Skip to main content

न्याय झाला, पण...!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी बुधवार, 29/11/2017 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
न्याय झाला, पण..! मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो करोडो जनसंख्येचे महामोर्चे निघाले. दोषींना फासावर लटकविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली. जणआक्रोशाचा प्रचंड दबाव असल्याने सरकारलाही हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा लागला. विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी सबळ पुरवा नसल्याने दोषींना फासावर लटकविण्याची न्यायालयीन लढाई तशी सोपी नव्हती. परंतु, ऍड. उज्वल निकम यांनी परिस्थतीतीजन्य पुराव्याच्या आधारावर मजबूतपणे युक्तिवाद केला. परिणामी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा अहमदनगर न्यायालयाने सुनावली आहे. यामुळे कोपर्डीच्या पीडितेला न्याय मिळाला असं म्हणता येईल. परंतु, हा न्याय अजून अपूर्ण आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावर दोषी अजूनही उच्च न्यायालयात अपील करू शकतात. त्यानंतरही शिक्षा प्रलंबित ठेवण्यासाठी अनेक उपाय दोषींकडे आहेत. त्यामुळे, कोपर्डी घटनेतील आरोपी ज्या दिवशी फासावर लटकविल्या जातील तेंव्हाच पीडितेला पूर्णतः न्याय मिळेल. 'मनुष्यप्राणी' असा शब्द उच्चारून माणूस देखील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्युक्त केल्या जाते. मात्र मनुष्य हा प्राणी विचारशील, समाजशील असल्याने त्याच्याकडून माणूसपण जपले जाण्याची अपेक्षा केल्या गेली आहे. नैतिकता सभ्यता सद्सदविवेकबुद्धी असे सद्गुण जपत माणूस रानटी अवस्थेतून आजच्या संगणकयुगापर्यंत वाटचाल करत असल्याचे म्हटले जाते, शिवाय माणसाने आज वैचारिक सुसंस्कृतपणाचा एक नवा टप्पा गाठल्याच्या गप्पाही मारल्या जातात. परंतु माणसाचा मूळ रानटी स्वभाव आजही कायम असून त्याच्या स्वभावातील रानटीपणा विकृत होत असल्याचे अवतीभवती सातत्याने घडणाऱ्या घटनांवरून जाणवत राहते. कोपर्डीच्या घटनेत जो अमानुषपणा या नराधमांनी केला तो प्राण्यातील रानटीपणालाही लाजवणारा होता. एखाद्या बलात्काराच्या घटनेचे वर्णन करू नये. पण या प्रकारातील विक्षिप्तपणा अत्यंत घृणास्पद होता. नराधमाने मुलीचे हात-पाय तोडले. ओठांचा चावून चोथा केला होता. केस उपटले होते. तिला प्रचंड वेदना देऊन एका निष्पाप अल्पवयीन मुलीची नृशंस हत्या केली. नरभक्षक प्राण्याला जसं गोळ्या घालून ठार मारल्या जातं तसेच या माणसातील जनावरांना तात्कळ गोळ्या घालून यमसदनी पाठविल्या जावं, अशा उद्विग्न प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या. परंतु आपल्या न्यायव्यवस्थेचं तत्व जनावरणांनाही मारण्याची परवनगी देत नसल्याने दोषींच्या विरोधात ट्रायल सुरु झाली. आणि आज अखेर या प्रकरणात न्याय आला. न्यायलायाच्या निकालाने समाजमन निश्चितच सुखावले आहे. कोपर्डी पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक केल्या जातेय. दोषींना फासावर लटकविण्याचा निर्णय देऊन न्यायालयाने फक्त पीडितेला न्याय दिला नाही तर या घटनेनंतर आक्रोश करणाऱ्या संपूर्ण महराष्ट्रातील जनतेच्या दुःखावर मलमपट्टी केली आहे. मात्र जखम अजून पूर्ण बरी झालेली नाही. दोषींना फासावर लटकविण्यासाठी अजून संघर्ष करावा लागणार आहे. शिवाय यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठीच्या उपयांवरही मंथन करावे लागणार आहे. कोपर्डीसारख्या अमानवीय बलत्कारच्या घटनेत 'न्याय झाला' एवढाच शब्द वापरून हा विषय संपणार नाही तर अनेक गंभीर मुद्दे यासोबत जुडलेले आहेत. शिक्षेची सुनावणी आणि अंलबजावणीत लागणाऱ्या मोठ्या कालावधीमुळे शिक्षेविषयी जनमानसातील धाक आणि विश्वासर्हतेचा प्रश्न जसा समोर येतो तसाच महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्नही अजेंड्यावर घ्यावा लागेल. कोपर्डीत एका निष्पाप मुलीचा बळी गेल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात जणक्षोभ उसळला होता. कोपर्डीच्या पीडितेला न्याय देण्याची मागणी ज्यावेळी करण्यात येत होती. त्याच्या मागे अशी घटना पुन्हा घडू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केल्या जात होती . आज कोपर्डीच्या प्रकरणात न्याय झाला, न्यायालयाने त्यांचे काम चोख बजावले. थोड्या उशिराने का होईना दोषी फासावर लटकविल्या जातील, आणि पीडितेला पूर्ण न्याय मिळेल. मात्र लोकांची अपेक्षा अजून पूर्ण झालेली नाही. कोपर्डी सारख्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. कोपर्डी घटनेच्या निकालाने अशा विकृत प्रवृत्तीवर जरब बसेल, असं ठामपणे म्हणता येणार नाही. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशात कायदे बदलले जागरूकता झाली. तरी कोपर्डीची घटना घडली. यानंतरही बलात्काराचे गुन्हे गुन्हे घडतच आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कायद्यासोबत मानसिकता ही बदलावी लागणार आहे. समाजातील पुरुषसत्ताक व्यवस्था आणि स्त्री विषयीचा भोगवादी दृष्टिकोन हेचं अशा विकृतींना जन्म देते. बलात्काराच्या विकृत विचारांचा जन्म मेंदूतून होतो, त्यामुळे उपचारही मेंदूवरच करावे लागतील. विकृत आणि मुजोर मानसिकेतला भयभीत करून अशा कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी कोठारातील कोठार शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र न्यायप्रक्रियेतील विलंब या उद्देशाला काही प्रमाणत हरताळ फसतो.सत्र न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा दिल्यापासून उच्च ते सर्वोच्च न्यायालय आणि नंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज या प्रवासात दोषीला सवलती तर मिळतात शिवाय शिक्षा अंलबजावणीत उशीर होतो. अर्थात, प्रोसिजर आवश्यक आहेच परंतु या प्रक्रयेलाही काही कालमर्यादा असावी. सत्र न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालयात अपील, नंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशी सारखी शिक्षा कायम ठेवल्यानंतर तरी अंलबजावणीत विलंब होऊ नये. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणातच फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. संपूर्ण गुन्हेगारी मानसिकतेवर जरब बसावा यासाठी हा निर्णय घेतला जातो. त्यामुळे किमान हा हेतू सफल होण्यासाठी तरी अशा खटल्यांमध्ये कालमर्यादा ठरवनियात यावी. आज कोपर्डी घटनेतील निकाल लागला आहे. दोषींना फाशीची शिक्षा देऊन न्यायालयाने मुजोर प्रवृत्तीला जरब बसविण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले, यात शंका नाही. परंतु कोपर्डीच्या दोषींना फासावर लटकावयला १२ वर्ष लागणार असतील तर कायदाचा धाक कसा निर्माण होईल. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशभारतील कायदे बदलण्यात आले होते, या धर्तीवर फाशीच्या शिक्षेअमलबजावणी संदर्भात कालमर्यदा निर्धारित करून त्यानुसार कोपर्डीतील आरोपीना फासावर लटकविल्या गेले तर कोपर्डीच्या पीडितेला खरा न्याय मिळेल..!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26127
प्रतिक्रिया 144

