गावाचे नाव "सानपाडा" नव्हे "सॅन पाडा" होय
(श्री. केदार यांनी चालवलेल्या "मिसळून मिसळ" या कायआप्पा गृपवर एक फोटो आला होता. त्यात सॅन San Francisco, San Diego त्याच प्रमाणे सान पाडा हे गाव देखील सॅन पाडा असू शकते या अर्थाचा मेसेज आला होता. त्यावर आम्ही अभ्यास करून एक लेख लिहीला तो येथे प्रसिद्ध करत आहोत.)
साधारणतः १६ व्या शतकात(१) आताची ठाणे खाडी परिसर, नवी मुंंबई आदी परिसर समुद्राच्या पाण्याने पुर्ण व्यापलेला होता. घनदाट खारपुटीचे, नारळी-फोफळीचे झाडे, जंगली श्वापदे तेथे होती. आताचा संजय गांधी नॅशनल फॉरेस्टचा परिसर लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला कल्पना येईल.
तर १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात घणसोली गाव फार छोटे होते. पाडाच म्हणाना. आजूबाजूलाही लोकवस्ती वेगवेगळ्या पाड्यातच राहत होती. गावांची नावे पाड्यांवरूनच ठरत असे. तेथे एक कोळी मासेमारी करत असे. त्याचे नाव महाप असे होते. महा म्हणजे महा - मोठा अन प म्हणजे पाटील असा तो महाप. तर असा तो मोठा पाटील कोळी होता. १६८८ च्या चैत्री पुनवेला त्याचे अन त्याच्या बायकोचे मोठे भांडण झाले. महाप वैतागला अन खाडीच्या बाजूला जावून झोपडीत राहू लागला. ( त्या महाप पाटलाच्या नावानेच आता तेथे "महापे" गाव आहे.)(२)
तेथे राहत असतांना सन १६९० च्या रमजान सणात त्याचे अन रब अली नावाच्या मुस्लिम तरूणीचे प्रेमसंबध तेथे जुळले. सगळे पाडेकरी मग त्यांना रबअली - महाप असे चिडवू लागले. ( रब अली ज्या पाड्याची होती ते पाडे आता "रबाले" नावाने ओळखले जाते.) रबअली अन महापचे संबंध काही वर्षे ठीक होते. महाप जवळच्या खाडीत मासेमारी करून उदरनिर्वाह करत असे. रबअली पासून त्याला एक मुलगी - नाव जुई - झाली अन एक अपंग मुलगा झाला. त्याचे नाव खैरना असे होते. त्याचा डावा हात कोपरापासून नव्हता. मोठे झाल्यावर जुई अन खैरनाने खुप पराक्रमी कामे केलीत. (आताचे "जुईनगर" त्या जुई नावाच्या मुलीवरून तर "कोपरखैरने" हे गावाचे नाव त्या खैरना या मुलाच्या नावावरून पडले. खैरनार या कुळाचा तो पुराणपुरूष होय.)(३)
जुई १२ वर्षंची अन खैरना लहान असतांना काही कारणांनी रबअली च्या समाजाच्या लोकांनी रबअलीचा खून केला. यासर्व कारणांमुळे संसारपाशाकडे आताशा महापचे लक्ष कमी झाले. तो आध्यात्माच्या गोष्टी करत असे.
इ. सन १७२० साली मे महिन्यात तो खोल समुद्रात मासेमारी करत असतांना होडीत त्याला तहान लागली पण होडीतल्या भांड्यातले पाणी संपलेले होते. मग भर समूद्रात तो "पाणी... पाणी" असे ओरडू लागला. भोवळ येवून महापाटील होडक्यातच बेशुद्ध पडला. तेवढ्यात तेथून एक इंग्रजाचे व्यापारी जहाज जवळून जात होते. त्या जहाजातल्या पाद्र्याने पाणी देवून महापाटलाचा जीव वाचविला. महापचे होडके त्या जहाजाच्या कप्तानाने ओढून अन महापला आपल्या जहाजावर घेतले. जहाजावरील पाद्र्याने (सेंट पाद्री) मोठ्या प्रेमाने थोड्या बेशुद्ध महापला त्याचे गाव कोणते असे विचारले. तेवढ्यात महापला शिंक आली अन तो "आंछी" असा आवाज करून शिंकला. त्या जहाजाच्या कप्तानाला ते "वाशी" असे ऐकू आले अन त्याने आपले गलबत वाशी या नावाच्या पाड्याच्या दिशेने हाकारले. पण महापला वाचवण्याच्या गडबडीत तो दिशा साफ चुकला होता अन गलबत चुकून पाडा या गावाच्या दिशेने जावू लागले. सारी गावे पाडेच तर हे देखील एक पाडेच होते.
