✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हाती ज्यांच्या शून्य होते

व
विकास यांनी
Tue, 03/03/2009 - 05:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14408 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

सकाळ मधले परिक्षण

नाटक्या
Tue, 03/03/2009 - 06:13 नवीन
ह्या पुस्तकाबद्दल रविवार ७ मे २००६ रोजी सकाळ मध्ये परिक्षण आले होते ते जसेच्या तसे देत आहे. गोपाळ जोशी यांनी ते लिहीले होते. जगण्याची उमेद वाढविणारे... आपले भवितव्य आपल्याच हातात असते, असे नेहमी सांगितले जाते. जगातल्या यच्चयावत कर्तृत्ववान माणसांचे जीवनचरित्र नुसते नजरेखालून घातले, तरी ही बाब स्पष्ट होईल. पंधराव्या शतकात रंगभूमीवर अफाट प्रयोग करणारा नाटककार विल्यम शेक्सपिअर असो किंवा आपल्या विनोदाने सर्व जगाला वेडा करणारा चार्ली चॅप्लीन असो, कंदील आणि नांगर विकता विकता रयत शिक्षणसंस्था उभी करणारे द्रष्टे कर्मवीर असोत किंवा मॅट्रिकला नापास झाल्यावर उदबत्या विकून चरितार्थ चालविणारे अण्णा माडगूळकर असोत, अशी कर्तृत्ववान माणसेच आपल्या जगण्याला खरे बळ देत असतात. जगण्याची उमेद वाढवतात आणि आपले आयुष्य समृद्ध करतानाच आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवतात. अरुण शेवते यांनी संपादित केलेले "हाती ज्यांच्या शून्य होते,' हे पुस्तक अशाच कर्तृत्ववान माणसांची कहाणी सांगते. कर्तृत्ववान माणसांचे वैभव सर्वांनाच दिसत असते. या वैभवाने क्वचित काळ दिपूनही जायला होते; परंतु या वैभवाच्या मागेही कधी काळी एक अंधार होता, याचा सर्वांनाच विसर पडतो. या अंधाराला छेद देत ही माणसे हे वैभव खेचून आणतात. त्यांचा हा संघर्षच शेवते यांच्या पुस्तकाचा गाभा आहे. अब्राहम लिंकन, शेक्सपिअर, चार्ली चॅप्लीन, ग्रेटा गार्बो, स्टीव्ह जॉब्स या परदेशी व्यक्तींबरोबरच लक्ष्मणराव किर्लोस्कर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, ग.दि.मा., गुलजार, सुधीर फडके, निळू फुले, सुशीलकुमार शिंदे, यशवंतराव गडाख या देशी मातीतल्या माणसांचा संघर्षही वाचायला मिळतो. तो जसा रंजक आहे, तसाच प्रेरणादायीही. या व्यक्तींनी लिहिलेल्या आत्मचरित्रांतील वेचे किंवा त्यांच्याविषयीचे लेख या पुस्तकात संकलित केले आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक कर्तृत्ववान माणसांची किमान तोंडओळख का होईना पण होते. यातले विष्णुपंत छत्रे, ग्रेटा गार्बो असे काही लेख तर संदर्भांच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणारे आहेत. मुख्य म्हणजे "आपणही आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकतो,' असा आशावाद हे पुस्तक जागवते. - नाटक्या
  • Log in or register to post comments

मस्त

विनायक प्रभू
Tue, 03/03/2009 - 06:51 नवीन
मस्त लेख्न
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Tue, 03/03/2009 - 07:56 नवीन
उत्तम परिचय. असाच आशय असलेले एक पुस्तक ४-५ वर्षांपूर्वी वाचनात आले होते. नाव बहुधा - नापास मुलांची कथा (चुभुद्याघ्या). Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

पुस्तक

सहज
Tue, 03/03/2009 - 08:07 नवीन
थोडक्यात पुस्तक परिचय आवडला. पुर्वीची लोकसंख्या [जुन्या मंदी, दुष्काळ, आपत्ती काळची] व ह्यावेळची लोकसंख्या यामुळे यशस्वी संघर्षाबरोबर अपयशी गाथा किती ऐकायला मिळणार हे येणारा काळच सांगेल. निदान यावेळी तरी लोकसंख्येचे महत्व पटेल व जन्मदर खाली येतो का हे पुढच्या जनगणनेत कळेल. यावेळी चांगला पाउस व अन्नधान्याचे उत्पादन होवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments

सुरेख पुस्तक ओळख.

