Skip to main content

वास बापूंचा

लेखक रानरेडा यांनी रविवार, 08/04/2018 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाआधी एक काळ असा आला कि मी आणि भाऊ दोघेही मुंबईबाहेर नोकरी करीत होतो आणि आई काहीशी एकटी झाली होती. त्याच वेळी बिल्डींग मध्ये अनेक बायका अनिरुद्ध बापू भक्त झाल्या होत्या आणि आई हि बरीच नास्तिक असली तरी त्यांच्या बरोबर जाऊ लागली. मग एकदा कधीतरी तिने हे एक खरेखुरे साधुपुरुष आहेत, किती चांगले बोलतात असे सांगितले. थोडे ऐकताच मी तिला सांगितले कि सर्च जण फ्रोड असतात, तू यांच्या नादी लागू नकोस.नंतर तिने भावाला सांगितले ( मी नसताना ) ; तर भाऊ तिला अशा चोरांच्या नादी लागू नकोस म्हणून ओरडला. मग तिची आणि भावाची वादावादी झाली. मग तिने मला सुनवले कि तुम्ही कसे आजीबात धार्मिक नाही .... असो .. पण नंतर आईला झटपट यातील खुळचट पणा जाणवला . विशेषत: लोक बापूंच्या कथा सांगत तेंव्हा . लोकांच्या घरी काहीही चांगले झाले कि बापू मुळे होत असे. आणि त्यात लोकांना सिगारेट किंवा कॉफी चा वास येत असे ( कारण बापू फुकाड्या आहे आणि कॉफी मारतो ) या कथा ऐकून आईला कळले कि हा मुर्खपणा आहे , तशीही ती rashional बाई आहे . तिने एक दोन दा शंका विचारल्यावर ( आमचीच आई - माती तशी खाण ) तिच्याबरोबर इतर बायका भांडल्या आणि तिचे बापू वेड संपले. याच काळानंतर मी आणि भाऊ मुंबईत परत आलो आणि आई बाबा बरोबर राहू लागलो आता मी अनेक वर्षे फुकाड्या लोकात काढली होती. पण सिगारेट चे व्यसन कधी लागले नाही . विविध स्मोकिंगच्या अड्ड्या वर मी पडीक असायचो . आई ला ते थोडे उशिरा कळले आणि तिला मी फुक्तोय असा संशय असायचा . तसेच उन्हाळ्यात अंगाला सिगारेट चा वास हि यायचा . मी अनेकदा सांगितले कि बरेच मित्र फुकतात , मी नाही पण तो संशय काही जात नव्हता . हा तर एके दिवशी जेवणाच्या वेळी मी असेच २ सांस्कृतिक केंद्रावरून ( सिगरेट च्या अड्ड्यावरून ) उकिरडे फुंकून ( आईच्या भाषेत ) आलो होतो. भाऊ वाचत किंवा TV पहात होता. आई हॉल मध्ये आली तेव्हा मी बसून जोडे काहित होतो. अंगाला भरपूर सिगारेट चा वास येत असणार कारण आई कडाडली " तू सिगरेट फुंकून आलास ना ? अचानक वेगात भाऊ उठला आणि माझ्याकडे आला . त्याने माझे पाय पकडले आणि आई ला बोलला " आई बापू आले घरी. प्रत्यय आला . " आम्ही तिघेही बराच वेळ डोळ्यात पाणी येई पर्यंत हसत होतो .

वाचने 14565
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

चांगलं आहे!!

जवळपास १५ वर्षांपूर्वी (त्या वेळी अनिरुद्ध बापू बहुतेक फ्रेशर होते) आमच्या गावी अनिरुद्ध बापूंचे शिष्य आले होते. बापूंची महती सांगणारा एक कार्यक्रम होता. आमच्या मातोश्री त्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. 'अनिरुद्ध बापू म्हणजे साक्षात श्री कृष्णाचा अवतार. आता ह्या काळात श्री कृष्णासारखे कपडे परिधान करणे योग्य वाटत नाही म्हणून शर्ट पॅन्ट घालतात' असे बौद्धिक बापूंच्या शिष्यानी दिले होते आणि ते आमच्या मातोश्रींना पण खरे वाटले. घरी परत येईपर्यंत जवळपास भक्त झाल्या होत्याच. मग एक रिवर्स बौद्धिक घेतले आणि भक्तगीरी वाढण्याआधीच नष्ट करून टाकली.