प्रतिक्रिया

In reply to by विशुमित

खिक्क.. नक्की एक काय ती भूमिका ठरवा की.. स्वतःला सुज्ञ वगैरे पदव्या (स्वतःच) बहाल करून घेताय आणि याच धाग्यात दुसरीकडे हुकुमशाहीची भाषा वापरून धमक्या पण देताय. रोज छापा काटा करून प्रतिसाद लिहीत असाल तर तसे सांगा, तुमचे बुरखे टरकवण्यात वेळ घालवणार नाही. दांभीकपणाचे धरण भरले नाही का अजून..?

In reply to by मोदक

ब्राह्मणांना विरोध, कारण ब्राह्मण जातीयवादी. अन्य साऱ्या जाती मिळून मिसळून एकोप्याने राहतात. हे ब्राह्मणच काड्या घालायला येतात. त्यांना ठेचायलाच हवं! (स्वगत: ब्रिगेडचं कन्टेन्ट डेव्हलपमेंट चं काम मिळतं का बघायला हवं!)

In reply to by mayu4u

सगळे नाही तर स्वतःला सगळ्यापेक्षा बाय डिफॉल्ट हुशार समजणारे जातीवादी लोकांचा विरोध आहे. बाकी डबल सीट बसून लोकांना ब्रिगेडचे शिक्के मारत फिरण्यापेक्षा काहीतरी पोटापाण्याचे बघा. शिक्षणाचा अधिकार मिळाल्यापासून लोक झपाट्याने पुढे निघून चालले आहेत. आहात कुठे तुम्ही ???

In reply to by विशुमित

त्याची तुम्हाला चिंता नको. आम्ही व्यवस्थित कमावतो, आणि घेतलेली कर्जं फेडतो सुद्धा. कर्जमाफी हवी म्हणून सम्पाची नाटकं करत नाही. :D

In reply to by मोदक

खाऱ्या पाण्याच्या धरणाची राहून राहून आठवण येतीय वाटते. मिटक्या मारत डुबक्या मारत बसा.. तुम्ही काय बुरखे फडताय, तुमच्या सायकलींची चेन कधीच पडली आहे. ती आधी बसवा मग पायडल मारा.

In reply to by विशुमित

खिक्क.. बिग्रेडी बुरखा फाटला उघडा पडला म्हणून त्रास झाला काय..? मूळ मुद्दा काय आहे ते बघा.. सूज्ञ बिज्ञ असल्याचा आव आणून चर्चा करताना आपण याच धाग्यात स्वतः हिटलरच्या थाटात न्यायनिवाडा करून शिक्षा सुनावली आहे तो दांभीकपणा बघा मग सायकल आणि चेनची काळजी करा.

In reply to by मराठी कथालेखक

इथेही अनेकजण 'साक्षिदार फिरलेत, त्याला काय करणार ?' असाच सूर लावत आहेत. >> कोणत्या अनेक प्रतिसादात दिसला हा सुर?

In reply to by एमी

नितीन आगे प्रकरणात न्याय मिळाला पाहिजेच, पण साक्ष फिरवणे कसे रोखणार? अनेक प्रकरणात साक्षीदार कधी धाकाने तर कधी पैशाने साक्ष बदलतात

In reply to by मराठी कथालेखक

हे 'अनेक' प्रतिसाद आहेत का? आणि त्याच्या पुढेच लिहिलेय ना कि "यातून मार्ग निघाला पाहिजे"... मी आणि विशुमितनी पण तेच लिहिलंय. हा प्रॉब्लेम असणार आहे. त्यावर काहीतरी उपाय किंवा workaround शोधायला हवा.

In reply to by एमी

उगाच वाद घालण्यात मला रस नाही.. मुद्दा हा आहे की नितीन आगे प्रकरणात ढिसाळपणा झाला आहे, राज्य सरकारने उज्वल निकम सारखे ज्येष्ठ वकील इथे लावले नाहीत. आणि आता जो अन्याय झाला त्याबद्दलही मुख्यमंत्री वा अन्य कुणी नेते एक चकार शब्द बोलले नाहीत की त्यांना काही खंत वाटली नाही (निदान माझ्या वाचनात तरी आले नाही) हे महाराष्ट्राचे आणि जातीभेदविरहीत समाजाची स्वप्न बघणार्‍या सर्वांचेच दुर्देव. असो. यापुढे नवीन मुद्दा असल्याखेरीज चर्चा रेटण्यात मला रस नाही. धन्यवाद.

In reply to by मराठी कथालेखक

महान आहात आपण! जातीचा विषय निघाला कि विचारांचे ध्रुवीकरण एका दिशेला किती लगेच होते हेच दिसून येतंय यातून! ते पूर्ण वाक्य देतो पुन्हा इथे.. तोडून जे सोयीस्कर घेतलंय आपण...
नितीन आगे प्रकरणात न्याय मिळाला पाहिजेच, पण साक्ष फिरवणे कसे रोखणार? अनेक प्रकरणात साक्षीदार कधी धाकाने तर कधी पैशाने साक्ष बदलतात. यातून मार्ग निघाला पाहिजे, आरोपीना जातीचे अधिष्ठान मिळवून द्यायचा हा जो प्रकार तुम्ही करत आहेत तो अत्यंत दुर्दैवी आहे.
हा प्रतिसाद लिहिणार्याची जात कुठली आहे हा विचार न करता वाचला तर यातून कोण हा महान शोध लावू शकेल कि..
'उच्च जातीतल्या मुलीकडे बघण्याचा प्रमाद करतो काय.. अशीच शिक्षा पाहिजे त्या मुलाला'
म्हणजे विचारांचा कल बघा तुमचा कुठे चाललाय, अवघड आहे राव! आणि परत म्हणताय "मला वाद नकोय?" साक्षीदाराने साक्ष फिरवणे हि गोष्ट फार काळापासून डोकेदुखी ठरलेली आहे, पोलिसांना दिलेले स्टेटमेंट ग्राह्य होत नाही आणि मग अचानक न्यायालयात साक्षीदार साक्ष फिरवतो आणि सगळ्या प्रकारावर पाणी फिरते... मी हेच लिहिले होते कि कधी साक्षीदार पैश्याच्या आमिषाने, कधी धाकाने तर कधी न्यायालयाबाहेरच्या तडजोडीने साक्ष बदलतात! न्याय व्यवस्था हे कसे रोखू शकेल यातून मार्ग काढावाच लागेल कारण तुम्हा-आम्हाला काय वाटत यावर प्रकरणाचे निकाल लागत नाहीत ते अशा पुराव्यांवरून आणि साक्षींवरूनच लागतात... यातही तुम्हाला तुमच्या मनासारखे काही दिसले नसेल तर अजून एखादे वाक्य लिहूच शकता! मी मागे एकदा सज्ञान मुलाने किंवा मुलीने त्यांचा जोडीदार (कसला ही असला तरी) निवडला तर त्यात बाकीच्यांनी नाक खुपसण्याचे काही कारण नाही हे एका धाग्यावर लिहिले होते तर "इथलेच" संस्कृतीरक्षक धावून आले होते. मला मुलं-मुलींची "जात" किंवा "धर्म" कोणता असावा याबाबत आपत्ती नाही. पण इथे आता मराठा समाजावर तोंडसुख घेणारे पलीकडे धाग्यावर मुस्लिम तरुणांसोबत लग्न करू नका हा संदेश देत फिरत आहेत! असला दुतोंडीपणा इथलेच काही निर्लज्ज आयडी करू शकतात आणि तरी पण ते सन्माननीय वगैरे असतात...

In reply to by शब्दबम्बाळ

यांच्या लेखी स्त्रिया मूर्ख, यांच्या लेखी मुस्लिम ख्रिश्चन देशद्रोही, यांच्या लेखी मराठा जातीयवादी, यांच्या लेखी बहुजन हे मेरिट नसलेले व सरकारी जावई, अजून खूप लिस्ट आहे... आणि हो, ज्ञानवंत विचारवंत बुद्धिवंत प्रातःस्मरणीय हेच, ... सकाळी उठून आरश्यात बघून स्वतः चीच आरती उतरवून, आरशाला टिळा लावणारे हेच... सकाळी उठून एक पळीभर गोमूत्र सेवन करून, पूर्व दिशेस आपले मुख करून, लॅपटॉपवर धर्माचे रक्षण करणारे हीच ती पिलावळ....

In reply to by पगला गजोधर

प.ग?, पण हे जे कोणी आहेत ते आरशाला टिळा लावतात ते तुम्हाला कसं कळलं? त्यांच्या आरशात तुम्ही डोकावून पाहायला गेलात आणि दिसायला नको ते दिसलं. बरोबर ना? आ.न., -गा.पै.

In reply to by शब्दबम्बाळ

मला कुणाशी व्यक्तिगत वाद करण्यात काडीचा रस नाही. तसेच कोणत्याही जाती धर्माबद्दल मला कोणताही आकस नाही. माझे काही अगदी जवळचे मित्र जातीने मराठा आहेत. खरं तर मी जात -धर्म काही मानतही नाही. आंतरजातीय / आंतरधर्मीय लग्नाबद्दलही माझा काहीच आक्षेप नाही... हिंदू काय मुस्लिम काय कुणीही कुणाशीही लग्न करावे आनंदात रहावे. पण त्याचवेळी तथाकथित उच्च जातीतले लोक आपल्या घरातील मुलीशी कनिष्ठ समजल्या जाणार्‍या जातीतल्या मुलाने प्रेम केले तर त्याचा जीव घेतात याने तीव्र संताप होतो. आणि काही लोकांचे याला (मला इथे कोणताही मिपाकर अभिप्रेत नाही... पण तुम्ही समाजात लोकांशी बोललात तर तुम्हाला हे नक्कीच आढळेल) उघड वा छुपे समर्थनही दिसून येते हे दुर्देव. 'उच्च जातीतल्या मुलीकडे बघण्याचा प्रमाद करतो काय.. अशीच शिक्षा पाहिजे त्या मुलाला' हा अर्थ मी तुमच्या प्रतिसादातून काढलेला नाही. पण ही भावना समाजात तुम्हाला बर्‍याच प्रमाणात आढळेल ...काही जण अशी टोकाची प्रतिक्रिया व्यक्त करतील तर काही जण थोडं सौम्यपणे म्हणतील "पण त्या मुलाचंही चुकलंच.. आता गावात रहातो तर जात पात कळत नाही का त्याला.. प्रेम करताना थोडा विचार करायला हवा ना" . ..(कृपया मला विदा मागू नका.. .. त्या ऐवजी लोकांशी बोला.) एक उदाहरण सांगतो.. माझ्या मित्राचं... तो जातीने कुंभार आणि त्याचा प्रेमविवाह झालेला. एकदा बोलताना तो मला सांगत होता की त्याच्या धाकट्या भावाचे एका मुलीवर प्रेम होते आणि त्याला ते कळाले तसे त्याने भावाला आणि त्या मुलीला बोलावून समजावले आणि संबंध तोडायला लावले...मी त्याला सहज विचारले "तू प्रेमविवाह केला आणि भावाच्या प्रेमात मात्र मोडता घातलास रे.." त्यावर तो म्हणाला "अरे तसं नाही.. ती मुलगी मराठा होती. त्यामुळे ते प्रेम सफल झाले नसतेच ..पण उगाच सगळ्या घरादारावर नस्ती आफत ओढावली असती" .. ही भिती कुठून आली ? वर सांगितल्याप्रमाणे इथे मी कुणा मिपाकराबद्दल बोलत नसून समाजात जे पाहत आहे त्याबद्दल बोलत आहे. कोणता मिपा सदस्य काय विचार करतो, कोणत्या जातीचा आहे , जातीयवादी आहे की नाही वगैरे जाणून घेण्यात मला रस नाही. तरी तुमच्या प्रतिसादाचा संदर्भ घेतला गेल्याने जो गैरसमज झाला त्याबद्दल क्षमस्व.

In reply to by मराठी कथालेखक

प्रतिसादाशी सहमत... म्हणूनच धर्म व जातीच्या नावाखाली चाललेली दलाली नष्ट व्हावी... किंवा लोकांनी धर्म व जातीच्या अफूबाजीतून जागे व्हावे...

In reply to by विशुमित

एकाच प्रकारच्या दोन घटनांचे वेगवेगळे निकाल लागल्याने अशी शंका निर्माण होणे साहजिकच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

एकाच प्रकारचे कसे काय ? गृहमंत्र्यांचे अपयश आहे हे. दोन्ही प्रकरणे सामान पातळीवरती त्यांनी का हाताळली नाहीत? त्यांच्यावर कोणत्या जातभाईंचा दबाव होता? हे स्पष्ट केले पाहिजे सरकारी प्रवक्त्यांनी. (सरकारी प्रवक्ता तुम्हाला उद्देशून नाही म्हणत मी, गैरसमज नसावा) तुम्ही फक्त दोन्ही प्रकरणाला जातीय रंग देत आहात अशी शंका निर्माण होणे साहजिकच आहे.

