✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ताज्या घडामोडी - भाग २१

ग
गॅरी ट्रुमन यांनी
गुरुवार, 02/01/2018 - 08:58  ·  लेख
लेख
आज राजस्थानातील अल्वर, अजमेर आणि पश्चिम बंगालमधील उलुबेरीया या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी आणि राजस्थानातील मंडलगड या विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आहे. अपेक्षेप्रमाणे राजस्थानातील तीनही मतदारसंघांमधून काँग्रेस आघाडीवर आहे. राजस्थानात बहुतेक वेळा सत्ताधारी पक्षाला परत निवडणुक जिंकणे शक्य झाले नव्हते. अपवाद १९८५ आणि १९९३ चा. इंदिरा हत्येनंतर काँग्रेस लाटेत १९८५ मध्ये काँग्रेसला परत निवडणुक जिंकता आली होती. तर १९९३ मध्ये बाबरी प्रकरणानंतर भैरोसिंग शेखावतांनी भाजपला निसटता विजय मिळवून दिला होता. वसुंधरा राजे यांचा कारभार फार लोकप्रिय आहे असे अजिबात नाही. ताज्या घडामोडींमध्ये याविषयी मागे कधीतरी लिहिले होते. डिसेंबरमधील विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेसला विजय मिळाला (कदाचित भरपूर मोठा) तर आश्चर्य वाटू नये. २०१४ पासून आतापर्यंत झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये गुजरात या एकाच राज्यात भाजप सत्ताधारी होता. पण इतर राज्यात विरोधात होता. त्यामुळे मोदी फॅक्टर बरोबरच राज्य सरकारविरूध्दच्या अ‍ॅन्टी इन्कबन्सीचाही फायदा भाजपला झाला होता. आता एप्रिल-मे मध्ये होणारी कर्नाटक विधानसभा निवडणुक त्यातील शेवटची असेल. डिसेंबरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तिसगड या तीन राज्यांमध्ये भाजप सत्ताधारी आहे. राजस्थानात पक्ष नक्कीच बॅकफूटवर असेल. बहुतेक छत्तिसगडमध्येही पक्ष एकाच मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर पक्ष बॅकफूटवर असेल. मध्य प्रदेशात पक्षाचा पराभव होईल असे वाटत नाही. पण काँग्रेस भाजपच्या नाकात दम आणेल हे नक्कीच. या पार्श्वभूमीवर त्यानंतर चारच महिन्यात होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसला नवा उत्साह संचारेल. तेव्हा मोदींनी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लोकसभा बरखास्त करून डिसेंबरमध्ये या राज्यांबरोबरच लोकसभा निवडणुक घेतली तरी आश्चर्य वाटू नये. त्याबरोबरच कदाचित महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्येही विधानसभा निवडणुक होऊ शकेल. कारण लोकसभा-विधानसभा निवडणुक एकत्र घ्यायचा पक्षाचा आग्रह असेल तर त्याप्रमाणे स्वतःचे वर्तन असायला हवे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
39998 वाचन

💬 प्रतिसाद (183)

प्रतिक्रिया

आपल्याला अजिबात त्रास न देणा

श्रीगुरुजी
Tue, 02/13/2018 - 23:09 नवीन
आपल्याला अजिबात त्रास न देणा-या व आपल्या राजवटीला अनुकूल असलेल्या स्थानिकांना घेऊन ब्रिटिशांनी खांग्रेसची स्थापना १८८५ मध्ये केली. पण स्वातंत्र्य मिळायला तब्बल ६२ वर्षे का लागली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

...

manguu@mail.com
Wed, 02/14/2018 - 03:41 नवीन
आपल्याला अनुकूल , राजवटीला त्रास न देणार्या .... हं ... हेडगेवारही आधी काँग्रेसातच होते . पं. मदनमोहन मालवीयही काँग्रेसातच होते . नथुरामही आधी गांधीभक्त होते. नंतर ते संघ व हिंदु सभेत निघून गेले. काँग्रेस इंग्रजाना अनुकूल होती. काँग्रेस मुसलमानाशी गुलुगुलु करत होती. म्हणून हे सगळे गेले. तर नंतर ह्यानी इंग्रजांशी / मुसलमानांशी नेमका कसा मुकाबला केला म्हणे ? हेडगेवारानी किती इंग्रजाना मारले ? नथुरामाने किती मुसलमानाना मारले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ते शरद पवार साहेब पण अगोदर

सुबोध खरे
Wed, 02/14/2018 - 09:29 नवीन
ते शरद पवार साहेब पण अगोदर काँग्रेस मध्येच होते त्यांनी काँग्रेस का सोडली ते त्यांच्या चाहत्यांना विचारून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

२ वेळा सोडली. पण दोन्ही वेळा

श्रीगुरुजी
Wed, 02/14/2018 - 10:43 नवीन
२ वेळा सोडली. पण दोन्ही वेळा शरण जाऊन खांग्रेस समोरच लोटांगण घातले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ते मोगा खान ला देऊ द्या कि

सुबोध खरे
Wed, 02/14/2018 - 10:50 नवीन
ते मोगा खान ला देऊ द्या कि उत्तर. एकदा तरी सुसंगत मुद्देसूद उत्तर देऊ द्या जिकडे तिकडे नुसतं पिचकायचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

...

manguu@mail.com
Wed, 02/14/2018 - 11:14 नवीन
प्रश्नाला उत्तर प्रश्नच ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

का नाही?

