Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २५

लेखक गामा पैलवान यांनी रविवार, 11/03/2018 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274 याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले? याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/ मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं. एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन. जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही. आ.न., -गा.पै.

वाचने 51422
प्रतिक्रिया 265

प्रतिक्रिया

निवडणुकीआधी डरकाळ्या फोडणारे वाघ गादी मिळाली की मांजर होतात.

In reply to by manguu@mail.com

ट्रंपूबाबांनी अशी कोणती निवडणूक लढवली की जिच्यानंतर ते एकदम म्यावम्याव झाले? उद्धव ठाकरे हे भारतीय राजकारणांत आहेत तर पुतीन, ट्रंप व किम हे आंतरराष्ट्रीय राजकारणातले भिडू आहेत. -गा.पै.

In reply to by शलभ

वरीलप्रमाणे, या बातम्या नकारात्मक प्रचारासाठी वापरणाऱ्यांसाठीच तर गडकरीचं वक्तव्य आहे. चुकलंच भाजपचं, आधी नीट लिहून घ्यायचं ना अंधविरोधकांकडून कि नक्की काय मिळालं की अच्छे दिन म्हणणार.

In reply to by बिटाकाका

पण एकंदरीत गडकरींचे बोलणे वावदूक असते असा माझा समज आहे. कारणे? आज (११ मार्च २०१८) ची बातमी आहे ती अशी: गडकरींनी (डोंबिवलीत बोलताना) म्हटले की डोंबिवली हे सर्वात जास्त घाणेरडे शहर आहे, आणि ते सुधारावयाचे असेल तर तेथील नागरिकांनी महापौर किंवा पालिकेकडे धरणे धरले पाहिजे! ते असेही म्हणाले की सर्वच राजकीय पक्ष हे आपापल्या स्वार्थासाठी शहराकडे दुर्लक्ष करतात म्हणून ही परिस्थिती ओढवली आहे! अरे व्वा! ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आम्ही आमची कामे करणार नाही, पैसे खाणार, आणि लोकांनी आपले कामधंदे सोडून धरणे धरावयाचे, आम्ही कामे करावीत म्हणून! ह्या महाशयांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत असे म्हटले की, भारतात खूप मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात व त्यात माणसे दगावतात. ते पुढे म्हणाले की चालक दुचाकी चालविताना हेल्मेट घालीत नाहीत त्यामुळे अपघात होतात. क्या बात है; किती सोपा उपाय आहे ना रस्ते अपघातातील बळींची संख्या कमी करण्याचा? नेव्हीतील अधिकार्यांबद्दल ह्यांनी असेच गैरलागू उद्गार मुंबईत काही दिवसांपूर्वी काढले. खरे तर, आपल्या राजकारण्यांना नको तिथे, संबंध नसता, पिचकाऱ्या टाकण्याची सवय आहे. गडकरी त्यास अपवाद नाहीत.

In reply to by रविकिरण फडके

काहीच्या काही, स्वतःच्या पक्षाचे प्रतिनिधी असतानाही त्याची तमा न बाळगता गडकरी त्यांचे कान टोचत होते हे उलट कौतुकास्पद आहे असे मला वाटते. स्वतःच्या 50 वर्षाच्या हुकलेल्या गोष्टींचे गोडवे गाणाऱ्यांपेक्षा हे बरे आहे. --------------------------------- हेल्मेटबाबतीत पण तेच! विरोधाला विरोध म्हणून काहीही. काय चुकीचे आहे त्यांच्या वक्तव्यात? भारतात होणारे अपघात हे रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे होतात या भ्रमात मी तरी नाही. ---------------------------------- नेव्हीचे प्रकरण जाणून घ्या. त्यांच्या खात्याच्या दृष्टीकोनातुन ते योग्यच बोलले.

In reply to by बिटाकाका

पण कुठेही जबाबदारीने बोलायला हवे. किती टक्के मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे होतात? हेल्मेट (न घालणे) हे रस्ते अपघाती मृत्यूचे क्रमांक एकचे कारण आहे काय? आणि मुदलात, हेल्मेट न घालून अपघात टळत नाही; फक्त संभाव्य मृत्यू टळतो. तुम्हाला अपघात कमी करावयाचे आहेत, की अपघात झाले तरी चालतील पण माणसे मरता काम नयेत असे तुमचे म्हणणे आहे? तीच गोष्ट डोंबिवलीतील भाषणाची. जर KDMC चे कर्मचारी कामे करीत नसतील, ते आणि लोकप्रतिनिधी मिळून जनतेला लुबाडीत असतील, तर तुमच्या monitoring systems काय करताहेत? लोकांनी दबाव टाकायचा म्हणजे काय करावयाचे? गडकरी प्रामाणिक आहेत हे मान्य केले तरी, त्यांची systems या विषयाची एकूण समज कमी आहे असेच त्यांचे बोलणे असते. कारण, कोणत्याही सिस्टिममध्ये leadership महत्वाची असते. त्या सिस्टिमच्या आत काम करणारे घटक त्यांची कितीही इच्छा असली तरी काहीही बदल घडवून आणू शकत नाहीत हे सत्य त्यांच्यापर्यंत अजून पोहोचलेले नाही - जसे ते अनेक इतरांपर्यंत पोहोचलेले नाही. म्हणून वावदूक म्हटले.System Thinking या विषयावर स्वत्रंतपणे लिहिणार आहे.

In reply to by रविकिरण फडके

तुम्ही त्यांचे अपघातावरचे भाषण पूर्ण ऐकले होते का? नसावे असे मला वाटते, खालील लिंकवर पाहू/ऐकू शकता. ते स्वतःचे मत सांगत नसून आकडे सांगत आहेत. माझ्या अतिसामान्य आकलनशक्तीला त्यांचा मतितार्थ - हेल्मेट न घालण्यामुळे अपघात नाही तर मृत्यू होतात - लक्षात आला. टिकाच करायची असेल तर - शुभेच्छा! https://youtu.be/pJcxMGwLMCQ ====================== सिस्टमची पूर्ण जाण असल्यामुळेच त्यांनी डोंबिवलीतील वक्तव्य केले आहे असे माझे मत आहे. जर अधिकारी सजग असते लीडर चांगले असते तर शहरे अशी बकाल झाली नसती. नागरिक सजग असतील तर सिस्टिमवर दबाव असेल नाहीतर गेली अनेक वर्षे काय चालले आहे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांचे डोंबिवली बद्दलचे पूर्ण भाषण ऐकण्याचीही विनंती! ====================== कर्मचारी अधिकारी वर्ग हा समान्य जनतेतच मोडतो असे मला वाटते. ====================== माध्यमांनी त्यांचा २४X७ वेळ काढण्यासाठी संदर्भविराहित काढलेले एक वाक्य ऐकून मते बनवण्यात काहीच अर्थ नाही, त्यामुळे असे काही चालू असेल तर मी संपूर्ण भाषण ऐकतो. मग ते कोणाचेही असो.

In reply to by बिटाकाका

धन्यवाद, तुम्ही दिलेल्या लिंकवरील भाषण ऐकले. आपणही पुन्हा एकदा नीट ऐकावे ही विनंती. गडकरी म्हणतात (१:०८ मिनिटे), "मॅडम, करीबन ६८% ऍक्सिडंट्स जो होते है वो हेल्मेट न पेहननेके कारण बाईकपर से होते है". ते लगेच पुढे असेही म्हणतात की हेल्मेटके बारेमे जैसा हमने कहा, हम लगातार उसके लिये प्रचार कर रहे है. (हिंदी लिहिताना झालेल्या चुका कृपया माफ कराव्यात.) म्हणजेच, हे माध्यमांनी संदर्भविरहित काढलेले एक वाक्य नाही. आता, हेल्मेट न घातल्यामुळे अपघात कसे होतात मी समजलो नाही. बाकी, डोंबिवलीबद्दल बोलायचे झाले तर, KDMC मधील २७ गांवे का वगळली, नंतर ती पुन्हा कशासाठी अंतर्भूत केली गेली, आणि ह्या मधल्या काळात तेथे काय झाले, हे सर्वज्ञात आहे. त्यात (जागरूक वगैरे) नागरिक काय करू शकले असते हे तुम्हीच सांगावे. त्यांच्या वक्तव्यानंतर आता जो शिमगा सुरु झाला आहे - आजच्या वर्तमानपत्रातील शिवसेनेच्या प्रतिक्रिया वाचाव्यात - तीच फलश्रुती त्यांना अभिप्रेत होती का? प्रॉब्लेम हा आहे की सगळ्यांनाच फक्त brownie point स्कोअर करण्यात रस आहे.

In reply to by रविकिरण फडके

गडकरी अपघातांची नाही तर मृत्यूंची आकडेवारी सांगत आहेत हा मुद्दा लक्षात घ्यावा एवढे सांगून मी माझे दोन शब्द संपवतो.

In reply to by बिटाकाका

विडिओमधील वाक्य मी चुकीचे कोट केले आहे, की वाक्य बरोबर आहे पण मी त्याचा अर्थ चुकीचा लावला आहे, ते कृपया सांगावे.

In reply to by रविकिरण फडके

१. विडिओमधील वाक्य तुम्ही बरोबर कोट केले आहे. २. गडकरी मृत्यूंचीआकडेवारी सांगत आहेत त्यामुळे त्यातील ६८% मृत्यू हेल्मेट नसल्यामुळे हे संयुक्तिक आहे, ६८% अपघात नाही. गडकरी अनावधानाने अपघात म्हणून गेले असे माझे मत आहे. यातून तुम्हाला काय अर्थ काढायचा आहे तो तुम्ही काढू शकता. ३. हेल्मेट घातल्याने अपघात थांबतील असं गडकरी म्हणतील किंवा त्यांना म्हणायचे असेल हे अजिबात पटत नाही. अपघात झाला आणि हेल्मेट नसेल तर मृत्यूचे प्रमाण जास्त आहे असा सरळ सरळ अर्थ मलातरी लागतो.

In reply to by बिटाकाका

"गडकरी अनावधानाने अपघात म्हणून गेले..." प्रत्येक बाईकच्या अपघातात काही बाईकस्वार मृत्युमुखी पडत नाही. मला अनेक अपघात माहीत आहेत - आणि तुम्हालाही माहीत असतील - ज्यात स्वाराला गंभीर दुखापत झाली, हाडे मोडली, पण तो जीवानिशी बचावला. असे मानले की बाईकच्या दोन अपघातात एक मृत्यू होतो तर बाईकच्या अपघातांचे प्रमाण एकूण अपघातांच्या १३६ टक्के भरते असा तुमच्या अर्थाचा अनर्थ होतो. अपघात व मृत्यूंचे प्रमाण गडकरींनी दिल्याप्रमाणे साधारण ४:१ असे पडते. म्हणजे बाईकचे अपघात एकूण अपघातांच्या ३००% होतात. ह्यालाच मी 'वावदूकपणे' (म्हणजे बेजबाबदारीने) बोलणे म्हटले होते. मजा अशी की लोकसभेतही कुणी फारसे गाम्भीर्यने घेत नाही कुणाचेच भाषण. त्यामुळे सगळे चालून जाते. असो!

In reply to by रविकिरण फडके

तुम्ही गडकरींच्या आकड्यांचा अर्थ लावण्याआधी त्यांचे आकडे इथे टाकाल का? मीही आकडे कुठून मिळाले तर टाकतो. उगाच वांझोटी चर्चा नको.

In reply to by रविकिरण फडके

गडकरी प्रामाणिक आहेत हे मान्य केले तरी, त्यांची systems या विषयाची एकूण समज कमी आहे असेच त्यांचे बोलणे असते.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेची "सिस्टिम पद्द्धत" आणि "गडकरी पद्धत" कधी वाचलीय का? ========= हे मान्य केले तरी मंजे काय?

In reply to by arunjoshi123

"मुंबई पुणे एक्सप्रेसवेची "सिस्टिम पद्द्धत" आणि "गडकरी पद्धत" कधी वाचलीय का?" माफ करा, मी नाही वाचलेली. कृपया संदर्भ दिलेत तर अवश्य वाचीन.

नाशिकमधून मंगळवारी ६ मार्च निघालेला किसान सभेच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. मोर्चात शेतकऱ्यांची असलेली संख्या वाढत असल्याचा दावा मोर्चेकरी करत असून मोर्चाला भाजप वगळता अन्य राजकीय पक्षांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. हा लाँग मार्च सोमय्या मैदानात रोखण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. मोर्चा सोमय्या मैदानातच अडवण्याचे प्रयत्न सरकारकडून होणार असून परिस्थितीचा अंदाज घेत हा मोर्चा आझाद मैदानाकडे जाण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दक्षिण मुंबईत हा मोर्चा आल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मोर्चेकरी विधान भवनाकडे जाणार नाहीत यासाठी प्रयत्न सुरू झाले असून पोलीस यंत्रणांनी नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. आज शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाहूरजवळ आल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी किसान सभेच्या नेत्यांची भेट घेत चर्चा केली. चर्चेत सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याच बरोबर किसान सभेच्या शिष्टमंडळाला सोमवारी चर्चेचे निमंत्रण दिले. तर, दुसरीकडे चर्चा आणि मोर्चा सुरू राहणार असल्याचे किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी स्पष्ट केले. सरकारने चर्चेसाठी दिलेल्या निमंत्रणाचे स्वागत असून मागण्या मान्य होईपर्यंत विधानसभेला घेराव घालणार असल्याचे नवले यांनी स्पष्ट केले.

In reply to by manguu@mail.com

विद्यमान सरकारला महागात पडू शकते. मी सरकारचा हितचिंतक नाही, पण जे आहेत त्यांच्या माहितीसाठी हा प्रतिसाद.

In reply to by सर टोबी

शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत. मागील वर्षाप्रमाणे यावेळी सुद्धा फडणवीस बळाचा अजिबात वापर न करता चातुर्याने आंदोलन थंड करतील.

In reply to by श्रीगुरुजी

शेतक-यांची ही आंदोलने नेहमीचीच आहेत.>>> ==>> अगदी सहमत. काही मिळणार नाही. गाजरच दाखवले जाईल. मागील वर्षाप्रमाणे यावेळी सुद्धा फडणवीस बळाचा अजिबात वापर न करता चातुर्याने आंदोलन थंड करतील.>>> ==>> ह्यात चातुर्य वगैरे काही दिसत नाही. मागील जे काय मोर्चे (मराठा मोर्च्यापासून सुरु झालेले) होते हे अहिंसक, शिस्तबद्ध, सामान्यांना कमीत कमी त्रासदायक ठरतील असे झाले आहेत. प्रत्येक वेळेस फडणवीसांनी तकलादू आश्वासने देऊन वेळ मारून नेली आहे. पुढे त्याचे काहीच झाले नाही, तो भाग सोडून द्या. फक्त एक काळजी वाटते जर असे मोर्चे हिंसक प्रकारावर उतरले तर फडणवीसांची कसोटी लागेल. याची चुणूक कोरेगाव भीमा मध्ये पाहायला मिळाली आहे. यामध्ये सुद्धा दोन्ही समाजांनी समजूतदारपणा दाखवला म्हणून २-३ दिवसात सगळे आटोक्यात आले. राज्य सरकारचे यात कोणतेच कर्तृत्व नाही. संभाजी ब्रिगेड आणि शरद पवारांची मध्यस्ती निर्णायक ठरली होती, हे तुम्ही नाही मानले तरी वस्तुस्थिती आहे. बाय द वे चातुर्य दाखवणे म्हणजे गाजरच दाखवणार ना. खालील बातमी मध्ये धावपळ कशी चालू आहे स्पष्ट दिसत आहे. "अभ्यासाचं" कारण देऊन वेळ नक्की मारून नेतील, यात काय वादच नाही. https://www.loksatta.com/mumbai-news/akhil-bhartiya-kisan-morcha-long-m…

In reply to by विशुमित

सातत्याने अव्यवहारी मागण्या होत राहिल्या तर यमजूत काढावीच लागते. >>> संभाजी ब्रिगेड आणि शरद पवारांची मध्यस्ती निर्णायक ठरली होती, हे तुम्ही नाही मानले तरी वस्तुस्थिती आहे. LLRC

In reply to by श्रीगुरुजी

सातत्याने अव्यवहारी मागण्या होत राहिल्या तर यमजूत काढावीच लागते.>>> ==>> अव्यवहारी जुमल्यांसारख्या का ??

In reply to by विशुमित

आमची कसलीही अडचण नाही व आम्हाला स्मृतिभ्रंश झालेला नाही. अव्यावहारिक जुमले हे शब्द ऐकिवात नसल्याने विचारलंय. माहिती नसेल तर तसं सांगा.

In reply to by कुंदन

114 मृत्यू ?? शरद पवारांच्या कारकिर्द मधल्या बऱ्याच डागांपैकी हा खूप मोठा आहे. लिंक बद्दल धन्यवाद ! हे पूर्वी वाचले नव्हते. कोणी ऑफिशियल येऊन मोर्चाच्या मागण्या ऐकून घेणे आणि आश्वासन देणे ही एक साधी कृती असते. ज्यातून असंतोषाची दखल घेतली आहे हा मेसेज जातो. एवढी अक्कल पवारांना नव्हती की मुद्दाम दुर्लक्ष केले ?? हा कसला डोंबलचा जाणता राजा आणि महाराष्ट्राचा नेता

In reply to by कपिलमुनी

पवारांनी नंतर मुंबईत येऊन जे statement दिलं, ते तर अजून असंवेदनशील होतं. "मोर्चेकर्‍यांना अनुभव नाही. त्यांनी मुले महिला व वृद्धांना आघाडीवर ठेवण्याची चुक केली म्हणून इतके बळी गेले".

In reply to by arunjoshi123

कोणिही नेता आवडत नाही . व्यक्तीपूजक नाही. चांगले काम केले तर चांगले म्हणायचे नैतर हाणायचे

In reply to by manguu@mail.com

आजकाल सगंळ फुक्ट मागण्याची पद्धत आल्ये. मूळात कर्जमाफी ही करदात्यांच्या जिवावर झाली. आमच्याकडून पैसे उकळायचे आणी व्यर्थ द्यायचे हेच चालले आहे. बर कर्जाचे पैसे शेतकरी कुठे वापरतो ते तपासायला याःचा विरोध. अन्नदाता वगैरे म्हणून डोक्यावर बसवणे नकौ.

In reply to by आलमगिर

आलमगीर साहेब तुम्ही वार्षिक टॅक्स किती भरता, कृपया सांगू शकाल का ? म्हणजे माझे म्हणणे मी मांडतो.

In reply to by आलमगिर

ऑ 'तेरी .. तुम्ही 'सकाळ'वरील स्मिता पटवर्धनचे फॅन आहात तर. तरीच म्हंटले कुठं तरी वाचल्या होत्या या ओळी. चालू द्या चालू द्या...

खांग्रेसचे स्वयंघोषित भक्त कुमार केतकर यांना अखेर आपल्या अनेक दशकांच्या गांधी घराण्याच्या निस्वार्थ सेवेचं फळ मिळालं आहे.

In reply to by श्रीगुरुजी

राणेंनी भाजपाची अशी काय सेवा केली की निष्ठवंताना डावलून त्यांना तिकीट दिले ? एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला तरी द्यायचे

In reply to by कपिलमुनी

भाजप मध्ये ग्रामपंचायतीला देखील (बाटग्यांची मदत घेतल्याशिवाय) निवडून येऊ शकत नाहीत असे दस्तूरखुद्द गडकरी मागे म्हणाले होते.

In reply to by विशुमित

गडकरींनी तुमच्या साहेबांना हसतहसत अनेक उपरोधिक टोमणे मारले. तुमच्या साहेबांना कसनुसं हसण्यापलिकडे काहीही करता येत नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला संदर्भ पाहिजे होता तो मी दिला पुढचे उरकायला नव्हते सांगितले. त्यावर काही टिपणी असेल त्यावर चर्चा अपेक्षित आहे.

In reply to by श्रीगुरुजी

या माणसाचा या क्षणापर्यंत आदर होता. हा तर पुरता नीच* आहे. =================== * या शब्दाचा एक गैरजातीभेदवादी अर्थ पण असतो. त्या अय्यरनं इतकं थोबाड वाकडं करत हा शब्द उच्चारला होता कि या शब्दाच्या घाणेरडेपणाला एक उच्च दर्जा प्राप्त झाला. अय्यरीय नीचतेशी इथे संबंध अपेक्षित नाही.

In reply to by arunjoshi123

जोशी, तुम्ही इथे हे लिहिताना थोबाड (तुमचंच) वाकडं केलं का नाही हे आता आणि आम्हाला कसं हो कळणार? नाही म्हणजे अय्यरीय नीच जर बेंचमार्क पकडलं तर तुमचं थोबाड किती वाकडं झालं होतं (त्या विविक्षित क्षणी) हे पाहून On a scale on अय्यरीय नीच, तुमचं विधान किती टक्के जातीयवादी होतं अन किती टक्के जातिभेदोत्तर होतं हे कळायला बरं पडलं असतं, सेल्फी टाकायला हवी होती तुम्ही =))

केवळ भाजप विरोध हा भाजपेतर सर्व पक्षियांचा एकमेव अजेंडा असल्याने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होई पर्यंत हे प्रकार अधिक जोर धरतील.

In reply to by Nitin Palkar

सर्वपक्षीय विरोध असला तरी भाजप सगळ्या ठिकाणी निवडणूक जिंकत आहेत ना! हे कसे काय बुवा?? हे सर्व शेतकरी राजकीय हेतू ने आलेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?

In reply to by sagarpdy

तुमच्या इथल्या कॉमेंटचा संदर्भ घेऊन विचारतोय, १. नारायण राणे ह्यांच्या भाजप प्रवेशानंतर आपण अजूनही आपल्या वरील कॉमेंट मधल्या विधानांशी सहमत आहात का? २. राणेंना आमदारकी होती, त्यांना मंत्रिपद मिळणे ह्याने ब्राह्मण समाज दुखावला असता अन त्यांना (ब्राह्मण समाजाला) भाजप अव्हेरू शकत नाही असे आपले म्हणणे होते, इथे तर थेट खासदारकी अन राज्यसभेचे वारे वाहतेय, म्हणजे मी म्हणलेलं ब्राह्मणांना भाजपची गरज आहे, भाजपला ब्राह्मणांची गरज नाही हे खरे मानावे का? की तुमच्यामते ब्राह्मणद्वेष्ट्या नारायण राणेंस पक्षात घ्यायचं अंतस्थ कारण काही व्यूहात्मक रचना असू शकेल ? ह्यावरचं तुमचं विश्लेषण वाचायला आवडेल. ३. ब्राह्मण समाज ही एकगठ्ठा मतपेढी नसल्यामुळे भाजपला त्यांच्यात रस नाही, शिवाय भाजपच्या नव्या ओबीसी/ वेगवेगळ्या जातीय केंद्रित राजकारणाला अनुसरून खेळ सुरू आहेत का? मुळात मला वाटतंय तसं हे राजकारण जातीय मतपेढीवर आधारित आहे का? उत्तर हो असले किंवा नसले तरी ह्यावर ब्राह्मण समाजाची प्रतिक्रिया काय असावी? पुढील व्यूहरचना (ब्राह्मण समाजाची) काय असावी?

In reply to by जेम्स वांड

>>> १. नारायण राणे ह्यांच्या भाजप प्रवेशानंतर आपण अजूनही आपल्या वरील कॉमेंट मधल्या विधानांशी सहमत आहात का? राणेला भाजपत घेतलेले नाही >>> की तुमच्यामते ब्राह्मणद्वेष्ट्या नारायण राणेंस पक्षात घ्यायचं अंतस्थ कारण काही व्यूहात्मक रचना असू शकेल ? ह्यावरचं तुमचं विश्लेषण वाचायला आवडेल. राणेला भाजपत घेतलेले नाही >>> पुढील व्यूहरचना (ब्राह्मण समाजाची) काय असावी? खांग्रेसी विचारांचे पक्श उघडउघड ब्राह्मणद्वेष्टे आहेत. त्यामुळे ब्राह्मणांनी सद्यपरिस्थितीत भाजपलाच पाठिंबा सुरू ठेवावा. भाजपला आंधळा पाठिंबा न देता मुद्द्यावर आधारीत व उमेदवारावर आधारीत पाठिंबा असावा.

In reply to by श्रीगुरुजी

नारायण राणे ह्यांना पक्षात घेतलेले नाही असे तुम्ही म्हणता आहात, पण राणेंना भाजपकडून राज्यसभेचे तिकीट मिळालेलं आवडलं नाही असेही म्हणताय, मला पडलेला प्रश्न असा की पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट मिळालेला माणूस पक्षाबाहेरचा असू शकतो? जर राणे पक्षाबाहेर आहेत अन पक्षाला त्यांची खास गरज नाहीये, उलट त्यांना तिकीट देऊन प्रामाणिक एकनिष्ठ मतदार असलेल्या ब्राह्मण समाजाचा रोषच पत्करायला लागणार आहे, तर भाजपने त्यांना तिकीट मुळातच का दिले असावे? दुसरे म्हणजे पक्षाचे राज्यसभेचे अधिकृत तिकीट मिळणे हे पक्ष प्रवेशाचे द्योतक मानता येईल का? नसल्यास का नाही? असल्यास राणे पक्षात आलेत हे मान्य करायला हरकत असल्यास ती कशावर आधारित हरकत असावी? (मुळात माझा तुमच्याइतका अभ्यास अन व्यासंग नाही, चार लोक जेव्हा मला विचारतील भाजपने असे का केले, तर त्याला द्यावयाचे उत्तर मला तुमच्या उत्तरातून मिळेल ही आशा मात्र पक्की आहे)

In reply to by जेम्स वांड

>>> पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट मिळालेला माणूस पक्षाबाहेरचा असू शकतो? राणे भाजपचा उमेदवार नसून भाजपच्या पाठिंब्यावर उभा आहे. >>> जर राणे पक्षाबाहेर आहेत अन पक्षाला त्यांची खास गरज नाहीये, उलट त्यांना तिकीट देऊन प्रामाणिक एकनिष्ठ मतदार असलेल्या ब्राह्मण समाजाचा रोषच पत्करायला लागणार आहे, तर भाजपने त्यांना तिकीट मुळातच का दिले असावे? कारण माहिती नाही. कदाचित कोकणात सेना, खांग्रेस व भ्रष्टव्याधीला अंगावर घेण्यासाठी राणेला वापरायचचे असावे. >>> दुसरे म्हणजे पक्षाचे राज्यसभेचे अधिकृत तिकीट मिळणे हे पक्ष प्रवेशाचे द्योतक मानता येईल का? नसल्यास का नाही? असल्यास राणे पक्षात आलेत हे मान्य करायला हरकत असल्यास ती कशावर आधारित हरकत असावी? राणे भाजपचा उमेदवार नाही. भाजपचा पाठिंबा असलेला उमेदवार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कारण माहिती नाही. कदाचित कोकणात सेना, खांग्रेस व भ्रष्टव्याधीला अंगावर घेण्यासाठी राणेला वापरायचचे असावे. हे असंच असावं असे मनापासून वाटतंय!

In reply to by श्रीगुरुजी

भाजपला आंधळा पाठिंबा न देता मुद्द्यावर आधारीत व उमेदवारावर आधारीत पाठिंबा असावा. LLRC

In reply to by श्रीगुरुजी

खांग्रेसी विचारांचे पक्श उघडउघड ब्राह्मणद्वेष्टे आहेत>> ==>> म्हणजे भाजप शेठजी-भटजी समर्थक आहे तर.