पानिपतचे खलनायक - दोन नवीन चित्रे
चित्र १ शुजा-उद्दोला
चित्र २ अहमदशाह अब्दाली
पानिपतच्या लढाईला १४ जानेवारी रोजी २५७ वर्षे पूर्ण होतील. या प्रसंगाच्या निमित्ताने पानिपतचा विजेता अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या बाजूने लढलेला शुजाउद्दोला या दोघांची नवीन चित्रे मला एका संग्रहात सापडली. ही चित्रे आणि त्यामागची कथा अत्यंत रोचक अशी आहे. पानिपत लढाईच्या निमित्ताने ही खास इतिहासाची सफर.
पानिपतचे खलनायक कोण असं शोधलं की दोन नावे लगेच आठवतात - लढाईचा विजेता अहमदशहा अब्दाली आणि नजीबखान रोहिला हा त्याचा हस्तक. अहमदशाह अब्दालीने भारतावर एकूण सात वेळ स्वाऱ्या केल्या. त्यामुळे त्याचा काही हिंदुस्थानी संस्थानिकांशी साहजिकच घनिष्ठ संबंध आला. अवधचा नबाब शुजाउद्दोला हा त्यापैकीच एक. मराठ्यांच्या विरुद्ध पानिपतच्या लढाईंत शुजा अब्दालीच्या बाजूने लढला.
शुजाची मराठ्यांशी लढण्याची ईच्छा नव्हती, पण नजीबखानाच्या रचलेल्या कारस्थानामुळे त्याचा नाईलाज झाला. लढाई संपल्यानंतर जी माणसें जिवंत परत आली त्यातली बरीचशी १४ जानेवारीच्या रात्री आणि त्यानंतर शुजाच्या छावणीत घुसली. त्याने इतर अफगाण सारदारांप्रमाणे कैद्यांची कत्तल करून मुंडक्यांचे मिनार रचले नाहीत. शुजाने लाखो रुपये दंड अब्दालीला भरून शरण आलेले मराठे धर्मार्थ सोडून दिले. शुजाच्या पदरी असलेल्या गोसावी सरदारांनीच मग काही मराठ्यांच्या मदतीने भाऊसाहेब आणि विश्वासराव यांचे मृतदेह ओळखून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.या शुजाच्या पदरी कर्नल जेंतील नावाचा फ्रेंच सैनिक त्याचा खास लष्करी सल्लागार म्हणून फैजाबाद इथे राहिला होता. तो १७७८ साली फ्रान्सला परत गेला. जाताना त्याने भारतात जमवलेली सर्व हस्तलिखिते, चित्रे आपल्याबरोबर नेली.
हा संग्रह सध्या फ्रान्समध्ये आहे. त्यातच अहमदशहा अब्दालीचे हे चित्र मला आढळले. शुजा आणि अब्दालीचे संबंध लक्षात घेता शुजाकडे अब्दालीचे चित्र असणे अगदी स्वाभाविक आहे असे माझे मत आहे.
पहिल्या चित्रात अहमदशहाचे नाव फ्रेंच भाषेत 'abdali amadcha' असे उजव्या कोपऱ्यात खाली लिहिलेले आहे. अहमदशहाने तुर्की पद्धतीचा सोन्याचा रत्नजडित मुकुट घातला आहे आणि हातात रत्नजडित सोन्याची कुऱ्हाड आहे. त्याच्या चेहेर्याभोवती राजघराण्यातील व्यक्तीसाठी काढले जाणारे सोन्याचे वलय आहे. चित्रात अहमदशहाच्या नाकावर आपल्याला एक जखम दिसते. शीख ग्रंथांच्या मतानुसार अहमदशहाच्या नाकावर हरमंदिर साहेब इथे मंदिर तोडताना एक विटेचा तुकडा लागून हि जखम झाली आहे. हि जखम पुढे वाढत जाऊन हालअपेष्टा भोगल्यावर अहमदशहाचा दीर्घ आजारानंतर १७७२ साली मृत्यू झाला. माझ्या मते ही जखम म्युकोसल लेशमॅनिया या कुष्ठरोगासारख्या आजाराची असू शकते. परजीवी जंतूंमुळे होणाऱ्या या आजाराची लक्षणे अहमदशहाच्या अवस्थेशी जुळतात.
