Skip to main content

माय गे माय...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 27/02/2018 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळपासूनच्या कौतुकाने हरखलेली माय मराठी दमून भागून जरा ओसरीवर टेकली. डोक्यावरचं संदेशांचं, भाषणांचं, योजनांचं ओझं उतरवलं. गळ्यातले हारतुरे काढून बाजुला ठेवले. पिशवीतला श्रीखंडाच्या गोळ्यांचा डब्बा पुन्हा घडवंचीवर ठेवत पुटपुटली, "एवढा मोठा सोहोळा झाला ,सगळी पोरं जमली पण नातवंडं काही भेटली नाहीत. "
काव्यरस

वाचने 4649
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

ओल्ड fashioned आहे. श्रीखंड गोळ्या? Omg! गिव देम समथिंग सेक्सी यू नो! =))

In reply to by पद्मावति

:)

एका दृष्टीकोनातून मनोगत आवडलं ! पण मराठी काही एवढी वृद्ध झाली नाही... ती बदलत्या कालाबरोबर अधिकाधि तरूण... चिरतरूण... होत राहणार आहे. तिचे बाह्यरूप बदलेल. तिचे कपडे, दागिने, अविर्भाव बदलत्या काळाप्रमाणे बदलत राहतील, इतकेच... तसे बदलणे हाच तर जीवनाचा मूलधर्म आणि जिवंतपणाचे लक्षण असते, नाही का ? सद्या मी मॉलमध्ये, एखाद्या हायफाय ऑफिसमध्ये किंवा इतर चकचकीत ठिकाणी जातो तेव्हा तेथे आलेल्या आणि काम करणार्‍या तरुणाईच्या तोंडात चालणारा मराठीचा सहजपणे चाललेला वापर ऐकतो. असेल तो जरासा इंग्राजळलेला किंवा हिंदाळलेला... पण हे सगळ्या भाषांमध्ये नेहमीच होते, होईल आणि दर पिढीगणिक वाढत राहील (शेपन्नास वर्षांपूर्वीची मराठी वाचताना आपली फेफे उडतेच, नाही का?). केसांमध्ये चांदी डोकावू लागलेल्या पुरुषांनी धोतर सोडून केवळ पँटच नाही तर काहीजणांनी जीनसुद्धा केव्हा स्विकारली आणि त्याच वयाच्या स्त्रियांनीही नऊवारी साडी --> पाचवारी साडी --> पंजाबी ड्रेस असा प्रवास करत काहींनी अगदी जीनसुद्धा केव्हा स्विकारली हे, तसा मुद्दाम विचार केल्याशिवाय आपल्या लक्षातही येत नाही ! अजून दहा वर्षांनी, "माय मराठी जीन आणि टॉप पेहरून, नातवंडांना केक-पास्ता-चॉकलेट्सच्या बरोबरच बेसनाच्या लाडवांचा व उकडीच्या मोदकांचा डेसर्ट स्प्रेड असलेल्या बुफेवर तुटून पडताना कौतूकाने पहात आहे", असे कोणी मिपावर लिहिले तर आश्चर्य वाटणार नाही ! :)

खरंय.मराठी नेहमीच चीर तरुण राहील. आणि तुम्ही सांगितलेलं चित्र आशादायी आहेच. पण पण पण.. मी मराठी म्हातारी झाली असं नाहीच म्हटलंय.;) जसं प्रत्येक स्त्री आधी मुलगी आई आणि आजी या तीन पिढ्यांतून जाते तशीच माय मराठी पण रूपं बदलत असते. पण आजची आजी आणि आजची नातवंड यांच्यातला सुसंवाद अखंड ठेवायला आपली मधली पिढी कुठेतरी कमी पडतेय असं वाटतं. ं

माय गे माय... दारात उभा गे साजण ची आठवण झाली.

कविता आवडली अमृतातेही पैजा जिंकणारी माझी माय मराठी आता साता समुद्रापार पोचली आहे. नातवंडे आपल्याकडे येतील अशी वाट न पहाता नातवंडांच्या भाषेतच त्यांच्याशी संवाद साधायला लागली आहे. पैजारबुवा,

फॉर्वर्ड आलेय, नाव आणि लिंक काढून. त्या मंडळीना मिपाची लिंक पाठवून योग्य रीतीने फॉर्वर्डा म्हणून सांगितले.