अखेरीस सर्व (तथाकथित) संस्कृती रक्षकांच्या विरोधास न जुमानता "पद्मावती" चे थेटरात आगमन झालेच.
माफ करा, टंकलेखनाच्या चुकांकडे कानाडोळा करावा, संपूर्ण लेखात "पद्मावती" छापण्यात आले असले तरीही (तथाकथित) संस्कृती रक्षकांनी आणि मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी यांनी ते "पद्मावत"(च) आहे असे समजून लेख वाचण्याची विनंती.
(विनाकारण) उत्सुकता वाढवणारा क्षण आल्यासरशी तमाम रसिकजनांनी त्यावरती उड्या हाणल्या. चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व (जास्तीचे) पैसे भरून चित्रपट पाहण्याची संधी पूर्ण करता आली. या सर्व घटनांबद्दल सर्व (तथाकथित) संस्कृती रक्षकांचे मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी यांचेकडून आभार.
या सकल घटनांचे रुपरंग पाहता, आम्हास १९३० ते १९४७ दरम्यान च्या निवडणुकांचे दिवस आठवले. "मुस्लिम लीग" नामक एक पक्ष ज्यांच्याकडे लोकसभा वा राज्यसभेत पूर्ण राहू द्या परंतु अर्धे देखील बहुमत नव्हते, त्या ठिकाणी त्यांची मंत्रिमंडळात पन्नास टक्के मंत्रिपदाची मागणी होती. अर्थातच या मागणीस सभ्य भाषेत "हेकटपणा" म्हटले जाऊ शकते किंवा शेलक्या शब्दात "बिनडोक" म्हणता येईल. करणी सेनेच्या मागणीस काय म्हणायचे ते वाचक आपसूक ठरवतीलच.
भ्रमाचा भोपळा अन भ्रमाचा फुगा दोन्ही फार काळ टिकाव धरू शकत नाहीतच. (जोवर त्यास झाकपाक संस्कृतीची लागण होत नाही.) सत्य हे आज नाही तर उद्या बाहेर येतेच. कोट्यवधी रुपयांच्या नाक आणि डोक्याची मूल्ये आजपासून कवडीमोल झालीत याचे आम्हास दुःख वाटत आहे. (आमच्या पेक्षा अधिक दुःख मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी अन कु. दिपीकेस वाटत असावे.) खिलजीच्या ज्या प्रणय प्रसंगाबाबत चर्वितचर्वण केले जात होते, अन ज्या प्रसंगाच्या बळावर (तथाकथित) संस्कृतीरक्षकांची धुडगूस चालू होता असा कोणताही प्रसंग संपूर्ण चित्रपटात नाहीच आहे हे वर"करणी" तरी प्रेक्षकांना समजलेच आहे. (परन्तु प्रणयप्रसंग चित्रपटात नसल्याने तमाम "शौकीन" निराश झालेत. तेव्हा भो संजया - पुढील चित्रपटात प्रणय प्रसंग असूच द्या अशी अपेक्षेवजा मागणी.)
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झाकलेलीं कु. दीपिकाची कंबर यामुळे पुनःश्च आपण आपल्या संस्कृतीचे रक्षण केल्याचा कोण अभिमान त्या चित्रपट गृहात ओसंडून वाहत होता याचे वर्णन आम्ही कोणत्या शब्दात करू! (येथे पुन्हा एकदा "शौकीन" निराश झालेत हे आम्ही नमूद करू इच्छितो.)
भारतीय संस्कृती ही केवळ सहनशील नाही तर वेळप्रसंगी त्यात शस्त्र हाती धरून संस्कृती नाश करणाऱ्या गोष्टींस मुळापासून उपटून टाकण्याचे सामर्थ्य देखील आहे आणि अशाही प्रकारे आपण संस्कृतीतील हिंसेचे प्रदर्शन या निमित्ताने भरवू शकलो, घडवू शकलो, ही या संजयाची "करणी".
वाघाने एकदा सावज हेरले की तो ते मारण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. सावजास एकदा माहीत पडले की आपली शिकार होणार, तेव्हा सावज चौखूर उधळत धावते म्हणून वाघास (बडेजाव माजविणेकरिता तरी ) सावजाचा पाठलाग करावा लागतो. तैसेच झाले असावे. प्रथम (तथाकथित) संस्कृतीरक्षकांनी सावज हेरले पण गवसत नाही असे लक्षात आले. चित्रपटात आक्षेपार्ह काही नाही याची जाणीव झाली तसे हेकटपणे चित्रपट पाहणे नाकारले. आता मात्र भन्साळींनी चौखूर उधळले म्हणून हे (तथाकथित) संस्कृतीरक्षक बडेजाव माजविणे करीता हिंसाचार करतांना दिसत आहेत. मुदलात आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे सापच नाही परंतु काठ्या आपटणे सुरुच ठेवावे लागले करण एका असत्यास लपविणे करिता असत्याची माळ उघडावी लागते. भोके असणाऱ्या वस्त्रांतून हवा लागून थंडी वाजतेच तशीच यांना हुडहुडी भरली. त्या थंडीवर उपचार म्हणून यांनी हिंसाचाराच्या शेकोट्या पेटवल्या. नुकताच यांच्यातील परमपुरुष नरवीरांनी भविष्यात अत्यंत धोकादायक असणाऱ्या लहान अजाण बालकांच्या गाडीवर लक्ष्यभेदी हल्ला केलाय. प्रसिद्धधी साठी अमाप खर्च करूनही जे शक्य झाले नसते त्याची सिद्धता झाली. याबद्दल संजयाचे अंतः"करणी" आनंदाचे धुमारे फुटले आहेतच. खाजगीत एक गोष्ट म्हणजे, या घटनेनंतर संजयाच्या भ्रमणध्वनीवर 'किती सांगू मी सांगू कुणाला...!' चे गाणेही वाजते आहे. सकल गोष्टी अंती.....
सुज्ञांच्या मनास एक प्रश्न विचारावासा वाटतो की हे जे संस्कृती नामक अगम्य गोष्टीवरती चतुरस्त्र आणि हिणकस प्रदर्शन चालले आहे ते पटते आहे का?
नवसाकरिता असो वा खाण्याकरिता - हिंसा ही अखेरीस हिंसाच असते. ती गाय वा बकरी वा घोडा अशी वेगवेगळी वाटण्यात आणि त्यावरून धार्मिक राजकारण करण्यात कितपत तथ्य आहे? धार्मिक किनार वाढवण्याच्या प्रयत्नात माणुसकीचा दृष्टिकोण संकुचित होतो आहे यावर कुणी विचार का करत नाही?असल्याच संकुचित दृष्टीकोनातून बेगडी सामाजिक रचना अस्तित्वात येते आणि मानवीय सह-संबंधांचे धागे उसवत जातात.
धार्मिकतेच्या नावावर पोळी भाजणारी मंडळी - मग ती लाल हिरव्या भगव्या निळ्या काळ्या कोणत्या का झेंड्या खाली असेना, त्यांना पाठिंबा तुम्हा आम्हा सारख्या सामान्यांतूनच मिळतो. जोवर आपण ही लक्तरे झुगारणार नाही तोवर आपले अस्तित्व चमकून दिसणार नाही.
आणि आम्हास सध्यातर "हर शाख पर उल्लू बैठा" दिसतोय. त्यामुळे भविष्यातही असेच पद्मावतीचे भ्रमाचे भोपळे फुटत राहणार आणि वर"करणी" धुडगूस वाढत राहणार.
वाचने
35881
प्रतिक्रिया
125
मिसळपाव
प्रतिक्रिया
...
शूर वीर संस्कृती रक्षकांना
आम्ही पद्मावत पाहिला, लागलीच
In reply to शूर वीर संस्कृती रक्षकांना by साहना
..
In reply to आम्ही पद्मावत पाहिला, लागलीच by पगला गजोधर
विघातक प्रवृत्तींना आवरणे अवघड आहे.