दुसऱ्या चित्रात शुजाउद्दोला आणि कर्नल जेंतील हे आपल्याला एका महालाच्या गच्चीवर दिसतात. शुजाच्या हातात एक लांब पल्ल्याची बंदूक असून तो त्यातुन एक गोळी डागतो आहे असं चित्रकाराने चित्रात दाखवले आहे. हे चित्र १७६५ च्या सुमारास फैजाबाद इथे कंपनी शैलीत काढलेले आहे. चित्रावर आपल्याला पाश्चात्त्य प्रभाव दिसतो. चित्रातील रंगसंगती आणि ऐतिहासिक महत्वाच्या व्यक्ती यामुळे हे चित्र महत्वाचे आहे.
या दोन्ही चित्रांविषयी मी पुढील संशोधन एका शोधनिबंधात प्रकाशित करेन.
ही पोस्ट इतर जागी अथवा सोशल मीडियावर शेअर करण्यास माझी हरकत नाही. ही चित्रे पोस्टमधून काढून इतरत्र (जसे विकी) वापरायची असतील तर त्यासाठी 'नॅशनल लायब्ररी, फ्रान्स' यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. या लेखापुरती ती परवानगी मी घेतली आहे. आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ही चित्रे प्रकाशित झाली आहेत.
चित्र २ अहमदशाह अब्दाली
पानिपतच्या लढाईला १४ जानेवारी रोजी २५७ वर्षे पूर्ण होतील. या प्रसंगाच्या निमित्ताने पानिपतचा विजेता अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या बाजूने लढलेला शुजाउद्दोला या दोघांची नवीन चित्रे मला एका संग्रहात सापडली. ही चित्रे आणि त्यामागची कथा अत्यंत रोचक अशी आहे. पानिपत लढाईच्या निमित्ताने ही खास इतिहासाची सफर.
पानिपतचे खलनायक कोण असं शोधलं की दोन नावे लगेच आठवतात - लढाईचा विजेता अहमदशहा अब्दाली आणि नजीबखान रोहिला हा त्याचा हस्तक. अहमदशाह अब्दालीने भारतावर एकूण सात वेळ स्वाऱ्या केल्या. त्यामुळे त्याचा काही हिंदुस्थानी संस्थानिकांशी साहजिकच घनिष्ठ संबंध आला. अवधचा नबाब शुजाउद्दोला हा त्यापैकीच एक. मराठ्यांच्या विरुद्ध पानिपतच्या लढाईंत शुजा अब्दालीच्या बाजूने लढला.
शुजाची मराठ्यांशी लढण्याची ईच्छा नव्हती, पण नजीबखानाच्या रचलेल्या कारस्थानामुळे त्याचा नाईलाज झाला. लढाई संपल्यानंतर जी माणसें जिवंत परत आली त्यातली बरीचशी १४ जानेवारीच्या रात्री आणि त्यानंतर शुजाच्या छावणीत घुसली. त्याने इतर अफगाण सारदारांप्रमाणे कैद्यांची कत्तल करून मुंडक्यांचे मिनार रचले नाहीत. शुजाने लाखो रुपये दंड अब्दालीला भरून शरण आलेले मराठे धर्मार्थ सोडून दिले. शुजाच्या पदरी असलेल्या गोसावी सरदारांनीच मग काही मराठ्यांच्या मदतीने भाऊसाहेब आणि विश्वासराव यांचे मृतदेह ओळखून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.या शुजाच्या पदरी कर्नल जेंतील नावाचा फ्रेंच सैनिक त्याचा खास लष्करी सल्लागार म्हणून फैजाबाद इथे राहिला होता. तो १७७८ साली फ्रान्सला परत गेला. जाताना त्याने भारतात जमवलेली सर्व हस्तलिखिते, चित्रे आपल्याबरोबर नेली.
हा संग्रह सध्या फ्रान्समध्ये आहे. त्यातच अहमदशहा अब्दालीचे हे चित्र मला आढळले. शुजा आणि अब्दालीचे संबंध लक्षात घेता शुजाकडे अब्दालीचे चित्र असणे अगदी स्वाभाविक आहे असे माझे मत आहे.
पहिल्या चित्रात अहमदशहाचे नाव फ्रेंच भाषेत 'abdali amadcha' असे उजव्या कोपऱ्यात खाली लिहिलेले आहे. अहमदशहाने तुर्की पद्धतीचा सोन्याचा रत्नजडित मुकुट घातला आहे आणि हातात रत्नजडित सोन्याची कुऱ्हाड आहे. त्याच्या चेहेर्याभोवती राजघराण्यातील व्यक्तीसाठी काढले जाणारे सोन्याचे वलय आहे. चित्रात अहमदशहाच्या नाकावर आपल्याला एक जखम दिसते. शीख ग्रंथांच्या मतानुसार अहमदशहाच्या नाकावर हरमंदिर साहेब इथे मंदिर तोडताना एक विटेचा तुकडा लागून हि जखम झाली आहे. हि जखम पुढे वाढत जाऊन हालअपेष्टा भोगल्यावर अहमदशहाचा दीर्घ आजारानंतर १७७२ साली मृत्यू झाला. माझ्या मते ही जखम म्युकोसल लेशमॅनिया या कुष्ठरोगासारख्या आजाराची असू शकते. परजीवी जंतूंमुळे होणाऱ्या या आजाराची लक्षणे अहमदशहाच्या अवस्थेशी जुळतात.
दुसऱ्या चित्रात शुजाउद्दोला आणि कर्नल जेंतील हे आपल्याला एका महालाच्या गच्चीवर दिसतात. शुजाच्या हातात एक लांब पल्ल्याची बंदूक असून तो त्यातुन एक गोळी डागतो आहे असं चित्रकाराने चित्रात दाखवले आहे. हे चित्र १७६५ च्या सुमारास फैजाबाद इथे कंपनी शैलीत काढलेले आहे. चित्रावर आपल्याला पाश्चात्त्य प्रभाव दिसतो. चित्रातील रंगसंगती आणि ऐतिहासिक महत्वाच्या व्यक्ती यामुळे हे चित्र महत्वाचे आहे.
या दोन्ही चित्रांविषयी मी पुढील संशोधन एका शोधनिबंधात प्रकाशित करेन.
ही पोस्ट इतर जागी अथवा सोशल मीडियावर शेअर करण्यास माझी हरकत नाही. ही चित्रे पोस्टमधून काढून इतरत्र (जसे विकी) वापरायची असतील तर त्यासाठी 'नॅशनल लायब्ररी, फ्रान्स' यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. या लेखापुरती ती परवानगी मी घेतली आहे. आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ही चित्रे प्रकाशित झाली आहेत. वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा छान
Axe-pistol (1930.73.5)
मनूची चा अल्बम आहे माझ्याकडे.
वरचा लेख आणि या दुव्याबद्द्ल
छान
छान लेख, अजून वाचायला आवडेल..
लेख आवडला....
धन्यवाद!
पैसाताई, ज्ञानेश्वरीवरच्या
छान आहेत चित्रे..
हा लेख आजच्या मटा मध्ये पण आहे.
होय. मीच दिला आहे.
दुवा मिळेल काय?
सॉरी गा पै
हाच लेख आहे?
हाच लेख आहे.
http://epaper.timesgroup.com
धन्यवाद.
छान लेख आणि चित्रे.
इतिहास संबंधित हे काही मागे
धन्यवाद !
नवीन चित्रे प्रकाशात
मनो यांचे आभार
उत्तम माहिती. धन्यवाद !
उत्तम माहीती.
छान माहिती
अभ्यासपूर्ण!
प्रोत्साहन दिल्याबद्दल
आश्र्चर्य म्हणजे यातल्या
प्रतिसाद चुकून इथे पडला.
चित्रे एक मूळ समकालीन
म्हणजे मूळ एकच चित्र असावे का
असं ठामपणे सांगता येत नाही.
लेख, चित्रे अतिशय माहितीपूर्ण