अखेरीस सर्व (तथाकथित) संस्कृती रक्षकांच्या विरोधास न जुमानता "पद्मावती" चे थेटरात आगमन झालेच.
माफ करा, टंकलेखनाच्या चुकांकडे कानाडोळा करावा, संपूर्ण लेखात "पद्मावती" छापण्यात आले असले तरीही (तथाकथित) संस्कृती रक्षकांनी आणि मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी यांनी ते "पद्मावत"(च) आहे असे समजून लेख वाचण्याची विनंती.
(विनाकारण) उत्सुकता वाढवणारा क्षण आल्यासरशी तमाम रसिकजनांनी त्यावरती उड्या हाणल्या. चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व (जास्तीचे) पैसे भरून चित्रपट पाहण्याची संधी पूर्ण करता आली. या सर्व घटनांबद्दल सर्व (तथाकथित) संस्कृती रक्षकांचे मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी यांचेकडून आभार.
या सकल घटनांचे रुपरंग पाहता, आम्हास १९३० ते १९४७ दरम्यान च्या निवडणुकांचे दिवस आठवले. "मुस्लिम लीग" नामक एक पक्ष ज्यांच्याकडे लोकसभा वा राज्यसभेत पूर्ण राहू द्या परंतु अर्धे देखील बहुमत नव्हते, त्या ठिकाणी त्यांची मंत्रिमंडळात पन्नास टक्के मंत्रिपदाची मागणी होती. अर्थातच या मागणीस सभ्य भाषेत "हेकटपणा" म्हटले जाऊ शकते किंवा शेलक्या शब्दात "बिनडोक" म्हणता येईल. करणी सेनेच्या मागणीस काय म्हणायचे ते वाचक आपसूक ठरवतीलच.
भ्रमाचा भोपळा अन भ्रमाचा फुगा दोन्ही फार काळ टिकाव धरू शकत नाहीतच. (जोवर त्यास झाकपाक संस्कृतीची लागण होत नाही.) सत्य हे आज नाही तर उद्या बाहेर येतेच. कोट्यवधी रुपयांच्या नाक आणि डोक्याची मूल्ये आजपासून कवडीमोल झालीत याचे आम्हास दुःख वाटत आहे. (आमच्या पेक्षा अधिक दुःख मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी अन कु. दिपीकेस वाटत असावे.) खिलजीच्या ज्या प्रणय प्रसंगाबाबत चर्वितचर्वण केले जात होते, अन ज्या प्रसंगाच्या बळावर (तथाकथित) संस्कृतीरक्षकांची धुडगूस चालू होता असा कोणताही प्रसंग संपूर्ण चित्रपटात नाहीच आहे हे वर"करणी" तरी प्रेक्षकांना समजलेच आहे. (परन्तु प्रणयप्रसंग चित्रपटात नसल्याने तमाम "शौकीन" निराश झालेत. तेव्हा भो संजया - पुढील चित्रपटात प्रणय प्रसंग असूच द्या अशी अपेक्षेवजा मागणी.)
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झाकलेलीं कु. दीपिकाची कंबर यामुळे पुनःश्च आपण आपल्या संस्कृतीचे रक्षण केल्याचा कोण अभिमान त्या चित्रपट गृहात ओसंडून वाहत होता याचे वर्णन आम्ही कोणत्या शब्दात करू! (येथे पुन्हा एकदा "शौकीन" निराश झालेत हे आम्ही नमूद करू इच्छितो.)
भारतीय संस्कृती ही केवळ सहनशील नाही तर वेळप्रसंगी त्यात शस्त्र हाती धरून संस्कृती नाश करणाऱ्या गोष्टींस मुळापासून उपटून टाकण्याचे सामर्थ्य देखील आहे आणि अशाही प्रकारे आपण संस्कृतीतील हिंसेचे प्रदर्शन या निमित्ताने भरवू शकलो, घडवू शकलो, ही या संजयाची "करणी".
वाघाने एकदा सावज हेरले की तो ते मारण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. सावजास एकदा माहीत पडले की आपली शिकार होणार, तेव्हा सावज चौखूर उधळत धावते म्हणून वाघास (बडेजाव माजविणेकरिता तरी ) सावजाचा पाठलाग करावा लागतो. तैसेच झाले असावे. प्रथम (तथाकथित) संस्कृतीरक्षकांनी सावज हेरले पण गवसत नाही असे लक्षात आले. चित्रपटात आक्षेपार्ह काही नाही याची जाणीव झाली तसे हेकटपणे चित्रपट पाहणे नाकारले. आता मात्र भन्साळींनी चौखूर उधळले म्हणून हे (तथाकथित) संस्कृतीरक्षक बडेजाव माजविणे करीता हिंसाचार करतांना दिसत आहेत. मुदलात आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे सापच नाही परंतु काठ्या आपटणे सुरुच ठेवावे लागले करण एका असत्यास लपविणे करिता असत्याची माळ उघडावी लागते. भोके असणाऱ्या वस्त्रांतून हवा लागून थंडी वाजतेच तशीच यांना हुडहुडी भरली. त्या थंडीवर उपचार म्हणून यांनी हिंसाचाराच्या शेकोट्या पेटवल्या. नुकताच यांच्यातील परमपुरुष नरवीरांनी भविष्यात अत्यंत धोकादायक असणाऱ्या लहान अजाण बालकांच्या गाडीवर लक्ष्यभेदी हल्ला केलाय. प्रसिद्धधी साठी अमाप खर्च करूनही जे शक्य झाले नसते त्याची सिद्धता झाली. याबद्दल संजयाचे अंतः"करणी" आनंदाचे धुमारे फुटले आहेतच. खाजगीत एक गोष्ट म्हणजे, या घटनेनंतर संजयाच्या भ्रमणध्वनीवर 'किती सांगू मी सांगू कुणाला...!' चे गाणेही वाजते आहे. सकल गोष्टी अंती.....
सुज्ञांच्या मनास एक प्रश्न विचारावासा वाटतो की हे जे संस्कृती नामक अगम्य गोष्टीवरती चतुरस्त्र आणि हिणकस प्रदर्शन चालले आहे ते पटते आहे का?
नवसाकरिता असो वा खाण्याकरिता - हिंसा ही अखेरीस हिंसाच असते. ती गाय वा बकरी वा घोडा अशी वेगवेगळी वाटण्यात आणि त्यावरून धार्मिक राजकारण करण्यात कितपत तथ्य आहे? धार्मिक किनार वाढवण्याच्या प्रयत्नात माणुसकीचा दृष्टिकोण संकुचित होतो आहे यावर कुणी विचार का करत नाही?असल्याच संकुचित दृष्टीकोनातून बेगडी सामाजिक रचना अस्तित्वात येते आणि मानवीय सह-संबंधांचे धागे उसवत जातात.
धार्मिकतेच्या नावावर पोळी भाजणारी मंडळी - मग ती लाल हिरव्या भगव्या निळ्या काळ्या कोणत्या का झेंड्या खाली असेना, त्यांना पाठिंबा तुम्हा आम्हा सारख्या सामान्यांतूनच मिळतो. जोवर आपण ही लक्तरे झुगारणार नाही तोवर आपले अस्तित्व चमकून दिसणार नाही.
आणि आम्हास सध्यातर "हर शाख पर उल्लू बैठा" दिसतोय. त्यामुळे भविष्यातही असेच पद्मावतीचे भ्रमाचे भोपळे फुटत राहणार आणि वर"करणी" धुडगूस वाढत राहणार.
वाचने
35881
प्रतिक्रिया
125
मिसळपाव
प्रतिक्रिया
...
In reply to अहो त्यांनी वर म्हटलंय नं, की by पगला गजोधर
मोगा खान
In reply to ... by manguu@mail.com
असा चित्रपट तयार केला तर जमात
In reply to मोगा खान by सुबोध खरे
....
In reply to मोगा खान by सुबोध खरे
नाक "करणी सेना"च कापणार आहे
In reply to .... by manguu@mail.com
डॉ
In reply to नाक "करणी सेना"च कापणार आहे by सुबोध खरे
...
https://m.timesofindia.com
जालावर गप्पा मारल्यावर मला
अगदी माझ्या मनातलं बोललात..
In reply to जालावर गप्पा मारल्यावर मला by सुबोध खरे
..
In reply to जालावर गप्पा मारल्यावर मला by सुबोध खरे
....
In reply to .. by manguu@mail.com
सती खंड
In reply to .... by manguu@mail.com
हे सर्व तुम्ही वाचलं का?
In reply to .... by manguu@mail.com
..
In reply to हे सर्व तुम्ही वाचलं का? by सुबोध खरे
.....
In reply to .. by manguu@mail.com
इतिहास किती खरा किती खोटा
In reply to .. by manguu@mail.com
शिवाजी महाराष्ट्रात राजे
In reply to इतिहास किती खरा किती खोटा by ss_sameer
शाळेत धडा होता.
In reply to शिवाजी महाराष्ट्रात राजे by पगला गजोधर
सत्यवचन
In reply to शाळेत धडा होता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
...
In reply to सत्यवचन by ss_sameer
वादातीत म्हणजे काय ?