सुबोध खरे
Wed, 02/14/2018 - 11:34 नवीन
का नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

http://www.misalpav.com

मेघपाल
Wed, 02/14/2018 - 13:43 नवीन
http://www.misalpav.com/comment/982564#comment-982564 ह्याला पिचकणे म्हणायचं का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

...

manguu@mail.com
Tue, 02/13/2018 - 23:20 नवीन
आमच्या गांधींनी आणि आमच्या काँग्रेसनं मुक्ताफळे नव्हती उधळली ... ३ दिवसात आर्मी उभी करतो म्हणून. ते कुणीतरी कुणालातरी वन म्यान आर्मी म्हणाले होते ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

... ३ दिवसात आर्मी उभी करतो

बिटाकाका
Tue, 02/13/2018 - 23:46 नवीन
... ३ दिवसात आर्मी उभी करतो म्हणून.
कोण म्हणालं आहे असं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

ते मोगा खान ला देऊ द्या कि

डँबिस००७
Wed, 02/14/2018 - 11:33 नवीन
ते मोगा खान ला देऊ द्या कि उत्तर. एकदा तरी सुसंगत मुद्देसूद उत्तर देऊ द्या जिकडे तिकडे नुसतं पिचकायचं ........ मोगा खान , सुसंगत मुद्देसूद उत्तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत !! दिवस भरात सुसंगत नसतात, संध्याकाळ नंतर तर नाहीच !!
  • Log in or register to post comments

व्यक्तिलक्ष्यी तर्कदोष

मेघपाल
Wed, 02/14/2018 - 12:25 नवीन
व्यक्तिलक्ष्यी तर्कदोष साभार - माहितगार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

+1

विशुमित
Wed, 02/14/2018 - 12:47 नवीन
+1 | manguu@mail.कॉम आल्यापासून ताज्या घडामोडीला जान आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघपाल

कसले उत्तर ?

manguu@mail.com
Wed, 02/14/2018 - 13:19 नवीन
आपल्याला अजिबात त्रास न देणा-या व आपल्या राजवटीला अनुकूल असलेल्या स्थानिकांना घेऊन ब्रिटिशांनी खांग्रेसची स्थापना १८८५ मध्ये केली. पण स्वातंत्र्य मिळायला तब्बल ६२ वर्षे का लागली? हे गुरुजीनी लिहिले आहे. म्हणून मी विचारले की हेगडेवारानी काँग्रेस सोडल्यानंतर इंग्रजाना किती त्रास दिला ? तर मलाच शरद पवारांबद्दल विचारत बसलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

...

manguu@mail.com
Wed, 02/14/2018 - 13:38 नवीन
काँग्रेसने इंग्रजाना त्रास दिला नाही. !!!!! असहकार आंदोलन , चले जाव आंदोलन इ इ कुणी केले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

त्यामुळे काही त्रास झाला असता

श्रीगुरुजी
Wed, 02/14/2018 - 14:11 नवीन
त्यामुळे काही त्रास झाला असता तर इंग्रजांनी राजबंदी, पंचतारांकित स्थानबद्धता अशी लुटुपटीची कारवाई न करता फासावर चढविले असते किंवा अंदमान, एडन, मंडाले अशा दूरच्या तुरूंगात डांबून ठेवलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

...

manguu@mail.com
Wed, 02/14/2018 - 14:16 नवीन
ऊठसूठ प्रत्येकाला फाशीच ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

त्रास देणा-यांना फाशी किंवा

श्रीगुरुजी
Wed, 02/14/2018 - 14:20 नवीन
त्रास देणा-यांना फाशी किंवा कठोर तुरूंगवास. अनकूल असणा-यांना पंचतारांकित स्थानबद्धता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

असु द्या हो गुर्जी

manguu@mail.com
Wed, 02/14/2018 - 16:38 नवीन
अयोध्येत हो तू राजा रंक मी वनीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ! पंडू जंगलात गेला , ध्रुतराष्ट्र घरात राहिला. पांडव जंगलात गेले. कौरव घरात राहिले राम जंगलात गेला. भरत घरात राहिला. सावरकर भगतसिंग विजनवासात गेले. गांधी नेहरु पटेल खुर्चीत बसले. सगळेच वनवासाला गेले , सगळेच फासावर लटकले , सगळेच मुक्तीसोपान अन मोक्षमार्गावर गेले , तर खुर्चीत बसणे , चार प्रश्न सोडवणे , चार प्रश्न न सोडवल्याबद्दल शिव्या खाणे , भवसागरात गटांगळ्या खाणे .. हे कोण करणार गुरुजी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दंडवत घ्या...

विशुमित
Wed, 02/14/2018 - 16:45 नवीन
दंडवत घ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

तिकडे तुमचे साहेब कधी

श्रीगुरुजी
Wed, 02/14/2018 - 17:02 नवीन
तिकडे तुमचे साहेब कधी परकीयांसमोर तर कधी मुल्लामौलवींसमोर दंडवत घालतात आणि इकडे ...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

@गुरुजी- झोंबला वाटते आमचा

विशुमित
Wed, 02/14/2018 - 18:09 नवीन
@गुरुजी- झोंबला वाटते आमचा दंडवत. आवरा स्वतःला. पण आमचे कोण साहेब? कोण विदेशी ? कोण मौलामौलावि ? डोक्यावर पडलात का ? काहींच्या काही प्रतिसाद टाकताय. उगाच स्वतःचा संबित पात्रा करून घेऊ नका. --बाकी संपादक मंडळ- मिपा वर असे निदर्शनास येत आहे की कोणी कोणाला काय प्रतिसाद द्यावा यासाठी काही कथित सन्मानीय सदस्य मज्जाव घालताना दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आम्हाला कशाला झोंबेल? आम्ही

श्रीगुरुजी
Wed, 02/14/2018 - 19:33 नवीन
आम्हाला कशाला झोंबेल? आम्ही असल्या दंडवताची मजा बघतो. तुमच्या दंडवताची आणि तुमच्या साहेबांच्या दंडवताचीही! तुमचे साहेब कोण, विदेशी कोण, मुल्लामौलवी कोण, साहेब कोणासमोर दंडवत घालतात ... हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे अनुयायांनी स्वत:च्या व साहेबांच्या दंडवताबद्दल खंत बाळगण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

काय कालची भांग उतरली नाही का

विशुमित
Wed, 02/14/2018 - 20:20 नवीन
काय कालची भांग उतरली नाही का अजून ? स्वतच्यात बोट घालून त्याला हुंगायचे आणि म्हणायचं अत्तर सारखा वास येतोय, अशी गत झाली आहे तुमची. तुमचं लोटांगण जगप्रसिद्ध झाले आहे हे नमके विसरून जाता. माझा दंडवत का खटकला एवढं मात्र सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

http://www.misalpav.com

श्रीगुरुजी
Wed, 02/14/2018 - 20:24 नवीन
http://www.misalpav.com/comment/982663#comment-982663
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

स्वतच्यात बोट घालून त्याला

सुबोध खरे
Wed, 02/14/2018 - 20:28 नवीन
स्वतच्यात बोट घालून त्याला हुंगायचे आणि म्हणायचं अत्तर सारखा वास येतोय, अरेरे विशुमित तुमची भाषा तर्राट जोकरांच्या पातळीपर्यंत उतरलेली पाहून वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

मलाही खूप वाईट वाटले आहे. हे

विशुमित
Wed, 02/14/2018 - 21:16 नवीन
मलाही खूप वाईट वाटले आहे. हे टाळता येऊ शकले असते मला पण काही जणांना अति सुसंस्कृतपणा चे अपचन होते. असो... काळजी दाखवलीत त्या बद्द्ल आपले आभार... भविष्यात असे लेखन टाळण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मान्य केलत ते उत्तम.

शलभ
Wed, 02/14/2018 - 22:12 नवीन
मान्य केलत ते उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

संघाचा इंग्रजांना अजून त्रास

श्रीगुरुजी
Wed, 02/14/2018 - 14:17 नवीन
संघाचा इंग्रजांना अजून त्रास होतोय. म्हणून तर इंग्रजांनी संघावर ३ वेळा बंदी घालून कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबले. कालच एक इंग्रज म्हणत होता की संघाच्या सल्ल्यानेच निश्चलनीकरणाचा निर्णय घेतला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

असुद्याहोगुरुजी

manguu@mail.com
Wed, 02/14/2018 - 16:43 नवीन
पण आता ते झाले ना ? काळा पैसा घावला , चोर घावले , नोटेवरचे पश्चिमाभिमुख गांधी पूर्वाभिमुख झाले ... केलेत ना मनासारखे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अग्गोबै !

manguu@mail.com
Fri, 02/16/2018 - 09:11 नवीन
इंग्रज लोक किती त्रास देताहेत संघिस्टाना. जेरुसलेमला पाठवा त्याना विमानाने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अग्गोबै !

manguu@mail.com
Fri, 02/16/2018 - 09:11 नवीन
इंग्रज लोक किती त्रास देताहेत संघिस्टाना. जेरुसलेमला पाठवा त्याना विमानाने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ब्राह्मणवादी = ?

गामा पैलवान
गुरुवार, 02/15/2018 - 02:34 नवीन
मेघपाल,
कशाला ह्या फालतू ब्राह्मणवादी वेबसाईटवर जीव काढता? औकातीच्या बाहेर गेले की चार शिव्या द्यायच्या आणि मोकळे व्हायचे. या भाडखाऊंची लायकीच तेवढी आहे.
ब्राह्मणवादी म्हणजे काय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा