Skip to main content

नवखेच सखे फसतात इथे

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/01/2018 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
वृत्त - तोटक अदमास पुन्हा चुकतात इथे वनवास नवे मिळतात इथे अवघे जगणे जगणे बनते मिथके सगळी जुळतात इथे रुसणे स्मरता हसणे स्फुरते अलवार सुखे कळतात इथे वळणे कळता सरती वलये नवखेच सखे फसतात इथे हलकेच पुन्हा जवळीक नवी सुमने कवळी फुलतात इथे विरहास नवे सहवास हवे हळवे क्षण ते स्मरतात इथे भुतकाळ जरा विसरू म्हणता इतिहास नवे रचतात इथे © विशाल वि. कुलकर्णी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 8035
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

संपादक मंडळी, काही मेजर चुका झाल्यात. अक्षरगणवृत्तात सुट घेता येत नाही. ती काही ठिकाणी घेतली गेलीय. तेव्हा कृपया मुळ कवितेच्या जागी खालील कविता टाकणार का? वृत्त - तोटक अदमास पुन्हा चुकतात इथे वनवास नवे मिळतात इथे अवघे जगणे जगणे बनते मिथके सगळी जुळतात इथे रुसणे स्मरता हसणे स्फुरते अलवार सुखे कळतात इथे वळणे कळता सरती वलये नवखेच सखे फसतात इथे हलकेच पुन्हा जवळीक नवी सुमने कवळी फुलतात इथे विरहास नवे सहवास हवे हळवे क्षण ते स्मरतात इथे भुतकाळ जरा विसरू म्हणता इतिहास नवे रचतात इथे © विशाल वि. कुलकर्णी धन्यवाद !

कुठल्या गिरणीचे पीठ खातोय ते समजलं पाहिजे!!! कविता गब्बर सिंग नाखु ता क कविता आवडली आहे

वृत्तात ठसल्यामुळे अधिकच आवडली.

दम है| दम है इसमे...

बाकी, मला कवितेतलं फारसं कळंत नाही पण कविता (की गझल) वृत्तात बसवायची खटपट प्रशंसनीय आहे. मुक्तछंदांच्या भाऊगर्दीत वृत्तमार्गी वृत्ती विशेषत्वाने उठून दिसते. -गा.पै.

विशाल भाउ जोमात बाकी सारे कोमात पैजारबुवा,

मुद्दाम लॉग इन करून अभिप्राय द्यावा असं वाटणारी. हार्दिक अभिनंदन!

वळणे कळता सरती वलये नवखेच सखे फसतात इथे
क्या बात !! व्वाह.. अक्षरशः आठ शब्दांत आयुष्याचं गमक सांगितलंय..