Skip to main content

बिथरलेले हिंदूत्व

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 03/04/2018 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यपूर्व काळामधे त्या वेळच्या इंग्रज राज्यकर्त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधे डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा हिंदूंना डावलून मुसलमानांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे हिंदूंमधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती. यातूनच हिंदूत्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली. सावरकरांनी भारतीय राजकारणामधे हिंदूत्वाचा ठळकपणे उच्चार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा हेसुद्धा हिंदूत्वाचाच आधार घेत होते. संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनसंघाने सुद्धा हिंदूत्वाचे राजकारण केले. स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी पूर्वीच्या राज्यकर्त्यांचाच कित्ता गिरवला. त्यामुळे स्वतंत्र भारतामधेही हिंदूंमधे डावलले गेल्याची भावना तशीच राहिली. त्यामुळे हिंदूत्वाच्या राजकारणाला बळकटी मिळत राहिली. पुढे शाहबानो प्रकरण घडले. एका मुसलमान स्त्रीला कायद्याने दिलेला न्याय, कायदा बदलून नाकारण्यात आला. हे काही मुल्ला मौलवींची मर्जी राखण्यासाठी झाले. यामुळे हिंदूत्वावर आधारित राजकारण करणाऱ्यांना आयते कोलीतच मिळाले आणि मग त्यांनी सरकारच्या विरोधात रान पेटवले. "बघा बघा हिंदूंनो तुमची दखलसुद्धा घेतली जात नाही आणि मुल्ला मौलवींची मात्र मर्जी कशी राखली जाते पहा" असे हिंदूत्ववादी हिंदू जनतेला सांगत राहिले. हिंदूंवरती सतत कसा अन्याय होतो आहे असे सांगणारे हिंदूत्ववादी हिंदूंच्या विरोधात बघा कसे संघटित षडयंत्राचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगताना लव्ह जिहाद सारखे मुद्दे पुढे आणू लागले. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या कथा रंगवून रंगवून सांगितल्या जायला लागल्या आणि यामधून हिंदूंना फक्त आम्हीच सोडवू शकतो असे म्हणून स्वतःचे महत्व वाढविण्याचा हिंदूत्ववादी प्रयत्न करू लागले. ह्या देशांत हिंदू धर्म खतरे में असे म्हणायला हिंदूत्ववाद्यांना संधीची कमतरता कधीच भासली नाही. त्यांना भांडवल करता येईल असे मुद्दे सतत मिळत राहिले. यातूनच ज्या राजीव गांधींनी शाहबानोचा निर्णय फिरवला, त्याच राजीव गांधींना हिंदूंना खूष करण्यासाठी अयोध्येच्या मंदिराचे दरवाजे उघडावे लागले. हिंदूत्वाचे राजकारण सुरूच राहिले. आपल्यावर अन्याय होतो आहे हे म्हणणे विरोधात असताना तसे सोपे असते. छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून जनतेमधे असंतोष उभा करता येतो. सरकारने हज यात्रेला सबसिडी दिली तर "त्यांना देता मग आम्हाला का नाही" किंबहुना "आम्हा हिंदूंना डावललं जातंय" ही आवडती बोंब ठोकता येते आणि त्यातून राजकारण साधता येते, स्वतःचे महत्व अबाधित राखता येते. या सगळ्या प्रयत्नातून अखेर हिंदूत्ववादी म्हणवणार्‍या पक्षांना भारतामधे सत्ता मिळाली. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर बसले. पण आजवर हिंदूंवर सतत अन्याय होतो आहे, हिंदूंना सतत डावललं जात आहे अशा प्रकारच्या तक्रारी करण्याची सवय पडलेल्या कार्यकर्त्यांना आता मात्र कुठलाच उद्योग राहिला नाही. कारण तक्रार तरी कुणाच्या विरोधात करायची ? सरकार त्यांचेच होते. पण हिंदूंवर अन्याय होतो आहे अशी रडारड करण्याची सवय मात्र गेली नाही. ती वेगळ्या स्वरूपात बाहेर यायला लागली. आपल्याकडे मूळातच जंगलतोड खूप झालेली आहे. राखायला पाहिजेत अशी जंगले सुद्धा आपण राखू शकलेलो नाही. त्या ठिकाणी माणसाचे अतिक्रमण झाले. त्यामुळे होळीच्या निमित्ताने तरी लाकडे जाळू नका आणि वृक्षतोड करू नका. निसर्गाने आपल्याला दिलेले पाणी मर्यादित आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने आपल्या घरातले पाणी नासू नका त्यामुळे आपलीच गैरसोय होणार आहे. असे कोणी सांगायला गेले की बिथरलेले हिंदूत्ववादी अंगावर यायला लागले. आम्हा हिंदूंनाच तुम्ही बंधने का घालता ? त्यांच्या बकरी ईदला ते इतके पाणी खर्च करतात मग आम्ही पाण्याची नासाडी का करू नये असे युक्तिवाद ऐकू यायला लागले. दिल्लीतील प्रदूषण पाहून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली त्यावेळी अनेक हिंदूत्ववाद्यांनी त्याचा निषेध केला. काही जणांनी तर आजवर आपण फटाके उडवत नव्हतो पण केवळ निर्णयाचा निषेध करण्यासाठी फटाके उडविणार आहोत असे जाहीर केले. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर हिंदूत्ववादी निस्तेज व्हायला लागले. पर्यावरणाच्या विनाशामधे हिंदूत्व शोधायला लागले. सत्तेमधे बसलेले लोक आपापले काम करत होते पण सत्तेबाहेर राहणाऱ्या हिंदूत्ववादी गटांमधे मात्र तू जास्त भगवा की मी अशी अहमहमिका सुरु झाली. पूर्वी अहिंदूंचे कसे लाड होत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात लढणारे हिंदूत्ववादी आपापसात लढून स्वतःचे उपद्रवमूल्य वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. गो सेवकांच्या हिंसाचारामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना कानपिचक्याही दिल्या. ज्या हिंदूत्वाने आयोध्येसारखे लढे उभारले, तेच हिंदूत्ववादी आता अगदी क्षुल्लक मुद्यांचे केविलवाणेपणाने राजकारण करताना दिसू लागले. राजकारणातला आणखी एक सुप्त हेतू असतो. तो म्हणजे आपल्याला मते देणाऱ्यांना चुचकारणे आणि आपल्या विरोधात असणाऱ्यांना झोडपणे, धाक दाखवणे, बदनाम करणे. हिंदूत्ववाद्यांनी एक प्रकारे हिंदूंना चुचकारले आणि आपल्याला मते न देणाऱ्या अहिंदूंना इशारे दिले, धाक बसवला. सुरुवातीला हिंदूत्ववादी अशी प्रतिमा असणाऱ्या नरेंद्र मोदींना केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचे सुद्धा समर्थन मिळू लागल्यानंतर मुस्लिमांना दुखावणे परवडणारे नव्हते. मुस्लिमांच्या विरोधात लव जिहाद वगैरे सारखे मुद्दे मांडणे सुद्धा आता अवघड झाले. कारण आपल्याला मत न देणाऱ्याला सर्व प्रकारे कोंडीत पकडण्यासाठी निरनिराळे प्रचाराचे, अपप्रचाराचे मुद्दे वापरले जातात. ते मुद्दे तो आपला मतदार झाल्यानंतर पुन्हा बासनात गुंडाळून ठेवावे लागतात. लव जिहादचे प्रकरण म्हणून सांगितलेली एक केस 2017 मधे न्यायालयाने फिरवली आणि त्या मुलीला पुन्हा आपल्या नवऱ्याबरोबर राहण्याची मुभा देण्यात आली. लव जिहादची हाकटी पिटणारे तोंडावर आपटले. मुसलमान सुद्धा आपला मतदार झाल्यानंतर हिंदूत्ववादी राज्यकर्ते त्यांच्या अजानच्या वेळी आपली सभा थांबवून ठेवू लागले. अशा वेळी हिंदूत्ववाद्यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही. पुढचा काही काळ तरी हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 48407
प्रतिक्रिया 196

प्रतिक्रिया

In reply to by बिटाकाका

मुळात ते जैन असते तरी त्याचा या विषयाशी काय संबंध?? आहे ना. बादरायण संबंध जोडून जातीयवादी मळमळ ओकणे हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. उदाहरणार्थ श्रीरामायण आणि पुष्यमित्र शुंग. तसेच उगाच जैन, हिंदू असले काहीतरी उकरायचे. मग त्याचा विषयाशी अजिबात संबंध नसला तरी हरकत नाही.

कृपया लेखामधे वर्णिलेल्या उदाहरणांबद्दल बोला त्या उदाहरणांमध्ये काहीच वावगं वाटत नसेल तर स्वच्छपणे तसं सांगा

असा एकांगी लेख नर्मदेच्या गोट्याचाच असू शकतो..

पुढचा काही काळ तरी हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते.
कायपण ! आमच्या पाठीशी शिवभक्त, मंदिर प्रेमी युवराज आहेत. https://www.huffingtonpost.in/uday-balakrishnan-/the-congress-is-indias… अर्थात हिंदुत्वाची व्याख्या काय ती सेटल करून घ्या.

In reply to by sagarpdy

सही बात.. जब तक "सुरज" "चांद" रहेगा... हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणारच. ... अर्थात हिंदुत्वाची व्याख्या काय ती सेटल करून घ्या. ==>> अजून हिंदू धर्म आहे की जीवन पद्धती हेच जर नीट ठरले नाही तर व्याख्या कुठून सेटल करणार?

मुसलमान सुद्धा आपला मतदार झाल्यानंतर हिंदूत्ववादी राज्यकर्ते त्यांच्या अजानच्या वेळी आपली सभा थांबवून ठेवू लागले.
त्येचं कसं हाय, पुरोगामी लोक मोदीची भाषणं आत्ता ऐकू लागलेत म्हणून त्यांना अजानच्या वेळेस भाषण आत्ता आत्ता थांबू लागलंय असं वाटतंय. पर तसं काय नाय. ते भाषणं अगोदर बी थांबायचे आन (बिथरलेल्या) हिंदू लोकायले ते थांबणं अगोदरपासूनच माहिताय. ============================================= पुरोगाम्यांची माहिती जशी जशी वाढलालीय तसा तसा त्यांचा कॉग्निटिव डिसोनान्स (शब्दसौजन्य : युयुत्सु) लैच वाढत चाल्लाय.

