Skip to main content

राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 12/03/2018 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
शाब्बास देवेंद्र शेतकरी आंदोलन समाप्त राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

वाचने 54034
प्रतिक्रिया 226

प्रतिक्रिया

In reply to by पगला गजोधर

रावबाजीनी इतर अनाथास मदत न देता स्वजातीतील जेवणभाऊंची सोय केली , हे वरच्या परिच्छेदात जे लिहिले आहे , ते खरे आहे का ?

In reply to by manguu@mail.com

फुल्यांनी लिहिलंय म्हणजे खरंच असणार. १३ व्या किंवा त्याआधीच्या शतकात लिहिलेले ग्रंथ हे गरीब बिच्चा-या मुस्लिमांविरूद्ध समाजमन कलुषित करण्यासाठी लिहिलेले डावपेची ग्रंथ आहेत हे जसं त्यांना १९ व्या शतकात जन्म होऊनसुद्धा समजलं तिथे त्यांना त्यांच्या जन्मापूर्वी जेमतेम १५-२० वर्षे आधी घडलेली घटना का समजणार नाही?

In reply to by श्रीगुरुजी

सगळे इतिहासकार , शाहीर , दशावतार, रामलीलावाले , टीव्ही सिरियल लिहिणारे , मिसळपाववर लिहिणारे ... .. सगळे त्यांच्या जन्मापूर्वीच्या घटनांबद्दलच लिहित असतात. कुणाचे खरे नि कुणाचे खोटे म्हणायचे म्हणे ?

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही नुसते पुरावे विचारात राहू नका हो गुरुजी, कधी कधी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे पण उत्तर देत चला...

In reply to by पगला गजोधर

जे कोणी चर्चेला कंटाळुन त्याच त्या निरर्थक मुद्द्यांभोवती फिरुन वैतागलेले असतील व ज्यांना खरोखर फुलेंच्या कार्याचे परखड प्रामाणिक उत्कृष्ठ मुल्यमापन वाचायचे असेल तर अशा सर्वांना कदाचित हे खालील तर्कतीर्थ श्री लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे हे अप्रतिम विश्लेषण उपयोगी ठरेल असे मला वाटते. इथे मराठी पुस्तकाचा दुवा ( छोटेच आहे ५७ पानांचे ) व मुळ मराठी पुस्तकच वा निबंध म्हणा हवा तर फार वाचनीय आहे. पण ते खेळत बसावे लागेल झुम शी http://marathifreebooks.blogspot.in/2015/10/jyoticharitra-jyotiba-phule… आणि त्याऐवजी वरील पुस्तकाचाच इंग्रजी अनुवाद पिडीएफ मध्ये इथे उपलब्ध आहे. http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/phule.pdf माझे मत आहे त्रास झाला तरी मराठी पुस्तकालाच प्राधान्य द्यावे. यातील मतांवर चर्चा करण्याची अजिबातच गरज नाही हे आपापल्या आकलनासाठी अभ्यासासाठी वाचावे या अपेक्षेने इथे देत आहे. ज्याला कोणाला रस असेल त्याच्यासाठी असो

In reply to by मारवा

मारवाजी लिंक बद्दल धन्यवाद, तर्कतीर्थ जोशी यांच्या या लिंक लेखनातून एक गोष्ट कळते, की तत्कालीन समतावादी पुरोगामी ब्राम्हण लोकं सुद्धा, . या बुरसटलेल्या विचारांच्या प्रतिगामी ब्राम्हणवादी वृत्तीच्या लोकांकडून भरपूर पिडले गेलेत, त्यानापन ह्या दलिंदरी मनु वादी वृत्तीच्या लोकांनी भरपुर त्रासले होते.

In reply to by मारवा

आता आली का पंचाईत. तर्कतीर्थ म्हणतात की शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना गुरू केले असे फुल्यांनी पोवाड्यात लिहिले आहे. पण रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते हे ब्रिगेडी आकसामुळे मान्य करीत नाहीत. नक्की कोण खरं बोलतंय? फुले, तर्कतीर्थ की ब्रिगेडी?

In reply to by श्रीगुरुजी

हाच प्रश्न तुम्हाला विचारला होता , कोण खरे बोलतय हे कसे ठरवायचे , तर तुम्ही बोल्ले की जो पुरावा देतोय तो.

In reply to by श्रीगुरुजी

अ ने त्याच्या पुस्तकात पुरावा म्हणून ब चे विधान वापरले. ब नेही त्याचे विधान क च्या पुस्तकातून घेतले होते. ..... विधान वर्णन करत असलेली घटना १६ व्या शतकातली अन अ ब् क् तिघेही १९-२० व्या शतकातले. खरं खोटं कसं करायचं ?

पगला गजोधर,
गापै तुमच्या प्रतिक्रियेचे ऑडिट करावे म्हटले तर, पहिल्याच लक्षणीय निरीक्षणात तफावत आढळली.
माझ्यासारख्या छपराट्याचं कसलं ऑडिट करता. त्यापेक्षा आपण फुल्यांच्या पुस्तकाचं ऑडिट करूया. आ.न., -गा.पै.

अजेण्डाधारी मंडळींनी हा त्री-ओळी धागा एव्हढा हायजॅक केलाच आहे तर तो नर्व्हस नाईंटीचा बळी होऊ नये म्हणून थोडासा हातभार (किंवा बोटभार / कीबोर्डाधार) !!

In reply to by चामुंडराय

चला चला आपण सगळेच एक एक सिंगल काढुया फिनिश करायला मोगा आहेतच. त्यांची एक प्रतिक्रिया छ्क्के के बराबर है..

In reply to by चामुंडराय

अगोदर "नर्व्हस नाईंटीचा" हे "नर्व्हस नाईटीचा" असे वाचले... धक्क्यातून सावरल्यावर मग परत नीट वाचले =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नर्व्हस नाईटी :) :) डॉ. साहेब नर्व्हस नाईटी भारीच .. ख्या ख्या ... आता एक नर्व्हस नाईटीचा बळी अशी जिल्बी पाडाच. BTW - पाडाच हा शब्द लिहिताना गुगलने भलताच शब्द सुचवला तो प्रूफ रिडींग करताना लक्षात आले म्हणून बरे अन्यथा आनगापै ची कपालहस्तमुद्रा: करावी लागली असती.

पगला गजोधर,
भाजपा या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू मुसलमान दंगे घडवून आणणार,
२०१२ साली मोठ्या कौतुकाने अखिलेश यादवला निवडून दिल्यावर लगेच मुझफ्फरनगरला दंगली झाल्या. त्या काय भाजपने केल्या? गोरखपूर व फुलपुरात भाजप हरल्यावर अरारिया त पाकिस्तान झिंदाबादचे नारे देऊन कोण दंगली करवू पाहतोय? भाजपच्या दंगली या सशाच्या शिंगासारख्या आहेत. आ.न., -गा.पै.

महाराष्ट्रात जातीय दंगली घडवल्या जाणार हे यांना आधीच माहित होते. दाऊद इब्राहिम भारतात येणार हे यांना आधीच माहित होते. आता देशात धार्मिक दंगली घडविल्या जाणार हे पण यांना आधीच माहित होते. पण ......... स्वतःच्या पक्षाचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरे पळवणार हे मात्र माहित नव्हते... ते पळवल्यावरच कळलं.

In reply to by श्रीगुरुजी

रेल्वे रोकोचे २-३ महिन्याचे प्लांनिंग बद्दल मात्र महाराष्ट्राच्या गृहखात्याला थांगपत्ताच नव्हता. मला वाटते हे सुद्धा तेवढेच महत्वाचे होते. https://www.loksatta.com/mumbai-news/watch-video-mumbai-rail-roko-was-p… .... बादवे मनसेचे सहा नगरसेवक राज यांनी बंधूंच्या दिमतीला पाठवले अशी कुजबुज ऐकली होती.

विरोधी पक्षांना या रेल रोकोची माहिती कशी काय नव्हती ते मजेशीर वाटतेय. अजून एक मोर्चा करून जनजीवन विस्कळीत करण्याची आणि सरकारविरोधात रोष निर्माण करण्याची एक नामी संधी गमावली त्यांनी. फक्त २०० विध्यार्थी जमले, ह्या काय मजा नाय! ---------------------------------------- कधी कुठे कुठले आंदोलन केले जाणार आहेत याची माहिती ठेवण्यासाठी गुप्तचर खातं असतं होय, चान चान! मला तर वाटले होते कि आंदोलन करणार्यांनी पोलिसांना आंदोलनाचे कारण, दिशा, काळ, वेळ सांगून परवानगी घ्याची असते. तरीही झालेल्या रेल रोकोलो निष्पाप नागरिकांचे संवैधानिक आंदोलन वगैरे म्हटले जाईलच म्हणा! ज्यांनी त्रास भोगला सकाळी ते सामान्य नागरिक गणले जात नसतात कधी!

माई, कर्नाटकात, लिंगायत धर्माला मान्यता देण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले राज्याने टाकली, आता केंद्रातील नरेंद्र काय भूमिका घेतोय ते पाहूया.... आजकाल ते मनमोहन पेक्षाही जास्त मौनात गेलेत, असे दिसते.....

In reply to by पगला गजोधर

धर्मनिरपेक्ष काँग्रेस चे काय झाले हे? यांना आता प्प्रादेशिक, धार्मिक सगळ्या अस्मिता जपण्याची वेळ आलीच. समाज आजुन दुभंगला जातोय पण निवडून यायचे आहे ना? तरी बर बौद्ध आणि मुस्लिम दंगली (म्यानमार व श्रीलंका येथील) दाखवून देत आहेत की सगळे धर्म सारखे. काँग्रेस ला देशाची नाही तर निवडून यायची फक्त काळजी आहे.

In reply to by manguu@mail.com

२०१३ ला सरकार असताना स्वतंत्र धर्माचा प्रस्ताव का म्हणे फेटाळला होता? -------------------------------------------- वीरशैव महासभेने कर्नाटक सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.

In reply to by बिटाकाका

चाण चाण तुमचे ते अयोध्येचे देऊळ तरी बांधा आधी ... मग त्यानाच विचारा तुम्ही रामेश्वरला शिवलिंग पूजले ते आता हिंदु मानायचे की लिंगायत ?

In reply to by manguu@mail.com

आमचे? आणि तुमचे कोणते मंदिर आहे मग? मंदिरच कि..? ================== देऊळ कधी बांधायचे ते बघू सावकाश! ते काँग्रेसच्या दांभिकपणाबद्दल बोला हो आता. आता मान्यता का दिली? २०१३ ला प्रस्ताव आला तेव्हा तो का फेटाळला? ================== तरीपण, तुमच्या माहितीसाठी, ते मंदिर कधी बांधायचे ते सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे हो. तुम्ही आम्ही नाही.

In reply to by बिटाकाका

चाण चाण तुमचे ते अयोध्येचे देऊळ तरी बांधा आधी ... मग त्यानाच विचारा तुम्ही रामेश्वरला शिवलिंग पूजले ते आता हिंदु मानायचे की लिंगायत ?

In reply to by manguu@mail.com

कच्च्या इतिहासाबरोबर दृष्टीदोषही दृग्गोचर होतोय. तस्मात तुमच्या त्या धनगराकडून दृष्टीदोष जाण्यासाठी एखादे जडीबुटीचे अंजन घ्या. अयोध्येचे देऊळ आधी बांधा लिहिलंत म्हणून मंदीराची वस्तुस्थिती सांगितली. त्यात नवंजुनं शिवलिंग कोठून आणलं?

In reply to by सुखीमाणूस

धर्मनिरपेक्ष व धर्मअतिरेकी यात फ़रक आहें. एखाद्या नवीन धर्माला मान्यता देने हे निरपेक्षपणे करणे वेगळे, बुरसटलेले धर्मअतिरेकी त्याला कडवा विरोध करतीलच...

In reply to by पगला गजोधर

आणि त्या धर्मातीलच लोकांनी विरोध केला तर? ======================= काँग्रेसने २०१३ मध्ये याला विरोध केला होता, मग कोण आहे धर्मातिरेकी?

In reply to by श्रीगुरुजी

"हिंदू ", धर्म नसून जीवनशैली आहे, असे आपण मागे मिपावर म्हटले होते का ? जर म्हटले असेल, तर नवीन धर्म तयार होतोय त्याला तुमचा आक्षेप असण्याचे कारण काय ?

In reply to by पगला गजोधर

तुमच्या आमच्या आक्षेपाचं राहूद्या हो थोडावेळ. २०१३ ला काँग्रेसला काय आक्षेप होते ते बघायला पाहिजे. काँग्रेसला ५ वर्षात असे काय झाले कि उपरती सुचली? बरं ती उपरती २०१७, २०१६ ला का नाही सुचली?

