बाबा-बुवा-माताजी यांचा सुळसुळाट
हिंदू विचारपद्धतीत संत या शब्दाला मान आहे, संत ही उपाधी मिळण्यासाठी सज्जन, दुसर्याची दु:खे समजून घेणारा, जमेल तिथे करूणाभाव ठेऊन लोकांना योग्य मार्गावर आणणारा असा माणुस असे सर्वमान्य आहे. आधुनिक महाराष्ट्रात गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज हे दोन रचनात्मक काम उभारणारे, समाजाला योग्य मार्गावर आणणारे संत होऊन गेले. हल्ली मात्र स्वयंघोषीत संत, अध्यात्मिक तारणहार उदंड झालेले आहेत. गेल्या ५ वर्षातच किमान ३ बहुचर्चीत बाबे(आणि त्यांच्या अनुयायांच्या दृष्टीने संत) आपल्या काळ्या कामांमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडले. आसाराम, रामपाल आणि गुरमीत हे ते तिघे.
मिसळपाव