Skip to main content

मातिच्या मुंग्या

लेखक अडाणि यांनी शनिवार, 07/03/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
मातिच्या मुंग्या का मुंग्यांची माती मला कळले नाही आजपण... जाता जाता वेळ गेला कळले नाही कधी सरले बालपण... उचलली जीभ लावली टाळ्याला बोलू नका तूम्ही काहीपण... मूंग्या ही गेल्या आणि जीभ ही गेली हाती उरले फक्त वेडेपण... का म सु (काही महत्त्वाच्या सुचना) १. सदरची कविता आंतरजालावर इतरत्र आढळ्ल्यास (शक्यता कमी तरीपण) त्या कवी म्हणवणार्‍याने चोरली आहे असे समजावे. २. ज्यांना विडंबन करायची हौस आहे त्यांनी क्रूपया ह्या कवितेचा वापर करावा... म्हणजे इतरांना त्रास होणार नाही. ३. ज्यांना विडंबन करायची हौस नाही त्यांनी ही कविता विडंबित समजून मुळ कविता तयार करवी. ४. वरील दोन्ही प्रकारात जे मोडत नाहीत (२ आणि ३) त्यांनी कवितेच्या पुढील ओळी लिहाव्यात. - अडाणि.
लेखनविषय:

वाचने 2455
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कविता समजली नाही. थोडे समजावून सांगा.कदाचीत लक्षात न आलेला आशय समजायला सोपा जाईल.

मातिच्या मुंग्या का मुंग्यांची माती मला कळले नाही आजपण... मला पण कळले नाही. जरा समजाउन सांगा.

कविता वाचुन मतीची माती झाली माझ्या ! काहि छुपे गुढ गर्भीत अर्थ दडले आहेत काय ह्यात ? खोलगट आणी पसरट टिकाकार ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

मलाबी असंच वाटय ! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

अवांतर : तुम्हाला सतिश चावला माहीत आहे का ? ;-) कृपया हळूवारपणे घेणे :-)

मुंग्यानी केल तुम्हाला वेड पण मातीवर लिहा काहीपण बालपण गेल तरी शाबूत आहे शहाणपण! मस्त मुक्तक आहे! क्रान्ति