स्वातंत्र्यपूर्व काळामधे त्या वेळच्या इंग्रज राज्यकर्त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधे डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला.
अनेकदा हिंदूंना डावलून मुसलमानांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे हिंदूंमधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती.
यातूनच हिंदूत्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली. सावरकरांनी भारतीय राजकारणामधे हिंदूत्वाचा ठळकपणे उच्चार केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा हेसुद्धा हिंदूत्वाचाच आधार घेत होते. संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनसंघाने सुद्धा हिंदूत्वाचे राजकारण केले. स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी पूर्वीच्या राज्यकर्त्यांचाच कित्ता गिरवला.
त्यामुळे स्वतंत्र भारतामधेही हिंदूंमधे डावलले गेल्याची भावना तशीच राहिली. त्यामुळे हिंदूत्वाच्या राजकारणाला बळकटी मिळत राहिली.
पुढे शाहबानो प्रकरण घडले. एका मुसलमान स्त्रीला कायद्याने दिलेला न्याय, कायदा बदलून नाकारण्यात आला. हे काही मुल्ला मौलवींची मर्जी राखण्यासाठी झाले.
यामुळे हिंदूत्वावर आधारित राजकारण करणाऱ्यांना आयते कोलीतच मिळाले आणि मग त्यांनी सरकारच्या विरोधात रान पेटवले.
"बघा बघा हिंदूंनो तुमची दखलसुद्धा घेतली जात नाही आणि मुल्ला मौलवींची मात्र मर्जी कशी राखली जाते पहा" असे हिंदूत्ववादी हिंदू जनतेला सांगत राहिले.
हिंदूंवरती सतत कसा अन्याय होतो आहे असे सांगणारे हिंदूत्ववादी हिंदूंच्या विरोधात बघा कसे संघटित षडयंत्राचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगताना लव्ह जिहाद सारखे मुद्दे पुढे आणू लागले. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या कथा रंगवून रंगवून सांगितल्या जायला लागल्या आणि यामधून हिंदूंना फक्त आम्हीच सोडवू शकतो असे म्हणून स्वतःचे महत्व वाढविण्याचा हिंदूत्ववादी प्रयत्न करू लागले.
ह्या देशांत हिंदू धर्म खतरे में असे म्हणायला हिंदूत्ववाद्यांना संधीची कमतरता कधीच भासली नाही. त्यांना भांडवल करता येईल असे मुद्दे सतत मिळत राहिले.
यातूनच ज्या राजीव गांधींनी शाहबानोचा निर्णय फिरवला, त्याच राजीव गांधींना हिंदूंना खूष करण्यासाठी अयोध्येच्या मंदिराचे दरवाजे उघडावे लागले.
हिंदूत्वाचे राजकारण सुरूच राहिले. आपल्यावर अन्याय होतो आहे हे म्हणणे विरोधात असताना तसे सोपे असते. छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून जनतेमधे असंतोष उभा करता येतो.
सरकारने हज यात्रेला सबसिडी दिली तर "त्यांना देता मग आम्हाला का नाही" किंबहुना "आम्हा हिंदूंना डावललं जातंय" ही आवडती बोंब ठोकता येते आणि त्यातून राजकारण साधता येते, स्वतःचे महत्व अबाधित राखता येते.
या सगळ्या प्रयत्नातून अखेर हिंदूत्ववादी म्हणवणार्या पक्षांना भारतामधे सत्ता मिळाली. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर बसले.
पण आजवर हिंदूंवर सतत अन्याय होतो आहे, हिंदूंना सतत डावललं जात आहे अशा प्रकारच्या तक्रारी करण्याची सवय पडलेल्या कार्यकर्त्यांना आता मात्र कुठलाच उद्योग राहिला नाही. कारण तक्रार तरी कुणाच्या विरोधात करायची ? सरकार त्यांचेच होते.
पण हिंदूंवर अन्याय होतो आहे अशी रडारड करण्याची सवय मात्र गेली नाही. ती वेगळ्या स्वरूपात बाहेर यायला लागली.
आपल्याकडे मूळातच जंगलतोड खूप झालेली आहे. राखायला पाहिजेत अशी जंगले सुद्धा आपण राखू शकलेलो नाही. त्या ठिकाणी माणसाचे अतिक्रमण झाले. त्यामुळे होळीच्या निमित्ताने तरी लाकडे जाळू नका आणि वृक्षतोड करू नका.
निसर्गाने आपल्याला दिलेले पाणी मर्यादित आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने आपल्या घरातले पाणी नासू नका त्यामुळे आपलीच गैरसोय होणार आहे.
असे कोणी सांगायला गेले की बिथरलेले हिंदूत्ववादी अंगावर यायला लागले. आम्हा हिंदूंनाच तुम्ही बंधने का घालता ? त्यांच्या बकरी ईदला ते इतके पाणी खर्च करतात मग आम्ही पाण्याची नासाडी का करू नये असे युक्तिवाद ऐकू यायला लागले.
दिल्लीतील प्रदूषण पाहून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली त्यावेळी अनेक हिंदूत्ववाद्यांनी त्याचा निषेध केला. काही जणांनी तर आजवर आपण फटाके उडवत नव्हतो पण केवळ निर्णयाचा निषेध करण्यासाठी फटाके उडविणार आहोत असे जाहीर केले.
नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर हिंदूत्ववादी निस्तेज व्हायला लागले. पर्यावरणाच्या विनाशामधे हिंदूत्व शोधायला लागले.
सत्तेमधे बसलेले लोक आपापले काम करत होते पण सत्तेबाहेर राहणाऱ्या हिंदूत्ववादी गटांमधे मात्र तू जास्त भगवा की मी अशी अहमहमिका सुरु झाली. पूर्वी अहिंदूंचे कसे लाड होत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात लढणारे हिंदूत्ववादी आपापसात लढून स्वतःचे उपद्रवमूल्य वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. गो सेवकांच्या हिंसाचारामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना कानपिचक्याही दिल्या.
ज्या हिंदूत्वाने आयोध्येसारखे लढे उभारले, तेच हिंदूत्ववादी आता अगदी क्षुल्लक मुद्यांचे केविलवाणेपणाने राजकारण करताना दिसू लागले.
राजकारणातला आणखी एक सुप्त हेतू असतो. तो म्हणजे आपल्याला मते देणाऱ्यांना चुचकारणे आणि आपल्या विरोधात असणाऱ्यांना झोडपणे, धाक दाखवणे, बदनाम करणे. हिंदूत्ववाद्यांनी एक प्रकारे हिंदूंना चुचकारले आणि आपल्याला मते न देणाऱ्या अहिंदूंना इशारे दिले, धाक बसवला.
सुरुवातीला हिंदूत्ववादी अशी प्रतिमा असणाऱ्या नरेंद्र मोदींना केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचे सुद्धा समर्थन मिळू लागल्यानंतर मुस्लिमांना दुखावणे परवडणारे नव्हते. मुस्लिमांच्या विरोधात लव जिहाद वगैरे सारखे मुद्दे मांडणे सुद्धा आता अवघड झाले.
कारण आपल्याला मत न देणाऱ्याला सर्व प्रकारे कोंडीत पकडण्यासाठी निरनिराळे प्रचाराचे, अपप्रचाराचे मुद्दे वापरले जातात. ते मुद्दे तो आपला मतदार झाल्यानंतर पुन्हा बासनात गुंडाळून ठेवावे लागतात.
लव जिहादचे प्रकरण म्हणून सांगितलेली एक केस 2017 मधे न्यायालयाने फिरवली आणि त्या मुलीला पुन्हा आपल्या नवऱ्याबरोबर राहण्याची मुभा देण्यात आली. लव जिहादची हाकटी पिटणारे तोंडावर आपटले.
मुसलमान सुद्धा आपला मतदार झाल्यानंतर हिंदूत्ववादी राज्यकर्ते त्यांच्या अजानच्या वेळी आपली सभा थांबवून ठेवू लागले. अशा वेळी हिंदूत्ववाद्यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही.
पुढचा काही काळ तरी हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते.
वाचने
48407
प्रतिक्रिया
196
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुळात ते जैन असते तरी त्याचा
In reply to श्रीगुरुजी, मला माहिती नव्हते by बिटाकाका
मुळात ते जैन असते तरी त्याचा या विषयाशी काय संबंध??आहे ना. बादरायण संबंध जोडून जातीयवादी मळमळ ओकणे हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. उदाहरणार्थ श्रीरामायण आणि पुष्यमित्र शुंग. तसेच उगाच जैन, हिंदू असले काहीतरी उकरायचे. मग त्याचा विषयाशी अजिबात संबंध नसला तरी हरकत नाही.जसा तुम्ही त्यांचा जैन
In reply to मुळात ते जैन असते तरी त्याचा by श्रीगुरुजी
बिटाकाका
In reply to बर्राबर वलीकलाव! हेच by बिटाकाका
कपाळावर हात मारून घ्यायची
In reply to बिटाकाका by नर्मदेतला गोटा
ज्या भारतीय नागरिकांना एका
ही खतरनाक व्याख्या अहे =))))
In reply to ज्या भारतीय नागरिकांना एका by Topi
कृपया लेखामधे वर्णिलेल्या
ह्म्म
पुढचा काही काळ तरी
सही बात..
In reply to पुढचा काही काळ तरी by sagarpdy
मुसलमान सुद्धा आपला मतदार
<<ते भाषणं अगोदर बी थांबायचे
In reply to मुसलमान सुद्धा आपला मतदार by arunjoshi123
लूकिंग फॉर लॉजिक
<<बलात्कारकर्ते म्हणजे
In reply to लूकिंग फॉर लॉजिक by arunjoshi123
नै हो, जोशी प्रवक्ते नव्हे तर
In reply to <<बलात्कारकर्ते म्हणजे by विशुमित
थँक्यू, थँक्यू. मस्त वाटलं.
In reply to नै हो, जोशी प्रवक्ते नव्हे तर by पगला गजोधर
असे मी अजो ना लगेच नाही म्हणू
In reply to नै हो, जोशी प्रवक्ते नव्हे तर by पगला गजोधर
फक्त ते नक्की कोणाची बाजू
In reply to असे मी अजो ना लगेच नाही म्हणू by विशुमित
हे तुमच्या बाबत तंतोतंत मान्य
In reply to फक्त ते नक्की कोणाची बाजू by arunjoshi123
मी सध्याला तरी भाजप प्रवक्ता*
In reply to <<बलात्कारकर्ते म्हणजे by विशुमित
<<गाच मंडळींना हिंदू वि
In reply to मी सध्याला तरी भाजप प्रवक्ता* by arunjoshi123
पुरोगामी हा शब्द भक्त या
In reply to <<गाच मंडळींना हिंदू वि by विशुमित
बदनाम करण्याने लौकिक दृष्टीने
In reply to पुरोगामी हा शब्द भक्त या by arunjoshi123
बदनाम करण्याने लौकिक दृष्टीने
In reply to बदनाम करण्याने लौकिक दृष्टीने by विशुमित
हेही खरेच
In reply to बदनाम करण्याने लौकिक दृष्टीने by arunjoshi123
सध्याच्या काळात हिंदुत्वाच्या
तुम्ही टाकली आहेतच कि उदाहरणे
In reply to सध्याच्या काळात हिंदुत्वाच्या by नर्मदेतला गोटा
मग नका घालवू ना सरसकटीकरणात
शुभेच्छा!
In reply to मग नका घालवू ना सरसकटीकरणात by नर्मदेतला गोटा
1. काय वाह्यात प्रश्न कम शंका
1. काय वाह्यात प्रश्न कम शंका आहे, मी मानायचा न मानायचा प्रश्न येतोच कुठे? 2. तुमच्या वरच्या चिखलफेकीत 3. तुम्ही दोघेही कुठल्याही मुद्द्यावर बोलत नसून माझ्या वैयक्तिक मतांवर पिंका टाकायचे काम करत आहात 4. आपला कयास चुकीचा होता मालक 5. तुम्हाला माझा मुद्दा समजलेला नाहीये 6. कपाळावर हात मारून घ्यायची स्मायलीकुणी वाह्यातपणा करतो आहे, कुणी मुद्दा सोडून बोलतो आहे, कुणी नुसताच पिंका टाकतो आहे, कुणी चिखलफेक करतो आहे, काही जणांची बिटाकाका म्हणताहेत ते समजून घेण्याची पात्रताच नाही यामुळे बिटा काकांना कपाळाला हात लावावा लागत आहे . . .आलात ना मूळ मुद्द्यावर,
In reply to 1. काय वाह्यात प्रश्न कम शंका by नर्मदेतला गोटा
*क्षुद्र
In reply to आलात ना मूळ मुद्द्यावर, by बिटाकाका
अरुण जोशी यांची कमेंट आवडली.