प्राजु
Tue, 03/03/2009 - 08:51 नवीन
मी यादी बनवत आहे. आई येणार आहे मे मध्ये तेव्हा तिला आणायला सांगणार आहे. हे पुस्तक या यादीत समाविष्ट केलं आहे आता. धन्यवाद विकासदा.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अरे वा!

भास्कर केन्डे
Wed, 03/04/2009 - 00:54 नवीन
अरे वा प्राजू ताई, क्या बात है! म्हणतात ना आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन... माझा विचार चालला होता विकासरावांकडून पुस्तक घेण्याचा. पण आता तुमच्यकडेच येत आहे तर त्यांना मेला-मेलीचा त्रास कशाला! ;) एका विकांतासाठी या पुस्तकाची बुकींग पक्की बरं का आपल्यासाठी :) आपला, (शुन्य) भास्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

हरकत नाही..

प्राजु
Wed, 03/04/2009 - 02:01 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे

डीएसके

प्रकाश घाटपांडे
Tue, 03/03/2009 - 11:12 नवीन
आता या यादीत डी एस कुलकर्णी यांचे नाव येईल. टेलीफोनला सुगंधी पट्ट्या लावण्याचे काम प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

मनीषा
Tue, 03/03/2009 - 11:15 नवीन
एका चांगल्या पुस्तकाचा परिचय करुन दिला आहे . हा उपक्रम खरच चांगला आहे ... कारण पुस्तके आणायला गेले असता बर्‍याचवेळा प्रसिद्ध लेखक किंवा प्रकाशनांचीच पुस्तके पाहिली जातात .. आणि अशी चांगली पुस्तके नकळत दुर्लक्षित राहतात..
  • Log in or register to post comments

हाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/03/2009 - 18:35 नवीन
हाती ज्यांच्या शून्य होते...पुस्तक उकलून दाखवल्याबद्दल आभार. मिळालं तर चाळुन घेईन हेही पुस्तक.
  • Log in or register to post comments

हेच...

एकलव्य
Fri, 06/19/2009 - 09:29 नवीन
धन्यवाद! अंगठाबहाद्दर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एका

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 18:36 नवीन
एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. मागे एकदा 'नापास मुलांची गोष्ट' वाचलं होतं (पण त्यापुढे काही आठवत नाही.) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

'नापास मुलांची गोष्ट'

विकास
Wed, 03/04/2009 - 00:01 नवीन
'नापास मुलांची गोष्ट' पुस्तकपण अरूण शेवत्यांनीच संपादीत केलेले आहे. पण मी ते वाचलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पुस्तकाचा

रेवती
Tue, 03/03/2009 - 20:39 नवीन
पुस्तकाचा परिचय आवडला. आता पुढच्या भारतभेटीत ही खरेदी नक्की! रेवती
  • Log in or register to post comments

रॅग्स टू रिचेस

मुक्तसुनीत
Wed, 03/04/2009 - 01:26 नवीन
लेख , पुस्तक परिचय आवडला. "रॅग्स टू रिचेस" हे अनेकानेक कथा-कादंबर्‍यातून दिसणारे सूत्र आहे. शून्यातून यशाकडे झालेली कुणाचीही वाटचाल ही प्रेरणादायी वाटावी अशीच आहे.
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/04/2009 - 01:31 नवीन
सहमत!!! छान परिचय. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

सुंदर

शितल
Wed, 03/04/2009 - 08:47 नवीन
सुंदर पुस्तक परिचय :)
  • Log in or register to post comments

छान परिचय

प्रदीप
Wed, 03/04/2009 - 08:56 नवीन
आवडला. अरूण शेवत्यांची काही पुस्तके माझ्या संग्रही आहेतच. हे आता पुढल्या भारतभेटीमध्ये घेतले पाहिजे, ह्याची नोंद करून ठेवत आहे.
  • Log in or register to post comments

छान !

प्रमोद देव
Wed, 03/04/2009 - 09:38 नवीन
पुस्तकाची ओळख छान करून दिलेय.
  • Log in or register to post comments

जियो

विसोबा खेचर
Wed, 03/04/2009 - 10:36 नवीन
जियो विकासराव! सुंदर लेख...! तात्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

विकास
Wed, 03/04/2009 - 19:48 नवीन
सर्व प्रतिक्रीयांना धन्यवाद! आपल्याला जे काही नवीन माहीती होईल/आवडेल याची माझ्यासकट येथील सदस्यांनी एकमेकांना देण्याचा प्रयत्न सर्वांनीच करावा असे वाटते. जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी द्यावे ॥ शहाणे करोनी सोडावे । सकळजन ॥
  • Log in or register to post comments

हे पुस्तक मी वाचलेले आहे..

शक्तिमान
Wed, 03/04/2009 - 20:57 नवीन
खूपच भारी पुस्तक आहे हे... एकदम डेंजर!
  • Log in or register to post comments

वा.. सुंदर

लिखाळ
Wed, 03/04/2009 - 21:07 नवीन
वा.. सुंदर परिचय.. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

चांगला परिचय!

चतुरंग
Wed, 03/04/2009 - 22:51 नवीन
प्रेरणादायी साहित्य वाचायलाच हवे. (जाताजाता - अरुण शेवते हे आमच्या अहमदनगरचे. एक संवेदनशील कवी आणि लेखक म्हणून सुपरिचित आहेत.) चतुरंग
  • Log in or register to post comments

एक

अमोल नागपूरकर
Fri, 03/06/2009 - 10:49 नवीन
एक संवेदनशील कवी आणि लेखक म्हणून सुपरिचित आहेत. माफ करा, पण मला वाटते की सर्व कवी आणि लेखक संवेदनशीलच असतात. ते तसे नसतील तर कवी किंवा लेखक होऊच शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

काही युगपुरुशन्च्या आत्मचरित्रे (पुस्तके)... माहीती

प्रनन्जय
Tue, 06/16/2009 - 14:02 नवीन
विकास भाउ आपन या पुस्तकाबद्द्ल सन्गितले ते मी गेव्ले ४ दिवसापसुन मित्राकदुन घेउन वाचत आहे... त्याबद्द्ल धन्यवाद.. पन मला अशा आनेक युगपुरुशान्ची आत्मचरित्रे हवी आहेत क्रुपय त्या पुस्तकान्ची नावे द्या.. आपला- प्राणान्जय. vap
  • Log in or register to post comments

काही युगपुरुशन्च्या आत्मचरित्रे (पुस्तके)... माहीती

प्रनन्जय
Tue, 06/16/2009 - 14:03 नवीन
विकास भाउ आपन या पुस्तकाबद्द्ल सन्गितले ते मी गेव्ले ४ दिवसापसुन मित्राकदुन घेउन वाचत आहे... त्याबद्द्ल धन्यवाद.. पन मला अशा आनेक युगपुरुशान्ची आत्मचरित्रे हवी आहेत क्रुपय त्या पुस्तकान्ची नावे द्या.. आपला- प्राणान्जय. vap
  • Log in or register to post comments

पुस्तकाची ओळख आवडली

संदीप चित्रे
गुरुवार, 06/18/2009 - 21:07 नवीन
विकत घ्यायच्या यादीत भर टाकली :)
  • Log in or register to post comments

+१

सुबक ठेंगणी
Fri, 06/19/2009 - 08:23 नवीन
असंच म्हणते... विकत घेऊन पुन्हा पुन्हा वाचावं असं पुस्तक वाटतंय! परिचयाबद्दल धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

पुस्तक

यशोधरा
Fri, 06/19/2009 - 09:24 नवीन
पुस्तक परिचय आवडला. आता घरी गेले की नक्की घेईन हे पुस्तक.
  • Log in or register to post comments

आवडलेले परि़क्षण!

उत्खनक
गुरुवार, 03/28/2013 - 12:18 नवीन
आवडलेले परि़क्षण! पुस्तक वाचावे लागणार! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा