लग्नाआधी एक काळ असा आला कि मी आणि भाऊ दोघेही मुंबईबाहेर नोकरी करीत होतो आणि आई काहीशी एकटी झाली होती. त्याच वेळी बिल्डींग मध्ये अनेक बायका अनिरुद्ध बापू भक्त झाल्या होत्या आणि आई हि बरीच नास्तिक असली तरी त्यांच्या बरोबर जाऊ लागली. मग एकदा कधीतरी तिने हे एक खरेखुरे साधुपुरुष आहेत, किती चांगले बोलतात असे सांगितले. थोडे ऐकताच मी तिला सांगितले कि सर्च जण फ्रोड असतात, तू यांच्या नादी लागू नकोस.नंतर तिने भावाला सांगितले ( मी नसताना ) ; तर भाऊ तिला अशा चोरांच्या नादी लागू नकोस म्हणून ओरडला. मग तिची आणि भावाची वादावादी झाली. मग तिने मला सुनवले कि तुम्ही कसे आजीबात धार्मिक नाही .... असो ..
पण नंतर आईला झटपट यातील खुळचट पणा जाणवला . विशेषत: लोक बापूंच्या कथा सांगत तेंव्हा . लोकांच्या घरी काहीही चांगले झाले कि बापू मुळे होत असे. आणि त्यात लोकांना सिगारेट किंवा कॉफी चा वास येत असे ( कारण बापू फुकाड्या आहे आणि कॉफी मारतो ) या कथा ऐकून आईला कळले कि हा मुर्खपणा आहे , तशीही ती rashional बाई आहे . तिने एक दोन दा शंका विचारल्यावर ( आमचीच आई - माती तशी खाण ) तिच्याबरोबर इतर बायका भांडल्या आणि तिचे बापू वेड संपले.
याच काळानंतर मी आणि भाऊ मुंबईत परत आलो आणि आई बाबा बरोबर राहू लागलो
आता मी अनेक वर्षे फुकाड्या लोकात काढली होती. पण सिगारेट चे व्यसन कधी लागले नाही . विविध स्मोकिंगच्या अड्ड्या वर मी पडीक असायचो . आई ला ते थोडे उशिरा कळले आणि तिला मी फुक्तोय असा संशय असायचा . तसेच उन्हाळ्यात अंगाला सिगारेट चा वास हि यायचा . मी अनेकदा सांगितले कि बरेच मित्र फुकतात , मी नाही पण तो संशय काही जात नव्हता .
हा तर एके दिवशी जेवणाच्या वेळी मी असेच २ सांस्कृतिक केंद्रावरून ( सिगरेट च्या अड्ड्यावरून ) उकिरडे फुंकून ( आईच्या भाषेत ) आलो होतो. भाऊ वाचत किंवा TV पहात होता. आई हॉल मध्ये आली तेव्हा मी बसून जोडे काहित होतो. अंगाला भरपूर सिगारेट चा वास येत असणार कारण आई कडाडली " तू सिगरेट फुंकून आलास ना ?
अचानक वेगात भाऊ उठला आणि माझ्याकडे आला .
त्याने माझे पाय पकडले आणि आई ला बोलला " आई बापू आले घरी. प्रत्यय आला . "
आम्ही तिघेही बराच वेळ डोळ्यात पाणी येई पर्यंत हसत होतो .
वाचने
14565
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
भारी ! =)) =)) =))
जवळपास १५ वर्षांपूर्वी (त्या
रिवर्स बौद्धिक
In reply to जवळपास १५ वर्षांपूर्वी (त्या by अभिजीत अवलिया
रिव्हर्स बौद्धिकाचा पण एक लेख
In reply to जवळपास १५ वर्षांपूर्वी (त्या by अभिजीत अवलिया
मनशक्तीदाता? किती किव करावी
ट्रोल अलर्ट
In reply to मनशक्तीदाता? किती किव करावी by Ram ram
आरेच्चा
In reply to मनशक्तीदाता? किती किव करावी by Ram ram
भारी किस्सा आहे. तुमच्या
शेषनाग
हि बापू/महाराज/श्रीश्रीश्री/गुरु मंडळी मास हिप्नोटिझम करतात का?
तुमच्या अफाट व्यासंगातील हा
=))
=))))))))))))))))))))))))))))
मिपा व्यवस्थापनाचा दांभिकपणा
सहमत आहे.
In reply to मिपा व्यवस्थापनाचा दांभिकपणा by बोका-ए-आझम
सहमत
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
हाओ
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
सुरूवात कोणी केली आणि टोळ्या
In reply to मिपा व्यवस्थापनाचा दांभिकपणा by बोका-ए-आझम
तो मुद्दाच नाहीये.
In reply to सुरूवात कोणी केली आणि टोळ्या by श्रीगुरुजी
सुरुवात करू देत
In reply to सुरूवात कोणी केली आणि टोळ्या by श्रीगुरुजी
आयला....आयडींची विडंबने हा
In reply to मिपा व्यवस्थापनाचा दांभिकपणा by बोका-ए-आझम
"मौका-ए-आझम" अशी सही करायची
In reply to आयला....आयडींची विडंबने हा by टवाळ कार्टा
फक्त आयडीच्या विडंबनामुळे
मला आठवते तसे
In reply to फक्त आयडीच्या विडंबनामुळे by मार्मिक गोडसे
पण खरे तर त्याहून वाईट भाषा
In reply to मला आठवते तसे by पैसा
अर्थात हे माझे मत आहे
In reply to पण खरे तर त्याहून वाईट भाषा by मार्मिक गोडसे
ह्यासाठी कोणीतरी
In reply to अर्थात हे माझे मत आहे by पैसा
दुसरे कोणी कशाला?
In reply to ह्यासाठी कोणीतरी by मार्मिक गोडसे
इतका दरारा नाहीये माझा.
In reply to दुसरे कोणी कशाला? by पैसा
दरारा नको आहे
In reply to इतका दरारा नाहीये माझा. by मार्मिक गोडसे
हे प्रयोग करून झालेत, कोणीही
In reply to दरारा नको आहे by पैसा
हम्म
In reply to हे प्रयोग करून झालेत, कोणीही by मार्मिक गोडसे
ह्यासाठी कोणीतरी
In reply to अर्थात हे माझे मत आहे by पैसा
जर फक्त, आयडीचे विडंबन
हौर आंदयेव
हेच म्हणतो!
In reply to हौर आंदयेव by भीडस्त