In reply to इतिहास किती खरा किती खोटा by ss_sameer
आ.ह. साळुंखेंचे काय मत असेल ?
...
कै च्या कै?
In reply to ... by manguu@mail.com
बाय द वे गाणं मस्तय सालं.
जुना सिनेमा
भन्साळी डिवचत नसून तो
घ्या करणीसेनेला सुचलं शहाणपण....
डॉ आपण आधीच सुचवलेला उपचार
In reply to घ्या करणीसेनेला सुचलं शहाणपण.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खालील घटनाक्रम पहा.
In reply to घ्या करणीसेनेला सुचलं शहाणपण.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आंदोलनाचा हेतू काय होता व
In reply to खालील घटनाक्रम पहा. by श्रीगुरुजी
निश्चितच. मुलांच्या बसवर
In reply to आंदोलनाचा हेतू काय होता व by पगला गजोधर
भाजपाने
In reply to निश्चितच. मुलांच्या बसवर by श्रीगुरुजी
भाजपने नोटाबन्दी केली आणि
In reply to भाजपाने by सुखीमाणूस
भाजपने नोटाबन्दी केली आणि कदाचित पैसे देऊन मत मिळवण्याचा मार्ग बंद झाला. काही हरकत नाही, जातीपातीच्या राजकारणाने मते मिळवू. कुठूनतरी सत्तेवर येऊ. देश जाऊदे खड्डय़ात. समाज राहुदे जातीत विभागलेला. आणि किती सोप्प आहे परत भाजपा सत्तेवर आहे म्हणुन जातीयता वाढली आहे म्हणत शिमगा करायला सगळे मोकळे.संपूर्ण सहमतपण मला जाम आवडली आहे ही राजकीय खेळी. भाजपला पण चांगला धडा आहे. तुमच हिन्दु मुस्लिम राजकारण तर आम्ही हिन्दु धर्म खिळखिळा करून टाकतो. परत मान वर काढता आली नाही पाहिजे.काँग्रेसने देशहिताला तिलांजली देऊन मुस्लिम अनुनय केला नसता तर भाजपला मुस्लिम अनुययाविरूद्ध आंदोलन करण्याची वेळच आली नसती. हाज यात्रा अनुदान, वेगळे व्यक्तिगत कायदे इ. काँग्रेसची देणगी. मोदींनी हाज अनुदान बंद केले तर लगेच काँग्रेसवाले गळा काढायला सुरूवात करतात. तोंडी तलाक रद्द करायला काँग्रेसचा अजूनही विरोध आहे. "तोंडी तलाक हा कुराणचा आदेश आहे व सरकारने त्यात ढवळाढवळ करू नये" असे कालच "पुरोगामी" पवारांनी सुद्धा जाहीरपणे सांगितले आहे. मुल्लामौलवींची दाढी कुरवाळूनच आपण सत्तेत येऊ शकतो या भ्रमात खांग्रेसी अजूनही आहेत.नोटाबन्दी केली आणि कदाचित
In reply to भाजपाने by सुखीमाणूस
एकदम पक्कं
In reply to नोटाबन्दी केली आणि कदाचित by पगला गजोधर
आमच ठाम मत आहे भाजपला पैसे
In reply to एकदम पक्कं by सुखीमाणूस
....
In reply to एकदम पक्कं by सुखीमाणूस
तुम्ही मुळात काँग्रेसवालेच
In reply to .... by manguu@mail.com
छान
In reply to तुम्ही मुळात काँग्रेसवालेच by सुबोध खरे
नव्या नोटा तुम्हाला कोणी
In reply to छान by manguu@mail.com
तळेगाव दाभाडे इथे नगर
In reply to तुम्ही मुळात काँग्रेसवालेच by सुबोध खरे
पंचक्रोशीत झालेल्या ४
In reply to तळेगाव दाभाडे इथे नगर by पुंबा
सोसायटीत राहणारे मध्यमवर्गिय
In reply to तळेगाव दाभाडे इथे नगर by पुंबा
कोंण ओ ?
In reply to तळेगाव दाभाडे इथे नगर by पुंबा
ते पैसे कोण अन कुठे वाटतात
In reply to कोंण ओ ? by कपिलमुनी
...
In reply to खालील घटनाक्रम पहा. by श्रीगुरुजी
लोकल जातीय संघटना
In reply to ... by manguu@mail.com
छान!
In reply to खालील घटनाक्रम पहा. by श्रीगुरुजी
(No subject)
हि माझी मते नाहीत, केवळ
In reply to (No subject) by माहितगार
....
....
In reply to .... by manguu@mail.com
....
In reply to .... by manguu@mail.com