In reply to by विशुमित

दोन्ही प्रकरणातील गुन्हे बरेचसे एकसारखे असले तरी त्यात संपूर्णपणे परस्परविरोधी गोष्टी असल्याने (निकाल, आरोपी व गुन्ह्याचे बळी) जातीय रंग दिसणे स्वाभाविकच आहे.

न्यायालयाच्या निकलांना जाती-पातीचा रंग देवून वाद विवाद घालणे खरच संयुक्तिक आहे का? आपला वैयक्तिक मुद्दा पटवून देण्यासाठी आपण न्याय व्यवस्थेला च कटघर्यात् उभ करण्याचा प्रमाद करत आहोत, किमान याच तरी भान ठेवायला नको का? काही प्रकरणात न्यायलयाने न्याय दिला नसल्याची भावना काहिनी याठिकानि मांडली.. भेद झाला असल्याचा गंभीर आरोप ही करण्यात आला.. पण न्याय व्यवस्थेत भेदाभेद असता किंव्हा जाती किंव्हा पैशावर न्याय झाला असता तर.. मुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तिना न्यायल्यात हजर राहवे लागले नसते.. एका साध्या पत्रावरुन रामरहिम सारखा बाबा जेरबंद झाला नसता.. न्याय जर धर्मा समोर झुकला असता तर आसाराम तुरुंगात खितपत पडला नसता. अशी एक नाही लाखो.. होय मी 'लाखो' च म्हणतोय उदाहरणे आहेत... आणि म्हणुन आजही न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास कायम आहे. न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी बांधली असल्याने न्यायदेवता आंधळी असते..असे म्हटले जाते. परंतु हे अंधत्व दिसत नसल्यामुळे नसते, तर कर्तव्यनिष्ठेतेसाठी त्याचा अंगीकार केलेला असतो. जेव्हा कोर्टात न्याय मागण्यासाठी एखादा खटला उभा राहतो तेव्हा न्यायदेवतेने उघड्या डोळ्यांनी पाहताना आपला परका असा भेद न करता निपक्षपातीपणे नैसर्गिक न्याय द्यावा.. न्याय देत असताना न्यायदेवतेने कर्तव्यकठोर असावे. याच भावनेतून न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधली जात असावी!

In reply to by अँड. हरिदास उंबरकर

न्यायव्यवस्थेपेक्षा तपासयंत्रणा पक्षपाती तपास करतात असे या घटनांवरून दिसते आहे. शेवटी न्यायाधीशांना समोर ठेवलेल्या पुराव्यांवर आधारीतच निर्णय द्यावा लागतो. समोर ठेवलेले पुरावेच संशयास्पद असतील तर निकाल त्यानुसारच लागणार.

In reply to by श्रीगुरुजी

न्यायव्यवस्थेपेक्षा तपासयंत्रणा पक्षपाती तपास करतात असे या घटनांवरून दिसते आहे. शेवटी न्यायाधीशांना समोर ठेवलेल्या पुराव्यांवर आधारीतच निर्णय द्यावा लागतो. समोर ठेवलेले पुरावेच संशयास्पद असतील तर निकाल त्यानुसारच लागणार.
जस्टीस लोया यांचा संशयास्पद मृत्यू, व त्यानंतर च्या न्यायमूर्तींनी दिलेला निकाल, हे याचे उत्कृष्ठ उदाहरण आहे.

In reply to by पगला गजोधर

जस्टीस लोया यांचा मृत्यू अजिबात संशयास्पद नाही हे त्यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्याबरोबर उपस्थित असलेल्या सहका-यांनी स्पष्ट केले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

जस्टीस लोया यांचा मृत्यू अजिबात संशयास्पद नाही हे त्यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्याबरोबर उपस्थित असलेल्या सहका-यांनी स्पष्ट केले आहे.
संदर्भ द्या.. उलट पत्नी व मुलाला धाक दाखवून मुस्कटदाबी केलीये, त्यांच्या सख्या डॉ बहिणीवर पण दबाव टाकण्यात येतोय, तरीही त्या खंबीरपणे उभ्या आहेत.

In reply to by पगला गजोधर

ही बातमी २६ नोव्हेंबरची आहे. इंडियन एक्स्प्रेसने या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून २८ नोव्हेंबरला या प्रकरणातील सत्य परिस्थिती प्रसिद्ध केली आहे. त्यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या सहकार्‍यांशी बोलून व रूग्णालयातील संबंधितांशी बोलून परिस्थिती जाणून घेतली आहे. न्यायाधीश लोया यांच्या मृत्युच्या वेळी व त्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांचे जे सहकारी न्यायाधीश होते त्या सर्वांनी या मृत्युसंबधात काहीही काळेबेरे नाही व त्यासंबंधाने आधी प्रसिद्ध झालेल्या बर्‍याचशा गोष्टी असत्य आहेत हे स्पष्ट केले आहे. या प्रकरणात काहीही काळेबेरे नाही असे लोयांच्या कुटुंबियांनी देखील स्पष्टपणे सांगितले आहे. ३ वर्षांपूर्वी लोयांचा मृत्यु झाल्यानंतर अचानक ३ वर्षानंतर त्याबद्दल संशय व्यक्त करणे, त्याच्याशी अमित शहांचा संबंध जोडणे, अमित शहा गुजरातचे असणे आणि दोन आठवड्यात गुजरातची निवडणुक असणे हे बिंदू जोडले तर चित्र पूर्णपणे स्पष्ट होते.

