शिवाजी महाराजांची "लुटी" मागची भुमिका.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संवर्धनासाठी,स्वराज्य बळकट बनविण्यासाठी बर्याच वेळा शत्रूच्या प्रदेशामध्ये लुटी केल्या.या लुटी त्यांच्या वैयक्तिक चैनीसाठी,विलासामध्ये जिवन घालविण्यासाठी नव्हत्या, त्या फक्त स्वराज्य बळकट करण्यासाठीच होत्या.या लूटीच्यावेळीहि कांही नियम,पथ्ये कटाक्षाने पाळली जात असत.कोणाच्याहि मनाला येईल,मर्जी होईल तशी लुट करण्याची कोणालाहि परवानगी नव्हती.याबाबतीत महाराज फार दक्ष असत.लूटींच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे नां याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे.या नियमांचे उल्लंघन करणार्याला ते कडक शिक्षा फर्मावित असत.ही सर्व लुट राज्याच्या खजिन्यातच जमा व्हावी असा प्रघात त्यांनी पाडला.मिळालेली लूट सैनिकांनी परस्पर घरी न्यावी असे कधीच चालु दिले नाही.कोणत्याहि लुटीमध्ये महाराजांनी धार्मीक स्थळे अन स्त्रीधन याना कधीही हात लावला नाही. सुरतेच्या लुटीच्या वेळची डच स्त्रीची हकिकत तर त्यांच्या उच्च नितिमत्तेचे उत्कृष्ठ उदाहरण आहे आणि विशेष म्हणजे ही हकिकत डच कागदपत्रांमधे सापडते.सुरत शहरामधील लुटीच्यावेळी सुरत शहरामध्ये एक विधवा स्त्री रहात होती.तिचा पति व्यापारी होता,पण तो मरण पावला होता.त्या विधवा स्त्रीजवळ खुप संपत्ती होती.पण महाराजांनी तिला कोणिही त्रास देऊ नये,तिच्या संपत्तीला हातहि लाऊ नये अशी सक्त ताकीत सर्व सैन्याला दिली होती.... महाराजांच्या लुटीमध्ये अशी नैतिकता पाळली जात असे.
महाराजांची लुटीचीहि एक पद्धत होती.प्रथम त्या पेठेमधील व्यापारांकडे खंडणी मागितली जात असे.जर त्या शहरामधील व्यापार्यांनी ठरलेली खंडणी दिली तर महाराज लुट न करता खंडणी घेउन निघुन जायचे.जिथे खंडणीस विरोध होई तेथे मनमुराद लुट करण्यात येत असे. सुरतच्या लुटीअगोदर महाराजांनी तेथील व्यापार्यांकडे खंडणी मागितली होती,पण ती न दिल्यामुळे मग सुरतेची बेसुरत झाली. लुटीमध्ये सोनेनाणे, जवाहिर,पैसा,शस्त्रास्ते,दारूगोळा यांचा समावेश असे.
शिवाजी महाराजांच्या कालापुर्वि मुसलमानांनी आणि सागरी मार्गाने अक्रमण करणार्या सिद्दी व पोर्तुगिजांच्या अक्रमणामध्ये पहिली धाड पडत असे इथल्या स्रियांच्या अब्रुवर.(शिवाजी महाराजांच्या सैन्याने असे कधीच केले नाही हे खाफीखान या मुसलमान इतिहासकारानेहि लिहीले आहे.)पुर्वि गरिब-श्रीमंत यांची भयंकर लुट करावी,घरादारांची जाळोपाळ करावी.शेतामधील ऊभी पिके कापुन न्यावीत असे चालायचे .गुरेढोरे जनावरे हेसुद्धा यांच्या लुटीमधुन सुटत नसे.पुरुषांना गुलाम करुन घेउन जावे आणि स्त्रियांना पळवुन नेणे याला तर राज्यकर्त्यांचीच मान्यता असे.राज्यकर्तेच सुंदर खानदानी स्त्रियांना आपल्या जनानखान्यात डांबायचे.सुंदर असणे हा त्याकाळी स्त्रियांना शाप ठरला होता.आणि इथल्या हिंदूंनी हात चोळत चडफडत गप्प बसावे हा त्यावेळचा प्रघात.यामुळे मुसलमान आणि इतर अक्रमकांबद्दल इथल्या हिंदूंमध्ये दहशत,भिती निर्माण झाली होती.पण शिवरायांनी ही परिस्थिती पुर्ण बदलली.शत्रुच्या प्रदेशात खुप आंतमध्ये घुसुन(ऊदा.सुरत.बुह्राणपुर,कारंजा,हुबळी)व्यापरी पेठा व शहरे लुटली,आणि ही सर्व लुट सरकारी खजिन्यातच जमा करण्याचा नविन शिरस्ता महाराजांनी घालुन दिला....स्त्रियांच्या नखालाहि धक्का न लावता, कोणत्याहि धर्माच्या धार्मिक स्थळांना हातहि न लावता,गरिब दिन दुबळ्याना न पिडता!!!!शत्रुच्या प्रदेशात खोलवर हल्ले केल्यामुळे व शहरे लुटुन रिकामी केल्यामुळे शिवरायांनी मोगल,अदिलशहा,कुतुबशहा.सिद्दि,पोर्तुगिज़्,इंग्रज यांच्या मनात धाक,दरारा निर्माण केला.मराठ्यांकडुन अशा प्रकारच्या धडाकेबाज मोहिमा मुसलमान सुलतानाना अपेक्षित नव्हत्या.महाराजांनी सुरत,बुह्राणपुर,हुबळी,कारंजा अशा खुप आतल्या शहरांवर छापे घतल्यमुळे शत्रुच्या मनात सतत भिती व काळजी निर्मान करुन ठेवली व यासत्ताधिशांची ईज्जत धुळिला मिळविली.महाराजांनी सुरत लुटली हे जेव्हा इराणच्या बादशहाला समजले तेव्हा त्याने यागोष्टीबद्दल खरमरीत पत्र औरंगजेबाला पाठविले. यागोष्टीने औरंगजेब किती शरमला असेल, किती संतापला असेल.....आपण कल्पनाच करा !!!!