तुमचा स्पोर्टपणा देखील आवडला
In reply to अरुण जोशी यांची कमेंट आवडली. by नर्मदेतला गोटा
वाचताना भयंकर हसलो
बिटाकाका
उदाहरण द्या. खरेतर कमी तुम्ही
In reply to बिटाकाका by नर्मदेतला गोटा
बिटाकाकांकडे काही उत्तरे तयार
वैयक्तिक बोलणे ही तुमची आवड
In reply to बिटाकाकांकडे काही उत्तरे तयार by नर्मदेतला गोटा
उत्तर भारतात हिंदू बनिया आणि
एक साधासा प्रश्न आहे
समजा भारतात वर्षाला १०० लि.
In reply to एक साधासा प्रश्न आहे by नर्मदेतला गोटा
गोटा, हा प्रतिसाद कळला आहे का
In reply to समजा भारतात वर्षाला १०० लि. by arunjoshi123
प्रश्नाला प्रश्न करत बसू नये
In reply to एक साधासा प्रश्न आहे by नर्मदेतला गोटा
प्रश्नाला प्रश्न न करता कशी
In reply to प्रश्नाला प्रश्न करत बसू नये by बिटाकाका
माझे एकच विचारणे आहे
अवश्य शोधावं. का ते सविस्तर
In reply to माझे एकच विचारणे आहे by नर्मदेतला गोटा
बिथरलेले हिंदूत्व
सर, इथे हिंदू म्हणून कोण
In reply to बिथरलेले हिंदूत्व by डँबिस००७
पगला गजोधर
In reply to सर, इथे हिंदू म्हणून कोण by पगला गजोधर
गोटाजी,
In reply to पगला गजोधर by नर्मदेतला गोटा
न गो साहेब
In reply to पगला गजोधर by नर्मदेतला गोटा
पगला गजोधर,
In reply to सर, इथे हिंदू म्हणून कोण by पगला गजोधर
डोक्यावरून मैला वाहणारे,
In reply to सर, इथे हिंदू म्हणून कोण by पगला गजोधर
स्त्रीला रेल्वे फलाटावर पाहून
In reply to सर, इथे हिंदू म्हणून कोण by पगला गजोधर
काही जण ब्यांका बुडवून पळून
In reply to सर, इथे हिंदू म्हणून कोण by पगला गजोधर
एखादया भरकटलेल्या अहिंदू
In reply to काही जण ब्यांका बुडवून पळून by arunjoshi123
त्या अहिंदू धर्माचे १८ कोट
In reply to एखादया भरकटलेल्या अहिंदू by पगला गजोधर
बिथरलेले ११० कोट लोक हिंदू
In reply to त्या अहिंदू धर्माचे १८ कोट by arunjoshi123
मी अगदी सुस्पष्ट उत्तर दिलं
In reply to बिथरलेले ११० कोट लोक हिंदू by पगला गजोधर
मग तुम्हीही लगेहाथो एक लेख
In reply to मी अगदी सुस्पष्ट उत्तर दिलं by arunjoshi123
गजोधारजी, ते घोड्यावरून फिरले
In reply to एखादया भरकटलेल्या अहिंदू by पगला गजोधर
सर, इथे हिंदू म्हणून कोण
In reply to सर, इथे हिंदू म्हणून कोण by पगला गजोधर
डँबीस साहेब तुमची कॉमेंट
In reply to बिथरलेले हिंदूत्व by डँबिस००७
पण प्रदूषण केल्याने आणि पाणी
In reply to डँबीस साहेब तुमची कॉमेंट by नर्मदेतला गोटा
माणूस (कींवा कोणताही सजीव)
In reply to डँबीस साहेब तुमची कॉमेंट by नर्मदेतला गोटा
न गो साहेब ,
In reply to डँबीस साहेब तुमची कॉमेंट by नर्मदेतला गोटा
भीषण वायू प्रदूषणामुळे
दिल्लित भारतातले सर्वाधिक
In reply to भीषण वायू प्रदूषणामुळे by नर्मदेतला गोटा
इथे प्रदूषणाचा विषय आहे.