पोटापाशी चोरखिसा असलेली धुवट पांढरी
अर्ध्या बाह्याची बंडी, तपकिरी स्वेटर..
निळ्या रेघांचा नाडीवाला पायजमा..
नीळ घातलेला स्वच्छ कॉलरचा पांढरा शर्ट..
आतली बाजू बाहेर केलेली काळी पॅन्ट,
भोकाभोकाचं बनियन..
टोकाची शिवण उसवून उंची वाढवलेली गणवेशाची गडद्द निळी पॅंट..
कधीकाळी सफेद पण आता धुऊनही मळकट दिसणारा
शाईचे डाग पडलेला छोटा शर्ट..
चौकड्या चोकड्यांचा, काखेत उसवलेला लाल काळा फ्रॉक..
काळा परकर, पोलका, निळ्या पिवळ्या सिंथेटिक साडीची घडी
इथे तिथे फाटलेले चार पाच पंचे,
त्यांच्या पोटात लपवलेले आतले कपडे
दोरीवर वाळत घातलेले कपडे
खूप काही सांगून जातात,
घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल..
काव्यरस
वाचने
8674
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे
असे चित्र काही वर्षांपूर्वी
धन्यवाद.
In reply to असे चित्र काही वर्षांपूर्वी by एस
आर्थिक परिस्थिती बेताचीच
कदाचित हो.
In reply to आर्थिक परिस्थिती बेताचीच by पगला गजोधर
त्याचे घरी आश्रित असणारे
In reply to आर्थिक परिस्थिती बेताचीच by पगला गजोधर
खूप छान!
दोरीवर वाळत घातलेले कपडे
सुरेख चित्रदर्शी कविता !
परफेक्ट वर्णन!
In reply to सुरेख चित्रदर्शी कविता ! by चौथा कोनाडा
छान
आत्ताच पाहिली. छान आहे.
In reply to छान by केडी
छान!
शेवट
अशा साध्या विषयावर देखील छान
:)
In reply to अशा साध्या विषयावर देखील छान by चामुंडराय
सुतावरुन स्वर्ग गाठणे म्हणजे हेच...
:)__/\__
In reply to सुतावरुन स्वर्ग गाठणे म्हणजे हेच... by ज्ञानोबाचे पैजार
सुंदर.
चित्रदर्शी वर्णन!
सुंदर!
अप्रतिम लिहिलिय
.....
करता बात. एकदम बुंगाट!
In reply to ..... by अभ्या..
थॅन्क्स डॉक.
In reply to करता बात. एकदम बुंगाट! by प्राची अश्विनी
भन्नाट
आवडली.
सर्वांनाच धन्यवाद!
छान मांडणी!
लोकांना दिसतील अशी वाळत
अप्रतिम कविता प्राची! जीयो :
__/\__
In reply to अप्रतिम कविता प्राची! जीयो : by अजया
सहसा जे न देखे.... च्या