In reply to by पगला गजोधर

कॅरॅव्हॅनमधील वृत्तांतात ज्या शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या, त्यावर इंडियन एक्स्प्रेसने शोध घेऊन त्यातील फोलपणा दाखवून दिला आहे. इंडियन एक्सप्रेस मध्ये यावर सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध झाल्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर ३ वर्षांनी जागे झालेल्या शंकाखोरांची तोंडे बंद झाली आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

सर्वोच्च न्यायालयात ४ न्यायाधीशांनी, अभूतपूर्व मार्ग चोखाळत सर्व काही आलबेल नाही याची चुणूक दाखवलीये, जस्टीस लोया मृत्यू प्रकरणी बर्याच संशयास्पद बाबी आहेत हेच यातून अधोरेखित होतंय.

In reply to by पगला गजोधर

>>> जस्टीस लोया मृत्यू प्रकरणी बर्याच संशयास्पद बाबी आहेत हेच यातून अधोरेखित होतंय. नक्की कोणत्या बाबी संशयास्पद आहेत आणि नक्की कसं हे अधोरेखित होतंय?

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी तु म्ही कशाला "प ग" शी वाद घालत बसलाय? कोणत्याही धाग्यात भाजप द्वेष आणल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आता हा धागा कोपर्डी वर असताना जस्टीस लोया यांच्या मृत्यू बद्दल काडी टाकलीच कि नाही. "चष्मा" घातला कि असंच होते.

In reply to by सुबोध खरे

त्यांच्या प्रत्येक प्रतिसादातून भाजप द्वेष आणि ब्राह्मणांविरूद्ध विखार अगदी ओथंबून वाहत असतो. त्याला प्रत्त्युत्तर देणे आवश्यक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

४ जजेसच्या पत्रकार परिषदेतील, विचारले गेलेले प्रश्न व त्याची जजने दिलेली उत्तरे पहा गुर्जी.

In reply to by श्रीगुरुजी

नयी दिल्ली : सुप्रीम कोर्ट के चार सीनियर जजों ने मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा पर आज एक प्रेस कान्फ्रेंस कर गंभीर आरोप लगाये. मुख्य न्यायाधीश के बाद सुप्रीम कोर्ट के सबसे वरिष्ठ जज जस्ती चेलमेश्वर की अगुवाई में चार जजों ने मीडिया से बात की और वे मुद्दे गिनाये जो विवाद की वजह हैं. चारों जजों ने कहा कि उन्होंने मुख्य न्यायाधीश को समझाने की कोशिश की, लेकिन वे विफल रहे. ऐसे में वे मीडिया के सामने आकर अपनी बात कह रहे हैं, ताकि आने वाले दिनों में कोई यह नहीं कहे कि हमने अपनी आत्म बेच दी है. चारों जजों ज्यूडिशयल आर्डर, एडमिनिस्ट्रेटिव फैसले के मुद्दे उठाये. इस पूरे मामले में विवाद की एक बड़ी वजह जज बीएच लोया (बृजगोपाल हरकिशन लोया) का केस माना जा रहा है. आज इस संबंध में पत्रकारों ने जब जजों इस संबंध में सवाल पूछा कि क्या यह मामला जज लोया से भी संबंधित है, तो जस्टिस रंजन गोगई ने कहा : जी हांं.

In reply to by पगला गजोधर

या मधून "जस्टीस लोया मृत्यू प्रकरणी बर्याच संशयास्पद बाबी आहेत हेच यातून अधोरेखित होतंय." हे कोठे दिसतंय?

In reply to by पगला गजोधर

त्या मातृभक्त गोगोयाचा बाप काँग्रेसचा आसाममधला मुख्यमंत्री होता नि आता त्यांच्या पार्श्वभग्तावर तिथे लाथ पडली आहे. लाथेची कळ अजून गेलेली नाही. अत्यंत निरुपयुक्त, निर्बुद्ध आणि लग्गेबाजीने सुप्रिम कोर्टात धाडलेली ही खद्रावळ कधी ना कधी वापरायची होती. डायरेक्टच चीफ जस्टीस अपॉइंट करता येईना म्हणून कॉलेजियम विकत घेतलं. लोयाचा विषय या चौघांनी चिफ जस्टिसला दिलेल्या कोणत्याही पत्रात नव्हता. कोणत्याही चर्चेत नव्हता. तरी या गाढव गोगोईने तिथेच पेरलेल्या पत्रकाराच्या नेमक्या या प्रश्नाला इतर तीन न्यायाधीशांचे लक्ष नसताना "यस" हे उत्तर दिले. या गाढवाचा लोयावरचा "यस" हा शब्द नसता या प्रकरणात सरकारला दुरान्वयेही संबोधता, जोडता आलं नसतं. पण बाप काँगी, पोरगं कॉगी म्हणून गोगोई खाल्ल्या मिठाला जागला. इतर तीन न्यायाधीशांचे वातावरण निर्मिती करून कान भरण्याचे कामही याच "पेरलेल्या जजाने" केले असावे. शिवाय बेंच नीट अलोकेट होत नाही म्हणायचा या गाढवाला तरी अधिकार नाही, कारण याचे काँग्रेसमधे इतके हात आहेत कि लोयाची केस याच्याकडे जाऊच शकत नाही. शिवाय हे घ्या - http://www.hindustantimes.com/punjab/cji-s-son-congress-leaders-among-7… ----------------------- शिवाय त्यानं इतक्या बेरकीपणानं तो अणुबॉम्ब टाकला कि उद्या मी असं म्हणालोच नाही, मी तिसर्‍याच वाक्याला "यस" म्हणत होतो असं तो म्हणू शकतो. मंजे आग लावून नामानिराळा.