अशा प्रकारे लुट करण्यामागचे महाराजांचा उद्देश स्वच्छ आहे.एव्हढी लुट करुन महाराजांनी स्वतःसाठी एखाधा तरी संगमरवराचा महाल बांधलेला दिसत नाही.नाच-गाण्यासाठी रंगमहाल बांधलेले दिसत नाहित.हा सर्व पैसा महाराजांनी चैनीसाठी अजिबात वापरला नाही. महाराज भोगी नव्हते---ते तर योगी होते.....श्रीमंत योगी ! नविन किल्ले बांधले,पुर्विचे किल्ले दुरुस्त करुन भक्कम केले.शस्त्रास्ते,दारुगोळा यांची निर्मिती केली,साठवण केली.सैन्यदलामध्ये पायदळ,घोडदळामध्ये प्रचंड वाढ केली.स्वराज्य स्थापनेच्यावेळी महाराजांचे सैन्य होते फक् १५००/२००० अन म्रुत्युसमयी घोडदळ अन पायदळ मिळुन सैन्य होते जवळ जवळ एक लाख !सैन्याच्या सर्व अधिकार्यांना अन सैनिकांना पगार प्रत्येक मराठी महिन्याच्या पहिल्या तिथीला मिळालाच पाहिजे असा दंडकच होता. आरमार तर नुतनच निर्माण केले.आरमारी युद्धनौका बांधल्या सागरी किल्ले बांधले,होते ते दुरुस्त करुन बळकट केले आणि सागरावर आपली सत्ता निर्माण केली.सिंधुदुर्ग किल्ला पुर्ण नविन बांधला.काय होते सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जागी पुर्वि?कुरटे या नांवाचे ते तर एक ओसड बेट होते .सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया शिश्यामध्ये घातला आहे,चुन्यामध्ये नाही.राज्य राखयचे असेल्,राज्य वाढवायचे असेल तर नविन किल्ले बांधले पाहिजेत्,आहेत ते किल्ले दुरुस्त केले पाहिजेत......जावळीच्या खोर्यात भोरप्याचा डोंगर होता,त्यावर किल्ला बांधला...प्रतापगड ! कुठुन आणायचा पैसा यासाठी? राज्यातील महसुलाचे उत्पन्न यासगळ्यासाठी पुरे पडणे शक्यच नव्हते.लुटीमधुन मिळालेले धन अशा चांगल्या कामासाठी खर्च व्हायचे.महाराजांवर सतत कोणाच्या तरी स्वार्या सतत सुरुच होत्या.वर्षामधील सहा/आठ महिने युद्धमान रहाणे सोपे नसते.३५ वर्ष सतत लढाया करुनहि महाराजांना पैशाची,सैन्याच्या पगाराची,शस्त्रांची,दारुगोळ्याची कमतरता कधीच भासली नाही.महाराज्यांच्या हिंदवी स्वराज्याचा कोष सदैव तुडुंब भरलेला होता याचे रहस्य हेच आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
सुभाष खडकबाण.
वाचने
4938
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लेख !!!
राजगड
In reply to छान लेख !!! by शेन्डेफळ
जावळीच्या खोर्यात प्रतापगडच बांधला
In reply to छान लेख !!! by शेन्डेफळ
चांगला
फालतू लेख!!!!!
+१
In reply to फालतू लेख!!!!! by पिवळा डांबिस
लुट
In reply to +१ by विकास
धन्यवाद
In reply to लुट by सुभाष
माफ करा...आपल्याला महाराज समजलेच नाहीत.
In reply to फालतू लेख!!!!! by पिवळा डांबिस
शिवाजी महाराजांबद्द्ल कोणताही वाद टाळा
+१
In reply to शिवाजी महाराजांबद्द्ल कोणताही वाद टाळा by पाषाणभेद
+१०००१%सहमत
In reply to +१ by दशानन
फक्त याच गुणांचा अभ्यास व्हावा असा आपला अट्टाहास कां?
In reply to शिवाजी महाराजांबद्द्ल कोणताही वाद टाळा by पाषाणभेद
तेच म्हणतो
ले़ख आवडला
http://www.orkut.co.in/Main#C