In reply to by Ram ram

आणला का ब्राम्हणना मधे? खर तर ही ××× दारी करायच काम पदला हजोदर यांचे आहे. टुम्ही पण त्यान्च्यासारखेच आजारी दिसता. बाबा आमटे वगरे माहीतही नसतील तुम्हाला!! मला आपले पतंजली वाले रामदेव बाबा यादव आहेत हे वाचून छान वाटले होते. व्यापारी द्रुष्ट्या विचार करून साम्राज्य उभ केले आहे.

भारी किस्सा आहे. तुमच्या भावाच्या प्रसंगावधानतेचे व विनोदबुद्धीचे कौतुक केले ! हे गुण, बुद्धी बापूंनीच तुमच्या भावामध्ये निर्माण केली ! पुढील लेखनासाठी अनिरुद्ध शुभेच्छा ! अंबज्ञ !

माझ्या मित्राला बापू जेंव्हा नवीन होता त्यावेळी सांगितले कि बापू म्हणजे विष्णू , बायको लक्ष्मी आणि एक चमचा असतो तो म्हणजे शेषनाग . तर मित्राने विचारले कि म्हणजे तो शेषनाग आडवा झोपतो आणि त्यावर बापू आणि बायको बसतात का ? आणि तो हाताचा नगीना स्टायल फणा हि काढतो का ? ते डोळ्यासमोर आणून मी वेड्यासारखा हसलो आणि समोरचे दोघे भयंकर तापले होते ............

हा हा ... जबरी किस्सा आहे आणि तुमच्या भावाची विनोदबुद्धी तर कहरच आहे... बापू म्हणजे विष्णू , बायको लक्ष्मी आणि एक चमचा असतो तो म्हणजे शेषनाग >>> लोकं एव्हढी वाहवत कशी जातात आणि त्यान्ची बुद्धी एव्हढी कशी गहाण पडते? कि हि मंडळी मास हिप्नोटिझम करत असावीत?

मस्त किस्सा!

जुलै २०१६ मध्ये मी एका धाग्यावर प्रतिक्रिया देताना एका सदस्याच्या नावाचं (त्यांचा आयडीही तोच होता) विडंबन केल्यावर मला लगेचच बॅन करण्यात आलं होतं. आता इथे आदरणीय सदस्य एकमेकांच्या आयडींचं विडंबन करताहेत पण व्यवस्थापनाने कुणालाही बॅन केलेलं नाही. यावरूनच व्यवस्थापनाचा आणि संस्थळाचा दांभिकपणा सिद्ध होतो. एकाला एक न्याय आणि बाकीच्यांना दुसरा न्याय. का मग मिपा व्यवस्थापनाची या सदस्यांची nuisance value बघून तंतरली आहे? तसं असेल तर स्पष्टपणे सांगा. लाजू नका.

In reply to by प्रचेतस

सहमत. इथे वाटेल तसे आयडी विडंबन सुरू आहे. पगला गजोधर आयडी ने अन्य धाग्यावर मिपा सदस्यांना उद्देशून महामाया अवदसा मुंजा अशी शेलकी संबोधने वापरलेली अजून तिथे झळकत आहेत. अनेकदा तक्रार करून कोणी त्याची दखल घेतलेली नाही.

In reply to by प्रचेतस

हाओ राजकारणाच्या धाग्यात घाण करणार्‍या आणि घाण राजकारण करणार्‍या सगळ्या आयडींना कसलाही मुलाहिजा न बाळगता ताबडतोब बॅन केले पाहिजे.

In reply to by श्रीगुरुजी

इथे आदरणीय सदस्यांनी एकमेकांच्या सात पिढ्यांचा उद्धार केला तरी मला काहीही फरक पडत नाही. पण जो नियम लावून मला बॅन करण्यात आलं तोच नियम सगळ्या सदस्यांना लागू असला पाहिजे. नाहीतर मग १. आपल्याला अमुक एक सदस्यांवर कारवाई करायला भीती वाटते किंवा २. आपण दांभिक आहोत आणि वेगवेगळ्या सदस्यांना वेगवेगळे नियम लावतो किंवा मग दोन्हीही - हे मिपा व्यवस्थापनाने जाहीर करावं. (ते करणार नाहीतच. तेवढी हिंमत त्यांच्यात असती तर अजून काय हवं होतं?)

In reply to by श्रीगुरुजी

पाणी आपल्या लेव्हलला जाऊन थांबते. एकाने गाय मारली म्हणून तुम्ही वासरू मारू नका. त्यांची संपादक /मालक यांच्याकडे तक्रार करा. दखल न घेतल्यास त्या आक्षेपार्ह प्रतिक्रियेला ट्रॉल अलर्ट म्हणून उपप्रतिसाद देऊन ठेवा. ५०% प्रतिक्रिया ट्रोल अलर्ट झाल्या तरी काय बिघडत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

आयला....आयडींची विडंबने हा मिपाचा एक अनमोल ठेवा आहे...त्यासाठीच उडवले? आयडींची विडंबने झालीच पाहिजेत

फक्त आयडीच्या विडंबनामुळे बोका-ए-आझम सारख्या आयडीला बॅन करणे मिपाला कसं परवडतं? प्रत्येक वेळी मिपा व्यवस्थापनानेच कारवाई करण्यापेक्षा येथील जेष्ठ समजदार आयडीने/आयडींने जागेवरच सौम्य भाषेत समज दिल्यास फरक पडू शकतो. बापुसाहेब करायचे हे काम, सध्या त्यांचा इथे वावर दिसत नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

त्या दुसऱ्या आयडीची आणि त्याची २ ४ प्रतिसादात वादावादी झाली होती. त्यातच हे आयडी विडंबन प्रकरण होते. पण खरे तर त्याहून वाईट भाषा तुम्ही लोक हल्ली वापरत असता. तेव्हा कोणी मध्ये पडण्यापूर्वी तो ban झाला होता. मिपावर टका म्हणतो तशी आयडी विडंबने होत आली आहेत आणि गमतीत असेल तर त्या त्या आयडीनी ती एन्जॉय केली असतीलही. मात्र कोणाचा आक्षेप असल्यास याचा आपापल्या रिस्कवर वापर करावा.

In reply to by मार्मिक गोडसे

संपादकांना ती भाषा वाईट वाटत नसेल. राजकीय किंवा अन्य काथ्या कुटाच्या धाग्यावर भांडणाऱ्या लोकांनी विचार करा की असली भाषा घरात भांडताना तुम्ही वापरता का?

In reply to by मार्मिक गोडसे

"तुझी भाषा चुकते आहे" एवढेच म्हटले तरी समोरचा सावध होईल. निदान आपली भाषा घसरू न देणे एवढे आपल्या हातात असते. सोन्याबापू ने आपली जागा किंवा दरारा तयार केला होता. कोणी सांगून दिला गेला नव्हता.

In reply to by मार्मिक गोडसे

मी तरी अशा लोकांना गच्छ सुकर भद्रम् ते असं मनात म्हणून सोडून देते. निदान पुन्हा जेव्हा मिपा स्वच्छता अभियान होईल तेव्हा माझा आयडी शहीद होणार नाही एवढेच बघायचे. बाकीचे आपापले बघतील.

जर फक्त, आयडीचे विडंबन केल्यामुळे, बो ए आ यांचे निलंबन झाले असेल तर, हे दुःखदायक आहे. असे व्हायला नको होते.

रारे मूर्तीभंजनाचे काम तुम्ही एकदम दिलखूष पद्धतीने करता... पोतडी खोललीच आहे तर चालू ठेवा