In reply to by पगला गजोधर

>>> जर म्हटले असेल, तर नवीन धर्म तयार होतोय त्याला तुमचा आक्षेप असण्याचे कारण काय ? लिंगायत हा वेगळा धर्म नाही. एखाद्या गटाला वेगळे काढून विशेष वागणूक देणे देशासाठी अत्यंत घातक असते. त्यातून समाजात दुही पेरली जाऊन अशांतता निर्माण होते. एका गटाला विशेष वागणूक मिळाली तर असे अनेक गट अशी मागणी करतील व त्यातून अराजक निर्माण होईल. पप्पूच्या पणजोबांनी हेच उद्योग करून काश्मिर व भारतात एक भिंत उभी केली ज्याचे दुष्परीणाम भारत आजही भोगत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

". एखाद्या गटाला वेगळे काढून विशेष वागणूक देणे देशासाठी अत्यंत घातक असते....."
. एक्झयांटली .. गेल्या अनेक शतकांपासून अशीच "वेगळी वागणुकीच्या" घातक प्रकार चालु आहे, हेच शेतकऱ्यांच्या व बहुजनांच्या अनिष्ठेस कारण आहे, असेच महात्मा फुले सांगत होते.

In reply to by पगला गजोधर

त्यांनी तसलं काही सांगितलं नाही. फक्त एका विशिष्ट जातीला कोणत्याही गोष्टीसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी शिव्या घातल्या.

In reply to by पगला गजोधर

"हिंदू ", धर्म नसून जीवनशैली आहे, असे आपण मागे मिपावर म्हटले होते का ? जर म्हटले असेल, तर नवीन धर्म तयार होतोय त्याला तुमचा आक्षेप असण्याचे कारण काय ?
लिंगायतांनी जिवनशैली बदलली हे नविनच ऐकलं. =================== हिंदू ही भारतातली सर्वांची जिवनशैली आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. आमचाही धर्म लातूरी आणि जिवनशैली हिंदू. तुमचा मुस्लिम आणि जीवनशैली हिंदू. हाय काय नाय काय....

In reply to by पगला गजोधर

तुमच्यासारख्यांची मानसिकता अशी आहे की आज लग्न झालं म्हणजे उद्याच मूल झाले पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर जनतेत फूट पाडून आपली पोळी भाजण्यासाठी जाहीर केलेल्या अत्यंत नीच खांग्रेसच्या या निर्णयाला अजून २४ तास सुद्धा झाले नाहीत. तरीसुद्धा लगेच मोदींना शिव्या देणे सुरू. तुम्हाला बद्धकोष्ट झाले तरी त्यावर अजून मोदी मौनात का असे विचारायला सुद्धा तुम्ही मागेपुढे बघणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला बद्धकोष्ट झाले तरी त्यावर अजून मोदी मौनात का असे विचारायला सुद्धा तुम्ही मागेपुढे बघणार नाही.
. बद्धकोष्ठता आणि त्यामुळे कुंथताना, मोदींची आठवण येणे स्वाभाविकच.

मंडळी तुम्ही धर्म धर्म मायनॉरिटी मायनॉरिटी चर्चा करताय Faizan Mustafa , vice-chancellor, NALSAR university of law, Hyderabad यांचा इंडीयन एक्सप्रेस मधील लेख उल्लेखनीय असावा.

In reply to by माहितगार

लिंगायत स्वता मानत असतील तर घटनेनुसार ते स्वतन्त्र धर्माचे आहेतच. मग आता केन्द्राने मान्यता द्यायची काय गरज? हा त्याना अल्पसन्ख्यान्क अशी घटनेत तरतुद करावी लागेल. व त्यानुसार त्याना फायदे मिळतील हा समाज किती मागासलेला आहे हे माहीत नाही. https://en.m.wikipedia.org/wiki/Ministry_of_Minority_Affairs साधारण 4700 कोटी रुपये आहेत या मिनीस्ट्री कडे. आत्ता जे अल्पसन्ख्यान्क धर्म व पंथ आहेत त्यान्ची कमिटीे मान्यता देतील का या नवीन पन्थाला सामावून घ्यायला? जैन धर्म अल्पसन्ख्यान्क असण्याचे फायदे घेत आहे. आणि शिवाय नीरव मोदी सारखे जैन मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करत आहेत.

In reply to by सुखीमाणूस

निरव मोदी असो की डी एस कुलकर्णी, गुन्हेगार व्यक्तीचा व त्याच्या जाती धर्माचा संबंध जोडू नका....