In reply to by arunjoshi123

ते भाषणं अगोदर बी थांबायचे आन (बिथरलेल्या) हिंदू लोकायले ते थांबणं अगोदरपासूनच माहिताय>>> ==>> अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी पूर्वीसुद्धा होयच्या पण २०१४ नंतर काही लोकांना त्याचा साक्षात्कार होऊ लागला. तो भाग गौण आहे. पुरोगाम्यांची माहिती जशी जशी वाढलालीय तसा तसा त्यांचा कॉग्निटिव डिसोनान्स (शब्दसौजन्य : युयुत्सु) लैच वाढत चाल्लाय.>>> ==>> हीच तर धोक्याची चाहूल वाटत आहे.

एका बाईवर बलात्कार झाला. पोलिसांनी डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला. बलात्कार्‍यांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे तिच्यामधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती. यातून सूडाची सुरुवात झाली. तिच्या घरच्यांनी तोच कित्ता गिरवला. कोर्टातही तिला डावलले गेल्याची भावना तशीच राहिली. पुढे तिचे घर जाळले गेले. हे काही बलात्कार्‍यांची मर्जी राखण्यासाठी झाले. यामुळे तिच्या घरच्यांना आयते कोलीतच मिळाले आणि मग त्यांनी सरकारच्या विरोधात रान पेटवले. "बघ गं बाई, तुझी दखलसुद्धा घेतली जात नाही आणि बलात्कार्‍यांची मात्र मर्जी कशी राखली जाते पहा" असे घरचे शेजार्‍यांना सांगत राहिले. अबलेवर सतत कसा अन्याय होतो आहे असे सांगणारे छेडछाडिसारखे सारखे मुद्दे पुढे आणू लागले. या कथा रंगवून रंगवून सांगितल्या जायला लागल्या. ह्या गावात बायका खतरे में असे म्हणायला घरच्यांना संधीची कमतरता कधीच भासली नाही. त्यांना भांडवल करता येईल असे मुद्दे सतत मिळत राहिले. यातूनच ज्या सरपंचांनी साक्ष फिरवली, त्याच पंचांना घरच्यांना खूष करण्यासाठी त्यांच्याच स्वतःच्या घरात जाऊ द्यावे लागले. आपल्यावर बलात्कार झाला आहे हे म्हणणे झाला असल्यावर तसे सोपे असते. छोट्या छोट्या गोष्टींचे (बलात्कार शेवटी एक संभोगच, त्यात काय एवढं? तो आनंदाने का नाही करू द्यायचा, इ इ) भांडवल करून मनामधे असंतोष उभा करता येतो. सरकारने बलात्कार्‍यांच्या वकीलाची फी दिली तर "त्यांना देता मग आम्हाला का नाही" किंबहुना "आम्हाला डावललं जातंय" ही आवडती बोंब ठोकता येते आणि त्यातून राजकारण साधता येते, स्वतःचे महत्व अबाधित राखता येते. या सगळ्या प्रयत्नातून अखेर सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला. पण आजवर आमच्यावर सतत अन्याय होतो आहे, सतत डावललं जात आहे अशा प्रकारच्या तक्रारी करण्याची सवय पडलेल्या बाईला आता मात्र कुठलाच उद्योग राहिला नाही. कारण तक्रार तरी कुणाच्या विरोधात करायची ? निकाल तिच्याच बाजूचा. पण अन्याय होतो आहे अशी रडारड करण्याची सवय मात्र गेली नाही. ती वेगळ्या स्वरूपात बाहेर यायला लागली. आपल्याकडे मूळातच जंगलतोड खूप झालेली आहे. राखायला पाहिजेत अशी जंगले सुद्धा आपण राखू शकलेलो नाही. त्या ठिकाणी माणसाचे अतिक्रमण झाले. त्यामुळे होळीच्या निमित्ताने तरी लाकडे जाळू नका आणि वृक्षतोड करू नका. निसर्गाने आपल्याला दिलेले पाणी मर्यादित आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने आपल्या घरातले पाणी नासू नका त्यामुळे आपलीच गैरसोय होणार आहे. असे कोणी सांगायला गेले की बिथरलेली बाई अंगावर यायला लागली. आम्हालाच तुम्ही बंधने का घालता ? त्यांच्या क्रिकेट लॉनला ते इतके पाणी खर्च करतात मग आम्ही पाण्याची नासाडी का करू नये असे युक्तिवाद ऐकू यायला लागले. गावातील प्रदूषण पाहून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली त्यावेळी अनेक शेजार्‍यांनी त्याचा निषेध केला. काही जणांनी तर आजवर आपण फटाके उडवत नव्हतो पण केवळ निर्णयाचा निषेध करण्यासाठी फटाके उडविणार आहोत असे जाहीर केले. निकाल आल्यानंतर घरचे निस्तेज व्हायला लागले. पर्यावरणाच्या विनाशामधे न्याय शोधायला लागले. केसवर काम करणारे लोक आपापले काम करत होते पण पाठींबा देणार्‍या गटांमधे मात्र अहमहमिका सुरु झाली. पूर्वी बलात्कार्‍यांचे कसे लाड होत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात लढणारे घरचे आपापसात लढून स्वतःचे उपद्रवमूल्य वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. बाबांनी तापलेल्या भावाला कानपिचक्याही दिल्या. ज्या लोकांनी एवढी मोठी केस जिंकली, तेच आता अगदी क्षुल्लक मुद्यांचे केविलवाणेपणाने भांडण करताना दिसू लागले. न्यायप्राप्तीतला आणखी एक सुप्त हेतू असतो. तो म्हणजे आपल्याला मते देणाऱ्यांना चुचकारणे आणि आपल्या विरोधात असणाऱ्यांना झोडपणे, धाक दाखवणे, बदनाम करणे. घरच्यांनी एक प्रकारे शेजार्‍यांना चुचकारले आणि आपल्याला मते न देणाऱ्या बलात्कार्‍यांच्या समर्थकांना इशारे दिले, धाक बसवला. सुरुवातीला न्यायासाठी केस लढणारे अशी प्रतिमा असणाऱ्या गृहप्रमुखांना केवळ शेजार्‍यांचीच नव्हे तर अन्यायकर्त्यांच्या शेजार्‍यांचे सुद्धा समर्थन मिळू लागल्यानंतर बलात्कार्‍यांना दुखावणे परवडणारे नव्हते. त्यांच्या विरोधात छेडछाड वगैरे सारखे मुद्दे मांडणे सुद्धा आता अवघड झाले. कारण आपल्याला समर्थन न देणाऱ्याला सर्व प्रकारे कोंडीत पकडण्यासाठी निरनिराळे प्रचाराचे, अपप्रचाराचे मुद्दे वापरले जातात. ते मुद्दे तो आपला समर्थक झाल्यानंतर पुन्हा बासनात गुंडाळून ठेवावे लागतात. छेडण्याचे प्रकरण म्हणून सांगितलेली एक केस 2017 मधे न्यायालयाने फिरवली आणि त्या मुलाला सोडून दिले. अशी हाकटी पिटणारे तोंडावर आपटले. अन्यायकर्ते सुद्धा आपले समर्थक झाल्यानंतर गृहकर्ते त्यांच्या पूजेच्या वेळी आपली व्यत्यय आणणारी कामे थांबवून ठेवू लागले. अशा वेळी शेजार्‍यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही. पुढचा काही काळ तरी बलात्काराला न्याय देण्यासाठी गावामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते. ====================================================================================== बलात्कारकर्ते म्हणजे काँग्रेस, मुसलमान नव्हे.

In reply to by arunjoshi123

बलात्कारकर्ते म्हणजे काँग्रेस, मुसलमान नव्हे.>> ==>> छान.. तुम्ही पण भाजप प्रवक्ते झालात का ? दंडवत घ्या ..._/\_

In reply to by विशुमित

नै हो, जोशी प्रवक्ते नव्हे तर, तर ते या कल्पित कथेतील सर्वोच्च-न्यायालया च्या भूमिकेत, आहात कुठे ?

In reply to by पगला गजोधर

असे मी अजो ना लगेच नाही म्हणू शकणार कारण त्यांचे बरेच लिखाण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा वेगळा अँगल देऊन जातो. बऱ्याच वेळा ते मजेशीर पद्धतीने आपले म्हणणे मांडतात. फक्त ते नक्की कोणाची बाजू घेऊन बोलतात हे अजून तरी ठामपणे समजले नाही. असो...

In reply to by विशुमित

फक्त ते नक्की कोणाची बाजू घेऊन बोलतात हे अजून तरी ठामपणे समजले नाही.
लोकांची वा पक्षांची स्वतःचीच बाजू फार ठाम नसते. मग मी कसा काय कोणाची ठाम बाजू घेऊ शकेन. --------------------- ज्या कुणाचं ज्या कोणत्या विषयात जे काही मत आहे "किमान मांडायच्या वेळी" ते सुसंगत, संपूर्ण आणि सुस्पष्ट असावं अशी माझी अपेक्षा असते. ते मत माझ्या मताशी मॅच न होणं गौण असतं.

In reply to by विशुमित

मी सध्याला तरी भाजप प्रवक्ता* आहे. भाजप सध्याला देशासाठी बेस्ट चॉइस आहे. लेट्स नॉट मिन्स वर्ड्स. ========================= हा प्रतिसाद लेखाच्या लॉजिकच्या शोधार्थ आहे. भाषा प्रचंड विचित्र आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. उगाच मंडळींना हिंदू वि मुस्लिम संदेश जाऊ नये म्हणून काँग्रेस वि भाजप असं म्हणायचं आहे. =================== *आत्मघोषित

In reply to by arunjoshi123

गाच मंडळींना हिंदू वि मुस्लिम संदेश जाऊ नये म्हणून काँग्रेस वि भाजप असं म्हणायचं आहे.>> ==>> हे मात्र चांगले केलेत. मग चालु द्यात भाजप-काँग्रेसच द्वंद्वव . काही हरकत नाही. पुरोगामी काही फक्त काँग्रेस मधेच नाही आहेत, एवढे नमूद करू इच्छितो.

In reply to by विशुमित

पुरोगामी हा शब्द भक्त या शब्दाचा काउंटर पार्ट म्हणून वापरतो. चांगला शब्द बदनाम करायचा अधिकार दोन्हीकडे असायला पाहिजे ना? ===================== भक्त तरी कुठे फक्त भाजपमधेच आहेत?

In reply to by arunjoshi123

बदनाम करण्याने लौकिक दृष्टीने जरी त्याला कमीपणा आला तरी त्याचा चांगुलपणा कमी होईल असे वाटत नाही. हे तुम्ही देखील जाणता. बाकी मोठे होता नाही आले तर पुढच्याला छोटे करा अशी चाणक्य फेम वाक्य कुठेतरी वाचले होते. असो... .... भक्त सगळीकडे आहेत पण भाजप भक्त लय पावरफुल मसला आहे. होईल तुम्हाला देखील अनुग्रह.

In reply to by विशुमित

बदनाम करण्याने लौकिक दृष्टीने जरी त्याला कमीपणा आला तरी त्याचा चांगुलपणा कमी होईल असे वाटत नाही.
+१११ सर्व विचारसरणींचे अनेक सज्जन लोक असतात. त्यांच्या सातत्यशील चांगुलपणामुळे विचारसरणींना एक सनातन समर्थक वर्ग उभा राहतो. विचारसरणींचं असं स्वतःचं चांगुलपण किंवा वाईटपण नसावं. म्हणजे जगात अत्यंत प्रजाहितदक्ष राजे झाले आहेत आणि अनेक लोकशाहींनी नागरीकांना देशोधडीला लावले आहे. पण का कोण जाणे अशा सज्जन व्यक्तिंची आपल्या विचारधारेशी अत्यंत दृढ भावनिक बांधिलकी असते नि अशी बांधिलकी विरुद्ध वा भिन्न विचारधारेतील चांगुलपण पहायला लागणारी बुद्धी कुंठित करून टाकते. दुर्दैवानं त्यांची गाठही नेहमी भिन्न विचारसरणीच्या अशाच लोकांशी पडते ज्यांचा ज्वर जास्त आणि वैचारिक प्रतिनिधित्वक्षमता शून्य असते.

In reply to by नर्मदेतला गोटा

तुम्ही टाकली आहेतच कि उदाहरणे पण ती सरसकटीकरणात जातात असे मत व्यक्त केलेच आहे. तुम्ही टाका तुमची स्पेसिफिक उदाहरणे म्हणजे केस बाय केस चर्चा करतीलच सगळे.

1. काय वाह्यात प्रश्न कम शंका आहे, मी मानायचा न मानायचा प्रश्न येतोच कुठे? 2. तुमच्या वरच्या चिखलफेकीत  3. तुम्ही दोघेही कुठल्याही मुद्द्यावर बोलत नसून माझ्या वैयक्तिक मतांवर पिंका टाकायचे काम करत आहात  4. आपला कयास चुकीचा होता मालक 5. तुम्हाला माझा मुद्दा समजलेला नाहीये  6. कपाळावर हात मारून घ्यायची स्मायली कुणी वाह्यातपणा करतो आहे, कुणी मुद्दा सोडून बोलतो आहे, कुणी नुसताच पिंका टाकतो आहे, कुणी चिखलफेक करतो आहे, काही जणांची बिटाकाका म्हणताहेत ते समजून घेण्याची पात्रताच नाही यामुळे बिटा काकांना कपाळाला हात लावावा लागत आहे . . .

In reply to by नर्मदेतला गोटा

आलात ना मूळ मुद्द्यावर, तुमच्या लेखात तर दम नाहीचाये म्हणून बिटाकाका नामक शूद्र सभासदवर घसरण्याची वेळ येतेय. अभ्यासू लेखनासाठी लै लै शुभेच्छा!! -------------------------------- हिंदुत्ववादी म्हणजे तुमच्यामते कोण हा वरपासून खालपर्यंत विचारला गेलेला प्रश्न एकदा तरी डोळ्याखालून घातला असतात आणि उत्तर द्यायचे कष्ट घेतले असतेत तर अशी वैयक्तिक आयडीचे नाव वगैरे घेऊन टीका करायची गरज पडली नसती. त्यामुळे असोच, तुम्ही अजून वैयक्तिक घोडे नाचावलेत तर माझी काही हरकत नाही, उलट अनेकानेक शुभेच्छा!!

अरुण जोशी यांची कमेंट आवडली. लेखाचे छान विडंबन केलेले आहे. पण तुम्हाला वाटते तशी अॅनोलोजी पूर्णपणे लागू करता येणार नाही.

बिटाकाका तुम्ही सगळ्यांनाच कमी का बरं लेखता ?

In reply to by नर्मदेतला गोटा

वैयक्तिक बोलणे ही तुमची आवड दिसते, अशीच जोपासत राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ------------------------------------- वैयक्तिक टोलेबाजीतून वेळ मिळाला वर तुम्ही लेखात उल्लेखिलेले हिंदुत्ववादी कोण ते तेवढं (उत्तर तयार असेल तर ) सांगून टका.

उत्तर भारतात हिंदू बनिया आणि जैन हे दोन भिन्न धर्म नाहीत. ======================== हिंदू बनिया लोक हिंदू ब्राह्मण वा हिंदू अन्यशी खूप दूरचे आहेत (रोटी बेटी इ त). त्यामानाने हिंदू बनिये आणि जैन खूपच घट्ट आहेत. रादर एकच आहेत.

एक साधासा प्रश्न आहे रंगपंचमीला पाणी नासल्यामुळे आणि होळीला लाकडे जाळल्यामुळे हिंदुत्वनिष्ठा कशी काय सिद्ध होते (शक्य असेल तर या प्रश्नाला उत्तर द्यावे प्रश्नाला प्रश्न करत बसू नये)

In reply to by नर्मदेतला गोटा

समजा भारतात वर्षाला १०० लि. पाऊस पडतो. त्यातले ९० लि. १-२ महिन्यात वाहून समुद्रात जातात. ४ लिटर वर्षभर घटलेली भूजलपातळी, वितळलेला बर्फ इ इ मधे जातात. उरलेल्या ६ लिटरपैकी ४.८ लिटर शेतीला देतात. उरलेल्या १.२ लिटरपैकी ०.९ लिटर उद्योगांना देतात. उरलेल्या ०.३ लिटरपैकी ०.१ संस्थांना देतात. आता उरलेले ०.२ लिटर पाणी देशभर वर्षभर घरगुती वापरसाठी असते. त्यात एक दिवस होळी खेळली तर जग इकडचे तिकडे होइल म्हणणारे, म्हणवून घेणारे शुद्ध महामूर्ख असतात. ---------------- कारण ४.८ लिटर शेतातून आलेले पाणी खते आणि किटकनाशके असली वीषे घेऊन येते. उद्योगांनी झिरो लिक्विड डिस्चार्ज करावा वा एम पी सी बी नॉर्म पाळावे असा नियम आहे तो ४% लोक पाळत नाही. संस्था नि घरे यांचे पाणी प्रत्येक गावात नि शहरात ट्रीट करूनच नदीत सोडावे असा नियम आहे तो भारतात १% पाळला जात नाही. -------------------------- तरी लोक नेमके रंगपंचमीलाच (होळी एवजी) बोंबा ठोकतात म्हणजे १. एकतर मूर्ख आहेत. २. किंवा जलक्षेत्रातलं काही कळत नाही. ३. किंवा उत्साही पुरोगामी आहेत. ४. किंवा जे हे सगळं जाणतात, ते हरामखोर हिंदूविरोधी आहे. त्यांना जोर फक्त त्याच दिवशी येतो. ते निर्बुद्ध लोकांचं असं मत बनवतात कि जे काय वाईट होतं ते त्याचं दिवशी होतं. सबब रंगपंचमी उत्साहाने साजरी करणे हिंदूत्ववादी आहे. कारण तो ऐतिहासिक सण आहे नि त्याने ०.००००००००००१% देखील जलप्रदूषण होत नाही. अक्कलवंतांना जलप्रदूषण म्हटले कि नक्की कशावर जोर द्यावा याचीही अक्कल हवी. आणि आपल्या परंपरांवरचे प्रेम भलतेच पातळ नसावे. आणि रंगपंचमीला जास्त किंवा फुकट पाणी सरकार देत नाही. ==================================== लाकडाची आकडेवारी असू दे.

In reply to by नर्मदेतला गोटा

प्रश्नाला प्रश्न करत बसू नये
हे भारीये. स्वतःला विचारलेल्या प्रश्नांना बगल देऊन वैयक्तिक टोलेबाजी आणि दुसर्यांना हा वैधानिक इशारा. लैच भारी.

माझे एकच विचारणे आहे प्रदूषणामधे हिंदुत्व शोधावं का कुठे सावरकरांचे हिंदुत्व आणि आज हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेल्या वाटेल त्या गोष्टी

In reply to by नर्मदेतला गोटा

अवश्य शोधावं. का ते सविस्तर लिहिलं आहे. कळलं नाही का? =============================== उद्या कोणी गोंगाट करेल हिंदूंनी प्रजनन थांबवावं. आणि तुम्ही विचाराल प्रजननामधे हिंदुत्व शोधावं का? ========================================== कोण सावरकर? त्यांचं कोणतं हिंदुत्व? गाय उपयुक्त पशू हा शास्त्रीय आणि जीव पुन्हा जन्म घेतो हा अशास्त्रीय विचार एकदाच करणारा माणूस! आणि माणसाची एक क्लिष्ट तात्विक विचारसरणी असेल तर ती लोकांपर्यंत पोचवायला एक संघटन हवं. जसं शिवाजीचं राज्य होतं, हेडगेवारांचा संघ आहे, दयानंद सरस्वतींचा आर्य समाज आहे, समाजवाद्यांचा राष्ट्र सेवा दल आहे, दाभोळकरांची अनिंस आहे, तसं. लोकांनी काय सावरकरांची पुस्तकं वाचून हिंदू धर्म पाळावा कि काय? सामान्य गावकर्‍यांपर्यंत सावरकरी हिंदुत्व पोचवणारं काहिही नाही म्हणून त्यांचा हिंदुत्ववाद पिचका आहे. होळी आणि रंगपंचमी जपणारे सामान्य हिंदू जे हिंदूत्व जपतात तेच खरं हिंदूत्व. =============================== सावरकरांना (म्हणे) तरुणपणी भारतीय इस्लाम आवडे (वा पंगा इ नव्हता.). नंतर (म्हणे) त्यांचं मत विखारी झालेलं. हिंदू लोकांनी नक्की काय करावं त्यांचं हिंदुत्व व्हर्जन फॉलो करताना?

सहीय !! जर आज हिंदु समाज बिथरलेला आहे अस वाटत असेल तर तो खुपच सोशीक आहे ह्याची ही ग्वाही आहे. ईतकी पीडा तर देशात कोणत्याच समाजाला दिली गेलेली नाही. दिल्लीत स्वातंत्र्यानंतर एका रोडला औरंगजेबच नाव देण्यात येत, तरी सुद्धा हिंदुंनी बिथरु नये १९८० साली ३,५० लाख काश्मिर पंडीत देशोधडीला लागतात तरी सुद्धा हिंदुंनी बिथरु नये एका पडीक वापरात नसलेल्या बाबरी मस्जिदीला पाडल्या बद्दल हजारो हिंदुंचे प्राण घेतले गेले तरी सुद्धा हिंदुंनी बिथरु नये स्वातंत्रानंतर ७० वर्षांपर्यंत हिंदु समाजाच्या प्रमुख देव श्री राम यांच्या जन्म स्थानाच्या देवळा बद्दल भांडायला लागतय तरी सुद्धा हिंदुंनी बिथरु नये लाखो हिंदुंना ( कर्नाटकातील, केरळातील ) फक्त ते हिंदु आहेत ह्या कारणाने ठार मारणार्या टिपु सुलतानला दे शाचा हिरो ठरवण्यात येत तरी सुद्धा हिंदुंनी बिथरु नये ( जुन्या काळात केरळातले ब्रांम्हण हे देशात प्रमुख उच्च शिक्षित हिंदु होते, उदा, शंकराचार्य ) "पोलिस नसले तर १५ मिनीटात हिंदुस्तानला हिंदु विरहीत करुन टाकु " ईती ओवेसी बंधू , हे सर्व मिडीयाला माहीत असुन सुद्धा ते जिवंत आहेत, त्यांच्या केसाला धक्का लागलेला नाही तरी सुद्धा हिंदुंनी बिथरु नये वरचे उदाहरण फक्त दाखल्यासाठी दिलेले आहेत. जर तरी सुद्धा हिंदुंनी बिथरु नये अस वाटत असेल तर वाळुत डोक खुपसुन बसा !!

In reply to by डँबिस००७

सर, इथे हिंदू म्हणून कोण तुम्हाला अपेक्षित आहे ? गावात घोड्यावरून मिरवू शकत नाही, 21 व्या शतकात ही, हत्या होते, तो दलित तरुण हिंदु म्हणून तुम्ही गणला होता का ? स्त्रीला रेल्वे फलाटावर पाहून हस्तमैथुन करणारा तरुण हिंदू असतो का ? उघड उघड स्त्रीची छेड काढली तरी आजूबाजूचे हात धरून उभे राहणारे हिंदू असतात का ? काही जण ब्यांका बुडवून पळून गेलेत, ते हिंदू होते का ? डोक्यावरून मैला वाहणारे, हाताने गटार साफ करणारे हिंदू असतात का ?

In reply to by नर्मदेतला गोटा

गोटाजी, तुमचा लॉजिकचा लै मोठा प्रोब्लेम हाये. ===================================== हिंदूंनी बिथरणे योग्य कि अयोग्य हा चर्चेचा मुद्दा असू शकतो. पण सुयोधन आणि दुर्योधन यांच्यात वितुष्ट / मतभेद आहेत, म्हणून पांडवांशी लढूच नये?

In reply to by नर्मदेतला गोटा

न गो साहेब प गजोधर ने विचारलेल्या प्रश्नाची ऊत्तरे खरेतर तुम्हीच द्यायला पाहीजेत !! तुम्ही उभी केलेल्या केसचा तो प्रेमाईस असेल !! पण तुम्ही दुसर्यावरच तोफा डागताय !,

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर, तसे तुम्ही दिलेले सर्वच मुद्दे खोटारडे आहेत. ================= पण खरे मानले तरी, लहान भावाशी भांडण आहे म्हणून वाडा पाटलाला लूटू देणं मूर्खपणा आहे.

In reply to by पगला गजोधर

डोक्यावरून मैला वाहणारे, हाताने गटार साफ करणारे हिंदू असतात का ?
आधुनिक सॅनिटेशन सायन्सचा शोध होइस्तो, जगात सर्वत्र मैला, गटार साफ करणे कसे हाताळले जाई?

In reply to by पगला गजोधर

स्त्रीला रेल्वे फलाटावर पाहून हस्तमैथुन करणारा तरुण हिंदू असतो का ? उघड उघड स्त्रीची छेड काढली तरी आजूबाजूचे हात धरून उभे राहणारे हिंदू असतात का ?
११० कोटी हिंदूंनी सगळे फलाट चिकचिक करून ठेवलेत कि काय?

In reply to by पगला गजोधर

काही जण ब्यांका बुडवून पळून गेलेत, ते हिंदू होते का ?
कहना क्या चाहते हो भाई? एका हिंदूने बँक बुडविली म्हणून हिंदू धर्म बुडवायचा?

In reply to by arunjoshi123

एखादया भरकटलेल्या अहिंदू तरुणाने जर अतिरेकी कारवाय केली , तर त्या संपूर्ण अहिंदू धर्मा विषयी, हिंदूंना बिथरवून का टाकलं जातंय ?

In reply to by पगला गजोधर

त्या अहिंदू धर्माचे १८ कोट लोक भारतात आहेत. त्यांना इजा करायला बिथरलेले ११० कोट लोक हिंदू आहेत. प्रत्यक्षात काय झालंय का? पुरोगामी सोडून कोणाचंही डोकं बिथरलेलं नाही.

In reply to by arunjoshi123

बिथरलेले ११० कोट लोक हिंदू आहेत
बघा, धागा लेखकाचा हा धागा परत एकदा वाचा नं प्लिज... त्याने ११० कोट लोकांना उद्देशून "बिथरलेले" हा शब्द प्रयोग केला आहे, असा आपला विव्ह का झाला असेल बरे ? याबद्दल जरा मला विचार करू द्या प्लिज... कारण ते उत्तर कोणी देतंच नाहीये...

In reply to by पगला गजोधर

मी अगदी सुस्पष्ट उत्तर दिलं आहे. बिथरलेत ना हिंदू, ना अहिंदू, ना हिंदुत्ववादी, ना त्यांचे विरोधक. बिथरलेत फक्त पुरोगामी.

In reply to by arunjoshi123

मग तुम्हीही लगेहाथो एक लेख पाडाच... "बिथरलेले पुरोगामी", व सप्रमाण माहिती सह लिहा प्लिज.. वाचायला आवडेल आपले लेखन

In reply to by पगला गजोधर

गजोधारजी, ते घोड्यावरून फिरले म्हणून हत्या झाली ही बातमी तुम्ही अर्धवट सांगून लोकांचे विचार चुकीच्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न करत नाहीयेत का? अशा घटनांचा विकटीम म्हणून वापर करणे गैर आहे असे तुम्हाला अजिबात वाटत नाही का? ************************ प्राथमिक तपासात ही हत्या छेडछाड प्रकरणातून झाली असल्याचा दावा पोलीस करत आहेत. ही गोष्ट तुम्हाला माहीत नाहीये की माहीत नाही असा दाखवून चुकीचा संदेश द्यायचाय? ************************ इथे जसा हे हिंदू आहेत का वगैरे प्रश्न विचारावासा वाटला तसा तो लेखकाला का नाही विचारावा वाटला??

In reply to by पगला गजोधर

सर, इथे हिंदू म्हणून कोण तुम्हाला अपेक्षित आहे ? गावात घोड्यावरून मिरवू शकत नाही, 21 व्या शतकात ही, हत्या होते, तो दलित तरुण हिंदु म्हणून तुम्ही गणला होता का ?
आजकालच्या हिशेबानं बामनाच्या बाईवर झालेला बलात्कार हा पुरुष - स्त्री अन्याय इ सदरात येतो. हाच बलात्कार दलित स्त्रीवर झाला तर तो हमखासपणे तिच्या लिंगावर नसून जातीवर असतो. ========================= बा द वे, गुजरात, राजस्थानमधे तबेले सांभाळणारे सगळे दलितच असतात. ही बातमी देणारा पठ्ठ्या लै शहाणा पुरोगामी दिसतो.

In reply to by डँबिस००७

डँबीस साहेब तुमची कॉमेंट वाचली पण प्रदूषण केल्याने आणि पाणी नासल्याने टिपू सुलतानचा बंदोबस्त कसा काय करता येईल ?

In reply to by नर्मदेतला गोटा

पण प्रदूषण केल्याने आणि पाणी नासल्याने टिपू सुलतानचा बंदोबस्त कसा काय करता येईल ?
असलं फ्रेजिंग डोक्यात घडायला जी बुद्धी लागते तिला पुरोगामी बुद्धी असे म्हणतात.

In reply to by नर्मदेतला गोटा

माणूस (कींवा कोणताही सजीव) नुसते साधे जगतो तेव्हा खूप प्रदूषण करत असतो. प्रदूषण होऊ नये म्हणून जगू नये असं म्हणाल का? पाण्याची इतकी आकडेवारी तुम्हाला दिली, त्यातलं काहीतरी तुम्हाला कळालंय का?

इथे प्रदूषणाचा विषय आहे. पुरोगामी वगैरे चा काय संबंध सांगू शकाल का ? आपला दिल्लीचा काही अनुभव आहे का ?