Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २१

लेखक गॅरी ट्रुमन यांनी गुरुवार, 01/02/2018 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज राजस्थानातील अल्वर, अजमेर आणि पश्चिम बंगालमधील उलुबेरीया या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी आणि राजस्थानातील मंडलगड या विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आहे. अपेक्षेप्रमाणे राजस्थानातील तीनही मतदारसंघांमधून काँग्रेस आघाडीवर आहे. राजस्थानात बहुतेक वेळा सत्ताधारी पक्षाला परत निवडणुक जिंकणे शक्य झाले नव्हते. अपवाद १९८५ आणि १९९३ चा. इंदिरा हत्येनंतर काँग्रेस लाटेत १९८५ मध्ये काँग्रेसला परत निवडणुक जिंकता आली होती. तर १९९३ मध्ये बाबरी प्रकरणानंतर भैरोसिंग शेखावतांनी भाजपला निसटता विजय मिळवून दिला होता. वसुंधरा राजे यांचा कारभार फार लोकप्रिय आहे असे अजिबात नाही. ताज्या घडामोडींमध्ये याविषयी मागे कधीतरी लिहिले होते. डिसेंबरमधील विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेसला विजय मिळाला (कदाचित भरपूर मोठा) तर आश्चर्य वाटू नये. २०१४ पासून आतापर्यंत झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये गुजरात या एकाच राज्यात भाजप सत्ताधारी होता. पण इतर राज्यात विरोधात होता. त्यामुळे मोदी फॅक्टर बरोबरच राज्य सरकारविरूध्दच्या अ‍ॅन्टी इन्कबन्सीचाही फायदा भाजपला झाला होता. आता एप्रिल-मे मध्ये होणारी कर्नाटक विधानसभा निवडणुक त्यातील शेवटची असेल. डिसेंबरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तिसगड या तीन राज्यांमध्ये भाजप सत्ताधारी आहे. राजस्थानात पक्ष नक्कीच बॅकफूटवर असेल. बहुतेक छत्तिसगडमध्येही पक्ष एकाच मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर पक्ष बॅकफूटवर असेल. मध्य प्रदेशात पक्षाचा पराभव होईल असे वाटत नाही. पण काँग्रेस भाजपच्या नाकात दम आणेल हे नक्कीच. या पार्श्वभूमीवर त्यानंतर चारच महिन्यात होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसला नवा उत्साह संचारेल. तेव्हा मोदींनी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लोकसभा बरखास्त करून डिसेंबरमध्ये या राज्यांबरोबरच लोकसभा निवडणुक घेतली तरी आश्चर्य वाटू नये. त्याबरोबरच कदाचित महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्येही विधानसभा निवडणुक होऊ शकेल. कारण लोकसभा-विधानसभा निवडणुक एकत्र घ्यायचा पक्षाचा आग्रह असेल तर त्याप्रमाणे स्वतःचे वर्तन असायला हवे.

वाचने 40148
प्रतिक्रिया 183

प्रतिक्रिया

In reply to by बिटाकाका

नाही जर तुरुंगात टाकले असते तर सूडबुद्धीने कृती आहे असं ओरडता आलं असते आणि लगेच टाकू शकले नाहीत (पूर्ण भुजबळ चौकशी सारखं सखोल अभ्यास) तर भ्रष्टाचार झालाच नाही असं ओरडत राहायचं असं असतेय ते अखिल मिपा हाय काय अन् नाय काय, खाली डोकं वर पाय या प्रतिसाद संघाच्या त्रैमासिकातून साभार

In reply to by नाखु

माई मोड ऑन.. भुजबळ , लालु .. असे एक दोनच आत घातलेत. आणि उरलेल्याना पवित्र करुन घेतले आहे. आमच्या ह्याना गब्बरची आठवण झाली .. एका सचिनला मारून घोड्यावरुन पाठवला की उरलेले गाववाले सेटलमेंटला तयार होतात. भुजबळ , लालूंचा सचिन केला आहे , असे आमच्या ह्यांचे मत. माई मोड ऑफ

In reply to by manguu@mail.com

रांगेत कुणाचा तरी पहीला नंबर लागणारच ना, घोळक्याने घ्यायला तो काय सेल आहे का? जितका निर्दोष आणि काटेकोर तपास तितका निकाल पक्का, कोपर्डी प्रकरणात दांभिंकांची इतकी आक्रस्ताळी भूमिका असूनही रीतसर तपास करुन खटला उभा राहिला निकाल पाहिलास न माई. बाकी तुमच्या यांना बजेटच्या सवलतींचा लाभ झाला की नाही? चिनार बरोबर काशीसादि तेल पाठवत आहे, सुकून तेलाचा उपयोग झाला का? तुझाच नम्र बालक नाखु

मागल्या सरकारात तरी कोण भ्रष्टाचारी होते ? यावर तुमचे मत काय? माझे मत मी स्पष्ट केले आहे की, मागील सरकारने भ्रष्टाचार केला. याला आधार माझे स्वतःचे मत. यावर मला चर्चा नकोय. त्याचे मला स्वातंत्र्य आहे. मोदीजीनी कुठे कुणाला तुरुंगात घातले ? या प्रश्नाची बरोबरी कोठे होणार याचा तुम्हाला अंदाज आहे का? कोणत्याही सरकारने कोणावर कारवाई केली नाही तर तो निर्दोष असे आपले मत आहे का? असे मत मान्य करायचे तर मग आनंद आहे.

In reply to by जानु

मुर्खांबरोबर वाद घालू नका. ते तुम्हाला आधी त्यांच्या पातळीवर ओढून नेतात आणि मग अनुभवाच्या जोरावर मात देतात.

In reply to by जानु

असेच म्हटले तर कोण कुणाला मौत का सौदागर म्हणते , कोण कुणाला महात्य्माच्या खुनी म्हणते , तेही कन्सिडर करायचे का ?

करणी सेनेच्या सेन्सोर नंतर आता लष्कराचे सेन्सॉर नीरज पांडेंच्या 'अय्यारी' चित्रपटातील काही दृश्यांना देशाच्या संरक्षण खात्यानं आक्षेप घेत त्यात काही बदल सुचविले आहेत. त्यामुळं 'अय्यारी'चं प्रदर्शन लटकण्याची चिन्हं आहेत. 'अय्यारी'ची कथा लष्करातील भ्रष्टाचाराभोवती फिरते. त्यामुळं संरक्षण मंत्रालयातील मंडळींनी पाहिल्याशिवाय सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाला मंजुरी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी 'अय्यारी'चा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. या अधिकाऱ्यांनी चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ते बदलण्याची सूचना निर्मात्यांना केलीय. आता पोलिस , वकील , डॉक्टर , शिक्षक वगैरे सर्वांनी प्रत्येक चित्रपटामध्ये वाईट व्यावसायिक किंवा वाईट बाजू दाखवू नये म्हणून सेन्सोरशिप करावी का ? लष्कराबद्दल आदर आहेच पण तरीही त्यात काही गैरव्यवहाआहेतच ते दाखवण्यात गैर नाही. आणि मुख्य म्हणजे सेन्सॉर कडे अशी मागणी करणेच चुकीचे आहे

करणी सेना अचानक थंड पडली काय ? का त्यांचा अंक स्क्रिप्ट प्रमाणे संपला ? असल्यास लेखक, दिग्दर्शक, निर्माता कोण कोण असावेत ?

In reply to by झेन

करणी सेना अचानक थंड पडली काय ? अचानक थंड पडलेली नाही. २९ जानेवारीला होणार्‍या राजस्थानमधील ३ पोटनिवडणुकांसाठी हा फड रंगविण्यात आला होता. २९ जानेवारीला पोटनिवडणुक झाली, १ फेब्रवारीला मतमोजणी झाली (म्हणजेच पडदा पडला) आणि ३ फेब्रुवारीला करणी सेनेने यू टर्न घेऊन आंदोलन मागे घेऊन चित्रपट मान्य करून चित्रपटाला पाठिंबा दिला.
का त्यांचा अंक स्क्रिप्ट प्रमाणे संपला ?
होय. अंक स्क्रिप्टप्रमाणेच संपला. निवडणुक होईपर्यंत चित्रपटाचे निमित्त करून आंदोलन करून अशांतता माजून राज्य सरकारला अडचणीत आणणे असे स्क्रिप्ट होते. असल्यास लेखक, दिग्दर्शक, निर्माता कोण कोण असावेत ? लेखक, निर्माता, दिग्दर्शक - खांग्रेस

In reply to by manguu@mail.com

भाजपा धर्मांध आहे. ते घालणार बंदी नाहीतर कोण?

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी समर्थकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 'आता भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे,' असा सल्ला ठाकरेंनी भुजबळ समर्थकांना दिला.  https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/chhagan-bhujbal-…

In reply to by manguu@mail.com

भुजबळाना साहेबांबरोबर पतंग उडवायला सांगा. येतील बाहेर

In reply to by manguu@mail.com

वरील बातमीत विकास कोंडला गेला असं म्हंटलंय. भुजबळ सुटल्यावर असा काय थोर विकास घडवून आणणारेत? -गा.पै.

http://indianexpress.com/article/india/dont-reduce-court-to-fish-market… धन्य ते वकील! ३ वर्षांपूर्वी झालेल्या नैसर्गिक निधनावर आता किळसवाणे राजकारण करून अमित शहांना अडकविण्यासाठी किती तो जीवाचा आटापिटा!!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीयुत डेव्ह फर्नांडिस ह्यांच्या पत्नीने दिलखुलास अंदाज डावोस मध्ये दाखवला त्यावेळी त्यांनी हाय हिल्स घालून बर्फात चालण्याचा आपण सराव करत अहोत असा गौप्यस्फोट सुद्धा केला https://www.youtube.com/watch?v=cQ0GCpSiXjA

‘पद्मावत’ या चित्रपटावरुन सुरु असलेला वाद आता शमला असतानाच कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका’ हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. राजस्थानमधील ब्राह्मण महासभेने चित्रपटावर आक्षेप घेतला असून चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांच्याबाबत चुकीची माहिती दाखवण्यात आल्याचा महासभेचा आरोप आहे. कंगना रणौत ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये सुरु आहे. या चित्रपटावरही आता आक्षेप घेण्यात आला आहे. सर्व ब्राह्मण महासभेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मिश्रा यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. ‘चित्रपटातील काही दृष्य आणि एका गाण्यावर आमचा आक्षेप आहे. यामध्ये राणीलक्ष्मी बाई यांचे एका इंग्रज अधिकाऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचे दाखवण्यात आले आहे, असा दावा सुरेश मिश्रा यांनी केला. चित्रपटांमधील काही भाग लंडनमधील लेखिका जयश्री मिश्रा यांच्या पुस्तकावर आधारित आहे. वादग्रस्त उल्लेखांमुळे या पुस्तकावर उत्तर प्रदेशमध्येही बंदी आहे. मग बंदी असलेल्या पुस्तकाच्या आधारे चित्रपट तयार करण्याचा खटाटोप निर्मात्यांनी का केला, असा सवाल मिश्रा यांनी केला आहे. विशेष म्हणजे मिश्रा हे काँग्रेसचे स्थानिक नेते देखील आहेत. ‘आमच्या आक्षेपांची दखल घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिले नाही तर राजस्थानमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरणच होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

In reply to by manguu@mail.com

हा जातीय वाद निर्माण करण्यामागेही खांग्रेसच आहे. सरकार कोणाचेही असले तरी जातीय भावना भडकावण्यामागे खांग्रेसीच असतात. जशी निवडणुक जवळ येईल, तसे खांग्रेस असले अनेक जातीय वाद निर्माण करून भावना भडकावणार.

आश्रमात काही स्त्रियांना डांबून ठेवण्याचा आरोप असलेल्या बाबा वीरेंद्र देव याच्या वकिलाने नारी नरकाचे द्वार असते, त्यामुळे त्यांना डांबून ठेवले जाते असं आक्षेपार्ह विधान उच्च न्यायालयात केलं. वकिलाच्या या धक्कादायक विधानानंतर न्यायालयात एकच गोंधळ उडाला. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशही त्यामुळे संतापल्या आणि त्यांनी या वकिलाला थेट गेट आऊट म्हणत न्यायालयाबाहेर जाण्यास सांगितलं. बाबा वीरेंद्र देव याच्या प्रकरणावर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. यावेळी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती जयहिंद या सुद्धा उपस्थित होत्या. याप्रकरणी न्यायालय आदेश देण्याच्या तयारीत असतानाच वीरेंद्र देवच्या वकिलाने युक्तिवाद करायला सुरुवात केली. 'आमच्यावर देशाचा कोणताच कायदा लागू होत नाही. आम्ही जे करतो आहोत, ते साक्षात देवानेच आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे,' असं या वकिलाने सांगितलं. त्यावर न्यायालयाने त्यांना म्हणणं मांडण्यासाठी दोन दिवसाची वेळ दिली.मात्र लगेचच 'नारी नरकाचे द्वार आहे. तिला बंद करूनच ठेवले पाहिजे,' असं धक्कादायक विधान या वकिलाने केलं. वकिलाच्या या वक्तव्यावर स्वाती जयहिंद प्रचंड संतापल्या आणि त्यांनी कोर्टातच त्याला जोरदार आक्षेप घेतला. हा गोंधळ सुरू असतानाच न्यायाधीशांनी या वकिलाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना न्यायालयाबाहेर जाण्यास सांगितले. https://m.maharashtratimes.com/india-news/after-an-statement-by-advovat…

In reply to by manguu@mail.com

आहेत तुमचे. असेच स्तुत्य प्रयत्न चालू ठेवा. वरील घटना वाईट आहे. आणि स्त्रियान्विषयी चा हा भाव अत्यन्त चुकीचा आहे. पण तुम्ही शोधून शोधून हिन्दु धर्मांधता/बुवाबाजी लोकांपुढे आणता केवढे उपकार आहेत तुमचे हिन्दु समाजावर. म्हणजे वाईट प्रथा जाऊन चांगला सुधारणा असलेला हिन्दु धर्म राहील.

In reply to by सुखीमाणूस

जेंडर डिस्क्रीमिनेशन हा मुद्दा धर्म जात यापलीकडला आहे.

In reply to by manguu@mail.com

काय सांगताय? म्हणजे मुसलमान महिलांना पण वारसाहक्काच्या ५० % तुम्हाला मान्य आहे कि काय? पण शरियत मध्ये तर २५ % च म्हटलंय. तोबा तोबा

In reply to by सुबोध खरे

मुलीला ० % कोण देत होते म्हणे ? ( बोट तुटक्या ) शाइस्तेखानाने ढाक्क्याला लाल किल्ला मिळाला तर तो त्याच्या मुलीला देवून टाकला म्हणे. परीबानो का महल.

In reply to by manguu@mail.com

शाहिस्ते खानाने दिले ते "बक्षिश" होते वारसा हक्काने आलेले नव्हते. तुमची या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायची सवय जात नाही. वारसा हक्क हा हक्क आहे उपकार किंवा मेहरबानी नव्हे शरियत प्रमाणे मुलीला मुलाच्या अर्धाच हिस्सा (२५ %) द्यायला पाहिजे. हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मुलगा आणि मुलीला ५० -५०% जातात 3 – If there are other, male, heirs who are descendents of the deceased (one or more), then they are to be given the remainder after each person who is entitled to a share has been given that share. Her share is equal to one-half of her brother’s share (“to the male, a portion equal to that of two females”), whether they are two or whether the children include both males and females. The male takes a share equal to that of two females. Allaah says (interpretation of the meaning): “Allaah commands you as regards your children’s (inheritance): to the male, a portion equal to that of two females” https://islamqa.info/en/12911

In reply to by सुबोध खरे

उगाच त्या ५० % चे तुणतुणे. . १०००० वर्षे शून्यावरच होते . बाबासाहेबांच्या आशिर्वादाने ५० % झाले . ५० वर्षे झाली जेमतेम.

In reply to by manguu@mail.com

मिंया चाउस एक बात कि दाद देनी पडेगि. तुमचा ऐक आय डि ब्लॉक झाला कि लगेच दुसरा तयार असतो. काल परवा नायर हॉस्पिटल मध्ये MRI मशिन रीलेटेड जो घातपात झाला त्यात ऐक मुर्ख कंपाउंडर सामिल होता म्हणे. ईतक्या लवकर कसा सुटलास गजानन कागलकर ? (संपादित) ROFL

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली आहे. नाशिक महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यापुढे कार्यरत असतील. संदर्भ ही बातमी राज्यकर्त्यांना ते कोठेच नको असणार. आता पुढील बदली कधी होणार एवढे बघणेच हाती आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ओ गुरुजी , तिकडे मिपावाले भांडत बसलेत .. ते हसणे मोदीना नेमके कुणासारखे वाटले ? सीतामैय्या शुर्पणखा अशोकवनातील राक्षशीण मिपावर एक कौल घ्या.

म्हशीचे मांस असल्याचे भासवून तशी बनावट कागदपत्रे तयार करून पावणे एमआयडीसीतील अॅग्रो फ्रेश कोल्ड स्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणात गाय आणि बैलाचे मांस साठवून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी हे मांस साठवून ठेवणाऱ्या व्हट्रेक्स अॅग्री प्रोडक्ट्स लि. या कंपनीचे संचालक हेमंत कुमार यांच्यावर फसवणूक तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी गाय व बैलाचे सुमारे २२ लाख ८५ हजार रुपये किमतीचे मांस जप्त केले असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. https://m.maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai… लाखोंचे गोमांस मिळूनही कट्टरपंथियानी कुणाच्या नखालाही धक्का लावला नाही. हिंसा टाळल्याबद्दल अभिनंदन.

In reply to by गामा पैलवान

अखलाखच्या प्रकर्णातही मांसच मिळाले होते ना ? की उपयुक्त पशू कापताना कुणी पाहिले होते ?

In reply to by manguu@mail.com

अखलकला कापला तो त्याने राहुल यादववर खुनी हल्ला केला म्हणून. गोमांसाचा संबंध नाही. -गा.पै.

In reply to by manguu@mail.com

अखलाख प्रकरण आणि हे वरील प्रकरण यात साम्य दिसतंय तर तुम्हाला! पोलिसांनी आधी कारवाई केली तरीही नंतर कुणीतरी येईन ठोकून काढलं असतं असं आपल्याला का बरं वाटत असेल?

In reply to by बिटाकाका

बाकी प्रकर्णात , आधी ठोकाठोकी , मग पोलिस असा sequence असायचा. इथे ठोकाठोकी न होता direct पोलिस आले. असो. अहिंसात्मक मार्गाला लागल्याबद्दल पुनश्च अभिनंदन.

Hira’ H stands for highway, I stands for I-way (digital connectivity), R stands for roadway A stands for airway. साभार मा. पं. प्र.

अलीकडच्या काळात निवडणुकांमध्ये पैशाचा अतिरेकी वापर होत असून ही चिंतेची बाब आहे. बऱ्याचदा निवडणुकानंतर काही उमेदवारांकडून प्रत्येक मतदानासाठी अमुक इतके पैसे देण्यात आल्याची भाषा कानावर पडते. त्यावेळेस चिंतेत अधिक भर पडते. पैशांचा हा वापर थांबविला पाहिजे, अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/excessive-use-of… अलीकडच्या म्हणजे नेमक्या कोणत्या ? सगळ्या निवडणुका हेच तर जिंकत आहेत.

तामिळनाडूच्या राजकारणात एन्ट्री करणारे अभिनेते कमल हसन यांनी रजनीकांत यांच्यासोबतच्या आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मी रजनीकांत यांचा मित्र आहे. आमचा उद्देश आणि लक्ष्य एकच आहे, मात्र दोघे एकत्र काम करू, असे मला वाटत नाही. त्यांच्या राजकारणाचा रंग भगवा नसेल, अशी अपेक्षा आहे. माझ्याही राजकारणाचा रंग भगवा नसेल,' असे हसन म्हणाले. https://m.maharashtratimes.com/india-news/kamal-haasan-speech-in-harvar… भक्तलोक आता कमल हसन व रजनीकांतवर तुटून पडतील.

In reply to by manguu@mail.com

जसे अंधभक्त/अंधविरोधक लोक आता त्यांच्या समर्थनार्थ तुटून पडले आहेत!! आज खिलजी असता आणि त्याने जरी मोदींना विरोध केला असता तरी अंधभक्त/अंधविरोधकांनी त्याच्या समर्थनार्थ उड्या मारल्या असत्या यात तिळमात्र शंका नाही! चालायचंच...

In reply to by बिटाकाका

+ साडेचार लाख कोटी जर मोदींविरूद्ध हफीज सईद, दाऊद असे कोणी उभे राहिले तर जमात-ए-पुरोगामी त्या लोकांना एकगठ्ठा मत देतील.

In reply to by श्रीगुरुजी

मोदीजी तीरथयात्रेतून आले का ? परदेशात गेले होते म्हणे. उगाचच हज यात्रेचे अनुदान बंद केलेत ... तुम्हीसुद्धा त्या सौदीच्या देवळात जायला भज यात्रा काढायची आणि अनुदान घेऊन जाऊन यायचे.

Senior cleric says long robes not necessary for Saudi women गेले काही महिने सौदी अरेबियात चाललेल्या घडामोडी पाहता, तेथिल मुस्लिम विचारसरणी, उदार विचारांच्या संबंधात, दिवसेदिवस आश्चर्यकारकरित्या भारतिय मुस्लिम विचारसरणीच्या, दशकांनी पुढे जात चालली आहे असेच दिसते !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चार एक वर्षांपूर्वी सौदी अरेबियातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला, नंतर गेल्या दोनएक वर्षांपूर्वी त्यांना निवडणूकीत उभे राहण्यास परवानगी मिळाली, चारचाकी चालवण्याचा परवाना देण्याच्या दिशेन त्यांची वाटचाल चाललेली आहे, घरचा मोठा माणुस (शॅपरोन) बरोबर न घेता घराबाहेर जाण्याची मुभा... नंतर घरच्या मोठ्या माणसाच्या लेखी परवानगीशिवाय एकटे परदेशी जाण्याची मुभा मिळाली, पुरुषांबरोबर उघड्या मैदानात बसून फूटबॉलसारखे खेळ बघण्याची मुभा मिळाली, ...आणि आता चक्क काळा बुरखा (अबाया) न घालता घराबाहेर जाण्यावरची बंदी उठवण्याच्या दृष्टीने त्या देशाच्या अधिकृत Council of Senior Scholars मधिल एका वरिष्ठ धार्मिक नेत्याने केलेले हे वक्तव्य ! हे वरचे सगळे बदल इतर जगासाठी अजिबात क्रांतिकारक वाटणार नाहीत. पण, अगदी चारपाच वर्षांपर्यंत सौदी अरेबियात, डोक्यासकट संपूर्ण अंग झाकणारा केवळ काळ्या रंगाचा (त्यावर इतर रंगाची वेलबुट्टी किंवा किनारही चालत नव्हती) अबाया घातल्याशिवाय आणि घरचा मोठा माणूस बरोबर असल्याशिवाय सौदी स्त्रियांना घराबाहेर पडण्यास बंदी होती. या पार्श्वभूमीवर गेल्या केवळ चारएक वर्षांत होत असलेले हे बदल, आताआतापर्यंत मध्यकाळात रुतून बसलेल्या एका कर्मठ देशाचे आधुनिकतेकडे वाटचाल करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे.

PM Modi officially launches foundation stone-laying ceremony for first Hindu temple in Abu Dhabi मुख्य म्हणजे, हे मंदीर अबू धाबीच्या युवराजांनी {जे सद्या व्यावहारीकरित्या (इप्सो फॅक्टो) सत्ता सांभाळत आहेत} भेट दिलेल्या ५५,००० चौ मीटर जमिनीवर उभे राहणार आहे. २०१७-१८ मध्ये (दुबईत नाही) अबू धाबीत हिंदू मंदीराची उभारणी होईल, असे २०१४ मध्ये (ज्यावेळी मी खाडी देशांतील वास्तव्याची अनेक वर्षे पुरी केलेली होती) सांगितले असते तर, मी त्यावर मी अजिबात विश्वास ठेवला नसता !

कमीत कमी या चार फोटोंसाठी माझ्या कडुन कॉग्रेसला एक मत २०१९ ला ;)

https://timesofindia.indiatimes.com/india/deoband-fatwa-says-avoid-fami… बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मुलींशी लग्न करू नका.कारण अशा हरामाच्या पैशातून पालन पोषण झालेल्या मुलिची नैतिकता संशयास्पद असते. असा फतवा काढला आहे दारुल उलूम देवबंद ने मोगा खान या बद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला?

In reply to by सुबोध खरे

कंजारभाट समाजात आजही कौमार्यचाचणी केल्या जाते. त्याबद्दल सुभोद खरे तुमचे काय म्हणणे आहे? तसेच खाप पंचायतच्या पवित्र्याबद्दल काय म्हणायचं आहे सुभोद खरे तुम्हाला? https://www.jagran.com/uttar-pradesh/bagpat-khap-panchayat-17502233.html

'भारतीय लष्कराला सैन्य तयार करण्यासाठी सहा ते सात महिने लागतील. पण देशाला गरज पडल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सीमेवर शत्रूशी लढेल आणि त्यासाठी केवळ तीन दिवसांत सैन्याची उभारणी करण्याची क्षमता संघाकडे आहे,' बातमीचा दुवा सरसंघचालकांनी सैनिकाची आणि स्वयंसेवकाची तुलना करणे चुकीचे आहे. संघाची आणि भारतीय लष्कराच्या तुलनेतून हे काय सांगू इच्छितात ?