In reply to by जानु

आरसा कधी खोट बोलू शकत नाही; पण जेव्हा सद्‌सद्विवेक बुद्धी खूप खोलवर गाडून टाकल्या जाते, तेव्हा आरसा जे काही दाखवतोय, ते पाहणं सोपं नसतं..!

In reply to by जानु

पण तो स्वतंत्र धाग्याचा विषय होईल.. शिवाय त्या भ्रष्टाचाराबद्दल काही बोलायचे म्हणजे 'न्यायालयाचा अवमान' वगैरे होवून लिहिणार्‍यावरच कारवाई होण्याची भीती.

In reply to by मराठी कथालेखक

"न्यायालयाचा अवमान" हा कागदी वाघ आहे. तुम्ही "पुराव्यासहित" सत्य बोलत असलात तर न्यायाधीशांची पण अवमान हे अस्त्र उगारण्याची हिम्मत होत नाही. जस्टीस सीरियाक जोसेफ यांनी आपल्या तीन वर्षाच्या कालावधीत फक्त सात निवाडे लिहिले http://strippedlaw.blogspot.in/2013/03/why-justice-cyriac-joseph-does-n… या महाशयांनी सर्वोच्च न्यायालयात बढती मिळण्याच्या अगोदर सुनावणी केलेल्या १०५ खटल्यात निकाल राखून ठेवलेला होता तो निकाल न लिहीताच हे महाशय बढती वर निघून गेले आणि या १०५ खटल्यातील फिर्यादी आरोपी यांचा बहुमूल्य असा पैसा आणि वेळ वाया गेला कारण हे खटले परत सुनावणीस घ्यावे लागले. याच महाशयांना निवृत्तीनंतर TDSAT वर अध्यक्ष म्हणून पाठवायचे घाटत होते. पण एकंदर यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्यावर बरेच आक्षेप घेतले गेले म्हणून त्यांची मानवाधिकार आयोगावर वर्णी लावण्यात आली. https://economictimes.indiatimes.com/industry/telecom/controversy-on-ap… https://thewire.in/3843/he-gave-only-7-judgments-in-3-years-so-how-did-… हि सर्व खिरापत या महाशयांना अशासाठी मिळाली कारण हे "ख्रिश्चन" होते. न्यायालयाची कॉलेजियम पध्द्तीवर टीका करताना महाधिवक्ता श्री मुकुल रोहटगी यांनी वरील आरोप केले तेंव्हा त्यांना मुख्य न्यायाधीश जस्टीस ठाकूर यांनी "न्यायालयाच्या अवमानाबद्दल" सुनावले असताना श्री रोहटगीनी स्पष्ट शब्दात मुख्य न्यायाधीशांना आव्हान दिले कि मी सत्य तेच बोलतो आहे आणि हिम्मत असेल तर तुम्ही माझ्या विरुद्ध कारवाई करून दाखवा. जस्टीस करणन यांची सुरस आणि चमत्कारिक कथा तर सर्वश्रुत आहेच. श्रींमती जयललिता या मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयाने संप हा तुमचा मूलभूत अधिकार नाही हा निवाडा देताना केलेल्या अतिरिक्त टिप्पणीवर बोलताना श्री सोली सोराबजी यांनी स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाला सुनावले होते कि तुम्ही सर्वोच्च असलात म्हणजे तुम्ही स्खलनशील नाही ( INFALLIABLE) असे समजू नका. त्यांची हात लावण्याची न्यायासनाची हिम्मत झाली नव्हती तुम्हाला भीती वाटत असेल तर राजीनामा देऊन घरी बसा सांगणाऱ्या मुख्य न्यायाधीश श्री मंजुळा नेल्लुर यांच्या वर टीकेची झोड उठली होती. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/resign-and-stay-at-home… न्यायाधीशांना "पोलीस संरक्षण का दिले जाते" याचे उत्तर द्या असे सार्वजनिक न्यासावर विचारले गेल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी शेपूट घातले होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. तेंव्हा न्यायसंस्था आपण म्हणता तशी निष्पक्ष आणि निरपवाद नाही. कायदा आपल्याला पाहिजे तसा वळवता आणि वाकवता येतो हे संजय दत्त वर लावलेला टाडा रद्द केला तेंव्हा जाणवलेच शिवाय सलमान खान याना खालच्या कोर्टात झालेली शिक्षा एका दिवसात एका न्यायाधीशाने उडवून लावली होती हेही सर्वश्रुत आहे. तेंव्हा न्यायालयात न्याय मिळतो हे अर्धसत्य आहे न्यायालयात जे मिळते त्याला न्याय म्हणायचे हे पूर्ण सत्य आहे.

श्री गुरुजी.. न्यायव्यवस्थेपेक्षा तपासयंत्रणा पक्षपाती तपास करतात .. आपला हा संदर्भ अपवादात्मक केस मधे लागू ही पडू शकतो.. सर्व काही पारदर्शकच आहे, असा दावा करनेही चुकीचे ठरेल.. तपास यंत्रणांच्या हलगार्जिपणामुळे एखाद्या प्रकरणाला योग्य न्याय मिळू शकला नसेल तर त्यासाठी संपूर्ण न्याय व्यवस्थेवर बोट ठेवता येणार नाही.. तपास करणारी यंत्रणा तपासकामी कमकुवत पडली असेल तर हां दोष तपास करणारा अधिकारी किंव्हा त्याच्या टीम ला देण्यात यावा.. नुसता दोष देवु नए तर बेजबदार पना किंव्हा भेदाभेद झाला असेल तर तो शिक्षेसही पात्र ठरेल..पण एकान माती खाल्ली म्हणुन संपूर्ण व्यवस्था मातिखाऊ झाली, अस कस म्हणता येईल..?

नुसार आत्तापर्यंत कोणत्या समाजातल्या लोकांवर जास्तीत जास्त खटले दाखल झाले आहेत हे बघितलं तर कोणता समाजातले लोक जास्त जातीयवादी आहेत हे कळेल आणि एक राहिलंच की सैराटच्या वेळेच्या वादाचं काय ? तेव्हा मराठा समाजातल्या काही लोकांनी जी वक्तव्य केली होती ती अगदी संतवचनेच होती जणू.

In reply to by अभिदेश

केसेस गुन्हा केलेल्या व्यक्तिवर दाखल होतात.. 'न्याय' आणि 'न्याय्य' चर्चेत 'सैराट' कोठुन आला बुवा?

In reply to by अभिदेश

गावगाड्यात आजही मराठा मात्तबर आहेत हे सत्य आहे.सैराटच्या वेळेस "मराठ्याशी वाकडं म्हणजे नदीवर लाकडं " असले मेसेज मराठा समाजाचे सुशिक्षीत तरुण फिरवत होते.इतकं स्पष्ट लीहु नये खरे तर,संस्थळाचे नियम आहेत.पण वर उघड चर्चा चालू आहे म्हणून भाग घेत आहे.

In reply to by सिंथेटिक जिनियस

सैराट चित्रपट म्हणून ठीक आहे.. यावर त्यावेळी मी एक लेख ही लिहला होता..मनोरंजन हां भाग समजून घेता येईल.. पण यातून जाती भेदाची बीजे पेरली जावु नयेत...जातिनिर्मूलनासाठी फुले, शाहू, आंबेडकरांनी निर्माण केलेल्या मार्गावर काटे पेरण्याचे काम सुरूच राहिले तर ही वाट आपल्याला रक्तपावलांनी तुडवावी लागेल, हाच आशय त्याचा होता. या मुद्द्यावर अधिक चर्चा करुण आपणही काटे पेरणाऱ्यात सामिल होऊ नये, हे माझे मत आहे.

खैरलांजी, सोनई, नितीन अागे, रमेश किणी, काळवीट... या साऱ्या प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांनी निष्पक्षरीत्या काम करून न्यायव्यवस्थेला मदत करायला हवी होती. -(जातीभेद न मानणारा आणि कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसलेला) मयुरेश

In reply to by mayu4u

रास्त अपेक्षा आहे.. तपास यंत्रणानि आपल् काम चोख केल असत तर याही प्रकरणात न्याय झाला असता.. याच धाग्यावर न्यायव्यवस्थेत ज्या काही त्रुटी आहेत त्यावर ही भाष्य करण्याचा प्रयत्न लेखात केला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

चांगला लेख आहे.
कोपर्डीतील ती दुदैवी युवती आपली भगिनी होती असे वाटणारयांनाच "नितीन हादेखील आपला भाऊ आहे; असे का वाटत नाही,’ हाच खरा प्रश्न आहे.
हे भावनिक आवाहन आवडलेच पण खालील वाक्य विचार करायला लावणारे आहे.
"आपली जात हा प्रभावी दबावगट नाही. यामुळे या व्यवस्थेत आपल्याला न्याय मिळत नाही,' अशी भावना होऊन उर्वरित समाजापासून एखादा समुदाय दुभंगला आणि लोकशाही संकेतात बसत नसलेल्या मार्गाकडे ओढला गेला; तर त्याची जबाबदारी आपण एक व्यवस्था म्हणून स्वीकारणार आहोत काय?

In reply to by मराठी कथालेखक

नक्षली कोण आहेत मग? आधी आदीवासींना ॲट्रॅक्ट करणारी नक्षल चळवळ आज दलितांनाही आकर्षीत करत आहे .उद्या भटके विमुक्तही तिकडे गेले तर कहर होईल. पोचीराम कांबळेचा मुडदा पाडणार्या मराठा जात दांडग्याचा नंतर कांबळेच्याच मुलाने कुर्हाडीने तुकडे करुन न्याय केला व एक वर्तुळ पुर्ण केले. येणार्या काळात अशीच आदिम न्यायपद्धती येऊ घातली आहे.आपल्याला त्यात अप्परहॅन्ड मिळेल या गैरसमजात उच्चजातीतील जातदांडगे असतील तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे.