ह्या पुस्तकाबद्दल रविवार ७ मे २००६ रोजी सकाळ मध्ये परिक्षण आले होते ते जसेच्या तसे देत आहे. गोपाळ जोशी यांनी ते लिहीले होते.
जगण्याची उमेद वाढविणारे...
आपले भवितव्य आपल्याच हातात असते, असे नेहमी सांगितले जाते. जगातल्या यच्चयावत कर्तृत्ववान माणसांचे जीवनचरित्र नुसते नजरेखालून घातले, तरी ही बाब स्पष्ट होईल. पंधराव्या शतकात रंगभूमीवर अफाट प्रयोग करणारा नाटककार विल्यम शेक्सपिअर असो किंवा आपल्या विनोदाने सर्व जगाला वेडा करणारा चार्ली चॅप्लीन असो, कंदील आणि नांगर विकता विकता रयत शिक्षणसंस्था उभी करणारे द्रष्टे कर्मवीर असोत किंवा मॅट्रिकला नापास झाल्यावर उदबत्या विकून चरितार्थ चालविणारे अण्णा माडगूळकर असोत, अशी कर्तृत्ववान माणसेच आपल्या जगण्याला खरे बळ देत असतात. जगण्याची उमेद वाढवतात आणि आपले आयुष्य समृद्ध करतानाच आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवतात. अरुण शेवते यांनी संपादित केलेले "हाती ज्यांच्या शून्य होते,' हे पुस्तक अशाच कर्तृत्ववान माणसांची कहाणी सांगते.
कर्तृत्ववान माणसांचे वैभव सर्वांनाच दिसत असते. या वैभवाने क्वचित काळ दिपूनही जायला होते; परंतु या वैभवाच्या मागेही कधी काळी एक अंधार होता, याचा सर्वांनाच विसर पडतो. या अंधाराला छेद देत ही माणसे हे वैभव खेचून आणतात. त्यांचा हा संघर्षच शेवते यांच्या पुस्तकाचा गाभा आहे. अब्राहम लिंकन, शेक्सपिअर, चार्ली चॅप्लीन, ग्रेटा गार्बो, स्टीव्ह जॉब्स या परदेशी व्यक्तींबरोबरच लक्ष्मणराव किर्लोस्कर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, ग.दि.मा., गुलजार, सुधीर फडके, निळू फुले, सुशीलकुमार शिंदे, यशवंतराव गडाख या देशी मातीतल्या माणसांचा संघर्षही वाचायला मिळतो. तो जसा रंजक आहे, तसाच प्रेरणादायीही.
या व्यक्तींनी लिहिलेल्या आत्मचरित्रांतील वेचे किंवा त्यांच्याविषयीचे लेख या पुस्तकात संकलित केले आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक कर्तृत्ववान माणसांची किमान तोंडओळख का होईना पण होते. यातले विष्णुपंत छत्रे, ग्रेटा गार्बो असे काही लेख तर संदर्भांच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणारे आहेत. मुख्य म्हणजे "आपणही आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकतो,' असा आशावाद हे पुस्तक जागवते.
- नाटक्या
उत्तम परिचय.
असाच आशय असलेले एक पुस्तक ४-५ वर्षांपूर्वी वाचनात आले होते. नाव बहुधा - नापास मुलांची कथा (चुभुद्याघ्या).
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
थोडक्यात पुस्तक परिचय आवडला.
पुर्वीची लोकसंख्या [जुन्या मंदी, दुष्काळ, आपत्ती काळची] व ह्यावेळची लोकसंख्या यामुळे यशस्वी संघर्षाबरोबर अपयशी गाथा किती ऐकायला मिळणार हे येणारा काळच सांगेल. निदान यावेळी तरी लोकसंख्येचे महत्व पटेल व जन्मदर खाली येतो का हे पुढच्या जनगणनेत कळेल. यावेळी चांगला पाउस व अन्नधान्याचे उत्पादन होवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
मी यादी बनवत आहे. आई येणार आहे मे मध्ये तेव्हा तिला आणायला सांगणार आहे.
हे पुस्तक या यादीत समाविष्ट केलं आहे आता.
धन्यवाद विकासदा.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अरे वा प्राजू ताई, क्या बात है! म्हणतात ना आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन... माझा विचार चालला होता विकासरावांकडून पुस्तक घेण्याचा. पण आता तुमच्यकडेच येत आहे तर त्यांना मेला-मेलीचा त्रास कशाला! ;)
एका विकांतासाठी या पुस्तकाची बुकींग पक्की बरं का आपल्यासाठी :)
आपला,
(शुन्य) भास्कर
एका चांगल्या पुस्तकाचा परिचय करुन दिला आहे .
हा उपक्रम खरच चांगला आहे ... कारण पुस्तके आणायला गेले असता बर्याचवेळा प्रसिद्ध लेखक किंवा प्रकाशनांचीच पुस्तके पाहिली जातात .. आणि अशी चांगली पुस्तके नकळत दुर्लक्षित राहतात..
एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. मागे एकदा 'नापास मुलांची गोष्ट' वाचलं होतं (पण त्यापुढे काही आठवत नाही.)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
लेख , पुस्तक परिचय आवडला. "रॅग्स टू रिचेस" हे अनेकानेक कथा-कादंबर्यातून दिसणारे सूत्र आहे. शून्यातून यशाकडे झालेली कुणाचीही वाटचाल ही प्रेरणादायी वाटावी अशीच आहे.
सर्व प्रतिक्रीयांना धन्यवाद!
आपल्याला जे काही नवीन माहीती होईल/आवडेल याची माझ्यासकट येथील सदस्यांनी एकमेकांना देण्याचा प्रयत्न सर्वांनीच करावा असे वाटते.
जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी द्यावे ॥ शहाणे करोनी सोडावे । सकळजन ॥
एक संवेदनशील कवी आणि लेखक म्हणून सुपरिचित आहेत.
माफ करा, पण मला वाटते की सर्व कवी आणि लेखक संवेदनशीलच असतात. ते तसे नसतील तर कवी किंवा लेखक होऊच शकत नाहीत.
विकास भाउ आपन या पुस्तकाबद्द्ल सन्गितले ते मी गेव्ले ४ दिवसापसुन मित्राकदुन घेउन वाचत आहे... त्याबद्द्ल धन्यवाद..
पन मला अशा आनेक युगपुरुशान्ची आत्मचरित्रे हवी आहेत क्रुपय त्या पुस्तकान्ची नावे द्या.. आपला- प्राणान्जय.
vap
विकास भाउ आपन या पुस्तकाबद्द्ल सन्गितले ते मी गेव्ले ४ दिवसापसुन मित्राकदुन घेउन वाचत आहे... त्याबद्द्ल धन्यवाद..
पन मला अशा आनेक युगपुरुशान्ची आत्मचरित्रे हवी आहेत क्रुपय त्या पुस्तकान्ची नावे द्या.. आपला- प्राणान्जय.
vap
प्रतिक्रिया
सकाळ मधले परिक्षण
मस्त
छान
पुस्तक
सुरेख पुस्तक ओळख.
अरे वा!
हरकत नाही..
डीएसके
धन्यवाद !
हाती
हेच...
एका
'नापास मुलांची गोष्ट'
पुस्तकाचा
रॅग्स टू रिचेस
+१
सुंदर
छान परिचय
छान !
जियो
धन्यवाद
हे पुस्तक मी वाचलेले आहे..
वा.. सुंदर
चांगला परिचय!
एक
काही युगपुरुशन्च्या आत्मचरित्रे (पुस्तके)... माहीती
काही युगपुरुशन्च्या आत्मचरित्रे (पुस्तके)... माहीती
पुस्तकाची ओळख आवडली
+१
पुस्तक
आवडलेले परि़क्षण!