरच्या तितक्याच घृणास्पद अत्याचाराच्या ६ घटना भारतातच घडल्या आहेत. पण त्यातल्या सुद्धा फक्त युपी मधल्या बातमीवर फोकस केला गेला. बाकी मुलींवर झालेल्या अत्याचाराबद्दल कोणाला फारसं काही वाटलेलं दिसत नाही. याचं कारण काय असावं? असं विचारलं की फक्त सारवासारव म्हणून काहीतरी उत्तर द्यायचं की झालं. पण असिफा सोडून बाकी कुठल्या घटना, त्यात नक्की काय झालं, कोण आरोपी, कोण पीडित हे पण बहुतेकांना माहित नसेल. राहुल गांधी वरही बलात्काराची केस चालू आहे म्हणल्यावर तत्परतेने कोर्टानी बाइज्जत बरी केलंय म्हणून दाखवणारे हे मात्र सोयीस्कर रित्या विसरतात की आसिफाच्या घटनेत पण पुजाऱ्यावर फक्त पोलिसांनी आरोप ठेवलेत. पण संपूर्ण देश, समस्त भारतीय पुरुष आणि हिंदू धर्म बदनाम करायला फक्त पोलिसांचे आरोपच पुरेसे आहेत नाही का?

In reply to by ट्रेड मार्क

On February 15, Chander Prakash along with another BJP leader Lal Singh had participated in a rally organised by right-wing Hindu Ekta Manch to demand the release of a special police officer, Deepak Khajuria, who is accused in the rape and murder case.
हे वाचा. पोलिसास सोडून द्या यासाठी काढलेला मोर्चा होता तो.
https://thewire.in/politics/hindu-ekta-manch-bjp-protest-support-spo-ar…
हे आरोपी पोलिसाच्या समर्थनार्थ काढलेल्या तिरंगा मार्चबद्दल.

In reply to by पुंबा

घटना जानेवारीत घडल्यानंतर लगेच बलात्कार व खुनासाठी एका १५ वर्षीय मुलाला अटक झाली होती. त्याचे पुढे काय झाले ते समजलेले नाही. http://m.greaterkashmir.com/news/jammu/15-year-old-boy-accused-of-murde…

In reply to by पुंबा

वायर हे घटना ट्विस्ट करून बातम्या देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही वायर सोडून अजून कोणाच्या बातम्या बघितल्यात? ही बातमी वाचा. तिथल्या लोकल पेपरने दिलेली आहे आणि तुमचा पुढचा संशय फिटवण्यासाठी बातमीदाराचं नाव बघा. हिंदू एकता मंचमध्ये आणि सगळ्या निदर्शनांमध्ये भाजप, काँग्रेस सहित सगळ्या पक्षांचे लोक सामील होते. सगळ्यांची मागणी एवढीच आहे की सीबीआय चौकशी व्हावी. कोणीही गुन्हेगाराला सोडून द्या म्हणून म्हणत नाहीये. त्या देवळाचे फोटो, व्हिडिओ आंतरजालावर उपलब्ध आहेत. फक्त एक खोली असलेल्या देवळाला तीन दारं, त्यातली दोन अर्धी जाळी असलेली, बंद न होणाऱ्या खिडक्या आहेत. कोणाला लपण्यासाठी/ लपवण्यासाठी योग्य जागाही नाहीये. त्यात ३ गावातले लोक रोज सकाळ संध्याकाळ पूजेसाठी आणि दर्शनासाठी येत असताना, त्या मुलीला ३ दिवस देवळात कोंडून ठेवणं आणि अत्याचार करणं कसं शक्य आहे? शेकडो लोकांपैकी कोणालाच ना आवाज आला ना मुलगी दिसली. नंतर त्या मुलीला मारून देवळापासून थोडं दूर आणून टाकलं, ते पण कुठे? तर स्वतःच्याच घरापासून १० फुटावर? म्हणजे एवढं ३ दिवस शेकडो लोकांपासून लपवून ठेवलं आणि मग मृतदेह टाकायची वेळ आली तर स्वतःच्या घराजवळ टाकला? त्यावर कडी म्हणजे आरोपींमधला मुलगा गुन्हे घडले त्यावेळेला कठुआ पासून ११०० किमी दूर परीक्षा देत होता. याचे साक्षीदार प्रोफेसर आणि विद्यार्थी आहेत पण त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. हॉल तिकीट आणि उत्तर पत्रिका दाखवल्या तर दुसरंच कोणीतरी परीक्षा देत होता असा आरोप होतो? यात तुम्हाला काहीच संशयास्पद वाटत नाही? घडलेली घटना अतिशय घृणास्पद आणि संतापजनक आहे, जो दोषी असेल त्याला चौरंगा करून म्हणजे हातपाय तोडून सोडून द्यावे अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. फाशी देऊन एवढं पटकन यातनांतून सुटका का करावी? पण निष्पक्ष तपास होऊन गुन्हेगार कोण हे तर सिद्ध होउ दे. त्याच्या आधीच संपूर्ण देश आणि हिंदू धर्माला/ लोकांना बदनाम का करताय?

In reply to by ट्रेड मार्क

जानेवारीत घटना घडल्यानंतर लगेचच एका १५ वर्षीय मुस्लिम मुलाला पकडले होते. नंतर तपासणीत त्याचे वय १९ असल्याचे दिसले होते. त्या मुलाचे पुढे काय झाले ते अजून समजले नाही.

एवढी चर्चा इथे करण्यापेक्षा माहितगार यांनी भारत हा स्त्रियांसाठी अवघड बनत चाललाय यावर काहीच प्रतिक्रीया दिलेल्या नाहीत याचं आश्चर्य वाटतं. (मी तीथेही व्यक्त होणारच आहे.) केवळ 5-6 प्रतिसाद आहेत त्यावर.

अलिकडे बलात्कारांच्या संख्येत आणि त्यातील निर्घृणपणात जी वाढ झालेली दिसून येत आहे, त्यामागचे एक महत्वाचे कारण जे असावे असे वाटते, त्याकडे फारसे कुणी लक्ष दिल्याचे दिसत नाही. हल्ली प्रत्येकाच्या खिशात मोबाईल, त्यात अगदी स्वस्त इंटरनेट आणि त्यामुळे केंव्हाही, कुठेही, कितीही पोर्न बघण्याची झालेली सोय, यामुळे शाळकरी मुलापासून ते तथाकथित थोर आदरणीय स्वामी बापू इ. पर्यंत पुरुषांमधील बेछूट सुटलेली कामांधता ... हे एक महत्वाचे कारण असावे. काट्याने काटा निघतो तसे आधुनिक तंत्राज्ञानानेच यावर मात करण्यासाठी सरकारने नेट संबंधी जास्तीत जास्त कठोर निर्बंध घालणे अगत्याचे आहे. भलेही यामुळे तथाकथित व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आल्याची हाकाटी पिटली जावो.

सरकारने नेट संबंधी जास्तीत जास्त कठोर निर्बंध घालणे अगत्याचे आहे. नका हो असा अत्याचार करू ,'त्या'साठीच तर अनलिमिटेड नेटपॅक घेतो की राव आम्ही. जियो और जिने दो.

In reply to by टवाळ कार्टा

मारिया बाईंनी अतिशय मुद्देसूद मांडलं आहे. काही लोकांचा भारताला बदनाम करायचा अजेंडा आहेच आणि आपण एक सामान्य माणूस म्हणून त्याला किती बळी पडायचं हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. नशीब हा ब्लॉग एका गोऱ्या आणि त्यातून स्त्रीने लिहिलाय. पण आता लोक तिच्यावरही आरोप करू नये म्हणजे झालं.

In reply to by टवाळ कार्टा

मारिया बाईंनी अतिशय मुद्देसूद मांडलं आहे. काही लोकांचा भारताला बदनाम करायचा अजेंडा आहेच आणि आपण एक सामान्य माणूस म्हणून त्याला किती बळी पडायचं हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. नशीब हा ब्लॉग एका गोऱ्या आणि त्यातून स्त्रीने लिहिलाय. पण आता लोक तिच्यावरही आरोप करू नये म्हणजे झालं.

John Swinton,  former Chief of Staff of the most powerful and prestigious newspaper on earth, The New York Times, when asked to give a toast to the "free press" at the New York Press Club stated: "There is no such thing, at this date of the world's history, in America, as an independent press. You know it and I know it. There is not one of you who dares to write your honest opinions, and if you did, you know beforehand that it would never appear in print. I am paid weekly for keeping my honest opinion out of the paper I am connected with.  Others of you are paid similar salaries for similar things, and any of you who would be so foolish as to write honest opinions would be out on the streets looking for another job. If I allowed my honest opinions to appear in one issue of my paper, before twenty-four hours my occupation would be gone.  The business of the journalists is to destroy the truth; to lie outright; to pervert; to vilify; to fawn at the feet of mammon, and to sell his country and his race for his daily bread. You know it and I know it and what folly is this toasting an independent press? We are the tools and vassals of rich men behind the scenes. We are the jumping jacks, they pull the strings and we dance. Our talents, our possibilities and our lives are all the property of other men.  *"We are intellectual prostitutes."*

In reply to by पैसा

मीडियाच्या रोल बद्दल वरच्या पत्रकारिय प्रांजळ कबुलीस हसण्याचा स्मायली द्यावा कि खेदाचा हे ठरवणे कठीण आहे . ट. का. नि दिलेला मारियांच्या ब्लॉगचा दुवा मुख्यत्वे तुलनेच्या संदर्भाने असल्याने एका घटक वगळता https://mariawirthblog.wordpress.com/2014/01/27/why-this-focus-on-rapes-... बाकी मत या चर्चेत व्यक्त करणे सयुक्तिक असावे . सालेक्टीव्ह बातमीदारी मागे काही अजेंडा असला तरी सिद्ध करणे तसे जिकिरीचे असते . कारण मूळ कारणातही तथ्य असते , माध्यमे केवळ कोणत्या बातमीला वर आणायचे त्यावर खेळतात . भारतात माध्यमांना पहले लक्ष वाचक वर्ग श्रोता वर्ग टिकवण्याचा असतो आणि मालकांच्या जाहिराती उत्पन्नाची काळजी घेणे आणि सोबत जमले तर पत्रकार आपले व्यक्तिगत हितसंबंध आणि मतप्रवाह जपत असतात . दक्षिण आशिया आणि विकसनशील संसदीय लोकशाहीत दुसरा सरळ प्रभाव सत्तेतील राजकीय पक्ष मग कॊणताही असो कायदा आणि सुव्यवस्था आणि भ्रश्टाचार या दोन पैकी एका समस्येवर रान उठवण्याची संधी सत्ताधारीपक्षाअंतर्गतच बऱ्याचदा पाहिली जाते कारण लक्ष्य अकार्यक्षम ठरवून मंत्री/मुख्यमंत्री / पंतप्रधान बदलण्याचे असते . या अंतर्गत गटबाजीला साथ देण्यात विरोधीपक्षांचा लॉंग टर्म फायदा असतो . सोबतीला पडद्या मागे बर्याचदा कोट्यावधीची कंत्राटे नेमकी कोणत्या गटा च्या कंत्राटदाराला मिळणार यावर बरेच हिशेब असतात आणि हे साटेलोटे ना सिद्ध करता येते ना जाणते समोर येते . हा देशांतर्गत मामला झाला . परदेशातील शत्रूराष्ट्रांचे तुमची व्यवस्था ढळमळीत करण्याचे लक्ष्य असते जसे रशियाच्या पुतिनने अमेरिकेत ढवळाढवळ करून जशास ताशाचा प्रत्यय दिला हे शत्रूराष्ट्रांचे कारनामे वेगळे . पण युरोमेरीकी विकसित देशांचे सामरिक आणि त्यांच्या संरक्षण आणि व्यापारी आस्थापनांचेही हितसंबंध असतात त्यावर दुसर्या देशातील ढवळाढवळ योग्य वेळी अस्थिरता आंदोलने छेडून केली जाते (आताशा शीत युद्धातल्या काळाप्रमाणे सीआयए आणि केजीबी तेवढा सरळ हस्तक्षेप करण्याचे अतिरेकी कारवायांना समर्थन देण्याचे टाळतात पण तरीही सिरीयात होणाऱ्या हस्तक्षेपासारखे प्रकार होतातच पण आताच्या काळात हे अपवाद झाले ) आता नव्या काळात सरळ हस्तक्षेप तर करता येत नाही मग एन.जी. ओ नामक प्रकरणे हाताशी धरली जातात . (आता मिपावरच महिन्याकाठी दीडलाख पेकेज ची एका धाग्यावर चर्चा चालू आहे . त्याचे करते करविते कोना आहेत फन्डिंग कुठंन येते याची काहीही माहिती नाही -हे एका जस्ट उदाहरण म्हणून काही अनुचित असेलच असे नाही ) एनजीओचे फँन्डीन्ग परदेशातून कुठून तरी होता असते मल्टि नॅशनलचे अप्रत्यक्ष लागे बांधे असतात . सोईचे लोक पुढे आणले जातात हि मंडळी बातम्या लिहिण्यात अथवा बातमीदारांशी संवादात प्रशिक्षित असतात . मग आपल्याला अपेक्षित नकारात्मक बातम्या परदेशी मीडियात छापून आणल्या कि संबंधित कॉज साठी यरोमेरिकाना माणूस क्रेडिट कार्डावरून पैसे देतो तर शिवाय मल्टीनेशनल पैसा मागे उभा ठेवतात देखाव्यासाठी थोडाफार स्थानिक पैसाही उभा केला जातो . या समाजसेवी एनजीओनाही पैसे सोयीच्या बातम्या पसरवून फन्डिंग मिळवण्याच्या टेक्निकची सवय होऊन व्हीसीएस सर्कल तयार होते . पण यातील एनजीओत जॉईन होणारे बरेचसे पब्लिक लौकराच ऐय्याशी आणि उंची कार उंची हॉटेले विमान प्रवास उंची जीवनशैली आणि बऱ्याचदा अगदी भ्रष्टाचारासही सरावते याचा एका फायदा असा कि थातुरमातुर कामे आणि परदेशी मीडियासाठी चकचकीत रिपोर्ट पलीकडे काही होत नाही तेवढा सरकारलाही त्रास कमी :) मीडियाच्या प्रभावाखाली बरेच स्थानिकही काळाची उबळ आलेल्या मानसिक अवस्थेस पोहोचतात , निवडणूक आली कि नवी सरकारे नित्य नवे डाव !!

काही तरी चुकतंय असं वाटत होतंच... आता ही बातमी .. आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी. शिवाय हे असं नाव , ओळख जाणिवपुर्वक उघड केली त्यांनाही शिक्षा व्हायला हवी.

सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
हे काही पटलं नाही.

In reply to by सुबोध खरे

हे तर आहेच, पण सुरुवातीचा... मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.' ...हा सगळा मजकूर विचारात घेतला तर धागाकर्तीने कोर्टाच्या प्रक्रियेचा उपहास केला आहे आणि तिच्या मते कोर्टाच्या प्रक्रियेपेक्षा, 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?', ही प्रक्रिया जास्त योग्य आणि न्याय्य आहे असे सूचीत केले आहे. भावनेच्या भरात इकडे बहुतेक जणांचे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. :(