वास बापूंचा
लग्नाआधी एक काळ असा आला कि मी आणि भाऊ दोघेही मुंबईबाहेर नोकरी करीत होतो आणि आई काहीशी एकटी झाली होती. त्याच वेळी बिल्डींग मध्ये अनेक बायका अनिरुद्ध बापू भक्त झाल्या होत्या आणि आई हि बरीच नास्तिक असली तरी त्यांच्या बरोबर जाऊ लागली. मग एकदा कधीतरी तिने हे एक खरेखुरे साधुपुरुष आहेत, किती चांगले बोलतात असे सांगितले. थोडे ऐकताच मी तिला सांगितले कि सर्च जण फ्रोड असतात, तू यांच्या नादी लागू नकोस.नंतर तिने भावाला सांगितले ( मी नसताना ) ; तर भाऊ तिला अशा चोरांच्या नादी लागू नकोस म्हणून ओरडला. मग तिची आणि भावाची वादावादी झाली. मग तिने मला सुनवले कि तुम्ही कसे आजीबात धार्मिक नाही .... असो ..
पण नंतर आईला झटपट यातील खुळचट पणा जाणवला . विशेषत: लोक बापूंच्या कथा सांगत तेंव्हा . लोकांच्या घरी काहीही चांगले झाले कि बापू मुळे होत असे. आणि त्यात लोकांना सिगारेट किंवा कॉफी चा वास येत असे ( कारण बापू फुकाड्या आहे आणि कॉफी मारतो ) या कथा ऐकून आईला कळले कि हा मुर्खपणा आहे , तशीही ती rashional बाई आहे . तिने एक दोन दा शंका विचारल्यावर ( आमचीच आई - माती तशी खाण ) तिच्याबरोबर इतर बायका भांडल्या आणि तिचे बापू वेड संपले.
याच काळानंतर मी आणि भाऊ मुंबईत परत आलो आणि आई बाबा बरोबर राहू लागलो
आता मी अनेक वर्षे फुकाड्या लोकात काढली होती. पण सिगारेट चे व्यसन कधी लागले नाही . विविध स्मोकिंगच्या अड्ड्या वर मी पडीक असायचो . आई ला ते थोडे उशिरा कळले आणि तिला मी फुक्तोय असा संशय असायचा . तसेच उन्हाळ्यात अंगाला सिगारेट चा वास हि यायचा . मी अनेकदा सांगितले कि बरेच मित्र फुकतात , मी नाही पण तो संशय काही जात नव्हता .
हा तर एके दिवशी जेवणाच्या वेळी मी असेच २ सांस्कृतिक केंद्रावरून ( सिगरेट च्या अड्ड्यावरून ) उकिरडे फुंकून ( आईच्या भाषेत ) आलो होतो. भाऊ वाचत किंवा TV पहात होता. आई हॉल मध्ये आली तेव्हा मी बसून जोडे काहित होतो. अंगाला भरपूर सिगारेट चा वास येत असणार कारण आई कडाडली " तू सिगरेट फुंकून आलास ना ?
अचानक वेगात भाऊ उठला आणि माझ्याकडे आला .
त्याने माझे पाय पकडले आणि आई ला बोलला " आई बापू आले घरी. प्रत्यय आला . "
आम्ही तिघेही बराच वेळ डोळ्यात पाणी येई पर्यंत हसत होतो .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
:)
भारी ! =)) =)) =))
जवळपास १५ वर्षांपूर्वी (त्या
रिवर्स बौद्धिक
रिव्हर्स बौद्धिकाचा पण एक लेख
मनशक्तीदाता? किती किव करावी
ट्रोल अलर्ट
आरेच्चा
भारी किस्सा आहे. तुमच्या
शेषनाग
हि बापू/महाराज/श्रीश्रीश्री/गुरु मंडळी मास हिप्नोटिझम करतात का?
तुमच्या अफाट व्यासंगातील हा
=))
=))))))))))))))))))))))))))))
मिपा व्यवस्थापनाचा दांभिकपणा
सहमत आहे.
सहमत
हाओ
सुरूवात कोणी केली आणि टोळ्या
तो मुद्दाच नाहीये.
सुरुवात करू देत
आयला....आयडींची विडंबने हा
"मौका-ए-आझम" अशी सही करायची
फक्त आयडीच्या विडंबनामुळे
मला आठवते तसे
पण खरे तर त्याहून वाईट भाषा
अर्थात हे माझे मत आहे
ह्यासाठी कोणीतरी
दुसरे कोणी कशाला?
इतका दरारा नाहीये माझा.
दरारा नको आहे
हे प्रयोग करून झालेत, कोणीही
हम्म
ह्यासाठी कोणीतरी
जर फक्त, आयडीचे विडंबन
हौर आंदयेव
हेच म्हणतो!