प्रतिसाद आवडला...
In reply to विघातक प्रवृत्तींना आवरणे अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इथं कुठं ?
In reply to प्रतिसाद आवडला... by मुक्त विहारि
या सर्व गोष्टीला शिक्षण जवाबदार आहे असे म्हणायचे आहे का ?
In reply to इथं कुठं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्वारं.....!
In reply to या सर्व गोष्टीला शिक्षण जवाबदार आहे असे म्हणायचे आहे का ? by मुक्त विहारि
ज्या ज्या देशात शिक्षकांचा आदर केला जातो....
In reply to ब्वारं.....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
..
In reply to ज्या ज्या देशात शिक्षकांचा आदर केला जातो.... by मुक्त विहारि
उगा काहीतरी विचरून टाइमपास
In reply to .. by manguu@mail.com
अहो....
In reply to उगा काहीतरी विचरून टाइमपास by आनन्दा
....
In reply to अहो.... by मुक्त विहारि
....
In reply to .... by manguu@mail.com
गृहपाठ - साहना यांचे सगळे
In reply to उगा काहीतरी विचरून टाइमपास by आनन्दा
आजचे शिक्षण असा नवा धागा काढ़ा.
In reply to ज्या ज्या देशात शिक्षकांचा आदर केला जातो.... by मुक्त विहारि
आपल्या अवांतर प्रतिसादामुळे मूळ धाग्याकडे दुर्लक्ष होत आहे.
In reply to आजचे शिक्षण असा नवा धागा काढ़ा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संदर्भ?
In reply to या सर्व गोष्टीला शिक्षण जवाबदार आहे असे म्हणायचे आहे का ? by मुक्त विहारि
+१
In reply to संदर्भ? by अरविंद कोल्हटकर
ओके...
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
....
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कौटिल्याचे अर्थशास्त्र हे पुस्तक वाचा...
In reply to संदर्भ? by अरविंद कोल्हटकर
हे बघा....
In reply to कौटिल्याचे अर्थशास्त्र हे पुस्तक वाचा... by मुक्त विहारि
नमन नटवरा !
In reply to प्रतिसाद आवडला... by मुक्त विहारि
शॄंगार पुरे.
In reply to नमन नटवरा ! by manguu@mail.com
याबाबतीत सहमत आहे..
In reply to विघातक प्रवृत्तींना आवरणे अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणीबाणी ?
डायरेक्ट हिंसाचार ? काय आहे काय ? ते किशोरकुमार , संजय गांधी आणि आणि आणीबाणी प्रकरण एकंदरीत बरेच सौम्य असावे नाही ?आणि पुन्हा असले येडेचाळे करण्याची आठवण जरी झाली तरी कापरे भरले पाहिजेत.कायद्यानेच....
In reply to आणीबाणी ? by तर्री
आधीच्या लेखाचा धागा....
...
राजपुतांचा अपमान
..
In reply to राजपुतांचा अपमान by गामा पैलवान
पिच्चर काढला तर चापटवायचे...
In reply to राजपुतांचा अपमान by गामा पैलवान
पिच्चर काढला तर चापटवायचे...
In reply to पिच्चर काढला तर चापटवायचे... by टवाळ कार्टा
कुजबूजी यंत्रणा लगेचच, 'ते
In reply to पिच्चर काढला तर चापटवायचे... by पगला गजोधर
टक्या तु नै बे कुजबुजी...
In reply to कुजबूजी यंत्रणा लगेचच, 'ते by टवाळ कार्टा
कोणी जर प्रेषित महमंदांच्या
In reply to राजपुतांचा अपमान by गामा पैलवान
कोणी जर प्रेषित महमंदांच्या
संस्कृती आणि इतिहासावर...
In reply to कोणी जर प्रेषित महमंदांच्या by झपाटलेला फिलॉसॉफर
कॉपीराईट नाहीये, पण म्हणून
In reply to संस्कृती आणि इतिहासावर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही पिच्चर बघितला का? का
In reply to कोणी जर प्रेषित महमंदांच्या by झपाटलेला फिलॉसॉफर
शार्ली हेब्दो च्या पुरोगामी
In reply to कोणी जर प्रेषित महमंदांच्या by झपाटलेला फिलॉसॉफर
आजच पाहिला पद्मावत .
उद्या डिस्क्लेमर टाकुन आदरणीय
In reply to आजच पाहिला पद्मावत . by बबन ताम्बे
तुम्ही चित्रपट बघुन या.
In reply to उद्या डिस्क्लेमर टाकुन आदरणीय by झपाटलेला फिलॉसॉफर
हे काय ?????
खर आहे, म्हणूनच हिंदूंच्या
In reply to हे काय ????? by manguu@mail.com
अरे वा !
In reply to खर आहे, म्हणूनच हिंदूंच्या by आनन्दा
च्यामारी, भन्साल्याला आस्कर द्या
च्यामारी, भन्साल्याला आस्कर द्या
भारत एक खोज मधला पद्मावतीचा
भारत एक खोज मधला पद्मावतीचा
भारत एक खोज मधला पद्मावतीचा
पद्मावतचे विरोधक
व्हाट्सप आले.
मी चित्रपट पाहीलाय..
एपिक..
In reply to मी चित्रपट पाहीलाय.. by चिगो
पद्मावत और तोता
In reply to एपिक.. by चिगो
....
<<<लोकाना आजही अशा
In reply to .... by manguu@mail.com
अल्लाउद्दीन खिलजी ची अधिकृत
प्रतिसाद माहितीपूर्ण वाटतो.
In reply to अल्लाउद्दीन खिलजी ची अधिकृत by झपाटलेला फिलॉसॉफर
पिच्चरमध्ये खिलजी आणि
In reply to अल्लाउद्दीन खिलजी ची अधिकृत by झपाटलेला फिलॉसॉफर
पिच्चरमध्ये खिलजी आणि
In reply to पिच्चरमध्ये खिलजी आणि by टवाळ कार्टा
पिक्चरच्या सुरुवातीला
In reply to पिच्चरमध्ये खिलजी आणि by पगला गजोधर
गजोधर भैय्या
In reply to पिक्चरच्या सुरुवातीला by पगला गजोधर
पिक्चरच्या सुरुवातीला दीपिकेकडून शाहिदच्या छातीवर समोरून ह्रिदयाजवळ बाण लागतो, त्यात शाहिद मारत नाही,तो तीर माशुक चा होता हो त्याने कसा मरणार तो ? थोड आशिक के पाँइट ऑफ व्ह्यु पण पहा न हो ? ते नाही का तो शेर आहे कोई मेरे दिल से पुछे तेरे तीर ए नीमकश को ये खलीश कहा से होती जो जीगर के पार होता बहुधा खलीश वगैरे साठी सहन केला असावा बाकी तुम्हाला विसंगतीच शोधायच्या असतील तर रजपुताना शौर्य "दाखवतांना" खुप आहेत. जसे शाहिद कपुर सुटका झाल्यावर खिल्जी ला आवर्जुन भेटुन मात्र त्याच्या सैनिकांना टाळुन "गुपचुप" निघुन जातो. (इथे खर त्याचे सैनिक ही असतात पालखीतुन आलेले पण एक शहीद ही होतो तरी हा काही त्यांच्या बरोबरीने न लढता नेतृत्व न करता उलट वरुन रोक सके तो रोक ले वगैरे डायलॉग मारुन जातो. नंतर तोच राजपुत बकरा वगैरे मोठ्या शौर्याने मारतो. बाकी सिनेमा इतका मोठा कचर्याचा ढीग आहे एक्सेप्ट सिनेमॅटोग्राफी एडिटींग की असोचदीपिकेचं नाक
हो का ?
In reply to दीपिकेचं नाक by गामा पैलवान
अहो त्यांनी वर म्हटलंय नं, की
In reply to हो का ? by manguu@mail.com