जेव्हा पाडा हे गाव आले तेव्हा ते गाव वाशी असे समजून पाद्री तेथे उतरला. उतरतांना त्याने अर्ध मुर्छीत महापला देखील सेवेसाठी घेतले. महापची त्याने दयाळू अंतःकरणाने वैद्यकीय सेवा केली. पुढे महाप याने देखील ख्रिस्ती धर्म स्विकारला अन संसारपाशाचा त्याग केला. जुई अन खैरना भेटायला येत तेव्हा तो त्यांना पराक्रमी होण्याची आठवण देई. पाड्याच्य लोकांवर सेंट पाद्री अन महापचा फार लोभ होता. पाद्रीला ते मोठा पाद्री अन महापला ते लहान महाप पाद्री असे बोलू लागले.
महापला वाचवणार्या पाद्री निवर्तल्यानंतर त्या पाड्याच्या लोकांनी महापला संत महाप असे म्हणायला सुरुवात केली. त्याने त्या काळात वैद्यकीय सेवा करण्यासाठी चर्चमध्येच दवाखाना सुरू केला. इंग्रजांचे आक्रमण झाल्यानंतर महापचे नाव इंग्रजी गॅझेटमध्ये सेंट महाप असे नोंदवले गेले. कालांतराने ते पाडे गाव वैद्यकीय सेवेसाठी फार प्रसिद्ध झाले. परंतु पाडे म्हटले की कोणते पाडे असे उपचारासाठी येणार्या लोकांना प्रश्न पडू लागला. कारण आजूबाजूला सारी गावे पाडे या नावानेच ओळखली जात. म्हणून पाड हे गावा महापच्या नावावरून "संत पाडा" गाव असे ओळखले जावू लागले.
जेव्हा रेल्वेचा विकास होवू लागला तेव्हा या संत पाडा गावालाही रेल्वे आणण्याचे प्रयत्न झाले. कारण पुढे वाशी ही मोठी बाजारपेठ त्यांना रेल्वेद्वारे जोडायची होती. पुढे इंग्रज देखील त्या पाड्याला "सेंट पाडा"(४) असे म्हणू लागले. पुढे कालओघात या सेंटचेच मराठी रुपांतर सान असे झाले अन त्या पाड्याला "सानपाडा" असे म्हटले जावू लागले.
अधिक अभ्यासू व्यक्ती खालील संदर्भ घेवून आपल्या अभ्यास वाढवू शकतात.
संदर्भः
(१) इंग्रजांचे गॅझेटीअर : A reference book of Grater Bombay (1522 to 1732) By Ray Maccmilan, Pub: Ocean Pub. १८९७ II Ver.
(२) "मुंबई परिसराचा विकास अन सामाजिक परिस्थिती एक अध्ययन अन एक अभ्यास" - PHD चा अभ्यास करणार्या सौ. वांगणीकर यांचा संदर्भ. (मुंबई विद्या.)
(३) खैरनार कुलाचा कुलवृत्तांत. (संदर्भ भाट आणि सनावळी यांनी लिहीलेले हस्तलिखीते)
(४) "How to run Great Indian Railway Commercially and profitable So that Great Britain achieves more - A HandBook on Indian Railway Installation" - Reference manual Ver. 2.082B.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भारी!
आवडली कथा. उन्हाळ्यात
खरं?
नाय जमलं!
=))
असेच मौलिक संशोढन आपल्या हातून होवो
एका ओरिगिनल संशोधनाचा पेपर
__/\__
वाह!! =))
लै ब्येस!
मला तर
नाशिकचा एक संशोधक अतीव मेहनत
अजब गावचा गजब इतिहास :-)
छान छान!
(No subject)
मस्त!!
खरी कथा वेगळीच आहे ....
आ. न., गा. पै जी, माझी कथा?
काय सांगायचं तुम्हांस आता ....
पुलंच्या " चितळे मास्तर "
" चितळे मास्तर " ???
चिंचपोकळी
तळेगाव, मळवली, लोणावळा
धन्यवाद
काल संध्याकाळी मला स्विडनमधून
अश्याच प्रकारचे संशोधन सान-दिया-गो बद्दल कुठेतरी वाचल्याचे अंधुक
ते संशोधन माझे आहे. एकदा एक
वारलो!
पेशव्यांच्या कुठल्याशा लढाईत
हे बनावट संशोधन आहे.
मस्त.....
चितळे मास्तर ! ! !
हरितात्याच होते
ते
वाहवा, पण चित्रगुप्त यांची सर